Thursday, 9 January 2020

डोंगरी विद्यूत विकास आराखडयातंर्गत पाटण मतदारसंघात मंजुर ११.२२ कोटींच्या निधीमधील पहिल्या टप्प्यातील कामांना होतेय लवकरच सुरुवात. ना.शंभूराज देसाईंची माहिती.


     


दौलतनगर दि.०9:- महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून राज्यातील डोंगरी तालुक्यांकरीता विद्यूतची प्रंलबीत कांमे करण्याकरीता डोंगरी विकास आराखडा तयार करुन यास आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार पाटण या १०० टक्के डोंगरी मतदारसंघाकरीता डोंगंरी विद्यूत विकास आराखडयातंर्गत आवश्यक ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी तत्कालीन शासनाने मंजुर करुन दिला होता. मंजुरीचा लेखी आदेश महाऊर्जा विभागामार्फत दि.२५.०६.२०१९ रोजी पारित करण्यात आला आहे. डोंगंरी विद्यूत विकास आराखडयातंर्गत पहिल्या टप्प्यात करावयाच्या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून या कामांचे कार्यारंभ आदेशही संबधित ठेकेदारास देण्यात आले असून डोंगंरी विद्यूत विकास आराखडयातंर्गत पहिल्या टप्प्यातील कामांना आता लवकरच महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून संबधित ठेकेदारांमार्फत सुरुवात होत असल्याची माहिती ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
             पाटण हा १०० टक्के डोंगरी व दुर्गम मतदारसंघ असून या मतदारसंघात डोंगरी विद्यूत विकास आराखडयातंर्गत खालीलप्रमाणे अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारी कामे करण्याकरीता कोटयावधी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. हा निधी शासनाने मंजुर करावा याकरीता मी सातत्याने तत्कालीन शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री यांनी विशेष बाब म्हणून यास मान्यता देवून ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता.या आराखडयातंर्गत शेती व गावठाणांसाठी मोठया क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविणे,उपसा जलसिंचन योजनांना १६ तास वीज उपलब्ध करुन देणे,गंजलेले 502 वीज पोल बदलणे, वाढीव वीज पोल बसविणे,थ्रीपेज लाईन करणे,नवीन फ्युज बॅाक्स बसविणे,जि.प.शाळेकरीता वाढीव पोल बसविणे यासारख्या कामांचा मागणीनुसार समावेश करण्यात आला आहे.
              यामध्ये 100 के.व्ही.ए. क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात येणारी गांवे चाळकेवाडी,आवर्डे, बाबंवडे,साखरी, काळकुटवाडी,तारळे,नेरळे,धडामवाडी (केरळ),चाफळ, नुने, चोपडी, येरफळे, माथणेवाडी चाफळ, चिटेघर, गुढेकरवाडी (खळे) गावठाण, बेलदरे, आबईचीवाडी तसेच 63 के.व्ही.ए. क्षमतेची रोहित्रे 100 के.व्ही.ए. क्षमतेची बसविणे महिंद मठवाडी, सळवे,नवसरी त्याचबरोबर उपसा जलसिंचन योजनांना १६ तास वीज उपलब्ध करुन देणे यामध्ये बाळासाहेब देसाई सहकारी उपसा जलसिंचन योजना,गांधीटेकडी,ज्योतिर्लिंग सहकारी पाणी पुरवठा योजना,चोपडी,त्रिपुडी सहकारी पाणी पुरवठा योजना,त्रिपुडी,पापर्डे सहकारी पाणी पुरवठा योजना,पापर्डे.नाडे सहकारी पाणी पुरवठा योजना,नाडे श्रीदत्त सहकारी पाणी पुरवठा योजना,येरफळे. येराड सहकारी पाणी पुरवठा योजना नंबर २,येराड.श्री निरापुर ज्योतिर्लिंग सहकारी पाणी पुरवठा योजना,विहे. विहे सहकारी पाणी पुरवठा योजना, विहे.निनाईदेवी सहकारी पाणी पुरवठा योजना, गोकुळ तर्फ पाटण. मसणाई माता सहकारी पाणी पुरवठा योजना,साईकडे या योजनांचा समावेश आहे.
             तर मतदारसंघातील गंजलेले 502 वीज पोल बदलणे यामध्ये काढणे 4, अडूळपेठ 5, आंबळे 5, आंबेवाडी 2, आंब्रुळे 9, आडदेव 11,आवर्डे 8, उधवणे 4, कडवे खुर्द 5, कडवे बुद्रुक 3, कळंबे 3, कसणी 5,कारळे 7, काळकुटवाडी 3, कोचरेवाडी 3, कोदळ 4, खडकवाडी 3, खराडवाडी 4, गायमुखवाडी 3, गुंजाळी 4, गोरेवाडी 3, घोट 8, चव्हाणवाडी नाणेगाव 4,चाफळ 9,चोपडी 2,जंगलवाडी तारळे 3,जन्नेवाडी घोट 9, जळव 8, जांभेकरवाडी 5, जाधववाडी 3, जानुगडेवाडी 5, जिमनवाडी 3, जुगाईवाडी 8, डिगेवाडी 3, डेरवण 4, तामिणे 2, तारळे 10, दाढोली 5, दुटाळवाडी 3,धामणी 7,धुमकवाडी 3,नवसरी पुनर्वसन 2,नवसरी 2,नाडे 5, नाडोली 9, नाणेगाव खुर्द 5, नुने लोरेवाडी 2,नुने 5, नेरळे 2,पांढरवाडी तारळे 2,पाडेकरवाडी 3,पाणेरी 5,पाबळवाडी 8,पाळशी 7, फडतरवाडी घोट 5, बनपूरी 9, बहुले 14, बांधवाट 3, बांबवडे 9, बाचोली 3, बामणेवाडी 3, बेलवडे खुर्द 2, बोर्गेवाडी 8, बौध्दवस्ती येराड 5, भुडकेवाडी 7, मंद्रुळकोळे 5, मरळोशी 5, मल्हारपेठ 9, महिंद 9, माणगाव 8, मानेगाव कळंत्रेवाडी 5, मान्याचीवाडी कुंभारगाव 5, मारुलहवेली 8, मोरेवाडी 7, रामाचावाडा येराड 7, राहुडे 4, रुवले 2, लोरेवाडी 2, वन 10, वाघजाईवाडी 2, शिंगणवाडी 9, शिद्रुकवाडी खळे 1, सडादाढोली 10, सणबूर 9, सळवे 9, आरेवाडी 5, गमेवाडी 2, तांबवे 12, पाडळी 2, भोळेवाडी 5, म्होप्रे 12, वस्ती साकुर्डी 5, साकुर्डी 6  येथील पोल बदलण्यात येणार आहेत
            तर खालील गांवामध्ये 305 ठिकाणी वाढीव पोल बसवून पथ दिप उर्जीकरण करण्यात येणार आहे. वेताळवाडी 5, खोणोली 6,गारवडे 8, घोट 5, ठोमसे 9,पाचगणी 9,जानुगडेवाडी 7,दुसाळे 5,शिवंदेश्वर 7,बोडकेवाडी 10,आंब्रुळे 8,चोपडी 5,आडूळपेठ 5,नाडे 13, सांगवड 5, कोकीसरे 3, तामिणे 5, खळे 2, वाझोली 5, सुतारवाडी मालदन 2, भातडेवाडी जिंती 1, वेखंडवाडी 5, आडदेव 5, काढोली रोहिणे 5, चव्हाणवाडी नाणेगाव 5, कुसरुंड 9, माथणेवाडी पुनर्वसन 1, शिद्रुकवाडी काढणे 4,जन्नेवाडी घोट 3,शेलारपूर शितपवाडी येथील सावंतवाडी 2,चेणगेवाडी सळवे 4,काठीटेक 9,आंबेवाडी घोट 3,कोळेकरवाडी 5,निवी 8, आडूळगावठाण 9, धनगरवाडा कसणी 6,चाफळ 9,गमेवाडी 4,शिंगणवाडी 4,खराडवाडी 1,तारळे 15, चिंचेवाडी वजरोशी 2,बांधवाट 2,पाबळवाडी 3,आंबळे 3,बोर्गेवाडी 2,फडतरवाडी 2,जळव 7,मरळोशी 3,जांभेकरवाडी 2,लोरेवाडी मुरुड 1,गोरेवाडी मुरुड 2,आवर्डे 5,भुडकेवाडी 5,नुने लोरेवाडी 1,तामकडे बौध्दवस्ती 5,बागलवाडी 5,बोर्गेवाडी कुंभारगाव 5,कसणी 4, लेंढोरी शिवनगर 5  त्याचबरोबरीने चोरगेवाडी (काळगाव), आंबेघर तर्फ मरळी, धुमाळवस्ती माजगांव, शांतीनगर येराड, पाचगणी, चेवलेवाडी याठिकाणी थ्रीपेज लाईन करणे व दिक्षी ते आटोली पाचगणी लिंक लाईन एच.टी एलटी प्रणालीची सुधारणा करण्याची कामे करण्यात येणार असून मारुल तर्फ पाटण शेळकेवस्ती, पेठशिवापूर, कोळणे, सणबूर, येराड, बनपुरी, जानूगडेवाडी, तामीणे या गांवात नवीन फ्युज बॅाक्स बसविण्यात येणार असून बहुले,गव्हाणवाडी माळवस्ती, माजगांव,येराड,गमेवाडी, भोळेवाडी,वस्ती साकुर्डी,मौजे साकुर्डी, म्होप्रे,पाडळी, द.तांबवे ते आरेवाडी रोडवरील सब स्टेशन, दक्षिण तांबवे, पश्चिम सुपने, बेलदरे ता.कराड येथे पोल,ट्रान्सफार्मर, विद्युत वाहिणी स्थलांतर करण्यात येणार आहे व जि.प.शाळेकरीता नव्याने बसवावयाच्या वाढीव पोल निवी ता.पाटण जि.प.शाळा १०, वाल्मिकी (पाणेरी) ता.पाटण जि.प.शाळा ०४, सुतारवाडी पाचपुतेवस्ती ता.पाटण जि.प.शाळा ०२, वरेकरवाडी ता.पाटण जि.प.शाळा 03 या शाळांना वाढीव पोल बसविण्यात येणार आहेत.लवकरात लवकर या कामांना सुरुवात करुन मुदतीत डोंगरी विद्यूत विकास आराखडयातील कामे मार्गी लावावीत अशा सक्त सुचना महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीचे अधिकारी व संबधित ठेकेदारांस करण्यात आल्या असल्याचेही ना.शंभूराज देसाईंने सांगितले.

ना.शंभूराज देसाईंनी घेतले माजी कृषी मंत्री शरद पवारसाहेबांचे आर्शिवाद. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट.




दौलतनगर दि.०9:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांची राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी राज्याचे राज्यमंत्री म्हणून विराजमान झालेनंतर आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सदिच्छा भेट घेतली.यावेळी ना.शंभूराज देसाईंनी मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांना पुष्पगुच्छ देत पवारसाहेबांचे आर्शिवाद घेतले. पवारसाहेब यांनी ना.शंभूराज देसाईंना आर्शिवाद देत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच राज्याचे राज्यमंत्री  म्हणून उत्कृष्ट काम करावे माझ्या तुम्हाला कायम सदिच्छा असल्याचेही पवारसाहेबांनी यावेळी ना.शंभूराज देसाईंना सांगितले.
                   यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सदिच्छा भेट घेणेकरीता राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे आले होते.१५ मिनीटांच्या भेटीमध्ये ना.शंभूराज देसाईंनी त्यांना मिळालेल्या  गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या सहा खात्यांच्या संदर्भात पवारसाहेबांशी सविस्तर चर्चा करुन या खात्यांमधील कामकाजासंदर्भात पवारसाहेबांकडून मार्गदर्शन घेतले. तसेच विविध विषयांवर ना.देसाईंनी पवारसाहेबांबरोबर चर्चा ही केली.यावेळी पवारसाहेबांनी गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री म्हणून राज्यामध्ये चांगले काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे.मिळालेल्या संधीचे सोने करुन राज्यातील जनतेला या खात्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दयावा. तुम्हाला प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव आहेच याच अनुभवाचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा मिळालेल्या खात्यांच्या माध्यमातून बरेच काही नवीन शिकण्यासारखे आहे माझे आपणांस सहकार्य आहेच त्याचबरोबर चांगले काम करणेकरीता तुम्हाला सदिच्छाही आहेत असे सांगून पवारसाहेबांनी ना.शंभूराज देसाईंना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत आर्शिवादही दिले.शपथविधी दिवशीही ना.शंभूराज देसाईंनी माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांची विधान भवनाच्या प्रांगणात सदिच्छा भेट घेतली होती यावेळी पवासाहेबांनी ना.शंभूराज देसाई यांना आर्शिवाद देत राज्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे तसेच ना.शंभूराज देसाई व पवारसाहेब यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा सुरु असलेलीही शपथविधीला उपस्थित असणाऱ्या जनतेने पाहिले होते.

Tuesday, 7 January 2020

ना.शंभूराज देसाईंनी स्विकारला मंत्रीपदाचा कार्यभार. आजपासून मंत्रालयीन कामांस केला प्रारंभ.




दौलतनगर दि.०७:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राजकीय वारसदार,शिवसेना पक्षाची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असणारे राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी आज दि.०७ रोजी विधानभवन येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रींमत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन आर्शिवाद घेत विधानभवनातील त्यांचे दालनात गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री म्हणून मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला.आजपासून त्यांनी प्रत्यक्षात राज्यमंत्री म्हणून त्यांना सोपविलेल्या सर्व खात्यांच्या कामांचा प्रारंभ केला.त्यांना शुभेच्छा देणेकरीता सातारा विधानसभेचे आमदार श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आर्वजुन याठिकाणी उपस्थित होते.
                          शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वावर महाराष्ट्र राज्यातील जनतेने विश्वास व्यक्त करुन त्यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये सत्तेवर आले आहे. या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची भूमिका विधानसभेत समर्थपणे मांडणारे, शिवसेना पक्षाचा अभ्यासू चेहरा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांची राज्याच्या राज्यमंत्रीपदी निवड केली व त्यांचेवर राज्याच्या गृह(ग्रामीण), वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या वजनदार आणि महत्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली आहे.राज्य शासनातील महत्वाच्या असणाऱ्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी ना.शंभूराज देसाईंवर देवून मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळवून देत त्यांचा यथोचित असा सन्मान केला आहे.राज्याचे नवनिर्वाचीत गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी आज दि.०७ जानेवारी रोजी विधानभवनातील त्यांचे दालनात त्यांचेवर सोपविलेल्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या पाचही खात्यांचा पदभार स्विकारुन मंत्रालयीन कामांस सुरुवात देखील केली.
              राज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर ना.शंभूराज देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी मला त्यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या व मित्रपक्षाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून निवड करुन पश्चिम महाराष्ट्राचा यथोचित असा सन्मान केला आहे. सन १९९६ ला शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे दौलतनगर येथे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्मभूमि आणि जन्मभूमिमध्ये येवून मला सहकार परीषदेचे अध्यक्षपद देवून राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला होता. शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे पोलादी पुरुष माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ऋृणानुबंध संपुर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचेनंतर पाटण विधानसभा मतदारसंघाला आमचे नेते मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी गृह राज्यमंत्री म्हणून मला दिलेले पद हे लाखमोलाचे आहे.गृह(ग्रामीण) राज्यमंत्री पदाबरोबरच मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी माझेवर वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या राज्यातील महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली आहे. मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना आणि राज्यातील जनतेला अपेक्षित असणारे काम या पाच खात्यांच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. राज्याचा राज्यमंत्री म्हणून मला जे अधिकार या महाविकास आघाडीच्या आणि मित्रपक्षाच्या सरकारमध्ये देण्यात आले आहेत त्या अधिकारांतून राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेवून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम कटीबध्द राहणार आहे.आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेवून त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून प्रत्यक्षात मी मला दिलेल्या पाच खात्यांच्या कामांला मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारुन सुरुवात केली आहे. ना.उध्दव ठाकरे यांनी माझेवर जी जबाबदारी सोपविली आहे. माझेवर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास सार्थ करण्याचे काम मी करणार असून ना.उध्दवजी ठाकरे व मला या पदापर्यंत पोहचविणारे माझे पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदार यांचे मी शतश: ऋृण व्यक्त करतो व त्यांचे जाहीर आभारही मानतो असे ना.शंभूराज देसाई यावेळी बोलताना म्हणाले.
चौकट:- करारी गृहमंत्र्यांचे नातू राज्याच्या गृहराज्यमंत्रीपदावर विराजमान.
             महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची ओळख राज्याचे करारी गृहमंत्री म्हणून असून राज्याचे गृहमंत्री म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी केलेल्या विविध कार्याचे दाखले आजही महाराष्ट्र सरकारमध्ये दिले जातात.त्यांचेच नातू ना.शंभूराज देसाई हे राज्याच्या गृहराज्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत याचा पाटण विधानसभा मतदारसंघातील व संपुर्ण सातारा जिल्हयातील जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे.


मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन.



दौलतनगर दि.०7:- राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई हे आज दि.०७ रोजी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारणार असून मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दादर येथील शिवतीर्थावरील हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळ व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांचे पुतळयास पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले व हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले.
                राज्याचे नवनिर्वाचीत गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई हे आज दि.०७ जानेवारी रोजी विधानभवनातील त्यांचे दालनात त्यांना राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी सोपविलेल्या गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या पाचही खात्यांचा पदभार स्विकारुन मंत्रालयीन कामांस सुरुवात करणार आहेत.मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापुर्वी ना.शंभूराज देसाईंनी दादर येथील शिवतीर्थावर जावून हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे समाधीस्थळाचे प्रथमत: पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले व त्यानंतर मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांचे पुतळयासही पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेत विनम्र अभिवादन केले आणि त्यानंतर आपल्याला मिळालेल्या खात्यांचा पदभार स्विकारण्याकरीता त्यांनी विधानभवनातील त्यांचे दालनात प्रवेश केला.
              स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्वाखाली सन १९९६ ला मी शिवसेना पक्षात प्रवेश केला २३ वर्षे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून या पक्षात कार्यरत आहे. आज पक्षाच्या माध्यमातून मला राज्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. ना.उध्दव ठाकरे यांनी मला दिलेल्या गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या पाच खात्यांचा राज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारण्यापुर्वी स्व.बाळासाहेब ठाकरे व मॉसाहेब स्व.मीनाताई ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणे हे माझे कर्तव्य समजतो.ना.उध्दव ठाकरे यांनी माझेवर जी जबाबदारी सोपविली आहे. माझेवर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास सार्थ करण्याचे व मला मिळालेल्या गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या पाच खात्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम मी करणार असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले

Monday, 6 January 2020

माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील ( तात्या ) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन.




दौलतनगर दि.०६:- सातारा जिल्हयाचे कणखर नेतृत्व सातारा लोकसभेचे माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्ताने राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी दि.०५ रोजी बोपेगांव ता.वाई येथील स्व.तात्या यांच्या निवासस्थानी जावून विनम्र अभिवादन केले.
                माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचा प्रथम स्मृतीदिन दि.०६ जानेवारी रोजी होत असताना राज्याचे नवनिर्वाचीत गृह(ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांना राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांची भेट घेणेकरीता दि.०५ रोजी तातडीने मुंबईला जावे लागल्यामुळे त्यांनी स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे बोपेगांव ता.वाई येथील निवासस्थानी जावून विनम्र अभिवादन केले.यावेळी स्व.तात्या यांचे सुपुत्र वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंदआबा पाटील,मिलींददादा पाटील,नितीनकाका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, स्व.लक्ष्मणराव पाटील (तात्या) हे सातारा जिल्हयाचे कणखर नेतृत्व होते.कार्यकर्ते,नेतृत्व व विचारशीलता यांचा उत्तम समन्वय तात्यांच्या ठायी होता.त्यांनी बोपेगांवचे सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली.सातारा जिल्हयातील सहकाराला दिशा देण्याचे काम तात्यांनी केले.तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष,वाई पंचायत समितीचे सभापती,सातारा जिल्हा परीषदेचे अध्यक्ष त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अशा विविध जिल्हयातील महत्वाच्या पदांची जबाबदारी तात्यांनी लिलया पेलली. सहा दशकाहून अधिक काळ त्यांनी सातारा जिल्हयाच्या राजकारणात, समाजकारणात आपला वेगळा असा ठसा उमटविला आहे. पक्षाकडून त्यांना पक्षसंघटनेतही महत्वाचे स्थान नेहमीच दिले होते. स्व. तात्या  माझेकरीता श्रध्दास्थान असून त्यांनी पक्ष गट तट न पाहता माझेवर पुत्रवत प्रेम केले. राज्याचा राज्यमंत्री या नात्याने मी त्यांच्या पवित्र स्मृतीस राज्यातील व सातारा जिल्हयातील तमाम जनतेच्या व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे वतीने विनम्र अभिवादन करतो.


Saturday, 4 January 2020

पक्ष संघटना मजबुत करुन पक्षवाढीसाठी कसोशीने प्रयत्नशील तळागाळातल्या शिवसैनिकांना सत्तेचा वापर करुन देणार. ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.





दौलतनगर दि.०४:- शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझेवर राज्याचा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली असून या जबाबदारी बरोबरच जिल्हयात व राज्यात पक्षसंघटना मजबुत करण्याचीही जबाबदारी दिली आहे.संघटना आणि सरकार यामध्ये समन्वय निर्माण करुन पक्षवाढीची सुरुवात ही आपल्या सातारा जिल्हयातूनच आपल्याला करावयाची आहे.सातारा जिल्हयातील तळागाळातील शिवसैनिकांना मिळालेल्या सत्तेचा वापर करुन देण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी यांना देवून सर्वांनी एकजुटीने आणि एकमुखाने शिवसेना पक्ष जिल्हयामध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 सातारा विश्रामगृह याठिकाणी ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व कोरेगांवचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हयातील शिवसेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शिवसेना पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,सातारा जिल्हयामध्ये माझेरुपाने राज्याचा राज्यमंत्री म्हणून एक हक्काचा माणूस शिवसैनिकांना आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी दिला आहे. याचा मला अभिमान आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी मला राज्याचा राज्यमंत्री करुन सातारा जिल्हयामध्ये शिवसेना पक्षसंघटना मजबूत करण्याकरीता जबाबदारी दिली आहे.पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी मी लिलया पेलणार असून सातारा जिल्हयातील तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देणेकरीता तसेच आपल्याला मिळालेल्या सत्तेचा वापर त्यांना करुन देणेकरीता मी कायम प्रयत्नशील राहणार आहे.राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत असताना ज्या पक्षामुळे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्यामुळे आपण ज्या पदापर्यंत पोहचलो आहोत त्या पदाचा वापर पक्षाकरीता आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकरीता करणे हेच माझे पहिले कर्तव्य मी मानतो. सातारा जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना अपेक्षित असेच काम माझे हातून होईल अशी मला खात्री असून सातारा जिल्हयातील सर्व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हयात त्यांना कोणतीही आणि कसलीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास किंवा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात निसंकोचपणे माझेकडे यावे.सातारा जिल्हयातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकरीता तुमच्या हक्काचा माणूस म्हणून उपलब्ध असणार आहे.सातारा जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नियोजनबध्द कामांचे नियोजन करावे.प्रत्येकांनी आपल्या जिल्हाप्रमुख यांचेमार्फत आपल्याकडील समस्या,विविध विकासकामांच्या यादया तयार कराव्यात सत्तेच्या माध्यमातून सर्वांना न्याय दिला जाईल.महिन्यातील एक दोन दिवस  जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना जिल्हयातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकरीता वेळ राखीव ठेवून त्यांच्याशी समन्वय साधूनच जिल्हयामध्ये काम करण्याचे नियोजन आपण सर्वांनी करुया असे सांगून ना.शंभूराज देसाईंनी आपण सर्वांनी एकमुखाने शिवसेना पक्ष सातारा जिल्हयात वाढीकरीता प्रयत्नशील राहूया. आपल्या समस्या सोडविण्याकरीता मी कुठेही आणि कधीही कमी पडणार नसल्याची ग्वाही सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी आमदार महेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ना.शंभूराज देसाई यांना सर्वसामान्य जनतेविषयी कणव आहे. त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द ही संघर्षातून गेली आहे. एक हक्काचा मंत्री आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी आपल्या सर्वांना दिला आहे. त्यांना प्रशासनातील दांडगा अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग सातारा जिल्हयातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना होईल यात तीळमात्र शंका नाही. ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयामध्ये शिवसेना पक्षवाढीचा जो विढा उचचला आहे त्याला आपण सर्वांनी पाठबळ आणि ताकत देण्याची गरज आहे. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठाम राहून आपल्या सर्वांचे पक्षप्रमुख ना.उध्दवजी ठाकरे यांचे हात बळकट करुया असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.बैठकीस जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव,युवासेना प्रमुख रणजितसिंह भोसले,महिला जिल्हाप्रमुख श्रीमती शारदा जाधव, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांच्यासह तालुकाप्रमुख,उपतालुकाप्रमुख,शहर प्रमुख व शिवसैनिक हे उपस्थित होते.


Tuesday, 31 December 2019

मंत्रीपदाची शपथ घेतलेनंतर ना.शंभूराज देसाई प्रथमच पाटण मतदारसंघाच्या दौऱ्यावर. दिवसभर जनतेच्या शुभेच्छांचा करणार स्वीकार.




दौलतनगर दि.३१:-  महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेवून राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबईहुन प्रथमच बुधवार दि.०१.०१.२०२० रोजी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून दौलतनगर ता.पाटण येथील त्यांच्या निवासस्थानी ते दिवसभर मतदारसंघातील जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
सकाळी १०.०० वा त्यांचे साताराहून कोयना दौलत या निवासस्थानावरुन प्रयाण होणार असून उंब्रजमार्गे ते चाफळ फाटा, उरुल,निसरेफाटा,मल्हारपेठ,नाडे नवारस्ता,पाटण मार्गे येराड येथे श्री.येडोबा देवाचे दर्शनाकरीता येणार आहेत तेथून पाटण येथील मुख्य बाजारपेठेतील श्री.सिध्दीविनायक गणपतीचे दर्शन करुन नाडे - नवारस्ता मार्गे दौलतनगर येथे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या पुर्णाकृती पुतळयास व समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत. दौलतनगर येथील श्री.गणेशाचे दर्शन घेवून ग्रामदैवत श्री.निनाई देवीचे दर्शन केलेनंतर ते दिवसभर दौलतनगर ता.पाटण येथील त्यांचे निवासस्थानी येणाऱ्या जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
 उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई यांची राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड झालेमुळे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून राज्यमंत्री पदाची शपथ घेवून राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबईहुन प्रथमच बुधवारी दि.०१.०१.२०२० रोजी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड झालेले ना.शंभूराज देसाई हे मंत्री म्हणून प्रथमत:च मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्याकरीता व त्यांना मंत्रीपदी निवड झाली म्हणून शुभेच्छा देणेकरीता जनतेमध्ये व मतदारांमध्ये आतुरता व उत्सुकता असून येराड येथील श्री.येडोबा देवाचे व पाटण येथील मुख्य बाजारपेठेतील श्री.सिध्दीविनायक गणपतीचे दर्शनाकरीता ते येत असल्यामुळे या मार्गावरील चाफळ फाटा, उरुल,निसरेफाटा,मल्हारपेठ,नाडे-नवारस्ता,पाटण,येराड येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी ०१.०० वा.नंतर ते दौलतनगर येथील त्यांचे निवासस्थानीही मतदारांच्या,हितचिंतकाच्या भेटी घेवून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. ना.शंभूराज देसाई बुधवार दि.०१ व गुरुवार दि.०२ जानेवारी रोजी दोन दिवस दौलतनगर येथे उपस्थित असणार असल्याचे त्यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
चौकट: शुभेच्छा देणाऱ्या हितचितंकानी शाल, हार- तुरे न आणता वह्या आणाव्यात.
ना.शंभूराज देसाई यांची राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड झालेमुळे त्यांना शुभेच्छा देणेकरीता येणाऱ्या हितचितंकांनी, मतदार जनतेने शाल, हार तुरे न आणता शालेय उपयोगी वह्या आणाव्यात. शाल, हार तुरे यांचा स्विकार केला जाणार नाही असे ना.शंभूराज देसाई यांचेकडूनच सांगण्यात आले असल्याचेही त्यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.