Tuesday, 20 November 2018

स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- आमदार शंभूराज देसाई. ७५ वा जयंती सोहळयात प्रतिपादन.


प्रसिध्दीसाठी दि. २०/११/२०१८
स्व.शिवाजीराव देसाईसाहेब (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत- आमदार शंभूराज देसाई.
७५ वा जयंती सोहळयात प्रतिपादन.
     

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असून मुंबई याठिकाणी एक प्रसिध्द उद्योजक म्हणून नावारुपाला आलेले स्व.शिवाजीराव देसाई हे आपल्या वडीलांच्या शब्दाखातर पाटण तालुक्यात आले आणि लोकनते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी करुन त्यांनी तालुक्याला प्रथमत: सहकाराची दिशा मिळवून दिली.सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी चांगली कामगिरी केली.शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लावलेल्या रोपटयाचे आज लोकनेते बाळासाहेब देसाई शैक्षणिक संकूल नावाने वटवृक्षात रुपातंर झाले आहे.त्यांचा सहकाराचा आणि शैक्षणिक वारसा आम्ही दोघे बंधू लिलया पेलत आहोत. स्व.आबासाहेब यांचे अधुरे स्वप्न मतदारसंघातील जनतेने पुर्ण करुन दाखविले.लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.आबासाहेब यांच्या पश्चात मतदारसंघातील जनतेने प्रामाणिकपणे आम्हास जे पाठबळ दिले आहे त्या पाठबळाच्या जीवावर आपली देसाई गटाची यशस्वी वाटचाल सुरु आहे याचा आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  ७५ वा जयंती सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,जयराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, शिवसेना पाटण विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख जयवंतराव शेलार यां प्रमुख मान्यवरांसह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,देसाई गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी स्व.शिवाजीराव देसाई आबासाहेब यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. 
      याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, आदरणीय लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर मरळीच्या माळरानावर साखर कारखाना उभारण्याची जबाबदारी स्व.आबासाहेब यांनी लिलया पार पाडली. पाटण तालुकयात मरळीला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर... आज पाटण तालुक्यातील शेतक-यांची आणि या विभागाची परिस्थिती काय असती याचाही सारासार विचार करणे गरजचे आहे. लोकनेते साहेबांनी तालुक्याचे नंदनवन करण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते तालुक्यातील कोयना धरणामुळे, पाटण खोऱ्यातील घाट फोडून रस्ते करण्याच्या दुरदृष्टीच्या निर्णयामुळे पुर्ण झाले कोयना नदीकाठी उपसा जलसिंचन योजना उभारुन या माध्यमातून साखर कारखान्यांस मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होईल हा त्यांचा दृष्टीकोन होता तो सफल झाला. प्रसिध्द उद्योजक असताना लोकनेते साहेबांच्या शब्दाखातर स्व.शिवाजीराव देसाईसाहेब पाटण तालुक्यात आले त्यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना उभारला, अल्पावधीतच कारखाना कर्जमुक्त करुन तो शेतक-यांच्या मालकीचा करुन दिला.स्व. आबासाहेबांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याचे ऋृण तालुक्यातील तुम्हा शेतक-यांना कधीही न फेडता येणारे आहे. देसाई कारखान्याची उभारणी हि आबासाहेबांच्या आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील आणि तालुक्याच्या इतिहासातील महत्त्वाची घटना असून या कारखान्याची उन्नती करणे हिच ख-या अर्थाने स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांना श्रध्दांजली ठरणार असून पाटण तालुक्यात सहकार क्षेत्रात स्व.शिवाजीराव देसाईसाहेबांनी केलेले कार्य या विभागाच्या इतिहासातील सोनेरी पर्व ठरले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब स्व.आबासाहेब यांचेपासून देसाई कुटुंबांशी नाळ जुळलेल्या पाटण तालुक्यातील जनतेने देसाई कुटंबिंयाना प्रामाणिकपणे पाठबळ दिले आहे. जनतेच्या पाठबळाला आमदार म्हणून मीही कुठेही कमी पडत नाही. मरळीच्या माळरानावर लोकनेते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला साखर कारखाना शेतक-यांच्या मालकीचा करुन देण्यात स्व.आबासाहेबांचे मोलाचे योगदान आहे.लोकनेते साहेब व स्व.आबासाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही गेली ३० ते ३२ वर्षे पाटण तालुक्यात काम करीत आहोत. हाच विचार आणि आदर्श घेवून आम्ही भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अशोकराव पाटील यांनी केले.ॲड.डी.पी.जाधव जयवंतराव शेलार, डॉ.दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली.कार्यक्रमास कारखान्याचे सभासद,शेतकरी, हितचिंतक, कार्यकर्ते व पदाधिकारी,देसाई कारखान्याचे कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment