Thursday 1 November 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा आमदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते सोमवार दि.०५ नोव्हेंबर रोजी गळीताचा शुभारंभ- अशोकराव पाटील चेअरमन




             दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०१८-१९ मधील ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ सोमवार दि.०५ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक, उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
        पत्रकात म्हंटले आहे की, या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उदीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.शंकर पाटील त्रिपुडी, श्री.रामचंद्र सावंत साखरी,श्री.शंकर चौधरी पाटण,श्री.पांडूरंग पाटील माजगाव, श्री.शिवाजी पवार बांबवडे,श्री.रामचंद्र कदम मरळी,श्री.नथुराम गायकवाड आबदारवाडी,श्री.राजाराम पानवळ खळे, श्री.दत्तात्रय देसाई कुंभारगाव, श्री.पांडूरंग शिंदे मारुलहवेली,श्री.हिंदुराव पाटील मंद्रुळकोळे यांचे व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक,उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ (दौलतनगर) येथे संपन्न होत आहे.या समारंभानिमित्त कारखान्याचे संचालक राजेंद्र गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शिल्पा गुरव यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे.या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी,पदाधिकारी,कार्यकर्ते,हितचिंतक यांनी सोमवार दि. ०५ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी १०.०० वा. बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवठी पत्रकात केले आहे.

No comments:

Post a Comment