Friday 23 November 2018

आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत निसरे घाटावर कोयना नदीकाठी दि.२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वा महाआरतीचे आयोजन. महाआरतीस उपस्थित राहण्याचे शिवसेनेचे आवाहन.


      

दौलतनगर दि.२३:- शासनाने रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे याकरीता शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरील पवित्र माती मंगल कलशामध्ये घेवून आयोध्येला निघाले आहेत दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी आयोध्या येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी आयोध्येत शरयु महाआरती घेण्यात येणार असून शिवसेनापक्षप्रमुख यांच्या विचारांना जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने निसरे ता.पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर सायं.५.०० वा महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार यांनी दिली असून या महाआरतीस पाटण मतदारसंघातील तमाम शिवसैनिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
          जयवंतराव शेलार यांनी पत्रकात म्हंटले आहे की,रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे यासाठी आजपर्यंत रथयात्रा निघाल्या.जय श्रीराम लिहलेल्या वीटा गेलेल्या आपण पाहिल्या आहेत. राममंदीर बांधण्याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी राजमाता जिजाऊ व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्शिवाद घेवून येथील पवित्र माती कपाळाला लावून शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरुन दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी आयोध्येला प्रस्थान करीत आहेत यादिवशी सायंकाळी आयोध्येत त्यांचे हस्ते शरयु महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या विचारांना पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी यादिवशी त्याचवेळी निसरे ता.पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर सायं.५.०० वा महाआरती घेण्याचे आयोजन पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.या महाआरतीस पाटण मतदारसंघातील तमाम शिवसैनिक,कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जयवंतराव शेलार यांनी पत्रकात केले आहे.

3 comments: