दौलतनगर
दि.०२:-कृष्णा
खोरे विकास महामंडळाच्या वांग-मराठवाडी धरण प्रकल्पांतर्गत अशंत: बाधित असणाऱ्या
निगडे गांवातील एकूण 117 प्रकल्पग्रस्तांची जमिन प्रकल्पामध्ये बुडीत गेली असून या
बुडीत जमिनींच्या बदल्यामध्ये रोख रक्कम या प्रकल्पग्रस्तांना मिळावी अशी मागणी
पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे जलसंपदा मंत्री यांचेकडे
केल्यानंतर जलसंपदा मंत्री यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक
यांना यासंबधीचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा असे लेखी आदेश दिले असल्याची
माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
मुंबई
येथील विधानसभेच्या अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांची
भेट घेवून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वांग-मराठवाडी धरण प्रकल्पांतर्गत अशंत:
बाधित असणाऱ्या निगडे गांवातील एकूण 117 प्रकल्पग्रस्तांची जमिन प्रकल्पामध्ये
बुडीत गेली आहे.या प्रकल्पग्रस्तांना कोणताही आणि कसलाही मोबदला शासनाने अथवा कृष्णा
खोरे विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला नाही.तर सदर प्रकल्पग्रस्तांनी
कोणत्याही पुनर्वसित जमिनीस पसंती दिलेली नसून संबधित सर्व 117 प्रकल्पग्रस्तांनी
त्यांचे बुडीत जमिनीचे बदल्यामध्ये रोख रक्कम आम्हास मिळावी अशी आग्रही मागणी केली
आहे.निगडे येथील 117 प्रकल्पग्रस्तांची नांवे आपणांकडे देत असून या
प्रकल्पग्रस्तांनी रोख रक्कमेचा प्रस्ताव सर्व कागदपत्रासह स्थानिक पातळीवर तयार
करुन सातारा सिंचन मंडळ,सातारा यांचे कार्यालयाकडे सुपुर्द केला आहे. सर्व
प्रकल्पग्रस्त रोख रक्कमेच्या मागणीवरच ठाम असून या प्रकल्पग्रस्तांना विशेष बाब
म्हणून बुडीत जमिनीचे बदल्यामध्ये रोख रक्कम मिळावी अशी आग्रही मागणी लेखी
पत्राव्दारे मी केली असून या लेखी पत्रावरच जलसंपदा मंत्री
ना.गिरीश
महाजन यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना तात्काळ
यासंबधीचा प्रस्ताव शासनास सादर करावा असे लेखी आदेश दिले आहेत असे सांगुन आमदार
शंभूराज देसाईंनी म्हंटले असून आठच दिवसापुर्वी निगडे येथे कसणी निगडे-माईंगडेवाडी
या रस्त्यांच्या भूमिपुजन समारंभाकरीता गेलो असता येथील प्रकल्पग्रस्तांनी
जमिनीच्या बदल्यात रोख रक्कमेचा आमचा विषय जिव्हाळयाचा आणि गरजेचा असून मी
यासंदर्भात लक्ष घालून आम्हास न्याय मिळवून दयावा अशी ग्रामस्थांनी आणि या
प्रकल्पग्रस्तांनी मागणी केलेली होती.त्यानुसार तातडीने निगडे प्रकल्पग्रस्तांच्या
मागणीच्या अनुषगांने त्यांच्या असणाऱ्या मागण्यांचे लेखी पत्र जलसंपदा मंत्री
यांना दिले असून त्यांनी तात्काळ प्रस्ताव मागवून घेण्याच्या सुचना केल्या आहेत
त्यामुळे या विषयाला आता गती मिळाली असून लवकरात लवकर हा प्रस्ताव सातारा सिंचन
मंडळ,सातारा यांचे कार्यालया मार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी
संचालक यांचेकडे व त्यांचेमार्फत शासनाकडे सादर करुन तो विशेष बाब म्हणून मंजुर
करुन घेणेकरीता मी स्वत: प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही आमदार शंभूराज
देसाईंनी पत्रकात दिली आहे.
No comments:
Post a Comment