Friday 8 March 2019

पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित गावठाणातील कामांना ०१ कोटी ३९ लाखाचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



दौलतनगर दि.०८:- राज्य शासनाकडे प्रलंबित राहिलेल्या कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या १३ कामांना ०१ कोटी ३० लाख ५८ हजार ४२० रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि.०७ मार्च,२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना आवश्यक असणारा निधी उपलबध करुन देणेबाबत राज्याचे महसूल व वनविभागाचे मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तसेच कोयना प्रकल्प टप्पा १ व २ अंतर्गत सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना राज्य शासनाने तातडीने निधी मंजूर करणेकरीता महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०१८ च्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत लक्षवेधी सुचना उपस्थित केली होती. सदर लक्षवेधी सुचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान मदत व पुनर्वसन राज्यमंत्री महोदय यांनी कार्यवाहीच्या अनुषंगाने आश्वासने दिली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधांच्या १३ कामांना ०१ कोटी ३० लाख ५८ हजार ४२० रुपयांचा निधी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकताच मंजूर केला असून सदरचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय शासनाच्या महसूल व वनविभागाने दि. ०७ मार्च,२०१९ रोजी पारित केला असून या १३ कामांमध्ये वरसरकून कामरगाव येथे मोरी बांधकाम व रस्ता डांबरीकरण करणे १२.२७ लाख, वरसरकून मिरगाव पोहोच रस्ता डांबरीकरण ४.३२ लाख, कामरगाव गोकूळ एस पोहोच रस्ता डांबरीकरण ३७.९५ लाख,मिरगाव बोपोली मोरी बांधकामे व डांबरीकरण ८.१३ लाख,वरसरकून कामरगाव ग्रामपंचायत कार्यालय इमारत २२.८० लाख,जुंगठी (दिवशी खुर्द) ग्रामपंचायत कार्यालय इमारत २२.६७ लाख, ढोकावळे रिसवड दोन शाळा खोल्या इमारत १३.57 लाख,किसरुळे रासाटी येथे बस थांबा २.९८ लाख, मानाईनगर बस थांबा ३.०४ लाख, वरसरकून हुंबरळी बस थांबा ०३.०० लाख, कामरगाव गोकूळ बस थांबा ०३.०२ लाख,नवजा (नवजावस्ती) स्मशानभूमी शेड २.८० लाख,वरसरकून कामरगाव बसथांबा ३.०२ लाख या कामांचा समावेश असून सदरच्या निधीमुळे कोयना प्रकल्पातील पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधांतर्गत प्रलंबित राहिलेल्या कामांना चालना मिळणार असून लवकर या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन सदरच्या मंजूर कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता,कण्हेर कालवे विभाग क्रं.२ करवडी कराड यांना दिले असल्याचे आमदार देसाई यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.
चौकट:- माजी आमदार पुत्रांना शासन निर्णय समजतो का?
           पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार अधिवेशन झाले की एवढे कोटी आणले, एवढया कोटींची कामे केली अशा वल्गना करतात. प्रत्यक्षात मात्र काहीच दिसत नाही असे म्हणणारे सत्यजितसिंह पाटणकर.कोटयावधी रुपयांच्या कामांच्या मी केवळ घोषणा करीत नाहीतर अधिवेशनातून मी मंजुर करुन आणलेल्या विविध विकास कामांच्या कोटयावधी रुपयांच्या निधीला शासन निर्णयांचा आधार आहे.शासनाने त्या निधीचे शासन निर्णय पारित केले आहेत. माजी आमदार पुत्रांना शासन निर्णय समजतो का? शासन निर्णय समजत नसेल तर त्यांचे पिताश्री आमदार व मंत्री होते त्यांच्याकडून शासन निर्णय काय असतात हे समजून घ्या असा सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला आहे.

No comments:

Post a Comment