दौलतनगर
दि.०७:-वनकुसवडे पठारावरील पवनचक्कीकडे जाणारा एकमेव रस्ता सोडला तर
तालुक्यातील इतर डोंगरपठारावरील रस्ते पाटणकरदादा तुम्हाला दिसले नाहीत का? भविष्यात
ज्याठिकाणी पवनचक्की प्रकल्प येणार आहेत त्याठिकाणी रस्ता करुन मी रस्त्याचे जाळे विणले
असे सांगत सुटणारे पाटणकरदादा,ज्या वनकुसवडे आणि घाणबीच्या गुळगुळीत
रस्त्यावरुन तुम्ही गेलात तो रस्ता या शंभूराज देसाईंनी गुळगुळीत करायला कोटयावधीचा
निधी दिला आहे. रस्त्याचे जाळे कुणी विणले आणि कुणाच्या काळात
रस्ते करायचे राहून गेले व तालुक्याच्या पठारावरील रस्ते कुणाच्या माध्यमातून झाले
व होत आहेत हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती पडले आहे.तुमच्या
विकासकामांची मापे काढायला तुम्ही विकास केला तर पाहिजे ना दादा.तो झाला नाही म्हणूनच तुमची मापे निघत आहेत.गेली अनेक
वर्षे तालुक्याला विकासापासून झुलवत ठेवणाऱ्यांची मापे काढायला येथे वेळ आहे कुणाला?
विकासाचा अनुशेष तुम्ही एवढा शिल्लक ठेवला आहे तोच पुर्ण करण्याचे काम
मी करीत आहे. असे प्रतिउत्तर आ.शंभूराज
देसाईंनी पाटणकरांना दिले आहे.
येराड ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत कराड चिपळूण रस्ता ते येराड ते रोमणवाडी या रस्त्याचा भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते. या योजनेकरीता त्यांनी २ कोटी ३३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू,माजी सदस्य बशीर खोंदु,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,कारखाना संचालक राजेंद्र गुरव,निवृत्ती कदम,नवनाथ सुर्यवंशी,सदानंद साळुंखे,प्रकाश साळुंखे,आबासो साळुंखे, निलेश साळुंखे,दिलीप सकपाळ,दिलीप कांबळे,किसन माने,लक्ष्मण जाधव,महिपती जाधव,सौ.सुनिता गुरव,बळीराम साळुंखे,रामचंद्र साळुंखे,यशवंत जाधव,दत्तात्रय साळुंखे,नानासो पवार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येराड,बनपेठवाडी, रोमणवाडी,रामाचावाडा येथील कार्यकर्ते, युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना
आ.शंभूराज
देसाई म्हणाले,माजी आ.पाटणकर हे
पाटण तालुक्याचे
२१ वर्षे
आमदार आणि
५ वर्षे
मंत्री राहिलेले
आहेत. इतक्या
वर्षे आमदार
राहिलेल्या माजी
आमदारांना जिल्हा
नियोजन समितीला
लघू समिती
असते आणि
या लघू
समितीवर जिल्हयाच्या
पालकमंत्र्यांनंतर एकमेव
आमदार निवडला
जातो आणि
तो मी
आहे हे
माहिती नसावे
यापेक्षा दुसरे
कोणते दुर्दैव? जिल्हा नियोजन
समितीच्या आराखडयामध्ये
मंजुर होणारी
सर्व कामे
ही लघू
समिती ठरवते
आणि मगच
जिल्हा वार्षिक
आराखडयास मंजुरी
मिळते.काठी
येथील आडवा
पाठ बांधणे
हे काम
कशाप्रकारे आराखडयात
बसवून ते
मंजुर करुन
आणले आहे
हे येथील
ग्रामस्थ व महिलांनाही तुम्हाला
सांगितले असेलच. काम कुणी
दिले तालुक्याच्या
आमदारांनी का
तुमच्या जिल्हा
परीषदेच्या सदस्यांनी
हे आम्हालाही
आणि तुम्हालाही
चांगलेच माहिती
आहे.निवडणूका
जवळ आल्या
की कोण
डोंगरपठारावर येतात
आणि पाच
वर्षे या
डोंगरपठारावरील जनतेच्या
सुखदु:खात
कोण सहभागी
होतात हे
माझेपेक्षा येथील
जनताच तुम्हाला
सांगेल.ही
निवडणूक ते
ती निवडणूक
जनतेच्या दारात
जाणाऱ्यांनी पठारावर
माणसे राहतात
का ?
याचा शोध मला
घ्यावा लागला
का? किंवा
मी कधी
आणि कुठे
जायचे हे
त्यांनी मला
शिकवू नये.पठारावरच्या गोरगरीब
शेतकऱ्यांच्या जमिनी
कवडीमोल किमंतीने
पवनचक्की कंपन्यांना
विकुन या
शेतकऱ्यांना देशोधडीला
लावणाऱ्यांनी पठारावरील
जनतेचा विकास
केल्याच्या गप्पा
हाणणाऱ्यांना हे
शोभत नाही.काठी,मरड,वनकुसवडे रस्त्यांची
काय अवस्था
आहे हे
प्रत्यक्षात जावून
पाहिले आहे. तुम्ही हे
रस्ते केले
असते तर
मला जावून
त्या रस्त्यांना
कोटयावधी रुपयांचा
निधी देण्याची
वेळ आली
नसती.तुमचे
रस्ते पाटणकरदादा,या विभागात
शोधावे लागत
आहेत.घाणबीचा
रस्ता केलात
कारण त्या
पठारावर पवनचक्क्या
येणार होत्या.पाटणकरदादा,घाणबीसारखे
तालुक्यात असे
अनेक रस्ते
डोंगरपठारावर आहेत.यामध्ये वरची
केळेवाडी, जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी,गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी
जाधववाडी,भालेकरवाडी,महिंद ते
वर्पेवाडी, मोडकवाडी,सातर,गुढे
शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी,डाकेवाडी,लोहारवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी हे
रस्ते तुम्हाला
दिसले नाहीत
का ? मी
तुम्हाला हे
तालुक्यातील रस्ते
तुम्ही का
करु शकला
नाहीत असा
सवाल देखील
केला होता. परंतू यावर
तुमची बोलतीच
बंद.नको
ते विषय
वाडयात बसून
पत्रकातून मांडायचे
आणि जनतेची
दिशाभूल करायची
या सवयी
पाटणकरदादा आता
तरी सोडा.तुम्हाला मंत्री
आणि आमदार
म्हणून जेवढा
विकास जमला
नाही तेवढा
विकास केवळ
गेल्या साडेचार
वर्षात माझे
माध्यमातून सुरु
असून संपुर्ण
तालुक्याचा आणि
मतदारसंघाचा सुरु
असलेला विकास
पाहून तुम्हाला
चांगलाच पोटसुळ
उठला आहे
हे आम्हालाही
कळते आहे.त्यामुळेच निष्क्रीय
माजी आमदारांची
मापे मी
नाही आता
जनताच काढू
लागली असून
येणाऱ्या विधानसभा
निवडणूकीत याच
मापांचे प्रतिउत्तर
मतदारसंघातील जनता
तुम्हाला मतांच्या
रुपाने नक्कीच
देईल असा
विश्वासही आमदार
शंभूराज देसाईंनी
व्यक्त केला
आहे.कार्यक्रमाचे
प्रास्ताविक दिलीप सकपाळ
यांनी केले
व उपस्थितांचे
आभार सचिन
साळुंखे यांनी
मानले.
चौकट:-
पाटणकरदादा, तुमच्या
सवयी आमच्याकडे
आणू नका.
गांवागावांत भांडणे लावण्यासाठी
दारु, मटण
वाटपासाठी पथके
नेमण्याच्या सवयी
पाटणकरदादा, तुमच्या
आहेत हे
अवघा तालुका
ओळखून आहे. निवडणूकीच्या अगोदर
१५ दिवस
गांवागावांत मटण
आणि दारु
देवून जनतेला
निवडणूकीत मते
देण्यास भाग
पाडायचे आणि
निवडणूकीनंतर पाच
वर्षे मतदारांच्या
सुखदु:खात
सहभागीही व्हायचे
नाही.या
सवयी तुमच्या
आहेत.तुमच्या
या सवयी
पाटणकर दादा
आमच्यावर ढकलून
असल्या वाईट
सवयी आमच्याकडे
आणू नका
असेही आ.शंभूराज देसाईंनी
म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment