Saturday 24 November 2018

निसरे घाटावर कोयना नदीकाठी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न. शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाआरतीला पाटण शिवेसनेच्यावतीने महाआरतीव्दारे दिला जाहीर पाठीबां. हजारों शिवसैनिकांची कोयना नदीकाठी उपस्थिती.


निसरे घाटावर कोयना नदीकाठी आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या महाआरतीला पाटण शिवेसनेच्यावतीने महाआरतीव्दारे दिला जाहीर पाठीबां.
हजारों शिवसैनिकांची कोयना नदीकाठी उपस्थिती.


दौलतनगर दि.२३:- शासनाने रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे याकरीता शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरील पवित्र माती मंगल कलशामध्ये घेवून आयोध्येला गेले असून येथे त्यांच्या हस्ते राममंदीर उभारणीसाठी शरयु नदीच्या काठावर शरयू महाआरती करण्यात आली त्यांच्या या विचारांना जाहीर पाठींबा देणेकरीता पाटण मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत निसरे ता.पाटण येथील कोयना नदीकाठच्या घाटावर आयोजीत केलेली कोयना नदीची महाआरती मोठया उत्साहाने संपन्न झाली. महाआरतीकरीता पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी,विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती.
         प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी निसरे ता.पाटण येथील सोमाई देवीची ओटी भरुन निसरे घाटावर येवून कोयना नदीचे पुजन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते याठिकाणी कोयना नदीची महाआरती करण्यात आली व आमदार शंभूराज देसाई व शिवसैनिकांच्या हस्ते शेकडो दिवे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, संचालक पांडूरंग नलवडे, विजयराव जंबुरे, बबनराव भिसे, जिल्हा परिषद सदस्य विजयराव पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, माजी पंचायत समिती सदस्य हरिश भोमकर, माजी विरोधी पक्षनेते ॲङ डी. पी. जाधव, ॲङ बाबूराव नांगरे, बॅकेचे संचालक अशोकराव पाटील, धोंडीराम भोमकर, अभिजित पाटील, कारखाना संचालक पांडूरंग नलवडे, संपतराव सत्रे, अशोकराव डिगे, गजानन जाधव, माजी संचालक बबनराव पानस्कर, बाळासाहेब पाटील, मानसिंगराव नलवडे, प्रकाश नेवगे, आबदारवाडी सरपंच विजय शिंदे, पी. एन. माने, दिलीप सपकाळ, शिवसेना पाटण शहर प्रमुख शंकर कुंभार, आनंदराव काळे, सुरेश जाधव यांच्यासह शिवसेना शाखाप्रमुख, विविध संस्थाचे पदाधिकारी, तालुक्यातील शिवसैनिक यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, रामजन्मभूमि अयोध्या येथे लवकरात लवकर राममंदीर उभारावे यासाठी आजपर्यंत रथयात्रा निघाल्या. जय श्रीराम लिहलेल्या वीटा गेलेल्या आपण पाहिल्या आहेत. राममंदीर बांधण्याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी राजमाता जिजाऊ व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आर्शिवाद घेवून येथील पवित्र माती कपाळाला लावून शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दवजी ठाकरे हे किल्ले शिवनेरी गडावरुन दि.२४ नोव्हेंबर,२०१८ रोजी आयोध्येला गेले आहेत. याचवेळी त्यांच्या शुभहस्ते आयोध्येतील शर्वरी नदीकाठी शिवसेना पक्षाच्या वतीने सहकुटुंब महाआरतीचे नियोजन केले होते मोठया उत्साहाने प्रथमत: लक्ष्मण किल्ल्यावर संकल्प पुजा करण्यात आली व त्यानंतर सायं महाआरती आयोध्येत संपन्न झाली असून शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या या विचारांना पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक, पाटण मतदारसंघ शिवसेना व मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने जाहीर पाठींबा देणेकरीता आपणही आपले मतदारसंघात कोयना नदीकाठी कोयना नदीची महाआरती केली आहे. शासनाने लवकरात लवकर रामजन्मभूमि अयोध्या येथे ठरलेल्या ठिकाणी राममंदीर उभारावे अशी आमची शिवसेना पक्षप्रमुख यांच्या बरोबरीने शासनाकडे मागणी आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या मागणीला पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा मी याठिकाणी जाहीर पाठींबा व्यक्त करतो असे ते म्हणाले. उपस्थित सर्वांचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार यांनी स्वागत केले व आभार सुरेश पानस्कर यांनी मानले.

No comments:

Post a Comment