Friday 30 November 2018

महाराष्ट्रातील दुष्काळाचे विरोधकांनी राजकारण करु नये. आमदार शंभूराज देसाईंचा विधानसभेत विरोधकांवर घणाघात.




दौलतनगर दि.30:-महाराष्ट्रातील जनता दुष्काळाच्या नैसर्गिक संकटात सापडली आहे त्यांना सर्वांनी मिळून बाहेर काढण्याची गरज असताना विरोधकांनी दुष्काळी परिस्थितीवर राजकीय टिका करण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही.या परिस्थितीवर टीका करण्यापेक्षा दुष्काळाला आपण सर्वजण कसे सामोरे जावू हे पाहण्याची गरज आहे.राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीवर एक पाऊल पुढे टाकून उपाययोजना सुरु केल्या आहेत.त्यात ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत,उपाययोजना अपुऱ्या आहेत त्या सरकारने तात्काळ पुर्ण कराव्यात व महाराष्ट्रातील दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या जनतेला मदतीचा हात द्यावा.या मताचा मी आहे परंतू महाराष्ट्रातील दुष्काळाचे विरोधकांनी राजकारण करु नये असा घणाघात सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंनी दुष्काळाच्या परिस्थितीवर विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर घातला.
       सत्ताधारी पक्षाच्या वतीने दुष्काळाच्या परिस्थितीवर विधानसभेत २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला यावेळी ते बोलत होते.आमदार शंभूराज देसाई म्हणाले,यावर्षी राज्यभरात मोठया प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनां सदर्भात तात्काळ पाऊले या सरकारने उचलली आहेत काही उपाय योजना जाहिर केल्या असून दुष्काळी तालुके आणि मंडळे यांसदर्भात शासन निर्णयही निर्गमित केला आहे.त्या शासन निर्णयामध्ये काहीच तालुके आणि मंडळाचा समावेश केला होता.त्यानंतर असे लक्षात आले की,अनेक मंडळे असे आहेत की,त्याठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती असताना त्या मंडळाचा समावेश पहिल्या शासन निर्णयामध्ये झालेला नाही. मुख्यमंत्री यांनी दुष्काळाची पाहणी व उपाययोजना करण्यासाठी बैठका घेतल्या होत्या.त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे त्या त्या जिल्हयाच्या पालकमंत्र्यांसमोर ही सर्व परिस्थिती विषद केली.त्यानंतर मागील १५ दिवसांपुर्वी २६८ मंडळांचा समावेश असणारी यादी सरकारने जाहिर केली.नव्याने जाहिर केलेल्या २६८ मंडळामधील गावांना पूर्वीच्या निर्णयामधील गावांसाठी ज्या सुविधा देण्यात आलेल्या होत्या त्या सर्व सुविधा किंवा उपाययोजना दुस-या निर्णयामधील गावांसाठी दिल्या नाहीत ही वस्तूस्थिती आहे.नव्याने जाहीर केलेल्या २६८ मंडळामध्ये पहिल्याप्रमाणेच उपाययोजनांचा समाविष्ट करावा अशाप्रकारचे स्पष्ट आदेश खालच्या शासकीय यंत्रणेला प्राप्त झालेले नाहीत.मी एक उदाहरण देऊ इच्छितो माझ्या विधानसभा मतदारसंघातील चार मंडळांचा समावेश दुस-या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.तेथील विद्यार्थ्यांचे एस.टी.चे मोफत पास देणेसंदर्भात तेथील अधिका-यांना सांगितले असता संबंधित अधिका-यांनी आम्हाला असे सांगीतले की या निर्णयामधील २६८ मंडळामंध्ये मोफत एस.टी.चे पास विद्यार्थ्यांना द्यावयाचे किंवा नाही याचा निर्णय एस.टी.महामंडळाने अद्यापपर्यंत घेतलेला नाही.मी या विषयावरील चर्चा करण्यापुर्वी राज्याचे परिवहन मंत्र्यांना भेटलो आजच्या आज विद्यार्थ्यांचे एस.टी.चे मोफत पास देणेसंदर्भात आदेश करावेत अशी मी मागणी केली आहे.
          दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाणी व दुसरे प्राधान्य शेतीसाठी लागणा-या पाण्यासाठी दिले पाहिजे. टंचाई परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीच्या उपाययोजना जानेवारी महिन्यानंतर सुरु करण्यात येतात परंतु मागील पंधरा ते वीस वर्षामध्ये पावसाची जी परिस्थिती नव्हती ती परिस्थिती यावर्षी महाराष्ट्र अनुभवतो आहे.शेतीसाठी व पिण्यासाठी लागणारे पाणी याअनुषंगाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होत नाहीत तिथे विंधन विहिरी खोदणे,विंधन विहिरींना जागा नाही तिथे टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे व टँकरव्दारे पाणी पुरवठा करावयाचा असेल तर टँकर मंजूरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याएैवजी तहसिलदारांना देणे आवश्यक आहे.प्रत्येक जिल्हयामध्ये टंचाईसंदर्भात बैठका पार पडल्या असून प्रत्येक तालुक्यातील टंचाई आराखडा शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, पाण्याचा उद्भव वाढविण्याच्यादृष्टीने विहिरींमध्ये आडवे बोअर मारणे, डोंगरावरील पाणी पुरवठा योजनांच्या करीता झ-यांचे उद्भव मोठे करणे,झरे एकमेकांना जोडावेत म्हणजे तेथील पाण्याचा स्त्रोत डोंगराखाली असलेल्या गावामध्ये आणता येईल. याचा समावेश असून यास निधी दयावा असे सांगून ते म्हणाले, जलयुक्त शिवारची कामे मोठया प्रमाणांत गेल्या दोन तीन वर्षामध्ये सुरु आहेत पठारावरील गावांमध्ये पावसाचे पाणी ओढया नाल्याने नदीला जात असून ते पठारावरच अडविले व पठारावरच पाण्याचे साठे निर्माण झाले तर पिण्यासाठी व इतर वेळी शेतीसाठी त्याचा दुहेरी उपयोग होईल.पाटण विधानसभा क्षेत्रातील देखील पठारावरील भागात कामे करण्यासाठी नेहमी होणा-या जलयुक्त शिवार योजनेच्या वार्षिक आराखडया व्यतिरिक्त निधी दयावा अशी मागणी करीत दुष्काळी परिस्थिती जाहिर झालेल्या मंडळातील कोणचीही वीज जोडणी तोडली जाणार नाही व ज्याठिकाणी वीज बिलाची थकबाकी आहे तेथे फक्त ३० टक्के पैसे भरुन घेवून वीज जोडणी करु अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे.परंतु दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची 30 टक्के रक्कम भरण्याची देखील परिस्थीती नाही.त्यामुळे ही अट देखील काढून टाकावी.दुष्काळी भागात नव्याने समाविष्ट झालेल्या मंडळांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आराखडयाच्या बाहेर जाऊन करणे गरजेचे आहे.राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडा झाला त्यावेळी दुष्काळी परिस्थिती नव्हती.त्यांनंतरच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाली आहे.आराखडयात नसलेल्या छोटया किंवा मोठया योजनांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पुरवठा योजना टप्पा 2 मध्ये करावा किंवा कोणत्या ना कोणत्या योजनेमधून प्राधान्याने निधी उपलब्ध करुन द्यावा. दुष्काळी भागातील विकास सेवा सोसायटयांच्या कर्जाच्या वसुल्या थांबविण्याचा किंवा कर्जांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबत जिल्हा व तालुका स्तरा वरील वरिष्ठ अधिका-यांना सुचना कराव्यात.
              राज्य सरकार दुष्काळाचा सामना करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत आहे. परंतु त्याचप्रमाणे खालच्या शासकीय यंत्रणांनीदेखील तात्काळ अशा प्रकारची कार्यवाही करणे आवश्यक आहे.अन्यथा नेहमी आपण पाहतो की,दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली की केवळ सोपस्कार म्हणून तालुक्यांचे आराखडे मागावायचे आणि ते आराखडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच पडून राहतात. ते पडून न राहता त्याची अंमलबाजवणी करावी. असे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले.

सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी येथील पुरसंरक्षक भिंतीच्या कामांना तात्काळ मान्यता दया.. पुरसंरक्षक भिंतीची १० टक्के लोकवर्गणीची अटही शिथील करा. औचित्याच्या मुद्दयाव्दारे आमदार शंभूराज देसाईंची विधानसभेत मागणी




दौलतनगर दि.30:  पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणाऱ्या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने या गावांना पुरसंरक्षक भिंती बांधण्यास व नदीवर घाट बांधणेस जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी माझी सातत्याची शासनाकडे आग्रहाची मागणी होती.माझे मागणीवरुन मौजे साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना जलसंपदा विभागाने मान्यताही दिली आहे.त्या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या आहेत.मात्र उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे प्रस्ताव मान्यतेकरीता जलसंपदा विभागाकडे सादर झाले आहेत त्यास मान्यता मिळाली नसून या प्रस्तावांना तात्काळ मान्यता दयावी व सर्व पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १० टक्के लोकवर्गणी भरण्याची टाकलेली अट रद् करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दाव्दारे केली.
                                 पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठच्या भिंती व घाट बांधणीच्या कामांना १० टक्के लोकवर्गणीचीही टाकण्यात आलेली अट शिथील करणेबाबत व उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे प्रस्तावांना तात्काळ मान्यता देणेबाबतचा औचित्याचा मुद्दा पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत उपस्थित केला यावेळी यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, माझे मागणीवरुन मौजे साजूर,तांबवे बौध्दवस्ती, नेरळे, गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना कोयना नदीकाठच्या भिंती व घाट बांधणीच्या कामांना जलसंपदा विभागाने मान्यताही दिली आहे. मात्र सांगवड, बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाच्या प्रस्तावांना अद्यापही मान्यता मिळाली नाही या कामांचे प्रस्ताव जलंसपदा विभागाकडे प्रलंबीत आहेत.राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे पाटण आणि सातारा दौ-यावर आले असताना सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाना पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्तावाना मान्यता देणेचे विभागाकडे प्रलंबीत असल्याची बाब जलसंपदामंत्री यांचे निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी जलसंपदामंत्री ना.महाजन यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे पुरसंरक्षक भिंती बांधणे व नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्ताव तात्काळ मान्यतेकरीता सादर करा अशा सुचना देखील दिल्या होत्या अजुनही या कामांना मान्यता मिळाली नाही या बाबीकडे जलसंपदा मंत्री यांचे लक्ष वेधत या मान्यता तात्काळ देण्यात याव्यात व या सर्व कामांसदर्भातील १० टक्के लोकवर्गणीचीच अट शिथील करावी असा आग्रह आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत धरला.
चौकट:- पोलीस पाटील संघटना व संगणक परिचालकांच्या आंदोलनातील मागण्याही मान्य करा.
             राज्यातील पोलीस पाटील संघटना व ग्रामपंचायत्यांमध्ये काम करणारे संगणक परिचालक हे राज्यभरातून आझाद मैदानावर त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. विधानसभा सभागृहातील अनेक विधानसभा सदस्य हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील पोलीस पाटील संघटना व संगणक परिचालकांच्या आंदोलनांना आझाद मैदानावरुन भेटून आले आहेत.अनेक वर्षापासून पोलीस पाटील संघटना व संगणक परिचालकांच्या मागण्या असून त्यांच्या आंदोलनातील विविध मागण्याही शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.




तारळी धरण प्रकल्पाचा १६१०.३२ कोटी रुपयांचा शासन निर्णय पारित. सातत्याच्या प्रयत्नांना मोठे यश- आमदार शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया.




दौलतनगर दि.30:-सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील महत्वपुर्ण योजनांपैकी एक असणाऱ्या तारळी धरण प्रकल्पास राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १६१०.३२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने दि.२६ नोव्हेबंर २०१८ रोजी पारित केला असल्याची माहिती या मान्यतेकरीता सातत्याने राज्य शासनाकडे प्रयत्न करणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून तारळी धरण प्रकल्पातून ५० मीटर हेडच्या वरील जमिन क्षेत्राला प्राधान्याने पाणी मिळवून देणेसाठी सन २००९ ते २०१४ या कार्यकालापासून माझा प्रयत्न सुरु होता त्या सातत्याच्या प्रयत्नाला आता मोठे असे यश मिळाले असून सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या वचननाम्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत ५० मीटर हेडच्या वरील जमिन क्षेत्राला प्राधान्याने पाणी मिळवून देणार असे वचन मी या विभागातील शेतकऱ्यांना दिले होते.ते वचन या निर्णयामुळे पुर्ण झाले असल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.
                आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की, सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील तारळी धरण प्रकल्प हा महत्वपुर्ण प्रकल्प असून या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिचांई योजनेत केला आहे. ही त्यावरुन महत्वपुर्ण बाब आहे. या धरण प्रकल्पातून या विभागातील १०० टक्के जमीन क्षेत्र ओलिताखाली आणून उर्वरीत राहिलेले पाणी विभागाच्या बाहेर देण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याची भूमिका आम्ही घेतली होती या विभागात ५० मीटर हेडपर्यंतच पाणी देवून उर्वरीत पाणी बाहेर देण्याचे नियोजन लक्षात आलेपासून मी १०० टक्के जमिन क्षेत्राला पाणी देण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली याकरीता या विभागातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात मला सहकार्य केले. सन २००९ पासून माझे याकरीता प्रयत्न सुरु होते त्यास ९ वर्षांनी यश मिळाले. या विभागातील १०० टक्के जमीन क्षेत्रास पाणी दयायचे असल्यास या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे अत्यंत गरजेचे होते आणि ही सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे काम युतीच्या शासनाच्या काळात झाले याचे समाधान आहे.माझे सातत्याच्या मागणीवरुन राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार स‍मितीने प्रकल्प अहवालाचा बारकाईने अभ्यास करुन या प्रकल्प अहवालाच्या 1610.32 कोटी इतक्या किंमतीस प्रथमत: शिफारस केली सदरची शिफारस झालेनंतर तारळी प्रकल्पाचा रुपये 1610.32 कोटी इतक्या किंमतीचा सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव हा मंजुरीकरीता मा.मंत्रीमंडळासमोर सादर करावा असे नियोजन व वित्त विभागाने निर्देशीत केले होते त्यानुसार हा प्रस्ताव मा.मंत्रीमंडळाच्या मंजुरीकरीता सादर करण्यात आला.मंत्रीमंडळाची आवश्यक असणारी मंजुरी मिळणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे माझे कसोशीने प्रयत्न सुरु होते त्यास राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दि.०९ ऑक्टोंबर,२०१८ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत तारळी धरण प्रकल्पाकरीता १६१०.३२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा धोरणात्मक असा निर्णय घेतला.त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे ९ वर्षाच्या आमच्या संघर्षाला,मागणीला आणि पाठपुराव्याला मुर्हुतस्वरुप प्राप्त करुन दिले त्याबद्दल प्रथमत: मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे शतश: आभार व्यक्त करतो. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे ५५३ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी हा तारळी धरण प्रकल्पातील ५० मीटर हेडच्या वरील जमिनक्षेत्राला पाणी मिळवून देणेकरीता मंजुर झाला आहे.यामुळे तारळे विभागातील एकूण १७ गावातील २७२५ एकर जादाचे क्षेत्र ओलिता खाली येणार असून युतीच्या शासनाने घेतलेला हा निर्णय तारळे विभाग सुजलाम सुफलाम करण्यास मदत करणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.


मराठा आरक्षणाचा एैतिहासिक निर्णय घेतलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत नवारस्ता येथे शनिवारी शासनाचे आभाराचा कार्यक्रम.


मराठा आरक्षणाचा एैतिहासिक निर्णय घेतलेबद्दल
आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत नवारस्ता येथे शनिवारी शासनाचे आभाराचा कार्यक्रम.


दौलतनगर दि.२९:- महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेले राज्यातील सकल मराठा समाजाचे गत दोन वर्षापासून मागणी असणारे मराठा आरक्षण देण्याचा एैतिहासिक निर्णय भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने घेतला असून या एैतिहासिक निर्णयाबद्दल युती शासनाचे व शासनाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे जाहीर आभार व विशेष अभिनंदन करणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत जाहीर आभाराचा कार्यक्रम नवारस्ता ता.पाटण येथे सकाळी ११.०० वा आयोजीत केला असून सकाळी १०.०० वा निसरे फाटा येथून मुंबई येथून अधिवेशनातून मतदारसंघात येणारे आमदार शंभूराज देसाईच्या प्रमुख उपस्थितीत मोटारसायकल रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना व शंभूराज युवा संघटना पाटण विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने देण्यात आली आहे.
                     पत्रकात म्हंटले आहे की,महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाजाला १६ टक्के मराठा आरक्षण देणेसंदर्भातील विधेयक दि. नोव्हेंबर रोजी विधानसभेत एकमताने मंजुर झाले असून महाराष्ट्रातील मराठा समाजाला १६ टक्के दिलेले आरक्षण हा युती शासनाने घेतलेला हा एैतिहासिक निर्णय आहे.या एैतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला न्याय मिळाला असून भाजप- शिवसेना युतीच्या शासनाने  घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत व शासनाचे विशेष अभिनंदन आणि जाहीर आभार माननेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हिवाळी अधिवेशनातुन आमदार शंभूराज देसाई हे शनिवारी पाटण मतदारसंघात येत असून त्यांचे पाटण तालुक्यातील निसरे फाटा  येथे जंगी स्वागत करुन निसरे फाटा येथून मतदारसंघातील सकल मराठा समाजातील युवक तसेच शिवसेना व शंभूराज युवा संघटना पाटण मतदार संघातील हजारों युवक हे मोटारसायकल रॅलीने आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत नवारस्ता ता.पाटण येथे येणार असून आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धाकृती पुतळयास व पाटण मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भाजप-शिवसेना युती शासनाचे जाहीर आभार मानण्याचा कार्यक्रम होणार आहे. युती शासनाने घेतलेल्या या एैतिहासिक निर्णयाचे स्वागत पेढे व साखर वाटून याठिकाणी करण्यात येणार असून सकल मराठा समाज हा मिळालेल्या मराठा आरक्षणाचा जल्लोष करणार आहे.या कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील सकल मराठा समाज तसेच शिवसेना पाटण मतदारसंघ व शंभूराज युवा संघटना पाटण मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते व युवकांनी सकाळी १०.०० वा निसरे फाटा येथे मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही शिवसेना व शंभूराज युवा संघटना पाटण विधानसभा मतदारसंघ यांचे वतीने करण्यात आले आहे.


Wednesday 28 November 2018

पाटण मतदारसंघातील वन विभागातील रस्त्यांना व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना १० दिवसात मान्यता देणार. आमदार शंभूराज देसाईंच्या तारांकीत प्रश्नावर वनमंत्री यांची विधानसभेत घोषणा.





   दौलतनगर दि.२८:- पाटण विधानसभा मतदारसंघातील वन विभागांच्या हद्दीत येणाऱ्या एक हेक्टरच्या आतील रस्त्यांच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना मान्यता मिळणेबाबत पाटणचे आमदार सुरवातीपासूनच आग्रही आहेत.त्यांनी अनेकदा हा प्रश्न माझे निदर्शनास आणून दिला आहे.पाटण मतदारसंघातील जे प्रस्ताव १ हेक्टरच्या आतील आहेत त्यास तात्काळ मान्यता देण्याचे अधिकार हे जिल्हा वनसंरक्षक यांना दिले आहेत १ हेक्टरवरील प्रस्ताव हे केंद्राकडे मान्यतेकरीता सादर करावे लागतात त्यानुसार राज्य शासनाच्या अखत्यारितील या प्रस्तावांना येत्या १० दिवसाच्या आत मान्यता देणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत या मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या तारांकीत प्रश्नावर केली.
              पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पाटण आणि कराड तालुक्यातील मौजे गणेवाडी ठोमसे,हुंबरणे,कसणी धनगरवाडा, कोळेकरवाडी (डेरवण), जळव डफळवाडी,पांढरेपाणी,नागवाणटेक (पाचगणी),पाणेरी (धनगरवाडा), निवी, आटोली, पाळेकरवाडी (बहूले),बेलदरे व म्होर्पे या १३ गांवाना व वाडयावस्त्यांना जोडणा-या रस्त्यांची कामे व पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामे करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतील मान्यता मिळणेबाबतचा तारांकीत प्रश्न आज विधानसभेत उपस्थित केला.             
             यावेळी प्रश्नावर आपले मत मांडताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये डोंगरी व दुर्गम भागात अनेक गांवे व वाड्या वस्त्या वसल्या असून डोंगरी भागातील अनेक गांवाना जोडणारे रस्ते तसेच करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजना या वनविभागाच्या हद्दीतून जात आहेत पाटण मतदारसंघातील अशी १३ गांवे व वाडयावस्त्यां आहेत.यापुर्वी दि.०४.०८.२०१६ रोजी यासंदर्भातील तारांकीत प्रश्न सभागृहात चर्चेला आला होता.यातील दोन गांवाना वनविभागाने मान्यता दिली आहे उर्वरीत ११ गांवाना अद्यापही मान्यता मिळाली नाही यास मान्यता कधी देणार असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी वनमंत्री यांना केला. यावर बोलताना वनमंत्री ना.मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या मान्यतेकरीता येणारे जे प्रस्ताव १ हेक्टरच्या आतील आहेत त्यास तात्काळ मान्यता देण्याचे अधिकार हे जिल्हा वनसंरक्षक यांना राज्य शासनाने अगोदरच दिले आहेत मात्र १ हेक्टरवरील प्रस्ताव हे केंद्राकडे मान्यतेकरीता सादर करावे लागतात तसा वनविभागाचा नियमच आहे.आजच हा तारांकीत प्रश्न सभागृहात झालेनंतर सन्माननीय आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर वन विभागाचे सचिव आणि त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी यांची बैठक घेण्याच्या सुचना मी वन सचिव यांना देतो आणि पाटण मतदारसंघातील जे प्रस्ताव १ हेक्टरच्या आतील आहेत त्यास मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा वनसंरक्षक यांना आहेत त्या प्रस्तावांना येत्या १० दिवसात मान्यता दयावी व जे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेकरीता सादर करावयाचे आहेत ते तात्काळ तयार करुन राज्य शासनाच्या वनविभागाच्या शिफारशीस केंद्र शासनाकडे सादर करावेत अशा सक्त सुचना वन विभाग सचिव व संबधित जिल्हा वनसंरक्षक यांना मी तातडीने देत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला क्रंमाक २ ला आलेला हा तारांकीत प्रश्न सुमारे अर्धा तास सभागृहात गाजला.यास वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक असे उत्तर दिल्याने आमदार शंभूराज देसाईंनी त्यांचे जाहीर आभार मानले.


Monday 26 November 2018

सत्यजितसिंह, आपण एवढेच पक्षनिष्ठा आहात तर छत्रपती उदयनराजेंच्या कार्यक्रमाला का गेला नव्हता. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना प्रतिसवाल.




दौलतनगर दि.२६:-मी आयोध्येला का गेलो नाही, का मला कुणी बोलवले नाही असे जाहीर करायला सांगणारे सत्यजितसिंह पाटणकर माझी पक्षनिष्ठा काढण्यापेक्षा आपण आणि आपले वडील एवढेच खरोखर नेत्याशी आणि पक्षाशी पक्षनिष्ठ आहात तर तुमच्या पक्षाचे प्रमुख हे तुमच्याच पक्षाचे जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे संपुर्ण सातारा जिल्हयाने आयोजीत केलेल्या जाहीर सत्कार कार्यक्रमाला आले तेव्हा तुम्ही कुठे लपून बसला होतात,जाहीर सत्कार कार्यक्रमाचे निमंत्रण असताना सुध्दा तुम्ही पितापुत्र या कार्यक्रमाला का गेला नव्हता हीच का तुमची पक्षनिष्ठा असा प्रतिसवाल आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना केला असून सत्यजितसिंह पाटणकरांनी किंवा त्यांच्या पिताश्रींनी हे पहिल्यांदा पाटण तालुक्यातील जनतेपुढे जाहीर करावे असे जाहीर आव्हान त्यांनी पाटणकर पितापुत्रांना पत्रकाव्दारे दिले आहे.
             पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की,बेताल वक्तव्य कुणाची सुरु आहेत हे पाटण मतदारसंघातील जनतेच्या चांगलेच लक्षात येत आहे.विरोधांत बोलण्यासारखे आणि दाखविण्यासारखे तुम्हा पितापुत्रांकडे काहीच नसल्याने नको ते विषय, नको तेव्हा घ्यायचे या तुमच्या सवयी जनतेला आणि आम्हालाही काही नवीन नाहीत. आमचे नेते आयोध्येला जाताना त्यांनीच पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात नदीकाठी महाआरती करावी अशा सक्त सुचना आम्हाला दिल्या होत्या त्या सुचनांचेच आम्ही पालन केले हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही हे पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या खाजगी शंभूसेनेलाही चांगलेच माहिती आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज घराण्याची परंपरा आणि समाजामध्ये या घराण्याविषयी असणारे आदराचे स्थान म्हणून तुमच्याच पक्षाचे जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे संपुर्ण सातारा जिल्हयाने जिल्हयाच्या ठिकाणी चार महिन्यापुर्वी भव्य जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या जाहीर सत्कार कार्यक्रमाला सातारा जिल्हयासह इतर जिल्हयातील राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांना या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे निमंत्रण होते.निमत्रंण असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. मग तेव्हा तुम्ही पितापुत्र या कार्यक्रमाला न येता कुठे लपून बसला होतात.हीच का तुमची पक्षनिष्ठा हे मतदारसंघातील जनतेला दोघांपैकी एकाने सांगितले तरी बरे होईल.स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून या सवयी आता तरी सोडा असा उपरोधिक टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
            माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर, १८८२४ ने कुणी लाटेवर निवडून येत नाही हे तुमच्या लक्षात केव्हा येणार? माझे विरोधात तीनवेळा ७३६ व २५०० आणि ५८० मतांनी निवडून आलेले तुमचे पिताश्री याला लाटेवर निवडून येणे असे म्हणतात.१८८२४ इतक्या मताधिक्कयाने तुमचा पराभव करुन पाटण मतदारसंघातील जनतेने तुम्हाला हे दाखवून दिले आहे.त्यामुळे लाटेवर निवडून येणाऱ्या तुमच्या पिताश्रींची सहावेळा निवडून आल्याची टिमकी सारखी वाजवित बसू नका.तुमच्या पिताश्रींची मापे काढायला आणि त्यांच्यावर बेताल वक्तव्य करायला आम्हाला वेळच आहेच कुठे आमचा सगळा वेळ तुमच्या पिताश्रींनी मतदारसंघातील प्रलंबीत ठेवलेली विविध विकासकामे मार्गी लावण्यातच जात आहे. हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. देसाई कारखान्याची निर्मिती कुणी केली,त्याला विरोध कुणी केला हे मतदारसंघातील जनतेबरोबर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.म्हणूनच तुम्हाला याच कारखान्याच्या सुज्ञ सभासदांनी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कारखान्यातून खडयासारखे बाजूला ठेवले आहे.कारखाना कसा चालवायचा हे आम्हाला चांगलेच कळते तुमच्या पिताश्रींनी आणि तुम्ही कोयना शुगरच्या नावाने गोळा केलेल्या भागभांडवलाचे केले काय? कधी तो वारंवार घोषणा केलेला कारखाना उभा राहणार आहे हे प्रथमत: पहा.विकासाच्या बाबतीत कुणी मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात केला आहे हे मतदारसंघातील जनतेला चांगलेच कळले आहे.म्हणूनच माझ्या खाजगी शंभूसेनेतील लोक मला सोडून न जाता ते राष्ट्रवादीला आणि तुमच्या निष्क्रीय कारभाराला कंटाळून आमच्या पक्षात येत आहेत. तुमच्या बालेकिल्ल्यातील तुमच्याच गावाशेजारील शिरळ गांवातील उदाहरण घ्या १५ दिवसापुर्वी या संपुर्ण शिरळ गावाने तुमच्या निष्क्रीय कारभाराला कंटाळून माझे नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावरुनच तुमचे कतृत्व लक्षात येते त्यामुळे सत्यजितसिंह पाटणकरांनी शिवसेनेची आणि आमच्या खाजगी शंभूसेनेची यापुढे मापे काढू नयेत असा सल्लाही त्यांनी शेवठी दिला आहे.
चौकट:- सत्यजितसिंहाचा बालिशपणा जाणार कधी ?
       मी आयोध्येला का गेलो नाही असा सवाल करणारे सत्यजितसिंह पाटणकर यांनी प्रसिध्दीमाध्यमांना प्रसिध्द केलेली बैठक दि.११ नोव्हेंबरची मोरणा विभागातील भवानी माळावरची आहे तेव्हा आयोध्येला जाण्याचा विषयही नव्हता आणि आमची शिवसेनेची महाआरती दि.२४ नोव्हेबंरला पार पडली.कुठे आणि कशी बेताल वक्तव्य करावीत याचे साधे भानही सत्यजितसिंहाना नाही. अहो सत्यजितसिंह किती ही फसवाफसवी. तुमचा बालिशपणा जाणार तरी कधी अशी खिल्ली आमदार शंभूराज देसाईंनी उडविली आहे.

Saturday 24 November 2018

निसरे घाटावर कोयना नदीकाठी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न. शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाआरतीला पाटण शिवेसनेच्यावतीने महाआरतीव्दारे दिला जाहीर पाठीबां. हजारों शिवसैनिकांची कोयना नदीकाठी उपस्थिती.


निसरे घाटावर कोयना नदीकाठी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाआरतीला पाटण शिवेसनेच्यावतीने महाआरतीव्दारे दिला जाहीर पाठीबां.
हजारों शिवसैनिकांची कोयना नदीकाठी उपस्थिती.


दौलतनगर दि.२३:- शासनाने रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे याकरीता शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरील पवित्र माती मंगल कलशामध्ये घेवून आयोध्येला गेले असून येथे त्यांच्या हस्ते राममंदीर उभारणीसाठी शरयु नदीच्या काठावर शरयू महाआरती करण्यात आली त्यांच्या या विचारांना जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत निसरे ता.पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर आयोजीत केलेली कोयना नदीची महाआरती मोठया उत्साहाने संपन्न झाली. महाआरतीकरीता पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी,विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती.
         प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी निसरे ता.पाटण येथील सोमाई देवीची ओटी भरुन निसरे घाटावर येवून कोयना नदीचे पुजन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते याठिकाणी कोयना नदीची महाआरती करण्यात आली व आमदार शंभूराज देसाई व शिवसैनिकांच्या हस्ते शेकडो दिवे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, संचालक पांडूरंग नलवडे, विजयराव जंबुरे, बबनराव भिसे, जिल्हा परिषद सदस्य विजयराव पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, माजी पंचायत समिती सदस्य हरिश भोमकर, माजी विरोधी पक्षनेते ॲङ डी. पी. जाधव, ॲङ बाबूराव नांगरे, बॅकेचे संचालक अशोकराव पाटील, धोंडीराम भोमकर, अभिजित पाटील, कारखाना संचालक पांडूरंग नलवडे, संपतराव सत्रे, अशोकराव डिगे, गजानन जाधव, माजी संचालक बबनराव पानस्कर, बाळासाहेब पाटील, मानसिंगराव नलवडे, प्रकाश नेवगे, आबदारवाडी सरपंच विजय शिंदे, पी. एन. माने, दिलीप सपकाळ, शिवसेना पाटण शहर प्रमुख शंकर कुंभार, आनंदराव काळे, सुरेश जाधव यांच्यासह शिवसेना शाखाप्रमुख, विविध संस्थाचे पदाधिकारी, तालुक्यातील शिवसैनिक यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे यासाठी आजपर्यंत रथयात्रा निघाल्या. जय श्रीराम लिहलेल्या वीटा गेलेल्या आपण पाहिल्या आहेत. राममंदीर बांधण्याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी राजमाता जिजाऊ व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्शिवाद घेवून येथील पवित्र माती कपाळाला लावून शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरुन दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी आयोध्येला गेले आहेत. याचवेळी त्यांच्या शुभहस्ते आयोध्येतील शर्वरी नदीकाठी शिवसेना पक्षाच्या वतीने सहकुटुंब महाआरतीचे नियोजन केले होते मोठया उत्साहाने प्रथमत: लक्ष्मण किल्ल्यावर संकल्प पुजा करण्यात आली व त्यानंतर सायं महाआरती आयोध्येत संपन्न झाली असून शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या या विचारांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक, पाटण मतदारसंघ शिवसेना व मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने जाहीर पाठींबा देणेकरीता आपणही आपले मतदारसंघात कोयना नदीकाठी कोयना नदीची महाआरती केली आहे. शासनाने लवकरात लवकर रामजन्मभूमि अयोध्या येथे ठरलेल्या ठिकाणी राममंदीर उभारावे अशी आमची शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बरोबरीने शासनाकडे मागणी आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या मागणीला पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा मी याठिकाणी जाहीर पाठींबा व्यक्त करतो असे ते म्हणाले. उपस्थित सर्वांचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार यांनी स्वागत केले व आभार सुरेश पानस्कर यांनी मानले.

नोव्हेंबरच्या अधिवेशनात राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये पाटण तालुक्यातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना १६.५० कोटीं रुपयांचा निधी मंजुर.


नोव्हेंबरच्या अधिवेशनात राज्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये पाटण तालुक्यातील
रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना १६.५० कोटीं रुपयांचा निधी मंजुर.

      
दौलतनगर दि.२४:- राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबई येथे सुरु असून या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये पाटण तालुक्यातील आठ रस्त्यांच्या कामांना व एका मोठया पुलाच्या कामांना एकूण १६.५० कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
       पत्रकात म्हंटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री व सार्वजनीक बांधकाम मंत्री यांचेकडे पाटण या डोंगराळ व दुर्गम भागातील रस्त्यांच्या व पुलाच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पाच्या मागण्यांमधून निधी मंजुर करणेकरीता पाटण तालुक्यातील आठ रस्त्यांची व एका मोठया पुलांचे बांधकाम करण्याची कामे सुचविण्यात आली होती त्यानुसार अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये पाटण तालुक्यातील आठ रस्त्यांच्या व एका मोठया पुलांचे बांधकामांस शासनाने निधी मंजुर करुन दिला आहे यामध्ये मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा १४३ किमी २/०० ते ३/०० सुधारणा करणेकरीता ६० लाख, मल्हारपेठ पंढरपूर रस्ता रामा १४३ किमी ४/८०० ते ६/५००,७/०० ते ८/०० सुधारणा करणे. १ कोटी ३५ लाख, पाटण मणदुरे जळव तारळे रस्ता प्रजिमा ५७ किमी २/५०० ते ४/००, ५/१०० ते ६/३००, ७/०० ते ८/५००, ९/०० ते ९/४००, १०/०० ते १०/३५०,१०/६७० ते ११/००,२३/०० ते २५/०० मधील सुधारणा करणे.१ कोटी ६० लाख, वाखाणवस्ती कराड ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी रस्ता प्रजिमा ५५ किमी ७३/०० ते ७६/०० ची सुधारणा करणे. १ कोटी, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ किमी १०/२०० जवळ पुलाचे बांधकाम करणे. ७५ लाख सातारा गजवडी चाळकेवाडी घाणबी पाटण रस्ता प्रजिमा २९ किमी ५९.०० ते ६१.८०० मधील सुधारणा करणे. १ कोटी, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ किमी २०/६०० जवळ पुलाचे बांधकाम व बांधीव गटर बांधणे. १ कोटी, ५० लाख,वाखाणवस्ती कराड ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी रस्ता प्रजिमा ५५ किमी ३३/०० ते ३३/५००, ३६/०० ते ४१/५०० ची सुधारणा करणे.१ कोटी १२ लाख ५० हजार व  प्रजिमा २९ ते ठोसेघर जांभळे मुरुड आवर्डे आंबळे रस्ता इजिमा ५२ वर किमी १५/८०० येथे तारळी नदीवर आंबळे गावाजवळ मोठा पुल बांधणे या कामांकरीता ७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये असा एकूण १६ कोटी ४२ लाख ०९ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिध्द करुन सदरची कामे लवकरात लवकर सुरु करणेसंदर्भात बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून पुरवणी मागण्यांमध्ये पाटण तालुक्यातील आठ मोठया रस्त्यांच्या कामांचा व एका मोठया पुलांच्या कामांस मंजुरी देवून निधी मंजुर केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.


Friday 23 November 2018

सतर्क आमदार शंभूराज देसाईंच्या, भूकंपाच्या संदर्भात सतर्क राहण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना. अधिवेशनाच्या सुट्टीत अधिकाऱ्यांची तातडीने घेतली बैठक.



       


दौलतनगर दि.२३:- कोयनेचा भूकंप महाराष्ट्रात अतिशय संवेदनशील मानला जातो.कोयनेकडे जाणवणारा भूकंपाचा धक्का महाराष्ट्राचा थरकाप उडविणारा ठरतो.या परिसरात लहान असो वा मोठा भूकंप याची चर्चा नेहमीच महाराष्ट्रभर होते.त्यामुळे येथील प्रशासन नेहमीच अलर्ट राहते.हे प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम या मतदारसंघाचे सतर्क आमदार शंभूराज देसाई नेहमी करतात.दि.२२ नोव्हेंबरच्या की ७.२९ मिनीटांनी असाच भूकंपाचा धक्का कोयनानगर परिसरात जाणवला.याची माहिती तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांना मिळताच हिवाळी अधिवेशनाकरीता मुंबई याठिकाणी असणारे आमदार यांनी सकाळी ०८.०० वा.पाटणचे उपविभागीय अधिकारी,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व याची माहिती घेतली. कोणतीही हानी किंवा पडझड झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून कळल्यानंतर त्यांनी निश्वा:स सोडला. आणि दुसरे दिवशी अधिवेशनातील सुट्टीतून येवून संबधित सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेवून भूकंपाच्या संदर्भात शासकीय सुट्टी असो वा काही भूकंपाच्या संदर्भात आमदार किती सतर्क आहेत याचे दर्शन आज घडले.
               शुक्रवारी गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असताना देखील हिवाळी अधिवेशनातून सुट्टी असल्याने तातडीने येत आमदार शंभूराज देसाईंनी दि.२२ नोव्हेंबरच्या झालेल्या २.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या संदर्भात तातडीने तहसिल कार्यालय,पाटण येथे तालुकास्तरीय सर्व संबधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले,पाटणचे पोलीस निरीक्षक यु.एस.भापकर,कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गुजर,कोयना धरण व्यवस्थापनाचे उपकरण विभागाचे अभियंता रा.य.खंदारे, संशोधन सहाय्यक डी.एम.चौधरी,मंडलाधिकारी ए.एल.संकपाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी वाघ, विस्तार अधिकारी शेजवळ,पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे यांची उपस्थिती होती.
               दि.२२ नोव्हेंबरच्या पहाटे ७.२९ वा पाटण तालुक्यात झालेल्या भूकंपाच्या संदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी सविस्तर आढावा घेतला.यामध्ये २.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.या भूकंपामुळे कोणतीही हानी किंवा पडझड झाली नाही.अशी माहिती प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,मात्र भूकंप जाणवला.या भूकंपाचा केंद्रबिंदू हा वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या ५ किमी अंतरावर आहे.असे उपकरण विभागाचे अभियंता रा.य.खंदारे यांनी सांगितले. यावर भूकंपाच्या संदर्भात शासकीय सुट्टी असो वा काही मतदारसंघातील प्रशासनाने नेहमीच सतर्क रहावे अशा सुचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.सातत्याने भूकंपाचे हादरे सोसणारा पाटण तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. या परिसरात लहान असो वा मोठा भूकंप झाला तर त्याची चर्चा महाराष्ट्रभर होते सध्या महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे त्यामुळे सतर्क रहा असे त्यांनी सांगून सन २०१८ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत एकूण किती भूकंप झाले याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी घेतली यावेळी या कालावधीत एकूण १० लहान मोठया रिश्टर स्केलचे भूकंप झाले आहेत यामध्ये जानेवारी २०१८ मध्ये १.३ व ३.२ रिश्टर स्केल,फेब्रुवारीमध्ये ३.२ रिश्टर स्केल,मार्चमध्ये दोन ३.४ व २.८ रिश्टर स्केल,सप्टेंबरमध्ये २.८ रिश्टर स्केल व नोव्हेंबरमध्ये ३.१-३.१ चे दोन व २.९ व २.८ रिश्टर स्केलचे दोन असे एकूण दहा भूकंपाचे हादरे जाणवले असल्याचे अधिकाऱ्यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले. सतर्क आमदारांमुळे सतर्क प्रशासनाचे कामकाजही सतर्क राहूनच सुरु असल्याचे पहावयास मिळाले.

आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत निसरे घाटावर कोयना नदीकाठी दि.२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा महाआरतीचे आयोजन. महाआरतीस उपस्थित राहण्याचे शिवसेनेचे आवाहन.


      

दौलतनगर दि.२३:- शासनाने रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे याकरीता शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरील पवित्र माती मंगल कलशामध्ये घेवून आयोध्येला निघाले आहेत दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी आयोध्या येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी आयोध्येत शरयु महाआरती घेण्यात येणार असून शिवसेनापक्षप्रमुख यांच्या विचारांना जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने निसरे ता.पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर सायं.५.०० वा महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार यांनी दिली असून या महाआरतीस पाटण मतदारसंघातील तमाम शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
          जयवंतराव शेलार यांनी पत्रकात म्हंटले आहे की,रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे यासाठी आजपर्यंत रथयात्रा निघाल्या.जय श्रीराम लिहलेल्या वीटा गेलेल्या आपण पाहिल्या आहेत. राममंदीर बांधण्याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी राजमाता जिजाऊ व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्शिवाद घेवून येथील पवित्र माती कपाळाला लावून शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरुन दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी आयोध्येला प्रस्थान करीत आहेत यादिवशी सायंकाळी आयोध्येत त्यांचे हस्ते शरयु महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या विचारांना पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी यादिवशी त्याचवेळी निसरे ता.पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर सायं.५.०० वा महाआरती घेण्याचे आयोजन पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.या महाआरतीस पाटण मतदारसंघातील तमाम शिवसैनिक,कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयवंतराव शेलार यांनी पत्रकात केले आहे.

Wednesday 21 November 2018

माजी आमदारपुत्र, प्रत्यक्षातला विकास पहायला चिंरेबंदी वाडयातून बाहेर या. मतदारसंघातील जनताच तुम्हाला मी केलेला विकास दाखवेल. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना टोला.



       

दौलतनगर दि.२१:- विधानपरीषदेचे सभापती यांच्या फंडातून मागून आणलेल्या केवळ १५ लाख रुपयांच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात कतृत्वशुन्य माजी आमदार यांचे सुपुत्रांनी कागदावरचा विकास कुणी पाहिला आहे.असा बालिश सवाल कार्यक्रमात केल्याचे समजले.अहो माजी आमदारपुत्र,पाटण मतदारसंघात सुरु असलेला कोटयावधी रुपयांचा विकास तुम्हाला चिरेबंदी वाडयात बसून दिसणार नाही त्याकरीता चिरेबंदी वाडयातून जरा बाहेर या.मी काय काय आणि कुठे कुठे विकास केलाय आणि केलेला विकास कागदावरच आहे का प्रत्यक्षात आहे हे मतदारसंघातील जनताच तुम्हाला गावागावात प्रत्यक्षात दाखवेल असा खरमरीत टोला उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगावला असून देसाई कारखान्याची काळजी तुम्ही करु नका.त्यासाठी आम्ही खंबीर आहोत तुमच्या पिताश्रींनी अनेकदा घोषणा केलेल्या साखर कारखान्याचे काय झाले त्याच्या विटा कधी उभ्या करणार हे मतदारसंघातील जनतेला तुम्ही आदी सांगा असे आवाहनही त्यांनी पाटणकरांना केले.
       तारळे विभागातील दुसाळे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर केलेल्या दुसाळे फाटा ते दुसाळे गावपोहोच रस्त्याचे भूमिपुजन त्यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते या २.४०० किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाकरीता आमदार शंभूराज देसाईंनी १ कोटी ५६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजुर आणला आहे.कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,देसाई कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शिवदौलत बँकेचे संचालक संजय देशमुख,शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष अभिजीत पाटील,माणिक पवार,सरपंच विठ्ठल जाधव,भरत जाधव, झुझांर जाधव,संतोष जाधव,समाधान जाधव,आबाजी जाधव,सुदाम लोहार,गौरव परदेशी,पोपट साळुंखे,बाजीराव रांजणे,बाळासाहेब सुर्यवंशी,श्रीमंत सुर्यवंशी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता विलास पानस्कर,शाखा अभियंता मासेरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होती.
       याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांनी तालुक्याची आमदारकी सहावेळा भोगली. या सहा टर्ममध्ये तालुक्यातील जनतेला देण्याकरीता त्यांच्या हातात बरेच काही होते.मात्र हातात असताना जनतेला ते काही देवू शकले नाहीत आणि आता पक्षाच्या नेत्यांकडे हात पसरत फिरत आहेत.गेल्या चार वर्षात याच माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना त्यांच्या पक्षाकडून केवळ आणि केवळ १ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मिळाला त्यापेक्षा जादा रक्कमेचे एका रस्त्याचे भूमिपुजन आज माझे हस्ते झाले.दुसाळयाचा हा रस्ता १ कोटी ५६ लाख ८९ हजार रुपयांच्या निधीचा आहे.त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांनी दोन वर्षापुर्वी तालुक्यात येवून प्रत्येक वर्षी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यातील केवळ १ कोटी रुपयेच त्यांना त्यांनी दिले आणि पुढे निधीचे गाजर दाखविले. आता विधानपरिषदेचे सभापती यांनी १५ लक्ष ते ही दोन गांवात १० आणि ५ लाख असे वाटुन दिले.विधानपरिषदेच्या सभापतींकडून मागून आणलेल्या केवळ १५ लाख रुपयांच्या निधीची भूमिपुजने करताना माजी आमदारपुत्रांनी जणू काही आपण कोटयावधी रुपयांचेच भूमिपुजन केल्याचा आव आणून बालिश वक्तव्ये केली मला त्यांना यानिमित्ताने सांगायचे आहे ज्या भूपिुजनाच्या कार्यक्रमात आपण कागदावरचा विकास कोणी पाहिला आहे असे बालिश वक्तव्य केले त्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापतीही उपस्थित होते त्यांना जरी विचारले असते की पाटण तालुक्यातील विकास कागदावरचा आहे का प्रत्यक्षातला.तर त्याचे उत्तर तुम्हाला त्यांच्याकडूनच मिळाले असते म्हणूनच त्यांनी तुमच्या बालिश वक्तव्याला बाजूला ठेवून दुजोरा दयायला नापसंती दर्शविली.यावरुनच आपली कार्यक्षमता जनतेच्या लक्षात येते असा उपहासात्मक टोलाही लगावत ते म्हणाले,विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता चार वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदार संघातील जनता करु लागली आहे.हेच आपल्या विरोधकांना रुचत नाहीये.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या चार वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे.आता बांधकाम मंत्री असताना जेवढा निधी बांधकाम मंत्री यांनी मतदारसंघात आणायला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त निधी जर केवळ आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर तुम्हाला त्याचे वाईट वाटणे सहाजिकच आहे.मतदारसंघातील व्यथा मांडायला मी तोंड उघडतो का नाही ते पाहण्यापेक्षा आपले पिताश्रींनी कोणकोणत्या व्यथा मांडायला याअगोदर तोंड उघडले हे जरा विचारुन घ्या. भाषणात माजी आमदारांचे नाव मला घ्यावेच लागणार कारण त्यांची निष्क्रीयता जनतेसमोर आली आहे.मतासाठी सर्वसामान्यांची डोकी भडकविण्याव्यतिरिक्त आतापर्यंत तुम्हा पितापुत्रांना काही जमलेच नाही आणि जमणारही नाही त्यामुळे जनतेने तुमच्याकडून कोणती अपेक्षा करायची. देसाई कारखान्याची काळजी करायला कारखान्यांच्या सुज्ञ सभासदांनी आम्हाला तुमचा अनेकदा मोठया मताधिक्कयाने पराभव करुन निवडून दिले आहे.कारखान्याची आणि सभासदांची काळजी करायला सभासदांनी निवडून दिलेले विश्वस्त सक्षम आहोत तुम्ही त्याची काळजी करु नका. तुमच्या पिताश्रींनी अनेकदा घोषणा केलेल्या साखर कारखान्याचे विटा कधी उभ्या करणार हे पहिल्यांदा सांगा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार रोहित जाधव यांनी मानले.



Tuesday 20 November 2018

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- आमदार शंभूराज देसाई. ७५ वा जयंती सोहळयात प्रतिपादन.


प्रसिध्दीसाठी दि. २०/११/२०१८
स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- आमदार शंभूराज देसाई.
७५ वा जयंती सोहळयात प्रतिपादन.
     

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे.त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही दोघे बंधू लिलया पेलत आहोत. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली देसाई गटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे याचा आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  ७५ वा जयंती सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख जयवंतराव शेलार यां प्रमुख मान्यवरांसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,देसाई गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी स्व.शिवाजीराव देसाई आबासाहेब यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. 
      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर... आज पाटण तालुक्यातील शेतक-यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे. लोकनेते साहेबांनी तालुक्याचे नंदनवन करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते तालुक्यातील कोयना धरणामुळे, पाटण खोऱ्यातील घाट फोडून रस्ते करण्याच्या दुरदृष्टीच्या निर्णयामुळे पुर्ण झाले कोयना नदीकाठी उपसा जलसिंचन योजना उभारुन या माध्यमातून साखर कारखान्यांस मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होईल हा त्यांचा दृष्टीकोन होता तो सफल झाला. प्रसिध्द उद्योजक असताना लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले त्यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारला, अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतक-यांच्या मालकीचा करुन दिला.स्व. आबासाहेबांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतक-यांना कधीही न फेडता येणारे आहे. देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असून या कारखान्याची उन्नती करणे हिच ख-या अर्थाने स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांना श्रध्दांजली ठरणार असून पाटण तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले आहे. जनतेच्या पाठबळाला आमदार म्हणून मीही कुठेही कमी पडत नाही. मरळीच्या माळरानावर लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला साखर कारखाना शेतक-यांच्या मालकीचा करुन देण्यात स्व.आबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे.लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही गेली ३० ते ३२ वर्षे पाटण तालुक्यात काम करीत आहोत. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी केले.ॲड.डी.पी.जाधव जयवंतराव शेलार, डॉ.दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली.कार्यक्रमास कारखान्याचे सभासद,शेतकरी, हितचिंतक, कार्यकर्ते व पदाधिकारी,देसाई कारखान्याचे कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सहावे पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण मतदारसंघात गोरगरीबांना ब्ल्ँकेट वाटप.


प्रसिध्दीसाठी दि.२०/११/२०१८
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सहावे पुण्यस्मरण दिनानिमित्त
आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण मतदारसंघात गोरगरीबांना ब्ल्ँकेट वाटप.


हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सहावे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ नोव्हेंबर,रोजी शिवसेनाप्रमुख यांना विनम्र अभिवादन करण्याआले.यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सहावे पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील पुरुष व महिलांना आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले.
दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी शिवसेनाप्रमुख यांचे सहाव्या पुण्यस्मरण दिनाचे व यानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील पुरुष व महिलांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम दि.१७ नोव्हेंबर, रोजी आयोजीत करण्यात आला होता.या दिनानिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमत: शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात येवून त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील महिलांना पुरुष व महिलांना आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना  आमदार शंभूराज देसाई म्हणाले,हिंदुहृदयसम्राटशिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारेहिंदुहृदयसम्राटशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्तीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला.. आपल्या लेखणीतून,व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊनशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांनी १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली.आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्रशिवसेनाप्रमुखहिंदुहृदयसम्राटम्हणून ओळखू लागला.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हायात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची वाटचाल सुरु आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो.