Thursday 28 March 2019

घाटमाथा पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे कामास गती देण्याच्या सक्त सुचना कराव्यात. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे आमदार शंभूराज देसाईंची लेखी मागणी.





दौलतनगर दि.२८:- पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग       विकास योजनेतंर्गत सुरु असणाऱ्या घाटमाथा हेळवाक- पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गत दीड वर्षापासून संथ गतीने सुरु असल्याने मतदारसंघातील नागरिकांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्याच्या व या रस्त्याचे यंदाच्या पावसाळयापुर्वी बहूतांशी काम हे पुर्णत्वाकडे नेण्याच्या सक्त सुचना आपणांकडून संबधित यंत्रणांना देणेत याव्यात अशी आग्रही मागणी पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.
                        मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे की, माझे पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत गुहागर चिपळुण कराड जत विजापुर या महामार्गावरील पाटण विधानसभा मतदारसंघातील घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापुर्वी मंजुर करण्यात आले आहे. गत दीड वर्षापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने या रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम संथगतीने गत दीड वर्षापासून सुरु आहे. रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहन धारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या आहेत. तरीही या कामास गती देण्यात आली नाही. पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे ४० टक्केही काम पुर्ण झाले नाही.पावसाळा येण्यास दोन महिन्यांचा कालावधी राहिला असून पावसाळयापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे बहूतांशी काम पुर्ण न झाल्यास मतदारसंघातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने संबधित कंपनीकडे अजुनही दोन महिन्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये बहूतांशी रस्त्याचे काम पुर्ण करण्यास या कंपनीस वाव आहे.सदरचे रस्त्याचे कामांस प्राधान्याने गती दयावी याकरीता आपणांकडून संबधित यंत्रणांना सक्त सुचना होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत गुहागर चिपळुण कराड जत विजापुर या महामार्गावरील पाटण विधानसभा मतदार संघातील घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे कामास प्राधान्याने गती देवून या रस्त्याचे यंदाच्या पावसाळयापुर्वी बहूतांशी काम हे पुर्णत्वाकडे नेणेकरीता आपणांकडून संबधित यंत्रणांना सक्त सुचना करण्यात यावी अशी आग्रही मागणी व विनंती आमदार शंभूराज देसाईंनी  पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रामध्ये केली असल्याचे म्हंटले आहे.

Wednesday 27 March 2019

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला प्रतिवर्षाप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. दि. १८ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते यांचे कार्याचा चित्ररथ व गौरवयात्रा निघणार.





दौलतनगर दि.२७:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळा वरील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात मागील नऊ वर्षाप्रमाणे यंदाही दहाव्या वर्षी भव्य अशा श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन शुक्रवार दि.२० एप्रिल ते दि. २३ एप्रिल,२०१९ पर्यंत करण्यात आले आहे. तत्पुर्वी गुरुवार दि.१८ एप्रिल,२०१९ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने मागील तीन वर्षापासून सुरु करण्यात आलेले लोकनेतेसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.
सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येत असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दि.२३ एप्रिल,२०१९ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०१९ पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ०९.०० वा.लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून हा चित्ररथ व गौरवयात्रा चोपदारवाडी,गव्हाणवाडी,सुर्यवंशीवाडी,पापर्डे,मारुलहवेली फाटा,सोनाईचीवाडी,नावडी,निसरे फाटा,मल्हारपेठ,  नवारस्ता,आडूळपेठ,आडूळ गावठाण,येरफळे,पाटण,नेरळे,मोरगिरी,नाटोशी,सोनवडे मार्गे पुन्हा कारखाना कार्यस्थळापर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.शनिवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन हभप जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्व्लन करुन करण्यात येणार आहे.या पारायण सोहळयात शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी हभप सचिन महाराज कदम,आळंदी यांचे प्रवचन,हभप संजय महाराज कावळे,आळंदी यांचे किर्तन,रविवार दि. २१ एप्रिल, २०१९ रोजी हभप दादा महाराज तुळसणकर यांचे प्रवचन तर हभप महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल,२०१९ रोजी हभप मधुकर महाराज दिक्षीत,मसूर यांचे प्रवचन तर हभप ॲङ जयवंत महाराज बोधले,पंढरपूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार श्री. शंभूराज देसाई व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप वेदांतचार्य श्रीकृष्णानंद शास्त्रीजी,गोकूळ शिरगाव,वृंदावनधाम करवीर कोल्हापूर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे दहावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झाले आहे.लोकनेते यांचे जीवनकार्यावरील विविध कार्याच्या संदर्भात तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथ व गौरव यात्रेचे तालुक्यातील जनतेतून मोठया प्रमाणांत कौतुक व स्वागत करण्यात येत आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३६ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारायण सोहळयाचा व चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

Monday 18 March 2019

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवॄत्ती योजनेतून गवळीनगरच्या कु.अर्चना यमकर हिचे महाविद्यालयीन शिक्षणाचा भार पेलण्याचा निर्णय. शिष्यवृत्ती समितीची माहिती




दौलतनगर दि.१८:- गवळीनगर (कोकीसरे),ता.पाटण येथे पंधरा वर्षापुर्वी चुलीच्या निखाऱ्यात दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झालेली कु.अर्चना सिधु यमकर ही मुलगी इयत्ता दहावीचे पेपर मोठया जिद्दीने आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे तिची शिक्षणांची असणारी तळमळ आणि जिद्द पाहून इयत्ता दहावीनंतरच्या तिच्या पदवीपर्यंतच्या संपुर्ण महाविद्यालयींन शिक्षणांचा भार हा पाटण विधानसभा मतदारसंघात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्ती योजनेमधून पेलण्याचा निर्णय कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीने घेतला असल्याची माहिती कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                पत्रकामध्ये म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून व त्यांचे मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील गरीबीमुळे तसेच वैयक्तीक अडचणीमुळे थांबू नये याकरीता त्यांनी त्यांचे आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली असून या शिष्यवृत्ती योजनेमध्ये या इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीची निवड करुन तिच्या पदवीपर्यंतच्या महाविद्यालयींन शिक्षणाचे पालकत्व स्विकारण्यात येत आहे.ही योजना गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी सुरु आहे.पाटण मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे पदवीपर्यंतच्या शिक्षणाकरीता या कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला आहे.
               पाटण मतदारसंघातील मोरणा विभागातील डोंगरी भागामध्ये वसलेल्या गवळीनगर (कोकीसरे), ता.पाटण या लहानशा लोकवस्तीमध्ये सुमारे पंधरा वर्षापुर्वी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली कु.अर्चना यमकर हिचे आईवडील तिच्या लहान भावंडांचे आधारावर सोडून मजुरीकरीता घराबाहेर गेले असताना चुलीच्या निखाऱ्यात कु.अर्चना हिची दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झाल्याने लहानपणापासून ती गंभीर दुखापत घेवून तसेच तिचे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील एवढया कठीण परिस्थितीत परिस्थितीशी झगडत ती शिक्षण घेत आहे. हाताला बोटे नसतानाही इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण ती यावर्षी पुर्ण करीत असून सध्या सुरु असलेले दहावीचे पेपर ती आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट असून यातून तिची शिक्षणाची आवड तळमळ व जिद्दीचे दर्शन घडून येत आहे.अशाच शिक्षणांची आवड आणि तळमळ असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणाकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना एक आधार म्हणून काम करीत आहे.कु.अर्चना हिच्या या परिस्थितीची माहिती सोशल मिडीयावरुन सर्वांना माहिती झालेनंतर तिच्या या जिद्दीची सर्व स्तरातून  वाहवाह केली जात असून तिला सर्वोत्तोपरी मदत करण्याची सर्वांनी भूमिका घेतली आहे ही आनंदाची बाब आहे. आमदार शंभूराज देसाई यांनीही कु.अर्चना हिचे दहावीचे पेपर संपलेनंतर तिची व तिच्या आईची भेट घेवून तिला पुढील आयुष्याकरीता लागणारी सर्वोत्तोपरी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तसे त्यांनी आश्वासन देखील दिले असून त्याअगोदर आमदार शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली  कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कु.अर्चना सिधु यमकर हिच्या इयत्ता दहावीनंतरच्या पदवीपर्यंतच्या संपुर्ण महाविद्यालयींन शिक्षणांचा भार हा कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेतून पेलण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवॄत्ती योजनेतून गवळीनगरच्या कु.अर्चना यमकर हिचे महाविद्यालयीन शिक्षणाचा भार पेलण्याचा निर्णय. शिष्यवृत्ती समितीची माहिती




दौलतनगर दि.१८:- गवळीनगर (कोकीसरे),ता.पाटण येथे पंधरा वर्षापुर्वी चुलीच्या निखाऱ्यात दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झालेली कु.अर्चना सिधु यमकर ही मुलगी इयत्ता दहावीचे पेपर मोठया जिद्दीने आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे तिची शिक्षणांची असणारी तळमळ आणि जिद्द पाहून इयत्ता दहावीनंतरच्या तिच्या पदवीपर्यंतच्या संपुर्ण महाविद्यालयींन शिक्षणांचा भार हा पाटण विधानसभा मतदारसंघात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्ती योजनेमधून पेलण्याचा निर्णय कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीने घेतला असल्याची माहिती कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                पत्रकामध्ये म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून व त्यांचे मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील गरीबीमुळे तसेच वैयक्तीक अडचणीमुळे थांबू नये याकरीता त्यांनी त्यांचे आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली असून या शिष्यवृत्ती योजनेमध्ये या इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीची निवड करुन तिच्या पदवीपर्यंतच्या महाविद्यालयींन शिक्षणाचे पालकत्व स्विकारण्यात येत आहे.ही योजना गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी सुरु आहे.पाटण मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे पदवीपर्यंतच्या शिक्षणाकरीता या कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ झाला आहे.
               पाटण मतदारसंघातील मोरणा विभागातील डोंगरी भागामध्ये वसलेल्या गवळीनगर (कोकीसरे), ता.पाटण या लहानशा लोकवस्तीमध्ये सुमारे पंधरा वर्षापुर्वी अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली कु.अर्चना यमकर हिचे आईवडील तिच्या लहान भावंडांचे आधारावर सोडून मजुरीकरीता घराबाहेर गेले असताना चुलीच्या निखाऱ्यात कु.अर्चना हिची दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झाल्याने लहानपणापासून ती गंभीर दुखापत घेवून तसेच तिचे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील एवढया कठीण परिस्थितीत परिस्थितीशी झगडत ती शिक्षण घेत आहे. हाताला बोटे नसतानाही इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण ती यावर्षी पुर्ण करीत असून सध्या सुरु असलेले दहावीचे पेपर ती आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट असून यातून तिची शिक्षणाची आवड तळमळ व जिद्दीचे दर्शन घडून येत आहे.अशाच शिक्षणांची आवड आणि तळमळ असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणाकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना एक आधार म्हणून काम करीत आहे.कु.अर्चना हिच्या या परिस्थितीची माहिती सोशल मिडीयावरुन सर्वांना माहिती झालेनंतर तिच्या या जिद्दीची सर्व स्तरातून  वाहवाह केली जात असून तिला सर्वोत्तोपरी मदत करण्याची सर्वांनी भूमिका घेतली आहे ही आनंदाची बाब आहे. आमदार शंभूराज देसाई यांनीही कु.अर्चना हिचे दहावीचे पेपर संपलेनंतर तिची व तिच्या आईची भेट घेवून तिला पुढील आयुष्याकरीता लागणारी सर्वोत्तोपरी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तसे त्यांनी आश्वासन देखील दिले असून त्याअगोदर आमदार शंभूराज देसाईंचे मार्गदर्शनाखाली  कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कु.अर्चना सिधु यमकर हिच्या इयत्ता दहावीनंतरच्या पदवीपर्यंतच्या संपुर्ण महाविद्यालयींन शिक्षणांचा भार हा कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेतून पेलण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.

Thursday 14 March 2019

चाळकेवाडी व डेरवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामांना पावसाळयापुर्वी गती देण्याच्या सुचना. दि.०५ मार्च रोजी बैठकीत या दोन्ही बंधाऱ्यांचा आ.शंभूराज देसाईंनी घेतला सविस्तर आढावा.





दौलतनगर दि.१४ :- कुंभारगांव विभागातील चाळकेवाडी व चाफळ विभागातील डेरवण बंधाऱ्यांची मोठया प्रमाणात नादुरुस्ती झाली असून या दोन्ही बंधाऱ्यांमध्ये येत्या पावसाळयातील पाणी मोठया प्रमाणात साचण्यासाठी दुरुस्तीची कामे पावसाळयापुर्वी पुर्ण करावीत अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी दि.०५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे नियोजन कोयना धरण व्यवस्थापनच्या संबधित अधिकाऱ्यांनी केले आहे.
                           कुंभारगांव विभागातील चाळकेवाडी व चाफळ विभागातील डेरवण बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती तसेच पाणीसाठा नियोजनाची जबाबदारी कोयना धरण व्यवस्थापन कडे असून याचे सर्व नियोजन कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्याकडे आहे. या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देवून येत्या पावसाळयातील पाणी या दोन्ही बंधाऱ्यांत अडविणेकरीता दि.०५ मार्च रोजी आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.त्यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी चाळकेवाडी व डेरवण बंधाऱ्यांच्या नादुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा कार्यकारी अभियंता पाटील यांचेकडून घेतला व त्यानुसार वरीलप्रमाणे त्यांनी पाटील यांना सुचना केल्या आहेत.
                        चाळकेवाडी कुंभारगांव येथील बंधाऱ्यांची सांडवा गळती,गेटची दुरुस्ती,मातीकाम,कॅनॉल दुरुस्ती तसेच बंधाऱ्यांच्या मुख्य भिंतीचे पिचींग करुन बंधाऱ्यामध्ये व बंधाऱ्यांच्या बाहेर मोठया प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे काढणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे असून डेरवण येथील बंधाऱ्याचे मुख्य गेटच्या दुरुस्तीचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.डेरवण बंधाऱ्यामध्ये मोठया प्रमाणात गाळही साचला असून तो गाळही काढण्याचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.चाळकेवाडी कुंभारगांव बंधाऱ्याच्या गेटच्या दुरुस्तीच्या कामांला संबधित विभागाला शासनाने निधी मंजुर करुन दिला आहे.मंजुर झालेल्या निधीतून या गेटचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन घेण्याचे नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे तसेच बंधाऱ्यांची सांडवा गळती,मातीकाम,कॅनॉल दुरुस्ती तसेच बंधाऱ्यांच्या मुख्य भिंतीचे पिचींग करुन बंधाऱ्यामध्ये व बंधाऱ्यांच्या बाहेर मोठया प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे काढणे ही ही कांमे पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.डेरवण बंधाऱ्यांच्या मुख्य गेटचे काम येत्या पावसाळयापुर्वी पुर्ण करुन घेणेकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर करुन देण्यात येणार असल्याचे सिंचन मंडळ,सातारा विभागाकडून सांगण्यात आले असून याही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम पावसाळयापुर्वी करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले.यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी हे दोन्ही बंधारे गाळमुक्त करण्याकरीता जिल्हाधिकारी,सातारा यांनी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध करुन दयावी याकरीता लोकसभेची आचारंसहिता झालेनंतर जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे बैठकही घेणार असल्याचे यावेळी म्हणाले.दरम्यान चाळकेवाडी व डेरवण या दोन्ही बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामांना गती देवून या दोन्ही बंधाऱ्यामध्ये यंदाच्या पावसाळयातील पाणी मोठया प्रमाणात साठावे याकरीताचे नियोजन संबधित यंत्रणेने तातडीने करावे व ही दुरुस्तीची कामेही लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावीत तसेच पाणीवाटपाच्या संदर्भातील निर्णय हा बंधाऱ्यांची कामे पुर्ण झालेनंतर घेवू असेही आमदार शंभूराज देसाईंनी कार्यकारी अभियंता व त्यांचे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.


शंभूराजेंना गांवे माहिती आहेत का नाही याचे उत्तर जनताच निवडणूकीत पाटणकरांना देईल. आ.शंभूराज देसाईंचा पाटणकरांना प्रतिटोला.





दौलतनगर दि.१४:- शंभूराजेंना गांवे पण माहिती नाहीत असे सांगणारे माजी आमदार पाटणकर दादा,शंभूराजेना तालुक्यातील गांवे माहिती नसती तर तालुक्याच्या गांवागावांत आणि वाडीवस्तीवर याच शंभूराजने आमदार म्हणून गत साडेचार वर्षात केलेल्या विविध विकासकामांचे बॅनर गांवातील जनतेने लावले नसते.मतदारसंघाच्या गांवागांवात आणि वाडीवस्तीवर याच शंभूराजच्या माध्यमातून विकासकांमे पोहचली आहेत याचे पुरावे जनतेनेच तुम्हाला दिले आहेत.तुमच्या बालेकिल्लयात तर माझ्या विकासकामांचा पुरावा या विभागातील जनतेनेच तुम्हाला भलेमोठे बॅनर लावून दिला आहे.शंभूराजेंना गांवे माहिती आहेत का नाहीत?याचे उत्तर मी नाही मतदारसंघातील जनताच तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत देईल. पाटणकर दादा,इतकीही घाई करु नका असा प्रतिटोला आ.शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांना लगाविला आहे.
                          घोट ता.पाटण येथे हरीतऊर्जा योजनेतंर्गत घोट ते जन्नेवाडी गावपोहोच रस्त्याचा भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.या रस्त्यांच्या कामांस त्यांनी १ कोटी ३६ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,बबनराव भिसे,शंभूराज युवा संघटना उपाध्यक्ष अभिजीत पाटील,शिवदौलत बँक संचालक संजय देशमुख,माणिकराव पवार,विजय पवार फौजी,उत्तमराव मगर,घोट सरपंच मधूकर आरेकर,उपसरपंच पुष्पाताई शिंदे,सर्जेराव आरेकर,बळीराम आरेकर,उत्तम आरेकर,संजय आरेकर,श्रीरंग आरेकर,रणजित शिंदे,भानूदास शिंदे,रवींद्र सावंत,राजेंद्र शिंदे, रविंद्र बोर्गे,पांडूरंग सोनवले,प्रल्हाद सोनवले,महिपती सोनवले,मारुती सावंत,शंकर सावंत,किसन साळुंखे,शुभांगी साळुंखे, सुलोचना महाडिक,सागर सोनवले,गौरव परदेशी,अमोल घाडगे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह घोट,जन्नेवाडी,जुगाईवाडी, फडतरवाडी व बोर्गेवाडी येथील कार्यकर्ते,युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                       याप्रसंगी आ.शंभूराज देसाई म्हणाले,पाटण तालुक्यातील डोंगरपठारावर विकास करताना आम्ही विरोध करीत होतो असे पाटणकरांचे म्हणणे आहे.आम्ही कोणत्या विकासकामांना विरोध करीत होतो हे पाटणकरांना चांगलेच माहिती आहे.ज्या ठिकाणी भविष्यात पवनचक्कया येणार आहेत त्याठिकाणी यांचा विकास सुरु होता हे मतदारसंघातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे. पाटणकरांना आमदार असताना पवनचक्कयांचीच तेवढी गांवे दिसली. घोटच्या वर असणारी जन्नेवाडी त्यांना दिसली नाही.याच जन्नेवाडीला आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पहिल्यांदा रस्ता दिला त्यावर पाटणकरांना एवढया वर्षात एक रुपयांचा निधी टाकता आला नाही.जन्नेवाडी सारखीच मतदारसंघातील डोंगर पठारावरील इतर गांवाचीही परिस्थिती आहे.माजी मंत्र्यांनी तालुक्यातील डोंगरपठारावरील रस्ते केले म्हणून पाटणकर ढोल वाजवित आहेत.त्याच पाटणकरांना मी अनेकदा मतदारसंघातील डोंगरपठारावरील असे २१ ते २२ रस्ते सांगितले ते त्यांना राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना का करता आले नाहीत त्याचे उत्तर पाटणकरांना देता आले नाही. बोलाचीच कढी अन बोलाचाच भात अशीच अवस्था पाटणकरांची असून काहीही न करता हे मी केले ते मी केले अशा बतावण्या मारण्यातच त्यांनी त्यांच्या आमदारकीचा काळ घालविला.डोळयाला दिसेल असे एकही काम त्यांना पाटण मतदारसंघात त्यांच्या आमदारकीच्या काळात करता आले नाही.निवडणूका जवळ आल्या की यांनाच जनतेची आठवण होते.आणि निवडणूका संपल्या की, परत हे मतदारसंघातील जनतेकडे ढुंकुनसुध्दा पहात नाहीत.कारण निवडणूकीत काही ठराविक लोकांना चिरीमिरी देवून या मंडळीनी गप्प केलेले असते.असा आरोप करीत ते म्हणाले,घोट असेा किंवा घोटच्या सर्व वाडया असो,या गांवाचा विकास मुलभूत सुविधा देवून पुर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे.पाटणकरांनी आपल्यावर कितीही आरोप केले तरी आपल्यावरील आरोपाचे उत्तर हे मतदारसंघातील जनतेने शोधून ठेवले आहे.योग्य वेळी ते उत्तर जनताच त्यांना देणार आहे.वाडयात बसून पत्रके काढणे एवढा एकमेव उद्योग त्यांचेकडे शिल्लक राहिला आहे त्यामुळे त्यांच्या आरेापांकडे लक्ष न देता आपण गत साडेचार वर्षात या विभागात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गतवेळच्या निवडणूकीपेक्षा कसे जादा मतदान घेवू शकू यादृष्टीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले.यावेळी बबनराव शिंदे यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित शिंदे यांनी करुन उपस्थितांचे आभार भानूदास शिंदे यांनी मानले.
चौकट:- माझ्या विकासकामांचे व पाटणकरांच्या निषक्रीयतेचे मुल्यमापन जनता निवडणूकीत करेल.
             आपण केलेली विकासकामे ही जनतेला उघडपणे दिसत आहेत तरीही पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र हे आपला विकास कुठेच दिसत नाही हा कागदावरचा विकास आहे अशा खोटया वल्गना करीत असले तरी माझ्या विकासकांमाचे व पाटणकर पितापुत्रांच्या निष्क्रीयतेचे मुल्यमापन जनता निवडणूकीतच करणार आहे त्यामुळे येणारा काळच ठरविणार आहे कोण कामाचा आणि कोण बिनकामांचा आहे ते ? असेही ते शेवठी बोलताना म्हणाले.


Tuesday 12 March 2019

पाटण तालुक्यातील डोंगर पठारावरील रस्त्यांना मंजुरी दिलेबद्दल आ.शंभूराज देसाईंनी मानले ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार.






दौलतनगर दि.१२ :-पाटण तालुक्यातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे डोंगरपठारावर जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेबद्दल पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले आहेत.
                       राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे दि.२५.१०.२०१८ रोजी पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा नाडे नवारस्ता याठिकाणी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना यापुर्वी भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण मतदारसंघाच्यावतीने ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या दरम्यानच आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना पाटण तालुक्यात पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कामे अजुनही प्रलंबीत असून या कामांना मंजुरी दयावी अशी आग्रही मागणी त्यांचेकडे केली होती.त्यावेळी अशा रस्त्यांना निधी न देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून आमदार शंभूराज देसाईंची आग्रही मागणी या खात्याचा मंत्री असल्याने मला मोडवत नसल्याने निर्णयात बदल करुन पाटण तालुक्यातील अशा रस्त्यांना हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुरी मिळणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार            शासनाच्या ऊर्जा विभागाकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आलेल्या कोकीसरे नवलाई वार्ड ते गवळीनगर रस्ता, वेताळवस्ती काळगाव ते मस्करवाडी ग्रामा 361 रस्ता, माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर रस्ता, भोसगाव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी रस्ता, कोळेकरवाडी ते अनुतेवाडी ते कारळे रस्ता, नेरळे ते गुंजाळी ग्रामा 188 रस्ता, घेरादातेगड गावपोहोच रस्ता, गावडेवाडी फाटा ते धुईलवाडी ग्रामा 63 रस्ता, काठीटेक ते आवसरी ग्रामा 55 रस्ता, रामेल फाटा ते रामेल ग्रामा 52 रस्ता या १० रस्त्यांच्या कामांना ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.०८ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी दिली असून रस्त्यांच्या कामांना विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले आहेत.

सत्यजितसिंह पाटणकर, पाटण शहराच्या बाहेर राहतात का? आ.शंभूराज देसाईंचा पाटणकरांना उलट सवाल.



दौलतनगर दि.११:- गेल्या चार वर्षात पाटणमध्ये का फिरकला नाहीत? असा सवाल मला करणारे माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर आपण पाटण शहराच्या बाहेर राहता काय? असा सवाल आ.शंभूराज देसाईंनी केला असून आठवडयातील किमान दोन दिवसाआड मी पाटण शहरात आहे. सत्यजितसिंह पाटणकर पेपरातून मला विचारण्यापेक्षा तुम्ही पाटणमधल्या जनतेलाच गाडीच्या काचा खाली करुन विचारा ना? पाटण शहरातील जनताच तुम्हाला सांगेल, छोटे दादा, आमदार शंभूराज देसाई पाटणमध्ये जेवढे वेळेस दिसतात तेवढया वेळेस तुम्हीच आम्हाला दिसत नाही.तुम्ही आम्हाला पहिले दिसा.आमदार शंभूराज देसाई पाटणमध्येच काय पण संपुर्ण पाटण तालुक्याच्या कानाकोपऱ्यात रोजच आहेत असा उपरोधिक टोला आ.शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
                                      मिरासवाडी ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शिरळ ते मिरासवाडी व ताईचीवाडी शिरळ गावपोहोच रस्त्यांचा संयुक्त भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.या दोन्ही रस्त्यांच्या कामांना त्यांनी ८६ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य बशीर खोंदु,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,कारखाना संचालक राजेंद्र गुरव,निवृत्ती कदम,नवनाथ सुर्यवंशी,पांडुरंग बेबले,सदानंद साळुंखे,दिलीप सकपाळ,प्रकाश सुर्यवंशी,गणपत सुर्यवंशी,शैलेंद्र शेलार,पांडुरंग सुर्यवंशी,ज्योतिराम सुर्यवंशी,संजय सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी,अमृत चव्हाण,संजीवन सुर्यवंशी,शंकर कुंभार,नानासो पवार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मिरासवाडी, शिरळ व ताईचीवाडी येथील कार्यकर्ते, युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी आ.शंभूराज देसाई म्हणाले,गेल्या साडेचार वर्षात माजी आमदार पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांचेकडे कुठले भूमिपुजन किंवा उदघाटनाचा कार्यक्रम नाही.जेव्हा हातात असताना मतदार संघातील जनतेला कोणते विकास काम देवून त्याची भूमिपुजने आणि उदघाटने केली नाहीत आणि आता जिल्हा वार्षिेक आराखडयातील नगरोथ्यान योजनेतील कामांचा आणि पाटणकरांचा काहीही संबध नसताना पाटण नगरपंचायतीला येणाऱ्या कामांची भूमिपुजने करण्याचा सपाटा माजी आमदार पुत्रांनी लावला आहे.या कार्यक्रमांमध्ये गेल्या साडेचार वर्षात मी काय केले? हे सांगण्यापेक्षा माजी आमदारपुत्र हे माझ्याच विकासकामांची मापे काढून माझे भाषण मी केलेली विकासकामे सांगण्यापेक्षा पाटणकर पितापुत्रांचे नाव घेतल्याशिवाय पुर्णच होत नाही असे सांगत सुटले आहेत. गेल्या साडेचार वर्षात मी मंजुर करुन आणलेली  विकासकामे ही पाटणकरांच्या काळात प्रलंबीत राहिलेली विकासकामे आहेत त्यांना जमले नाही ते मी केले त्यामुळे पाटणकरांचा निष्क्रीय कारभार मतदारसंघातील जनतेला समजलाच पाहिजे ना? असे सांगून ते म्हणाले माजी आमदार पुत्र ज्या ज्या कामांचे भूमिपुजन करीत सुटले आहेत ती ती कामे कुठुंन आणि कुठल्या योजनेतून मंजुर झाली आहेत हे तरी त्यांना माहिती आहे का? रोज पाटणमध्ये गेल्यानंतर येथील लोक भेटले की हेच सांगतात या प्रभागात कचऱ्याचे व्यवस्थापन नाही,या प्रभागात स्वच्छता नाही,सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे.शहरात अर्धा तासच पाणी मिळतेय, तुमचे आमदार फंडातील रस्त्याचेही यांच्याच कार्यकर्त्यांनी भूमिपुजन केले.पाटण शहरात प्रवेश करतानाच पाटण शहर किती स्वच्छ आहे हे सगळीकडे पाहिल्यानंतर दिसून येते. पाटणकरांच्या याच वाडयाच्या खालची बाजू पाटणकरांना स्वच्छ करुन घेता येत नाही आणि पाटण शहराच्या स्वच्छतेचा डंका माजी आमदारपुत्र वाजवित सुटले आहेत.पाटण शहरात लवकरच २४ बाय ७ पाणी योजनेचे काम सुरु होणार असल्याचे सांगणारे सत्याजितसिंह पाटणकर २४ बाय ७ योजना आपले पिताश्री राज्याचे मंत्री असताना का सुरु करु शकला नाहीत याचे उत्तर पहिल्यांदा पाटण शहरातील जनतेला दया.मी जिल्हा वार्षिक आराखडयातून मंजुर करुन दिलेला निधी तुम्हाला खर्चता आला नाही आणि आता २४ बाय ७ च्या योजनेच्या गप्पा मारता हे तुम्हाला शोभणारे नाही असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगाविला. मिरासवाडी रस्त्याला मी मागे आमदार असताना निधी दिला होता त्यावर गेल्या ९ वर्षात एक रुपयांचाही निधी पाटणकरांकडून टाकण्यात आला नाही. मी सुमारे ८६ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे आणि माजी आमदारपुत्र विकासाच्या गप्पा मारत आहेत ही लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना म्हंटले आहे.यावेळी जयवंतराव शेलार यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सकपाळ यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.
चौकट:- पाटणकरांनी फोडलेल्या नारळांचा खर्च विकासकामांच्या निधीपेक्षा जादा.
           माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर पाटण शहरात ज्या कामांची भूमिपुजने करत आहेत त्याठिकाणी भूमिपुजनाकरीता ठेवण्यात येणारे नारळ याचा खर्च पाहिला तर त्या संबधित विकासकामांकरीता एवढा निधी मंजुर नाही त्यापेक्षा अधिकच खर्च सत्यजितसिंह पाटणकरांच्या नारळावर होत आहे. कामाला निधी किती आहे आणि आपण नारळे किती फोडतोय याचे भानही त्यांना नाही असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.

Monday 11 March 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचला.- आ.शंभूराज देसाई. महाराष्ट्र दौलतमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांची १०९ वी जयंती साजरी.




दौलतनगर दि.११:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता होती मात्र लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची कबुली दस्तुरखुद्द राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री यांनी दिली असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचण्याचे अतुलनीय कार्य केले असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
                          दौलतनगर.ता पाटण येथे राज्य शासनाने उभारलेल्या महाराष्ट्र दौलत या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकामध्ये मोठया दिमाखात महाराष्ट्र राज्याचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 109 वी जयंती सोहळा संपन्न झाला या समारंभात आ.देसाई बोलत होते.या कार्यक्रमास सातारा इतिहास मंडळाचे अध्यक्ष व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेवर शिवाजी विद्यापीठामध्ये एम फिल केलेले प्रा.आत्माराम थोरात, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जयराज देसाई,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सह्याद्री हॉस्पीटलचे संचालक दिलीपराव चव्हाण,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲड.मिलिंद पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व‍ शिक्षण समुहातील पदाधिकारी,लोकनेतेप्रेमी जनतेची मोठया संख्येने प्रमुख उपस्थिती होती.
                 आ.देसाई म्हणाले,महाराष्ट्र राज्याला नवी दिशा देऊन विकासप्रवाहात आणण्यामध्ये लोकनेत्यांचा सिंहाचा वाटा आहे असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया रचणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कर्मभूमित चिरंतन स्मारकासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा याकरीता तत्कालीन आघाडी सरकारकडे सातत्याने प्रयत्न केले परंतू तत्कालीन आघाडी सरकारने जाणीवपूर्वक हा प्रस्ताव टाळण्याचा प्रयत्न केला. ज्या काँग्रेस पक्षाकरीता लोकनेते यांनी अतुलनीय कार्य केले त्याच पक्षाच्या मातब्बरांनी लोकनेते यांचे स्मारकासाठी निधी दिला नाही मात्र भाजप सेना युतीच्या सरकारने  मुख्यमंत्री देवेद्रं फडणविस यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलाही विचार न करता लोकनेत्यांचे या प्रस्तावाला एकमुखाने या प्रस्तांवाला तात्काळ परवानगी देत मंजुरी देऊन हे स्मारक तात्काळ उभे केले. युतीच्या शासनाच्या हे ऋृण कधीही न फेडता येणारे आहे. महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या माध्यमातून लोकनेते साहेबांच्या नावाला साजेसे असे काम केले जाईल जेणे करुन भविष्यात महाराष्ट्र दौलत चा रमणीय आणि मोहक परिसर पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतील असा विश्वास व्यक्त करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या विविध मंत्री पदाचा उपयोग तालुक्यातील,जिल्हयातील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी केला आपल्या कर्तत्वाने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केले.संपूर्ण भारत देशात कोणत्याच राज्यात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत नसताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ईबीसी सवलत देणारे देशातील पहिले शिक्षणमंत्री ठरले.आज कोणत्याही नेतृत्वामध्ये ती धमक दिसून येत नाही म्हणूनच तर प्रसिद्ध लेखक प्र.के.अत्रे यांनी महाराष्ट्रातील लोकांचा नेता म्हणून स्व.बाळासाहेबांना लोकनेते ही पदवी बहाल केली.सागंली,सातारा,कोल्हापुर या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता कोल्हापुर येथे शिवाजी विद्यापीठाची निर्मिती केली.लोकनेत्यांनी महाराष्ट्राला दिशा देऊन राज्याला विकास प्रवाहात आणत असताना  पाटण तालुक्याची जडण घडण करण्याचेही मोलाचे कार्य केले.त्यांच्या कार्याचा गौरव आजही महाराष्ट्रात होत आहे त्यांचे आदर्श विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे असून लोकनेते यांना त्यांचे १०९ जयंतीनिमित्त पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करत असल्याचेही आ.शंभूराज देसाईंनी सांगितले. 
                  यावेळी प्रा.आत्माराम थोरात म्हणाले,माणसातील देव म्हणजे लोकनेते राजकारणाबरोबर आपल्या मातीवर प्रेम करणारा लोकनेत्यांसारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. जनतेच्या भल्यासाठी वेळप्रसंगी कायदा बदला म्हणणारे कणखर नेतृत्व म्हणून लोकनेत्यांची ओळख महाराष्ट्रात असून त्यांच्यामुळे या तालुक्याबरोबर जिल्हयातील अनेकजण हे उच्चपदावर काम करत आहेत. लोकनेते यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे नातू आ.शंभूराज देसाई यांची वाटचाल सुरु आहे हे पाटण मतदारसंघाचे भाग्य आहे.हजारो कोटी रुपयांची विकासकामे अक्षरक्ष: खेचून आणणारा रोखठोक आमदार महाराष्ट्राच्या 288 आमदारामध्ये शोधूनही सापडणार नसल्याचे प्रा.थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले व लोकनेते यांना त्यांचे १०९ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करुन आदराजंली वाहिली. यावेळी जाळगेवाडी येथील चि.रोहन जगदाळे व गिरेवाडी येथील कु.अक्षरा माने या विद्यार्थ्यासहित जयवंतराव शेलार,ॲड.डी.पी.जाधव,डॉ. दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागत अशोकराव पाटील यांनी केले तर आभार प्रा.विश्वनाथ पानस्कर यांनी मानले.
चौकट: पश्चिम महाराष्ट्रातील पहिले मोठे डिजिटल क्लासरूम महाराष्ट्र दौलतमध्ये.
          राज्य शासनाने सुमारे १० कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाचा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या आधुनिक स्मारकामध्ये प्रथमच लोकनेते यांचा जयंतीचा समारंभ घेणेत आला.अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा या स्मारकामध्ये असून ग्रामीण भागातील मुलामुंलीना स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाकरीता तब्बल 50 लाख रुपये खर्चाचे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे डिजिटल क्लासरुम तसेच 5 लाख रुपये खर्चाचे केवळ रेफरन्स बुक या स्मारकामध्ये उभारण्यात येत आहे याचा उपयोग नक्कीच पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी निश्चितपणे होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टास्क फोर्सच्या माध्यमातून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न सोडविण्याची अंमलबजावणी लवकर करावी. आमदार शंभूराज देसाईंची मुख्यमंत्री ना.फडणवीस यांचेकडे लेखी मागणी.




दौलतनगर दि.११:- पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपले अध्यक्षतेखाली दि.20.03.2018 रोजी संपन्न झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये आपणांकडून ठरविण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविणेसंदर्भात अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना देण्यात याव्यात व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करावी अशी लेखी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.
                       मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आ.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे,माझे पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपले अध्यक्षतेखाली दि.20.03.2018 रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांचे देखरेखीखाली आपण टास्क फोर्सची निर्मिती करुन जिल्हाधिकारी,सातारा यांना कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नाची माहिती संकलित करुन या प्रश्नासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.टास्क फोर्सच्या माध्यमातून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची माहिती संकलीत करण्याचे काम जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत सुरु आहे.दरम्यान कोयना धरण प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता पुन्हा कोयनानगर येथे बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला असून कोयनानगर ता. पाटण येथे कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरु असून आपण दि.20.03.2018 रोजीच्या बैठकीमध्ये निर्मिती केलेल्या टास्क फोर्सची अंमलबजावणी तात्काळ सुरु करुन कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत असणारे प्रश्न तातडीने मार्गी लावणे अत्यंत गरजेचे असून आपण यासंदर्भात तात्काळ सातारा जिल्हाधिकारी यांना सुचना देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात गती देवून टास्क फोर्सच्या माध्यमातून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी विनंती आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रात केली आहे.


Friday 8 March 2019

पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणातील कामांना ०१ कोटी ३९ लाखाचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.०८:- राज्य शासनाकडे प्रलंबित राहिलेल्या कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या १३ कामांना ०१ कोटी ३० लाख ५८ हजार ४२० रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि.०७ मार्च,२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी उपलबध करुन देणेबाबत राज्याचे महसूल व वनविभागाचे मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तसेच कोयना प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना राज्य शासनाने तातडीने निधी मंजूर करणेकरीता महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०१८ च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सुचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्री महोदय यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या १३ कामांना ०१ कोटी ३० लाख ५८ हजार ४२० रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. ०७ मार्च,२०१९ रोजी पारित केला असून या १३ कामांमध्ये वरसरकून कामरगाव येथे मोरी बांधकाम व रस्ता डांबरीकरण करणे १२.२७ लाख, वरसरकून मिरगाव पोहोच रस्ता डांबरीकरण ४.३२ लाख, कामरगाव गोकूळ एस पोहोच रस्ता डांबरीकरण ३७.९५ लाख,मिरगाव बोपोली मोरी बांधकामे व डांबरीकरण ८.१३ लाख,वरसरकून कामरगाव ग्रामपंचायत कार्यालय इमारत २२.८० लाख,जुंगठी (दिवशी खुर्द) ग्रामपंचायत कार्यालय इमारत २२.६७ लाख, ढोकावळे रिसवड दोन शाळा खोल्या इमारत १३.57 लाख,किसरुळे रासाटी येथे बस थांबा २.९८ लाख, मानाईनगर बस थांबा ३.०४ लाख, वरसरकून हुंबरळी बस थांबा ०३.०० लाख, कामरगाव गोकूळ बस थांबा ०३.०२ लाख,नवजा (नवजावस्ती) स्मशानभूमी शेड २.८० लाख,वरसरकून कामरगाव बसथांबा ३.०२ लाख या कामांचा समावेश असून सदरच्या निधीमुळे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कामांना चालना मिळणार असून लवकर या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन सदरच्या मंजूर कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता,कण्हेर कालवे विभाग क्रं.२ करवडी कराड यांना दिले असल्याचे आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
चौकट:- माजी आमदार पुत्रांना शासन निर्णय समजतो का?
           पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार अधिवेशन झाले की एवढे कोटी आणले, एवढया कोटींची कामे केली अशा वल्गना करतात. प्रत्यक्षात मात्र काहीच दिसत नाही असे म्हणणारे सत्यजितसिंह पाटणकर.कोटयावधी रुपयांच्या कामांच्या मी केवळ घोषणा करीत नाहीतर अधिवेशनातून मी मंजुर करुन आणलेल्या विविध विकास कामांच्या कोटयावधी रुपयांच्या निधीला शासन निर्णयांचा आधार आहे.शासनाने त्या निधीचे शासन निर्णय पारित केले आहेत. माजी आमदार पुत्रांना शासन निर्णय समजतो का? शासन निर्णय समजत नसेल तर त्यांचे पिताश्री आमदार व मंत्री होते त्यांच्याकडून शासन निर्णय काय असतात हे समजून घ्या असा सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला आहे.

नवीन रस्ते करायला संधीच नाही म्हणणारे पाटणकर,,मग हे रस्ते आतापर्यंत का होवू शकले नाहीत. आ.शंभूराज देसाईंचा पाटणकरांना सवाल.





दौलतनगर दि.०८:- पाटण तालुक्यात रस्ते नसल्याने आपल्या आमदारकीच्या काळात सातत्याने दुर्गम डोंगराळ भागातील रस्त्यावर भर दिल्याने संपुर्ण मतदारसंघात रस्त्याचे जाळे झाले आहे. नवीन रस्ते करण्यास संधीच नाही जुन्याच रस्त्यावर डांबराचे कार्पेट करण्याचे व खड्डे भरण्याचे काम सुरु आहे असे म्हणणारे पाटणचे निष्क्रीय माजी आमदार साहेब,मी सांगतो त्या वरची केळेवाडी,जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी,गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी जाधववाडी,भालेकरवाडी,महिंद वर्पेवाडी,निगडे माईंगडेवाडी,मोडकवाडी,सातर,गुढे शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी, डाकेवाडी,लोहारवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी या २१ ते २२ प्रमुख गावांच्या रस्त्यावर आतापर्यंत डांबर राहू दया परंतू साधी खडी किेंवा मुरुम टाकण्याचेही काम तुम्ही का करु शकला नाहीत? असा सवाल आ.शंभूराज देसाईंनी पाटणकरांना केला असून हे रस्ते तुमच्या काळात का होवू शकले नाहीत याचे उत्तर मतदारसंघातील जनतेला दया असे आवाहन आ.शंभूराज देसाईंनी पाटणकरांना केले आहे.
                     चिखलेवाडी कुंभारगांव ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंनी हरीत ऊर्जा निधी योजनेतंर्गत मंजुर केलेल्या कुंभारगांव-माटेकरवाडी ते वरेकरवाडी या ०४ किमी रस्त्याचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कामांकरीता त्यांनी १ कोटी ८१ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,जितेंद्र केसेकर,पंचायत समिती गटनेने पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,शंकरराव चव्हाण,चंद्रकांत चाळके,सरपंच सौ.कविता घाडगे,उपसरपंच केशव माटेकर,अजित वरेकर, भगवान वरेकर,दत्तात्रय चोरगे,भरत चाळके,विशाल पवार,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,विकास गिरी गोसावी, प्रकाशराव तवटे,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,महादेवराव पानवळ,शाखा अभियंता राजाराम खंडागळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिखलेवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी,चाळकेवाडी,कुंभारगांव गांवातील कार्यकर्ते व मुंबई मित्रमंडळा तील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी आ.शंभूराज देसाई म्हणाले,आपल्या तालुक्याचे माजी आमदार पाटण येथील शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात मागील आठवडयात बोलताना म्हणाले की,पाटण तालुक्यात रस्ते नसल्याने त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात रस्त्यांना प्राधान्य देवून प्रत्येक गांव आणि वाडीवस्तीवर रस्त्यांची सुविधा पुरविली. नवीन रस्ते करण्यास आता संधीच नाही जुन्याच रस्त्यावर डांबराचे कार्पेट करण्याचे व खड्डे भरण्याचे उद्योग सुरु आहे.मला या रस्त्याच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने त्यांना सवाल करायचा आहे.पाटणकरसाहेब जर खरोखरच आपण आपल्या आमदारकींच्या काळात रस्त्यांना प्राधान्य दिले असे म्हणता तर स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली कुंभारगांव विभागातील वरेकरवाडी या वाडीला पोहचलेल्या रस्त्यांवर डांबर राहू दया परंतू साधी खडी किंवा मुरुम टाकण्याचेही काम तुम्हाला का जमले नाही. नवीन रस्ते करायला संधीच नाही तर मग वरेकरवाडी गांवाप्रमाणे वरची केळेवाडी,जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी, गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी जाधववाडी,महिंद वर्पेवाडी,निगडे माईंगडेवाडी,भालेकरवाडी,सातर, मोडकवाडी,गुढे शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी,डाकेवाडी,लोहारवाडी या २१ ते २२ गांवाच्या आणि वाडयांच्या रस्त्यांची कामे आतापर्यंत का होवू शकली नाहीत जी तुम्हाला नाही परंतू मला नव्याने करावी लागली आहेत.वरेकरवाडीचा हा रस्ता होतोय या वाडीला स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने रस्ता पुर्ण झालेनंतर स्वातंत्र्य मिळणार आहे याचा मला आनंद होत आहे. असे सांगुन ते म्हणाले,येथील चाळकेवाडी बंधाऱ्यांचे कामाचाही प्रश्न प्रलंबीत आहे.मागील आठवडयात या विभागातील भूमिपुजनांच्या कार्यक्रमानिमित्त आलेनंतर चाळकेवाडी बंधाऱ्याच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन ते निधीसाठी मुख्य अभियंता,पुणे यांचेकडे सादर करण्याच्या सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या बंधाऱ्याकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर करुन आणणेकरीता मी कटीबध्द आहे. कुंभारगांव विभागातील प्रत्येक गांवामध्ये या साडेचार वर्षात मोठया प्रमाणात विकासाचे कामे देवून शिल्लक राहिलेला विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचे काम आपण केले आहे. कुंभारगांव जिल्हा परीषद मतदारसंघामध्ये माजी आमदारांच्या काळात जेवढा निधी मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जादा निधी विकासकामांना देण्याचे काम आपण केले आहे. ज्याप्रमाणे कामांसाठी या विभागात निधी दिला आहे त्याप्रमाणातच येणाऱ्या निवडणूकीत या विभागातील मतदारांनी मते देवून विकासकामे मार्गी लावणाऱ्यांच्या पाठीशी आपली ताकत उभी करावी.मतदारसंघाच्या विकासाकरीता आपण कुठेही कमी पडणार नाही.विकासाची कामे मागताना ज्याप्रमाणे पदाधिकारी चढाओढ करतात त्याचप्रमाणे निवडणूकीत मते मिळविण्याकरीताही चढाओढ लागणे गरजेचे असल्याचेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवबा वायचळ यांनी केले व उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत सदस्य केशव टोळे यांनी मानले.

रामराम करायला पाच वर्षातून एकदा जाणार,मग पाटणकर पितापुत्रांना आपला विकास कसा दिसणार? आ.शंभूराज देसाईंचा पाटणकर पितापुत्रांना उपरोधिक टोला.


   


दौलतनगर दि.०8:- निवडणूका जवळ आल्या की, रामराम करुन मते मागायला येणारे पाटणकर पितापुत्रांना आपण साडेचार वर्षात मतदारसंघात केलेला विकास आता टोचू लागला आहे.हजारो कोटी रुपयांची विकासकामे गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात आली कुठुंन? हा प्रश्न निष्क्रीय विरोधकांना सतावत असून झोपा काढून किंवा मरळीच्या बंगल्यावर थांबून कोटयावधी रुपयांची कामे मतदारसंघात आली नाहीत.दे हरी पलंगावरी असे कुणी कुणाला आणून देत नाही त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो.सत्ताधारी असलो तरी सरकारबरोबर भांडावे लागते, विधानसभेत बोलावे लागते हे तुम्ही जाणता पण विरोधकांना याची जाण कधी येणार? विरोधकांची अवस्था दे हरी पलंगावरी अशीच असल्याने मतदारसंघातील ही कामे आतापर्यंत होवू शकली नाहीत.रामराम करायला हे पाटणकर पितापुत्र पाच वर्षातून एकदा गावांगावात जाणार मग त्यांना गावांगावांचा सुरु असलेला विकास कसा दिसणार असा उपरोधिक टोला आ.शंभूराज देसाईंनी पाटणकर पितापुत्रांना लगाविला आहे.
                     नाटोशी ता.पाटण येथे आ.शंभूराज देसाईंनी हरीत ऊर्जा निधी योजनेतंर्गत मंजुर केलेल्या सातेवाडी ते नाटोशी ते जाधववाडी या ०४ किमी रस्त्याचे व अर्थसंकल्पातून मंजुर केलेल्या इनामवाडी नाटोशी तसेच सर्वसाधारण साकव योजनेतंर्गत मंजुर नाटोशी देसाईवाडा येथील सुर्वेवस्ती साकव पुलाचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या तिन्ही कामांकरीता त्यांनी २ कोटी 54 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी जिल्हा परीषद सदस्य सौ.सुग्रा खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव,नथूराम कुंभार,विष्णुपंत देसाई,रामचंद्र देसाई,किसन गालवे,गणेश भिसे,ॲड.मारुती देसाई,नाटोशी सरपंच अविनाश कुंभार, उपसरपंच उदय देसाई,शाबुदिन मुलाणी,सचिन भिसे,प्रवीण आगाणे,चेतन देसाई,जयदीप पाटील,नाथा भिसे,प्रदीप जाधव, संजय जाधव,अशोक शिर्के, विक्रम देसाई या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील कार्यकर्ते,युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,हातात सध्या काहीच नसताना माजी आ.पाटणकर दादांनी सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानादेखील कोटयावधी रुपयांची विकासकामे केली असल्याच्या खोटया वल्गना माजी आ. पाटणकर पितापुत्रांकडून सध्या तालुक्यात सुरु आहेत.माजी आ.पाटणकरांनी कोटयावधी रुपयांचा विकास केला असता तर नाटोशी जाधववाडी गांवाचा रस्ता त्यांना इतक्या वर्षात का करता आला नाही.? याचे उत्तर आतापर्यंत पाटणकरांचे नेतृत्व मानणाऱ्या मंडळीनी मला दयावे.त्यांची निष्क्रीयता त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे.नाटोशी गांव असो किंवा या गावच्या वाडया.प्रत्येक वाडीमध्ये आपण या साडेचार वर्षात एक ना एक तरी विकासाचे काम दिले आहे.नाटोशीची पाणी पुरवठा योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सुरु झाली आहे.जाधववाडीच्या रस्त्याचे आताच आपण भूमिपुजन केले.इतक्या वर्षे न झालेला हा रस्ता आता मार्गी लागणार आहे.खोटया वल्गना करुन लोकांना कामे दिसत नाहीत त्यासाठी प्रत्यक्षात काम करावे लागते. हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी मतदारसंघात आणला तो विकासनिधी मतदारसंघातील जनता उघडया डोळयांनी गांवागावात आणि वाडीवस्तीवर पहात आहे.पाटणकरांनी खोटारडेपणा तरी किती करावा? मी केलेला विकास जनतेला दिसतोय तसा तुमचा विकास जनतेला शोधावा लागतोय,पाटणकर दादांना मागणी करुनही आतापर्यंत आमचे हे काम झाले नाही ते तालुक्याच्या आतांच्या आमदारांनी केले हेच पाटणकर पितापुत्रांना रुचत नाहीये.मी केलेला विकास पहायला त्यांना नाटोशीत यावे लागेल,जाधववाडीत यावे लागेल,कुसरुंडमध्ये यावे लागेल,तालुक्याच्या भागा-भागात फिरावे लागेल.परंतू निवडणूका जवळ आल्या की पाच वर्षातुन ते एकदा तालुक्याच्या गांवागावांत जाणार मग त्यांना आपण करीत असलेला विकास कसा दिसणार? असा सवाल करुन ते म्हणाले,माजी आमदार पाटणकरांनी पवनचक्की कंपन्यांनी खराब केलेले किती रस्ते त्यांच्या आमदारकीच्या काळात नव्याने करुन घेतले, हे त्यांनी आकडेवारीसह प्रसिध्द करावे. आणि मी किती रस्ते करुन घेतले हे मी आकडेवारीसह प्रसिध्द करायला तयार आहे. २००४ ते २००९ मध्ये मी आमदार असताना या हरीत ऊर्जा योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.पाटण तालुक्यात पवनचक्की प्रकल्पांच्या कामांमुळे मोठया प्रमाणावर डोंगरपठारावरील ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था झाला असून या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करुन दयावा अशी मागणी मी तत्कालीन अपारंपारिक ऊर्जा मंत्री विनय कोरे यांचेकडे केली होती तेव्हा प्रति किमी १० लाख रुपयांचा निर्णय करण्यात आला. त्यानंतर २००९ ते २०१४ पर्यंत पाटणकर या मतदारसंघाचे आमदार होते.त्या निर्णयाची त्या पाच वर्षात पाटणकर साधी अंमलबजावणीही करु शकले नाहीत. म्हणूनच या योजनेचा निधी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांकरीता येवू शकला नाही. २०१४ ला परत मी आमदार झालेनंतर या १० लाखाच्या निधीत एक किमी रस्ता पुर्ण होणार नाही त्याकरीता जादा निधी लागणार याकरीता मी शासनाकडे पाठपुरावा केला म्हणूनच हरीत ऊर्जा निधीमधून तालुक्यात ज्या ज्या ठिकाणचे रस्ते पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीने खराब झाले ते ते रस्ते नव्याने करण्याचे काम मी करु शकलो. ते पाटणकरांना मागच्या पाच वर्षात करता आले नाही.त्यामुळे विरोधकांच्या कोटयावधीच्या वल्गना किती खऱ्या आणि किती खोटया  आहेत हे यावरुनच स्पष्ट होते. खोटया वल्गना करणाऱ्यांना मतदार थारा देत नाहीत हे विरोधकांनीच चांगले ध्यानात घ्यावे असेही आ.शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण आगाणे यांनी केले व उपस्थितांचे आभार रामचंद्र कदम यांनी मानले.
चौकट:- निष्क्रीय पाटणकर पितापुत्रांनी हे तरी आवाहन स्विकारावे.
            मी केलेला विकास पाटणकर पितापुत्रांना दिसत नाही.त्यांना तो पहायचा असेल तर वाडयातून जरा बाहेर पडा. विकासासंदर्भात काही शंका असेल तर समोरासमोर या असे मी अनेकदा आवाहन त्या पितापुत्रांना दिले आहे पण ते स्विकारत नाहीत.साडेचार वर्षात मी केलेला विकास त्यांना पहायचा असेल तर आता आचारसंहिता सुरु होईल.आचारसंहितेत फारसे काही काम नसते मी केलेला विकास दाखवायला गांवागावात मी वाटाडया होतो.पाटणकर पितापुत्रांनी त्यांच्या वाहनातून माझेबरोबर यावे.असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना दिले.

Thursday 7 March 2019

पाटणकरदादा, तुमची मापे काढायला वेळ आहे कुणाला? विकासाचा अनुशेष तुम्ही एवढा शिल्लक ठेवलाय तोच पुर्ण करतोय. आ.शंभूराज देसाईंचे पाटणकरांना प्रतिउत्तर.




दौलतनगर दि.०७:-वनकुसवडे पठारावरील पवनचक्कीकडे जाणारा एकमेव रस्ता सोडला तर तालुक्यातील इतर डोंगरपठारावरील रस्ते पाटणकरदादा तुम्हाला दिसले नाहीत का? भविष्यात ज्याठिकाणी पवनचक्की प्रकल्प येणार आहेत त्याठिकाणी रस्ता करुन मी रस्त्याचे जाळे विणले असे सांगत सुटणारे पाटणकरदादा,ज्या वनकुसवडे आणि घाणबीच्या गुळगुळीत रस्त्यावरुन तुम्ही गेलात तो रस्ता या शंभूराज देसाईंनी गुळगुळीत करायला कोटयावधीचा निधी दिला आहे. रस्त्याचे जाळे कुणी विणले आणि कुणाच्या काळात रस्ते करायचे राहून गेले व तालुक्याच्या पठारावरील रस्ते कुणाच्या माध्यमातून झाले व होत आहेत हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती पडले आहे.तुमच्या विकासकामांची मापे काढायला तुम्ही विकास केला तर पाहिजे ना दादा.तो झाला नाही म्हणूनच तुमची मापे निघत आहेत.गेली अनेक वर्षे तालुक्याला विकासापासून झुलवत ठेवणाऱ्यांची मापे काढायला येथे वेळ आहे कुणाला? विकासाचा अनुशेष तुम्ही एवढा शिल्लक ठेवला आहे तोच पुर्ण करण्याचे काम मी करीत आहे. असे प्रतिउत्तर आ.शंभूराज देसाईंनी पाटणकरांना दिले आहे.
                     येराड ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत कराड चिपळूण रस्ता ते येराड ते रोमणवाडी या रस्त्याचा भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते. या योजनेकरीता त्यांनी कोटी ३३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य बशीर खोंदु,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,कारखाना संचालक राजेंद्र गुरव,निवृत्ती कदम,नवनाथ सुर्यवंशी,सदानंद साळुंखे,प्रकाश साळुंखे,आबासो साळुंखे, निलेश साळुंखे,दिलीप सकपाळ,दिलीप कांबळे,किसन माने,लक्ष्मण जाधव,महिपती जाधव,सौ.सुनिता गुरव,बळीराम साळुंखे,रामचंद्र साळुंखे,यशवंत जाधव,दत्तात्रय साळुंखे,नानासो पवार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येराड,बनपेठवाडी, रोमणवाडी,रामाचावाडा येथील कार्यकर्ते, युवक महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना .शंभूराज देसाई म्हणाले,माजी .पाटणकर हे पाटण तालुक्याचे २१ वर्षे आमदार आणि वर्षे मंत्री राहिलेले आहेत. इतक्या वर्षे आमदार राहिलेल्या माजी आमदारांना जिल्हा नियोजन समितीला लघू समिती असते आणि या लघू समितीवर जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनंतर एकमेव आमदार निवडला जातो आणि तो मी आहे हे माहिती नसावे यापेक्षा दुसरे कोणते दुर्दैव? जिल्हा नियोजन समितीच्या आराखडयामध्ये मंजुर होणारी सर्व कामे ही लघू समिती ठरवते आणि मगच जिल्हा वार्षिक आराखडयास मंजुरी मिळते.काठी येथील आडवा पाठ बांधणे हे काम कशाप्रकारे आराखडयात बसवून ते मंजुर करुन आणले आहे हे येथील ग्रामस्थ महिलांनाही तुम्हाला सांगितले असेलच. काम कुणी दिले तालुक्याच्या आमदारांनी का तुमच्या जिल्हा परीषदेच्या सदस्यांनी हे आम्हालाही आणि तुम्हालाही चांगलेच माहिती आहे.निवडणूका जवळ आल्या की कोण डोंगरपठारावर येतात आणि पाच वर्षे या डोंगरपठारावरील जनतेच्या सुखदु:खात कोण सहभागी होतात हे माझेपेक्षा येथील जनताच तुम्हाला सांगेल.ही निवडणूक ते ती निवडणूक जनतेच्या दारात जाणाऱ्यांनी पठारावर माणसे राहतात का ?  याचा शोध मला घ्यावा लागला का? किंवा मी कधी आणि कुठे जायचे हे त्यांनी मला शिकवू नये.पठारावरच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमंतीने पवनचक्की कंपन्यांना विकुन या शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांनी पठारावरील जनतेचा विकास केल्याच्या गप्पा हाणणाऱ्यांना हे शोभत नाही.काठी,मरड,वनकुसवडे रस्त्यांची काय अवस्था आहे हे प्रत्यक्षात जावून पाहिले आहे. तुम्ही हे रस्ते केले असते तर मला जावून त्या रस्त्यांना कोटयावधी रुपयांचा निधी देण्याची वेळ आली नसती.तुमचे रस्ते पाटणकरदादा,या विभागात शोधावे लागत आहेत.घाणबीचा रस्ता केलात कारण त्या पठारावर पवनचक्क्या येणार होत्या.पाटणकरदादा,घाणबीसारखे तालुक्यात असे अनेक रस्ते डोंगरपठारावर आहेत.यामध्ये वरची केळेवाडी, जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी,गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी जाधववाडी,भालेकरवाडी,महिंद ते वर्पेवाडी, मोडकवाडी,सातर,गुढे शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी,डाकेवाडी,लोहारवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी हे रस्ते तुम्हाला दिसले नाहीत का ? मी तुम्हाला हे तालुक्यातील रस्ते तुम्ही का करु शकला नाहीत असा सवाल देखील केला होता. परंतू यावर तुमची बोलतीच बंद.नको ते विषय वाडयात बसून पत्रकातून मांडायचे आणि जनतेची दिशाभूल करायची या सवयी पाटणकरदादा आता तरी सोडा.तुम्हाला मंत्री आणि आमदार म्हणून जेवढा विकास जमला नाही तेवढा विकास केवळ गेल्या साडेचार वर्षात माझे माध्यमातून सुरु असून संपुर्ण तालुक्याचा आणि मतदारसंघाचा सुरु असलेला विकास पाहून तुम्हाला चांगलाच पोटसुळ उठला आहे हे आम्हालाही कळते आहे.त्यामुळेच निष्क्रीय माजी आमदारांची मापे मी नाही आता जनताच काढू लागली असून येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत याच मापांचे प्रतिउत्तर मतदारसंघातील जनता तुम्हाला मतांच्या रुपाने नक्कीच देईल असा विश्वासही आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सकपाळ यांनी केले उपस्थितांचे आभार सचिन साळुंखे यांनी मानले.
चौकट:- पाटणकरदादा, तुमच्या सवयी आमच्याकडे आणू नका.
          गांवागावांत भांडणे लावण्यासाठी दारु, मटण वाटपासाठी पथके नेमण्याच्या सवयी पाटणकरदादा, तुमच्या आहेत हे अवघा तालुका ओळखून आहे. निवडणूकीच्या अगोदर १५ दिवस गांवागावांत मटण आणि दारु देवून जनतेला निवडणूकीत मते देण्यास भाग पाडायचे आणि निवडणूकीनंतर पाच वर्षे मतदारांच्या सुखदु:खात सहभागीही व्हायचे नाही.या सवयी तुमच्या आहेत.तुमच्या या सवयी पाटणकर दादा आमच्यावर ढकलून असल्या वाईट सवयी आमच्याकडे आणू नका असेही .शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.