दौलतनगर दि.११:- पाटण
विधानसभा मतदारसंघातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपले
अध्यक्षतेखाली दि.20.03.2018 रोजी संपन्न झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये आपणांकडून
ठरविण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न
तातडीने सोडविणेसंदर्भात अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना
देण्यात याव्यात व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करावी अशी
लेखी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र
फडणवीस यांना लेखी पत्राव्दारे केली आहे.
मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये आ.शंभूराज देसाईंनी म्हंटले
आहे,माझे पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध
प्रश्नांसंदर्भात आपले अध्यक्षतेखाली दि.20.03.2018 रोजी झालेल्या उच्चस्तरीय
बैठकीमध्ये सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांचे देखरेखीखाली आपण टास्क फोर्सची
निर्मिती करुन जिल्हाधिकारी,सातारा यांना कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नाची
माहिती संकलित करुन या प्रश्नासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत.टास्क
फोर्सच्या माध्यमातून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची माहिती
संकलीत करण्याचे काम जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत सुरु आहे.दरम्यान कोयना धरण
प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता पुन्हा कोयनानगर येथे बेमुदत
आंदोलनाचा पवित्रा घेतला असून कोयनानगर ता. पाटण येथे कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे
आंदोलन सुरु असून आपण दि.20.03.2018 रोजीच्या बैठकीमध्ये निर्मिती केलेल्या टास्क
फोर्सची अंमलबजावणी तात्काळ सुरु करुन कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत
असणारे प्रश्न तातडीने मार्गी लावणे अत्यंत गरजेचे असून आपण यासंदर्भात तात्काळ
सातारा जिल्हाधिकारी यांना सुचना देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरण
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात गती देवून टास्क फोर्सच्या माध्यमातून कोयना
धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी विनंती आमदार
शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रात केली आहे.
No comments:
Post a Comment