दौलतनगर दि.०३:- पाटण विधानसभा मतदारसंघातील
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची
शासनाकडे प्रलंबीत असणारी कार्यवाहीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी
आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे वनमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांची अधिवेशनात
प्रत्यक्ष भेट घेवून केलेनंतर वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री
व्याघ्र प्रकल्पातील ती १४ गांवे वगळण्याचा आदेश तात्काळ काढावा असे लेखी आदेश
वनविभागांचे प्रधान सचिव यांना दिले आहेत येत्या काही दिवसात ही १४ गांवे
वगळणेबाबतचा आदेश पारित करण्याची कार्यवाही होईल असा विश्वास आमदार शंभूराज
देसाईंनी व्यक्त केला आहे.
नुकत्याच झालेल्या मुंबई
येथील विधानसभेच्या अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे वन मंत्री ना.सुधिर
मुनगंटीवार यांची भेट
घेवून पाटण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर
झोनमध्ये असणारी १४ गांवे बफर झोनमध्ये घेणेची कार्यवाहीची अंमलबजावणी शासनस्तरावर
प्रलंबीत आहे. लवकरात लवकर ही अंमलबजावणी पुर्ण करावी व व्याघ्र प्रकल्पातील १४
गांवे कोअर झोनमधून बफर झोनमध्ये घेणेचे आदेश काढावेत अशी आग्रही मागणी केली यावर वनमंत्री
ना.सुधीर मुनगंटीवार यांनी वरीलप्रमाणे वनविभागाचे प्रधान सचिव यांना आदेश दिले.
वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना आमदार
शंभूराज देसाईंनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात दि.०५
जानेवारी, २०१० अन्वये कोयना वन्यजीव अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा
राखीव प्रदेश घोषित व अधिसुचित केला आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्रीय
अधिनियमान्वये दि.२१ ऑगस्ट,२०१२ रोजी अधिसुचित केलेल्या राजपत्रामध्ये परिशिष्ट १
(ब) मध्ये समाविष्ट केलेल्या १४ गांवाना प्रकल्पातील कोअर क्षेत्राप्रमाणे लागु
केलेल्या अटी शर्ती या अन्यायकारक असून या अटीशर्तीमुळे पाटण मतदारसंघातील १४
गांवातील प्रकल्पग्रस्तांवर कोअर झोनप्रमाणे अनेक बंधने आली आहेत.त्यामुळे या
गांवातील प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सदरची १४ गांवे
कोअर झोनमधून वगळून ती बफर झोनमध्ये घेणेकरीता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या
सल्लागार समितीनेही राज्य शासनाच्या वनविभागाकडे शिफारस केली आहे. शासनाच्या
वनविभागानेही ही १४ गांवे कोअर झोनमधून वगळणेबाबत तत्वत: मान्यता देखील दिली आहे.
याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी केली असून या भेटी दरम्यान वनमंत्री
ना.सुधीर मुनगंटीवार यांना आपण कराड येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नवीन
कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाकरीता आला असताना ही १४ गांवे वगळण्याचा आदेश येत्या
६० दिवसात काढण्यात येईल असे आश्वासन देखील दिले असल्याची आठवण करुन दिली. यावर पाटण
विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये असणारी ती १४
गांवे बफर झोनमध्ये घेणेचे आदेश तात्काळ काढावेत असे लेखी आदेशच माझे पत्रावर
वनविभागांचे प्रधान सचिव यांना दिले असून त्यांना यासंदर्भात तात्काळ कार्यवाही
करण्याचेही वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना सांगितले आहे. त्यामुळे येत्या
काही दिवसात ही १४ गांवे वगळणेबाबतचा आदेश पारित करण्याची कार्यवाही शासनामार्फत
करण्यात येईल असा विश्वासही आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
Saheb 👌👌
ReplyDelete14 गावची लिस्ट ध्या साहेब
ReplyDelete