दौलतनगर दि.२६:-मी
आयोध्येला का गेलो नाही, का मला कुणी बोलवले नाही असे जाहीर करायला सांगणारे
सत्यजितसिंह पाटणकर माझी पक्षनिष्ठा काढण्यापेक्षा आपण आणि आपले वडील एवढेच खरोखर नेत्याशी
आणि पक्षाशी पक्षनिष्ठ आहात तर तुमच्या पक्षाचे प्रमुख हे तुमच्याच पक्षाचे
जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे संपुर्ण सातारा
जिल्हयाने आयोजीत केलेल्या जाहीर सत्कार कार्यक्रमाला आले तेव्हा तुम्ही कुठे लपून
बसला होतात,जाहीर सत्कार कार्यक्रमाचे निमंत्रण असताना सुध्दा तुम्ही पितापुत्र या
कार्यक्रमाला का गेला नव्हता हीच का तुमची पक्षनिष्ठा असा प्रतिसवाल आमदार शंभूराज
देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना केला असून सत्यजितसिंह पाटणकरांनी किंवा
त्यांच्या पिताश्रींनी हे पहिल्यांदा पाटण तालुक्यातील जनतेपुढे जाहीर करावे असे
जाहीर आव्हान त्यांनी पाटणकर पितापुत्रांना पत्रकाव्दारे दिले आहे.
पत्रकात
त्यांनी म्हंटले आहे की,बेताल वक्तव्य कुणाची सुरु आहेत हे पाटण मतदारसंघातील
जनतेच्या चांगलेच लक्षात येत आहे.विरोधांत बोलण्यासारखे आणि दाखविण्यासारखे तुम्हा
पितापुत्रांकडे काहीच नसल्याने नको ते विषय, नको तेव्हा घ्यायचे या तुमच्या सवयी
जनतेला आणि आम्हालाही काही नवीन नाहीत. आमचे नेते आयोध्येला जाताना त्यांनीच पक्षाच्या
आमदारांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात नदीकाठी महाआरती करावी अशा सक्त सुचना आम्हाला
दिल्या होत्या त्या सुचनांचेच आम्ही पालन केले हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज
नाही हे पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या खाजगी
शंभूसेनेलाही चांगलेच माहिती आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज घराण्याची परंपरा
आणि समाजामध्ये या घराण्याविषयी असणारे आदराचे स्थान म्हणून तुमच्याच पक्षाचे
जिल्हयाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे संपुर्ण सातारा
जिल्हयाने जिल्हयाच्या ठिकाणी चार महिन्यापुर्वी भव्य जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजीत
केला होता. या जाहीर सत्कार कार्यक्रमाला सातारा जिल्हयासह इतर जिल्हयातील
राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांना या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे निमंत्रण होते.निमत्रंण
असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. मग तेव्हा तुम्ही
पितापुत्र या कार्यक्रमाला न येता कुठे लपून बसला होतात.हीच का तुमची पक्षनिष्ठा हे
मतदारसंघातील जनतेला दोघांपैकी एकाने सांगितले तरी बरे होईल.स्वत:चे ठेवायचे झाकून
आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून या सवयी आता तरी सोडा असा उपरोधिक टोलाही आमदार शंभूराज
देसाईंनी लगाविला आहे.
माजी
आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर, १८८२४ ने कुणी लाटेवर निवडून येत नाही हे तुमच्या लक्षात
केव्हा येणार? माझे विरोधात तीनवेळा ७३६ व २५०० आणि ५८० मतांनी निवडून आलेले तुमचे
पिताश्री याला लाटेवर निवडून येणे असे म्हणतात.१८८२४ इतक्या मताधिक्कयाने तुमचा
पराभव करुन पाटण मतदारसंघातील जनतेने तुम्हाला हे दाखवून दिले आहे.त्यामुळे लाटेवर
निवडून येणाऱ्या तुमच्या पिताश्रींची सहावेळा निवडून आल्याची टिमकी सारखी वाजवित
बसू नका.तुमच्या पिताश्रींची मापे काढायला आणि त्यांच्यावर बेताल वक्तव्य करायला
आम्हाला वेळच आहेच कुठे आमचा सगळा वेळ तुमच्या पिताश्रींनी मतदारसंघातील प्रलंबीत
ठेवलेली विविध विकासकामे मार्गी लावण्यातच जात आहे. हे मतदारसंघातील जनता जाणून आहे.
देसाई कारखान्याची निर्मिती कुणी केली,त्याला विरोध कुणी केला हे मतदारसंघातील
जनतेबरोबर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.म्हणूनच तुम्हाला याच कारखान्याच्या
सुज्ञ सभासदांनी आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी या कारखान्यातून खडयासारखे बाजूला
ठेवले आहे.कारखाना कसा चालवायचा हे आम्हाला चांगलेच कळते तुमच्या पिताश्रींनी आणि
तुम्ही कोयना शुगरच्या नावाने गोळा केलेल्या भागभांडवलाचे केले काय? कधी तो वारंवार
घोषणा केलेला कारखाना उभा राहणार आहे हे प्रथमत: पहा.विकासाच्या बाबतीत कुणी मतदारसंघातील
जनतेचा विश्वासघात केला आहे हे मतदारसंघातील जनतेला चांगलेच कळले आहे.म्हणूनच
माझ्या खाजगी शंभूसेनेतील लोक मला सोडून न जाता ते राष्ट्रवादीला आणि तुमच्या निष्क्रीय
कारभाराला कंटाळून आमच्या पक्षात येत आहेत. तुमच्या बालेकिल्ल्यातील तुमच्याच गावाशेजारील
शिरळ गांवातील उदाहरण घ्या १५ दिवसापुर्वी या संपुर्ण शिरळ गावाने तुमच्या
निष्क्रीय कारभाराला कंटाळून माझे नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावरुनच तुमचे कतृत्व लक्षात येते त्यामुळे सत्यजितसिंह पाटणकरांनी शिवसेनेची आणि
आमच्या खाजगी शंभूसेनेची यापुढे मापे काढू नयेत असा सल्लाही त्यांनी शेवठी दिला
आहे.
चौकट:-
सत्यजितसिंहाचा बालिशपणा जाणार कधी ?
मी आयोध्येला का गेलो नाही असा सवाल करणारे
सत्यजितसिंह पाटणकर यांनी प्रसिध्दीमाध्यमांना प्रसिध्द केलेली बैठक दि.११ नोव्हेंबरची
मोरणा विभागातील भवानी माळावरची आहे तेव्हा आयोध्येला जाण्याचा विषयही नव्हता आणि आमची
शिवसेनेची महाआरती दि.२४ नोव्हेबंरला पार पडली.कुठे आणि कशी बेताल वक्तव्य करावीत
याचे साधे भानही सत्यजितसिंहाना नाही. अहो सत्यजितसिंह किती ही फसवाफसवी. तुमचा
बालिशपणा जाणार तरी कधी अशी खिल्ली आमदार शंभूराज देसाईंनी उडविली आहे.
Nice speech
ReplyDeleteफक्त 7070
ReplyDelete