दौलतनगर दि.२३:- कोयनेचा भूकंप महाराष्ट्रात अतिशय संवेदनशील
मानला जातो.कोयनेकडे जाणवणारा भूकंपाचा धक्का महाराष्ट्राचा थरकाप उडविणारा ठरतो.या
परिसरात लहान असो वा मोठा भूकंप याची चर्चा नेहमीच महाराष्ट्रभर होते.त्यामुळे
येथील प्रशासन नेहमीच अलर्ट राहते.हे प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम या मतदारसंघाचे
सतर्क आमदार शंभूराज देसाई नेहमी करतात.दि.२२ नोव्हेंबरच्या की ७.२९ मिनीटांनी
असाच भूकंपाचा धक्का कोयनानगर परिसरात जाणवला.याची माहिती तालुक्याचे आमदार
शंभूराज देसाई यांना मिळताच हिवाळी अधिवेशनाकरीता मुंबई याठिकाणी असणारे आमदार
यांनी सकाळी ०८.०० वा.पाटणचे उपविभागीय अधिकारी,कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी
अभियंता यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व याची माहिती घेतली. कोणतीही हानी
किंवा पडझड झाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून कळल्यानंतर त्यांनी निश्वा:स सोडला. आणि
दुसरे दिवशी अधिवेशनातील सुट्टीतून येवून संबधित सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
घेवून भूकंपाच्या संदर्भात शासकीय सुट्टी असो वा काही भूकंपाच्या संदर्भात आमदार
किती सतर्क आहेत याचे दर्शन आज घडले.
शुक्रवारी गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असताना
देखील हिवाळी अधिवेशनातून सुट्टी असल्याने तातडीने येत आमदार शंभूराज देसाईंनी दि.२२ नोव्हेंबरच्या
झालेल्या २.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या संदर्भात तातडीने तहसिल कार्यालय,पाटण
येथे तालुकास्तरीय सर्व संबधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली यावेळी बैठकीस पाटणचे
प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले,पाटणचे पोलीस निरीक्षक
यु.एस.भापकर,कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गुजर,कोयना धरण
व्यवस्थापनाचे उपकरण विभागाचे अभियंता रा.य.खंदारे, संशोधन सहाय्यक डी.एम.चौधरी,मंडलाधिकारी ए.एल.संकपाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी वाघ, विस्तार अधिकारी
शेजवळ,पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार, शिवदौलत
बँकेचे संचालक अशोकराव पाटील,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे यांची उपस्थिती
होती.
दि.२२ नोव्हेंबरच्या पहाटे ७.२९
वा पाटण तालुक्यात झालेल्या भूकंपाच्या संदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी सविस्तर
आढावा घेतला.यामध्ये २.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे.या भूकंपामुळे
कोणतीही हानी किंवा पडझड झाली नाही.अशी माहिती प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार
रामहरी भोसले,मात्र भूकंप जाणवला.या भूकंपाचा केंद्रबिंदू हा वारणा खोऱ्यात जावळे
गावाच्या ५ किमी अंतरावर आहे.असे उपकरण विभागाचे अभियंता रा.य.खंदारे यांनी
सांगितले. यावर भूकंपाच्या संदर्भात शासकीय सुट्टी असो वा काही मतदारसंघातील
प्रशासनाने नेहमीच सतर्क रहावे अशा सुचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.सातत्याने
भूकंपाचे हादरे सोसणारा पाटण तालुका म्हणून पाटण तालुक्याची ओळख आहे. या परिसरात
लहान असो वा मोठा भूकंप झाला तर त्याची चर्चा महाराष्ट्रभर होते सध्या
महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे त्यामुळे सतर्क रहा असे त्यांनी सांगून सन
२०१८ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत एकूण किती भूकंप झाले याची माहिती आमदार
शंभूराज देसाईंनी घेतली यावेळी या कालावधीत एकूण १० लहान मोठया रिश्टर स्केलचे
भूकंप झाले आहेत यामध्ये जानेवारी २०१८ मध्ये १.३ व ३.२ रिश्टर स्केल,फेब्रुवारीमध्ये ३.२ रिश्टर स्केल,मार्चमध्ये दोन ३.४ व २.८ रिश्टर
स्केल,सप्टेंबरमध्ये २.८ रिश्टर स्केल व नोव्हेंबरमध्ये ३.१-३.१ चे दोन व २.९ व
२.८ रिश्टर स्केलचे दोन असे एकूण दहा भूकंपाचे हादरे जाणवले असल्याचे अधिकाऱ्यांनी
आमदार शंभूराज देसाईंना सांगितले. सतर्क आमदारांमुळे सतर्क प्रशासनाचे कामकाजही
सतर्क राहूनच सुरु असल्याचे पहावयास मिळाले.
No comments:
Post a Comment