मराठा आरक्षणाचा एैतिहासिक
निर्णय घेतलेबद्दल
आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख
उपस्थितीत नवारस्ता येथे शनिवारी शासनाचे आभाराचा कार्यक्रम.
दौलतनगर
दि.२९:- महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष
लागून राहिलेले राज्यातील सकल मराठा समाजाचे गत दोन वर्षापासून मागणी असणारे मराठा
आरक्षण देण्याचा एैतिहासिक निर्णय भाजप-शिवसेना युतीच्या
सरकारने घेतला असून या एैतिहासिक निर्णयाबद्दल युती शासनाचे व शासनाचे प्रमुख
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व शिवसेना
पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे जाहीर आभार व विशेष अभिनंदन करणेकरीता पाटण
विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख
उपस्थितीत जाहीर आभाराचा कार्यक्रम नवारस्ता ता.पाटण येथे
सकाळी ११.०० वा आयोजीत केला असून सकाळी १०.०० वा निसरे फाटा येथून मुंबई येथून अधिवेशनातून मतदारसंघात येणारे आमदार
शंभूराज देसाईच्या प्रमुख उपस्थितीत मोटारसायकल रॅलीने या कार्यक्रमाची सुरुवात
करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना व शंभूराज युवा संघटना पाटण विधानसभा मतदारसंघ
यांच्यावतीने देण्यात आली आहे.
पत्रकात म्हंटले आहे की,महाराष्ट्र
राज्यातील सकल मराठा समाजाला १६ टक्के मराठा आरक्षण देणेसंदर्भातील विधेयक दि.२९ नोव्हेंबर
रोजी विधानसभेत एकमताने मंजुर झाले असून महाराष्ट्रातील मराठा समाजाला १६ टक्के दिलेले
आरक्षण हा युती शासनाने घेतलेला हा एैतिहासिक निर्णय आहे.या
एैतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला न्याय मिळाला असून भाजप-
शिवसेना युतीच्या शासनाने
घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचे स्वागत व शासनाचे विशेष अभिनंदन आणि जाहीर
आभार माननेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे
आयोजन केले आहे.हिवाळी अधिवेशनातुन आमदार शंभूराज देसाई हे
शनिवारी पाटण मतदारसंघात येत असून त्यांचे पाटण तालुक्यातील निसरे फाटा येथे जंगी स्वागत करुन निसरे फाटा येथून
मतदारसंघातील सकल मराठा समाजातील युवक तसेच शिवसेना व शंभूराज युवा संघटना पाटण
मतदार संघातील हजारों युवक हे मोटारसायकल रॅलीने आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख
उपस्थितीत नवारस्ता ता.पाटण येथे येणार असून आमदार शंभूराज
देसाईंच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे
अर्धाकृती पुतळयास व पाटण मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भाजप-शिवसेना युती शासनाचे
जाहीर आभार मानण्याचा कार्यक्रम होणार आहे. युती शासनाने
घेतलेल्या या एैतिहासिक निर्णयाचे स्वागत पेढे व साखर वाटून याठिकाणी करण्यात
येणार असून सकल मराठा समाज हा मिळालेल्या मराठा आरक्षणाचा जल्लोष करणार आहे.या कार्यक्रमास पाटण मतदारसंघातील सकल मराठा समाज तसेच शिवसेना पाटण
मतदारसंघ व शंभूराज युवा संघटना पाटण मतदारसंघातील पदाधिकारी,कार्यकर्ते व युवकांनी सकाळी १०.०० वा निसरे फाटा
येथे मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही शिवसेना व शंभूराज युवा संघटना
पाटण विधानसभा मतदारसंघ यांचे वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment