Wednesday 21 November 2018

माजी आमदारपुत्र, प्रत्यक्षातला विकास पहायला चिंरेबंदी वाडयातून बाहेर या. मतदारसंघातील जनताच तुम्हाला मी केलेला विकास दाखवेल. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना टोला.



       

दौलतनगर दि.२१:- विधानपरीषदेचे सभापती यांच्या फंडातून मागून आणलेल्या केवळ १५ लाख रुपयांच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात कतृत्वशुन्य माजी आमदार यांचे सुपुत्रांनी कागदावरचा विकास कुणी पाहिला आहे.असा बालिश सवाल कार्यक्रमात केल्याचे समजले.अहो माजी आमदारपुत्र,पाटण मतदारसंघात सुरु असलेला कोटयावधी रुपयांचा विकास तुम्हाला चिरेबंदी वाडयात बसून दिसणार नाही त्याकरीता चिरेबंदी वाडयातून जरा बाहेर या.मी काय काय आणि कुठे कुठे विकास केलाय आणि केलेला विकास कागदावरच आहे का प्रत्यक्षात आहे हे मतदारसंघातील जनताच तुम्हाला गावागावात प्रत्यक्षात दाखवेल असा खरमरीत टोला उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगावला असून देसाई कारखान्याची काळजी तुम्ही करु नका.त्यासाठी आम्ही खंबीर आहोत तुमच्या पिताश्रींनी अनेकदा घोषणा केलेल्या साखर कारखान्याचे काय झाले त्याच्या विटा कधी उभ्या करणार हे मतदारसंघातील जनतेला तुम्ही आदी सांगा असे आवाहनही त्यांनी पाटणकरांना केले.
       तारळे विभागातील दुसाळे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर केलेल्या दुसाळे फाटा ते दुसाळे गावपोहोच रस्त्याचे भूमिपुजन त्यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते या २.४०० किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाकरीता आमदार शंभूराज देसाईंनी १ कोटी ५६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजुर आणला आहे.कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,देसाई कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शिवदौलत बँकेचे संचालक संजय देशमुख,शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष अभिजीत पाटील,माणिक पवार,सरपंच विठ्ठल जाधव,भरत जाधव, झुझांर जाधव,संतोष जाधव,समाधान जाधव,आबाजी जाधव,सुदाम लोहार,गौरव परदेशी,पोपट साळुंखे,बाजीराव रांजणे,बाळासाहेब सुर्यवंशी,श्रीमंत सुर्यवंशी,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता विलास पानस्कर,शाखा अभियंता मासेरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होती.
       याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांनी तालुक्याची आमदारकी सहावेळा भोगली. या सहा टर्ममध्ये तालुक्यातील जनतेला देण्याकरीता त्यांच्या हातात बरेच काही होते.मात्र हातात असताना जनतेला ते काही देवू शकले नाहीत आणि आता पक्षाच्या नेत्यांकडे हात पसरत फिरत आहेत.गेल्या चार वर्षात याच माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना त्यांच्या पक्षाकडून केवळ आणि केवळ १ कोटी १५ लक्ष रुपयांचा निधी मिळाला त्यापेक्षा जादा रक्कमेचे एका रस्त्याचे भूमिपुजन आज माझे हस्ते झाले.दुसाळयाचा हा रस्ता १ कोटी ५६ लाख ८९ हजार रुपयांच्या निधीचा आहे.त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा यांनी दोन वर्षापुर्वी तालुक्यात येवून प्रत्येक वर्षी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती त्यातील केवळ १ कोटी रुपयेच त्यांना त्यांनी दिले आणि पुढे निधीचे गाजर दाखविले. आता विधानपरिषदेचे सभापती यांनी १५ लक्ष ते ही दोन गांवात १० आणि ५ लाख असे वाटुन दिले.विधानपरिषदेच्या सभापतींकडून मागून आणलेल्या केवळ १५ लाख रुपयांच्या निधीची भूमिपुजने करताना माजी आमदारपुत्रांनी जणू काही आपण कोटयावधी रुपयांचेच भूमिपुजन केल्याचा आव आणून बालिश वक्तव्ये केली मला त्यांना यानिमित्ताने सांगायचे आहे ज्या भूपिुजनाच्या कार्यक्रमात आपण कागदावरचा विकास कोणी पाहिला आहे असे बालिश वक्तव्य केले त्या कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापतीही उपस्थित होते त्यांना जरी विचारले असते की पाटण तालुक्यातील विकास कागदावरचा आहे का प्रत्यक्षातला.तर त्याचे उत्तर तुम्हाला त्यांच्याकडूनच मिळाले असते म्हणूनच त्यांनी तुमच्या बालिश वक्तव्याला बाजूला ठेवून दुजोरा दयायला नापसंती दर्शविली.यावरुनच आपली कार्यक्षमता जनतेच्या लक्षात येते असा उपहासात्मक टोलाही लगावत ते म्हणाले,विरोधासाठी विरोध करणे हे विरोधकांचे कामच आहे.त्यांनी विरोधक म्हणून विरोध नाही केला तर त्यांना विरोधक कोण म्हणणार.परंतू विरोधकांच्या कार्यकालात पाटण मतदारसंघाची अवस्था काय होती आणि आता चार वर्षात पाटण मतदारसंघात कशाप्रकारे बदल झाला आहे याची तुलना मतदार संघातील जनता करु लागली आहे.हेच आपल्या विरोधकांना रुचत नाहीये.गत पाच वर्षात विरोधकांच्या काळात पाटण मतदारसंघात रस्त्याच्या कामांसाठी जेवढा निधी आला नाही त्याहून अधिक निधी या चार वर्षात तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील रस्त्याच्या कामांसाठी आणण्यास मला यश मिळाले आहे.आता बांधकाम मंत्री असताना जेवढा निधी बांधकाम मंत्री यांनी मतदारसंघात आणायला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त निधी जर केवळ आमदार म्हणून मी मतदारसंघात आणत असेल तर तुम्हाला त्याचे वाईट वाटणे सहाजिकच आहे.मतदारसंघातील व्यथा मांडायला मी तोंड उघडतो का नाही ते पाहण्यापेक्षा आपले पिताश्रींनी कोणकोणत्या व्यथा मांडायला याअगोदर तोंड उघडले हे जरा विचारुन घ्या. भाषणात माजी आमदारांचे नाव मला घ्यावेच लागणार कारण त्यांची निष्क्रीयता जनतेसमोर आली आहे.मतासाठी सर्वसामान्यांची डोकी भडकविण्याव्यतिरिक्त आतापर्यंत तुम्हा पितापुत्रांना काही जमलेच नाही आणि जमणारही नाही त्यामुळे जनतेने तुमच्याकडून कोणती अपेक्षा करायची. देसाई कारखान्याची काळजी करायला कारखान्यांच्या सुज्ञ सभासदांनी आम्हाला तुमचा अनेकदा मोठया मताधिक्कयाने पराभव करुन निवडून दिले आहे.कारखान्याची आणि सभासदांची काळजी करायला सभासदांनी निवडून दिलेले विश्वस्त सक्षम आहोत तुम्ही त्याची काळजी करु नका. तुमच्या पिताश्रींनी अनेकदा घोषणा केलेल्या साखर कारखान्याचे विटा कधी उभ्या करणार हे पहिल्यांदा सांगा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार रोहित जाधव यांनी मानले.



1 comment: