Monday, 19 November 2018

दि. २० नोव्हेंबर, २०१८ रोजी स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचा ७५ वा जयंती सोहळा आमदार शंभूराज देसाईंची प्रमुख उपस्थिती.



      लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा आज मंगळवार दि. २० नोव्हेंबर, २०१८ रोजी ७५ वा जयंती सोहळा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर याठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार असून जयंतीदिनाचा कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे. दरम्यान स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे जयंतीदिनाच्या निमित्ताने शिवदौलत सहकारी बँकेच्या पाटण शाखेचा प्रथम वर्धापनदिन व बँकेने ग्राहकांना वीज बिल व टेलिफोन बिल भरणेसाठी सुरु केलेल्या भारत बिल पेमेन्ट सिस्टीम या सेवेचा शुभारंभही दुपारी ०४.०० वा आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
      प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवार दि.२० नोव्हेंबर, २०१८ रोजी ७५ वा जयंतीदिन कार्यक्रम सकाळी १०.०० वा. कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर या ठिकाणी संपन्न होत आहे. या जयंती दिनाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाई यांचे कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या शिवदौलत सहकारी बँक लि. मल्हारपेठ या बँकेच्या पाटण, जि.सातारा येथील सातव्या शाखेचा प्रथम वर्धावनदिन सोहळाही दुपारी ०४.०० वा.पाटण या ठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ७५ व्या जयंतीदिनाच्या व बॅकेच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्ताने श्री.सत्यनारायण पुजा व बँकेने ग्राहकांसाठी वीज बिल व टेलिफोन बिल भरणेसाठी सुरु केलेल्या भारत बिल पेमेन्ट सिस्टीम (बी.बी.पी.एस) या सेवेचा शुभारंभही बँकेचे संस्थापक व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते आयोजीत केला आहे.यावेळी स्ट्रील फ्रेम या सुप्रसिध्द पुस्तकाचे लेखक फारुक नाईकवाडे यांचे स्पर्धा परिक्षा वळणे आणि आडवळणे या विषयावरील व्याख्यान आयोजीत केले आहे.स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे ७५ व्या जयंती सोहळयास कारखाना कार्यस्थळावर सकाळी १०.०० वा तसेच शिवदौलत सहकारी बँक लि. मल्हारपेठ या बँकेच्या पाटण, जि. सातारा येथील सातव्या शाखेच्या प्रथम वर्धापनदिन कार्यक्रमास दुपारी ०४.०० वा अशा या दोन्ही कार्यक्रमांना लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व शिवदौलत बँकेचे सभासद, हितचिंतक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही पत्रकांत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment