दौलतनगर दि.११:- गेल्या चार वर्षात पाटणमध्ये का फिरकला नाहीत? असा सवाल मला
करणारे माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर आपण पाटण शहराच्या बाहेर राहता काय?
असा सवाल आ.शंभूराज देसाईंनी केला असून आठवडयातील किमान दोन दिवसाआड मी पाटण शहरात
आहे. सत्यजितसिंह पाटणकर पेपरातून मला विचारण्यापेक्षा तुम्ही पाटणमधल्या जनतेलाच
गाडीच्या काचा खाली करुन विचारा ना? पाटण शहरातील जनताच तुम्हाला सांगेल, छोटे
दादा, आमदार शंभूराज देसाई पाटणमध्ये जेवढे वेळेस दिसतात तेवढया वेळेस तुम्हीच
आम्हाला दिसत नाही.तुम्ही आम्हाला पहिले दिसा.आमदार शंभूराज देसाई पाटणमध्येच काय
पण संपुर्ण पाटण तालुक्याच्या कानाकोपऱ्यात रोजच आहेत असा उपरोधिक टोला आ.शंभूराज
देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
मिरासवाडी ता.पाटण येथे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शिरळ ते मिरासवाडी व ताईचीवाडी शिरळ गावपोहोच
रस्त्यांचा संयुक्त भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी
ते बोलत होते.या दोन्ही रस्त्यांच्या कामांना त्यांनी ८६ लाख रुपयांचा निधी मंजुर
करुन दिला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,जिल्हा परीषद सदस्या
सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य बशीर खोंदु,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी
पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,कारखाना संचालक राजेंद्र गुरव,निवृत्ती कदम,नवनाथ
सुर्यवंशी,पांडुरंग बेबले,सदानंद साळुंखे,दिलीप सकपाळ,प्रकाश सुर्यवंशी,गणपत
सुर्यवंशी,शैलेंद्र शेलार,पांडुरंग सुर्यवंशी,ज्योतिराम सुर्यवंशी,संजय सुर्यवंशी,
गणेश सुर्यवंशी,अमृत चव्हाण,संजीवन सुर्यवंशी,शंकर कुंभार,नानासो पवार या प्रमुख
पदाधिकाऱ्यांसह मिरासवाडी, शिरळ व ताईचीवाडी येथील कार्यकर्ते, युवक व महिलांची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.शंभूराज देसाई
म्हणाले,गेल्या साडेचार वर्षात माजी आमदार पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह
पाटणकर यांचेकडे कुठले भूमिपुजन किंवा उदघाटनाचा कार्यक्रम नाही.जेव्हा हातात
असताना मतदार संघातील जनतेला कोणते विकास काम देवून त्याची भूमिपुजने आणि उदघाटने
केली नाहीत आणि आता जिल्हा वार्षिेक आराखडयातील नगरोथ्यान योजनेतील कामांचा आणि
पाटणकरांचा काहीही संबध नसताना पाटण नगरपंचायतीला येणाऱ्या कामांची भूमिपुजने
करण्याचा सपाटा माजी आमदार पुत्रांनी लावला आहे.या कार्यक्रमांमध्ये गेल्या
साडेचार वर्षात मी काय केले? हे सांगण्यापेक्षा माजी आमदारपुत्र हे माझ्याच
विकासकामांची मापे काढून माझे भाषण मी केलेली विकासकामे सांगण्यापेक्षा पाटणकर
पितापुत्रांचे नाव घेतल्याशिवाय पुर्णच होत नाही असे सांगत सुटले आहेत. गेल्या
साडेचार वर्षात मी मंजुर करुन आणलेली
विकासकामे ही पाटणकरांच्या काळात प्रलंबीत राहिलेली विकासकामे आहेत त्यांना
जमले नाही ते मी केले त्यामुळे पाटणकरांचा निष्क्रीय कारभार मतदारसंघातील जनतेला
समजलाच पाहिजे ना? असे सांगून ते म्हणाले माजी आमदार पुत्र ज्या ज्या कामांचे
भूमिपुजन करीत सुटले आहेत ती ती कामे कुठुंन आणि कुठल्या योजनेतून मंजुर झाली आहेत
हे तरी त्यांना माहिती आहे का? रोज पाटणमध्ये गेल्यानंतर येथील लोक भेटले की हेच
सांगतात या प्रभागात कचऱ्याचे व्यवस्थापन नाही,या प्रभागात स्वच्छता नाही,सगळीकडे
दुर्गंधी पसरली आहे.शहरात अर्धा तासच पाणी मिळतेय, तुमचे आमदार फंडातील
रस्त्याचेही यांच्याच कार्यकर्त्यांनी भूमिपुजन केले.पाटण शहरात प्रवेश करतानाच पाटण
शहर किती स्वच्छ आहे हे सगळीकडे पाहिल्यानंतर दिसून येते. पाटणकरांच्या याच वाडयाच्या
खालची बाजू पाटणकरांना स्वच्छ करुन घेता येत नाही आणि पाटण शहराच्या स्वच्छतेचा
डंका माजी आमदारपुत्र वाजवित सुटले आहेत.पाटण शहरात लवकरच २४ बाय ७ पाणी योजनेचे
काम सुरु होणार असल्याचे सांगणारे सत्याजितसिंह पाटणकर २४ बाय ७ योजना आपले
पिताश्री राज्याचे मंत्री असताना का सुरु करु शकला नाहीत याचे उत्तर पहिल्यांदा
पाटण शहरातील जनतेला दया.मी जिल्हा वार्षिक आराखडयातून मंजुर करुन दिलेला निधी
तुम्हाला खर्चता आला नाही आणि आता २४ बाय ७ च्या योजनेच्या गप्पा मारता हे
तुम्हाला शोभणारे नाही असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगाविला. मिरासवाडी
रस्त्याला मी मागे आमदार असताना निधी दिला होता त्यावर गेल्या ९ वर्षात एक
रुपयांचाही निधी पाटणकरांकडून टाकण्यात आला नाही. मी
सुमारे ८६ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे आणि माजी आमदारपुत्र
विकासाच्या गप्पा मारत आहेत ही लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना म्हंटले
आहे.यावेळी जयवंतराव शेलार यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सकपाळ
यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.
चौकट:-
पाटणकरांनी फोडलेल्या नारळांचा खर्च विकासकामांच्या निधीपेक्षा जादा.
माजी आमदारपुत्र सत्यजितसिंह पाटणकर
पाटण शहरात ज्या कामांची भूमिपुजने करत आहेत त्याठिकाणी भूमिपुजनाकरीता ठेवण्यात
येणारे नारळ याचा खर्च पाहिला तर त्या संबधित विकासकामांकरीता एवढा निधी मंजुर
नाही त्यापेक्षा अधिकच खर्च सत्यजितसिंह पाटणकरांच्या नारळावर होत आहे. कामाला
निधी किती आहे आणि आपण नारळे किती फोडतोय याचे भानही त्यांना नाही असा टोलाही
आमदार शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
No comments:
Post a Comment