Friday, 10 August 2018

कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबियांची आमदार शंभूराज देसाईंनी घेतली भेट. आर्थिक मदत देणेकरीता शासकीय स्तरावर सुरु असणा-या कार्यवाहीची दिली माहिती.



दौलतनगर दि.10 :-  मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलनाचे रान पेटले असताना मुंबईतील दंगलीमध्ये बळी गेलेल्या पाटण तालुक्यातील खोणोली गावच्या २१ वर्षीय कै.रोहन तोडकर या युवकाच्या कुटुंबिंयाना आधार देणेकरीता आणि अत्यंसंस्कारादिवशी या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मिळवावयाच्या आर्थिक मदतीकरीता शासकीय स्तरावर सुरु असलेल्या शासकीय कार्यवाहीसंदर्भात माहिती देणेकरीता आणि लवकरात लवकर ही शासकीय मदत या कुटुंबांस मिळवून देणेसाठी आमदार शंभूराज देसाईंनी कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबिंयाची खोनोली येथे जावून प्रत्यक्ष भेट घेतली व या कुंटुंबातील सदस्यांचे त्यांनी सात्वंन केले.
               मराठा आरक्षणाच्या संदर्भात नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नोकरीकरीता गेलेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा झालेला मृत्यू या मृत्यूमुळे या विभागात त्यांचे पार्थिव चाफळ भागात आलेनंतर निर्माण झालेला तणाव तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच निवळला होता. त्यादिवशी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना घडलेली हकीकत सांगून मुख्यमंत्री यांचेकडून कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच कुटुंबातील सज्ञान व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन घेतलेमुळे तसेच या कुंटुबांला आर्थिक मदत मिळणेसंदर्भात  लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हा तणाव निवळला होता.
             दरम्यान आमदार शंभूराज देसाईंनी यासंदर्भात तातडीने दुसरे दिवशी  राज्याचे मुख्यमंत्री यांना लेखी पत्र देवून कै.रोहन तोडकर यांचे कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच कुटुंबातील सज्ञान व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्याचे लेखी पत्र दिले होते तसेच जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांनीही सदरचा पत्रव्यवहार मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे केला होता.आमदार शंभूराज देसाई यांचे पत्राचे अनुषंगाने मुख्यमंत्री यांचे आदेशावरून सदर कुटुंबाला आर्थिक मदत देणेसंदर्भात विहीत नमुन्यातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या असून त्यानुसार पाटणचे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांचेकडून हा विहीत नमुन्यातील प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी मागविला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंना देण्यात आली असून सदरची शासकीय कार्यवाही संदर्भातील माहिती आमदार देसाई यांनी तोडकर कुटुंबाला दिली व त्यांनी कुंटुंबातील सदस्यांचे यावेळी सात्वंन केले.रोहनचे वडील दिलीप तोडकर यांनीही आता आमचा तुमच्यावरच विश्वास असून आपणच आम्हाला न्याय मिळवून देवू शकता असे यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाईंना सांगितले. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भरत साळुंखे,प्रकाश नेवगे,चंद्रकांत पाटील,उमेश पवार या प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


Tuesday, 7 August 2018

दि.०९ ऑगस्टचे ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आमदार शंभूराज देसाईंचे आवाहन.


दौलतनगर दि.07 :- मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासंदर्भात दि.०९ऑगस्ट रोजी जिल्हा,तालुकापातळीवर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.आतापर्यंत संपुर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील नागरिकांनी,महिलांनी,युवक,युवतींनी लाखोंच्या संख्येने एकूण ५८ मोर्चे कोणतेही गालबोट न लागता शांततेच्या मार्गाने पार पाडले आहेत व समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला आहे.आतापर्यंत निघालेल्या शांततेच्या मोर्चांना काही दिवसात वेगळेच तसेच हिंसक वळण लागू लागले आहे.यामुळे मराठा समाजाचेच मोठे नुकसान होत आहे.दि.०९ ऑगस्टचे ठिय्या आंदोलनात आपण स्वत: सहभागी होणार असून जिल्हा,तालुकापातळीवर दि.०९ ऑगस्ट रोजी होणारे ठिय्या आंदोलन किंवा यानिमित्ताने पाळण्यात येणारा बंद हा शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावे.आपल्याला नक्कीच न्याय मिळेल अशी मला आशा आहे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही शांततेने आंदोलन पार पाडण्याकरीता पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
               आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे,इतके वर्षे आरक्षणापासून वंचीत राहिलेल्या मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे याकरीता सर्वपक्षीय मराठा आमदारांनी वेळोवेळी राज्य शासनाकडे यासंदर्भातील आपली ठाम भूमिका मांडून मराठा क्रांती मोर्चाची असणारी भूमिकाही तसेच विविध मागण्या या शासनापर्यंत पोहचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले आहेत.आरक्षणाच्या मागणीवर आम्ही आजही राज्यातील तमाम मराठा समाजाबरोबर ठाम आहोत आणि कायम ठाम राहणार आहोत. संपुर्ण राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने आत्तापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात शांततेत कोणतेही गालबोट न लागता केलेली ५८ आंदोलने आणि आता काही दिवसात आंदोलनाला लागलेले हिंसक वळण तातडीने थांबविणेकरीता व मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर करुन घेणेकरीता राज्य शासनाने नेमलेल्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्वपक्षीय मराठा आमदारांची यासंदर्भातील आग्रही मागणी जाणून घेणेकरीता राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांचे समवेत लवकरात लवकर सर्वपक्षीय मराठा आमदारांची एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्याची विशेष विनंती राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांना करावी अशी आग्रही मागणी मी स्वत: महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा आमदारांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी पत्राव्दारे केली होती.मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील विविध भागातील अनेक युवकांवर मृत्यूला कवटाळण्याची दुर्दैवी वेळ आली या घटना दुर्दैवी असून युवकांच्या आत्महत्यांचे सत्र तात्काळ थांबणे गरजेचे आहे.मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी कालच येत्या नोव्हेंबरअखेर ज्या काही वैधानिक प्रक्रिया पुर्ण करावयाच्या आहेत त्याची पुर्तता येत्या ३ महिन्यात करुन राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर मागवून घेवून यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवून एका महिन्याभरातच मराठा आरक्षणासंदर्भात प्रकिया पुर्ण करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले आहे.मराठा समाजाला दयावयाचे आरक्षण कायदयाच्या कसोटीवर टिकायचे असेल तर या सर्व वैधानिक प्रक्रिया पुर्ण करणे गरजेच्याच आहेत.मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत यात कुणाचेही दुमत नाही परंतू या कायदेशीर बाबींचाही आपण विचार करणे तितकेच गरजेचे आहे आणि या बाबींचा सकल मराठा समाजातील नागरिकांनी, युवक, युवतींनी सखोल विचार करावा अशी माझी सर्व मराठा बांधव भगिनींना नम्रतेची विनंती आहे.
                 दि.०९ ऑगस्ट रोजीचे आंदोलनात मराठा समाजाकडून मांडण्यात येणा-या भूमिका त्यांच्या भावना व मागण्या या शासनापर्यंत तसेच राज्य मागास आयोगापर्यंत पोहचविण्यासाठी पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कटीबध्द असल्याची ग्वाही यानिमित्ताने पाटण तालुकावासियांना देत असून तालुकापातळीवरील मराठा क्रांती मोर्चाचे दि.०९ऑगस्ट रोजीचे ठिय्या आंदोलन हे अत्यंत शांततेच्या मार्गाने कोणताही अनुचित प्रकार न घडता अथवा आंदोलनाला गालबोट लागेल अशा घटना न घडता पार पडावे अशी माझी व्यक्तीश: सर्वांना विंनती असून मराठा समाजातील प्रत्येक नागरिकांने हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पाडावे. आपल्या आंदोलनाचा त्रास बसने तसेच इतर वाहनाने प्रवास करणा-या प्रवाशांना तसेच सर्वसामान्यांना होवू नये याची काळजीही आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंतीही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात केली आहे.


Saturday, 4 August 2018

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील सात ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास मंजुरी. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.05 :- राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाने मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मंजूरी दिली आहे.या योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी,जळव, गव्हाणवाडी, गुंजाळी, उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकाम करणेच्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुक्रमे दि.30 जुन,2018 व  दि. ०३ ऑगस्ट, २०१८ रोजीचे शासन निर्णयाव्दारे मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
         आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकांत म्हंटले आहे , ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणा-या स्तोत्रांची मर्यादा विचारात घेऊन राज्य शासनाने राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सदरचा निर्णय शासनाने घोषित केलेनंतर राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचेकडे पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी, जळव,गव्हाणवाडी,गुंजाळी,उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामांना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत मंजुरी देवून आवश्यक असणारा निधी मंजुर करणेबाबत लेखी पत्राव्दारे मागणी केली होती त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुक्रमे दि.30 जुन,2018 व  दि.०३ ऑगस्ट, २०१८ रोजीचे शासन निर्णयाव्दारे पाटण तालुक्यातील बांधवाट,मरळी,जळव,गव्हाणवाडी,गुंजाळी,उधवणे व बोडकेवाडी सात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या बांधकामांना मंजूरी दिली आहे. लवकरच या कामांना आवश्यक असणारा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त होणार असून या कामांना यंदाच्या वर्षीच सुरुवात होईल असा विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.



Thursday, 2 August 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्यात युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते रोलरचे पुजन.




दौलतनगर दि. 02 :- गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा महाराष्ट्रामध्ये सध्या ऊसाचे प्रमाण जास्त असून साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असल्याने अनेक कारखान्यांकडे मोठया प्रमाणांत साखरेचे साठे पडून आहेत.आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगात तग धरुन आहे.कारखान्यांने गतवर्षीचा गळीत हंगाम या पुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे चांगल्या प्रकारे पुर्ण केला असून इतर कारखान्यांच्या बरोबरीने आपले देसाई कारखान्याने ऊस उत्पादक यांना एफआरपीची पुर्ण रक्कम अदा केली आहे.चालू गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट कारखान्याने ठेवून नियोजनबध्द काम करुन सन 2018-19 चा गळीत हंगामही प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
            दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2018-19 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन युवा नेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रोलरचे पुजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजांची पदाधिकारी यांचेसोबत बारकाईने पहाणी केली.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालक आनंदराव चव्हाण, संपतराव सत्रे,बबनराव भिसे,विकास गिरीगोसावी,शशिकांत निकम,सेामनाथ खामकर,वसंत कदम, गजानन जाधव, व्यकंट पाटील, शंकर शेजवळ, राजेंद्र गुरव, सौ.दिपाली पाटील हे संचालक मंडळ व पंचायत समिती सदस्य संतोष गिरीगोसावी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कारखान्याचे कार्यकारी संचालक विनायकराव देसाई यांची उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे म्हणाले, कारखान्याचे मार्गदर्शक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना साखर उद्योग अडचणीत असताना देखील चांगल्या प्रकारे सुरु आहे. कारखान्याची क्षमता कमी असूनही तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करीत आहोत. इतर कारखान्यांप्रमाणे आपले कारखान्याने शासनाने ठरवून दिलेली एफआरपीची संपुर्ण रक्कम गत गळीत हंगामात ऊस पुरवठा करणा-या शेतक-यांच्या खात्यावर जमा केली आहे.अधिकारी आणि कारखान्याचे पदाधिकारी यांचेकडून माहिती घेतली असता यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची उपलब्धता चांगली राहणार असल्याचे सांगण्यात आले शेतक-यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे आज सातत्याने कोसळणा-या साखर दरामुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असतानादेखील यावर मात करुन यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे सन 2018-19 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.त्या नियोजनाप्रमाणे कारखान्यातील सर्व अधिकारी व कामगार यांनी नियोजनबध्द काम करावे. तर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिकवणा-या सभासद तसेच बिगर सभासद शेतक-यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस देसाई कारखान्याला देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना केले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.






Monday, 30 July 2018

पाटण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा 58 वा वाढदिवस उत्साहात साजरा. आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते दौलतनगरला विद्यार्थ्यांना शालेय वहया व खाऊवाटप.



दौलतनगर दि. ३० :- पाटण तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा 58 वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे ५८ व्या वाढदिवसानिमित्त पाटण तालुक्याचे शिवसेनेचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते दौलतनगर, ता. पाटण याठिकाणी दि.27 जुलै,2018 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनींना खाऊवाटप तसेच शालेय वहयांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
                   जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनींना खाऊवाटप तसेच शालेय वहयांचे वाटप झालेनंतर उपस्थित लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच शिक्षण समुहातील विविध पदाधिकारी, शिवसैनिक व शालेय विद्यार्थी यांचेसमोर आमदार शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाटण तालुक्यातील तमाम शिवसैनिक व आम जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे याकरीता ईश्वरचरणी प्रार्थना केली.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,अभिजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,जालंदर पाटील,प्रभाकर शिंदे,राजाराम मोहिते,शंभूराज युवा संघटनेचे दिलीप सपकाळ,अशोक पाटील यां प्रमुख पदाधिकारी यांचेसह शिवसैनिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक व शिक्षीका यांची उपस्थिती होती.

Thursday, 26 July 2018

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील सर्वपक्षीय मराठा आमदारांची राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांचेसमवेत तातडीने एकदिवसीय बैठक आयोजीत करावी. आमदार शंभूराज देसाईंची मुख्यमंत्री यांचेकडे आग्रही मागणी.


दौलतनगर दि. २६: संपुर्ण राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासंदर्भात केलेली आंदोलने आणि या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण तातडीने थांबविणेकरीता व मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर करुन घेणेकरीता राज्य शासनाने नेमलेल्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्वपक्षीय मराठा आमदारांची यासंदर्भातील आग्रही मागणी जाणून घेणेकरीता राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांचेसमवेत लवकरात लवकर सर्वपक्षीय मराठा आमदारांची एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्याची विशेष विनंती राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांना करावी अशी आग्रही मागणी शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा आमदारांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये केलेल्या आग्रही मागणीमध्ये म्हंटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात संपुर्ण राज्यामध्ये आजपर्यंत एकूण ५८ मराठा क्रांती मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडले आहेत. मात्र सध्या मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटला असून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने संपुर्ण राज्यभर हिंसक वळण घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण दया यासंदर्भात आम्ही सर्वपक्षीय मराठा विधानसभा सदस्य हे विधानसभा सभागृहात तसेच विधानसभेबाहेरही आग्रही राहून आरक्षणासंदर्भातील आमची भूमिका वारंवार शासनापुढे मांडत आलो आहोत. उच्च न्यायालयाने विचारणा केलेप्रमाणे राज्य शासनाने राज्य मागास प्रवर्ग आयोग स्थापन केला असल्याचे म्हणणे उच्च न्यायालयाला दिले असून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य मागास प्रवर्ग आयोग यांचेकडे प्रलंबीत असून राज्यातील मराठा समाजाला त्यांचे मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून देणेसंदर्भात आपले महाराष्ट्र राज्यातील विधानसभेतील सर्वपक्षीय मराठा आमदारांची उच्चस्तरीय एकदिवसीय बैठक राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांचेसमवेत लवकरात लवकर आयोजित करुन या बैठकीत मराठा आमदारांची मराठा आरक्षणासंदर्भातील आग्रही मागणी जाणून घेऊन मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. याकरीता आपण राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे माननीय अध्यक्ष यांना विशेष विनंती करुन, हिंसक वळण लागलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर माननीय अध्यक्षासमवेत एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक आयोजीत करावी अशी महाराष्ट्र राज्यातील तमाम मराठा आमदारांच्यावतीने आपणांकडे आग्रही विनंती करीत असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे.


Thursday, 19 July 2018

सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या कोयना नदीकाठच्या गांवाना संरक्षक भिंती बांधायला तात्काळ मान्यता दया. पावसाळा संपण्यापुर्वी निधी मंजुर करुन कामांना सुरुवात करावी. आमदार शंभूराज देसाईंची औचित्याच्या मुद्दयाव्दारे विधानसभेत मागणी.


दौलतनगर दि. १९: पाटण तालुक्यात सर्वात मोठया असणा-या कोयना नदीकाठी सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी ही गांवे वसली असून सध्या कोयना धरणातून सुमारे १७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात होत आहे.धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर याहून अधिक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत करण्यात येतो.सन २००५ साली तर १ लाखाहून अधिक क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला होता.एवढया मोठया प्रमाणात कोयना नदीला पाणी सोडण्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होवून कोयना नदीकाठच्या सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या गांवाना पुराचा धोका पोहचत असल्याने या गांवाना पुरापासून संरक्षण होणेकरीता संरक्षक भिंती व नदीवरील घाट बांधणेस मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्याची माझी अनेक वर्षाची शासनाकडे मागणी आहे. दि.०३.०८.२०१६ रोजी मी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेदी सुचनेवर एक वर्षाच्या आत निधी मंजुर करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री यांनी दिले होते.जलसंपदामंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ या तीन गांवाना पुरापासून संरक्षण होणेकरीता संरक्षक भिंती व नदीवरील घाट बांधणेस मान्यता देवून पावसाळा संपण्यापुर्वी निधी मंजुर करीत पावसाळयानंतर या कामांना सुरुवात करावी अशी आग्रही मागणी आज आमदार शंभूराज देसाई यांनी औचित्याच्या मुद्दयाव्दारे पावसाळी अधिवेशनामध्ये केली.
           कोयना धरणातून सोडण्यात येणा-या पाण्यामुळे प्रतिवर्षी धोका पोहचणा-या पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या तीन मुख्य गांवांना पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मान्यता व निधी देणेसंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार शंभूराज देसाई यांनी आज विधानसभा सभागृहात शासनाचे व राज्याचे जलंसपदा मंत्री यांचे लक्ष वेधले.
          यावेळी आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माझे पाटण तालुक्यातील सर्वात मोठया असणा-या कोयना नदीकाठच्या कोयनेच्या पुरामुळे धोका निर्माण होणा-या १० गांवाना पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणेच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी माझी सातत्याची शासनाकडे मागणी होती व आहे. दरम्यान या विषयासंदर्भात मी दि.०३.०८.२०१६ रोजी लक्षवेदी सुचनेच्या माध्यमातून विधानसभा सभागृहात राज्य शासनाचे लक्षही वेधले होते तेव्हा पाटण मतदारसंघातील कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे मोठया प्रमाणात धोका निर्माण होणा-या एकूण १० गांवाना पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणेस एक वर्षाच्या आत निधी मंजुर करण्याचे आश्वासन शासनाच्यावतीने राज्याचे जलसंपदामंत्री यांचेकडून विधानसभा सभागृहात दिले होते माझे सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शासनाचे जलसंपदा विभागाने १० पैकी सात गांवाना पुरसंरक्षक भिंती व कोयना नदीवर घाट बांधणेकरीता मान्यता देवून निधी मंजुर केला आहे.परंतू सर्वात जास्त धोका निर्माण होणा-या सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी तीन महत्वाच्या गावांतील कामांना शासनाने दोन वर्षापुर्वी आश्वासन देवून देखील अद्यापही मंजुरी व निधी दिलेला नाही.
          आजच दिवसभरात मी तीनवेळा मतदारसंघातून माहिती घेतली सध्या तालुक्यात होणा-या मुसळधार पावसामुळे मुळातच कोयना नदीपात्रात जादा प्रमाणात पाणी असून धरणातील १७ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रात पाण्याची वाढ होवून नदीपात्राबाहेर पाणी आले आहे.वाढत्या पाण्याचा धोका सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या तीन गांवाना प्रतिवर्षी होतो वाढत्या पाण्यामुळे या गावाकडेच्या जमिनी मोठया प्रमाणात खचू लागल्या असल्यामुळे या तिन्ही गांवांमध्ये मोठया प्रमाणात भितीचे वातावरण आहे.या तीन गांवाच्या या कामांना लवकरात लवकर मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देणेसंदर्भात शासनाचे जलसंपदा विभागाकडे सविस्तर प्रस्ताव देखील सादर करण्यात आला असून सदरचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रलंबीत असलेने या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री यांचेकडे दि.०५.१२.२०१७ रोजी पत्रव्यवहार देखील केला आहे. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने पहावे व शासनाच्या वतीने राज्याचे जलसंपदामंत्री यांनी दि.०३.०८.२०१६ रोजी मी मांडलेल्या लक्षवेदी सुचनेवर दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ सांगवड,बनपेठवाडी व गुंजाळी या पुराचा धोका निर्माण झालेल्या तीन गांवाना पुरापासून संरक्षण होणेकरीता संरक्षक भिंती व नदीवरील घाट बांधणेस मान्यता देवून पावसाळा संपण्यापुर्वी निधी मंजुर करीत पावसाळयानंतर या कामांना सुरुवात करावी असा आग्रह आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत धरला.