Friday 8 March 2019

रामराम करायला पाच वर्षातून एकदा जाणार,मग पाटणकर पितापुत्रांना आपला विकास कसा दिसणार? आ.शंभूराज देसाईंचा पाटणकर पितापुत्रांना उपरोधिक टोला.


   


दौलतनगर दि.०8:- निवडणूका जवळ आल्या की, रामराम करुन मते मागायला येणारे पाटणकर पितापुत्रांना आपण साडेचार वर्षात मतदारसंघात केलेला विकास आता टोचू लागला आहे.हजारो कोटी रुपयांची विकासकामे गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात आली कुठुंन? हा प्रश्न निष्क्रीय विरोधकांना सतावत असून झोपा काढून किंवा मरळीच्या बंगल्यावर थांबून कोटयावधी रुपयांची कामे मतदारसंघात आली नाहीत.दे हरी पलंगावरी असे कुणी कुणाला आणून देत नाही त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो.सत्ताधारी असलो तरी सरकारबरोबर भांडावे लागते, विधानसभेत बोलावे लागते हे तुम्ही जाणता पण विरोधकांना याची जाण कधी येणार? विरोधकांची अवस्था दे हरी पलंगावरी अशीच असल्याने मतदारसंघातील ही कामे आतापर्यंत होवू शकली नाहीत.रामराम करायला हे पाटणकर पितापुत्र पाच वर्षातून एकदा गावांगावात जाणार मग त्यांना गावांगावांचा सुरु असलेला विकास कसा दिसणार असा उपरोधिक टोला आ.शंभूराज देसाईंनी पाटणकर पितापुत्रांना लगाविला आहे.
                     नाटोशी ता.पाटण येथे आ.शंभूराज देसाईंनी हरीत ऊर्जा निधी योजनेतंर्गत मंजुर केलेल्या सातेवाडी ते नाटोशी ते जाधववाडी या ०४ किमी रस्त्याचे व अर्थसंकल्पातून मंजुर केलेल्या इनामवाडी नाटोशी तसेच सर्वसाधारण साकव योजनेतंर्गत मंजुर नाटोशी देसाईवाडा येथील सुर्वेवस्ती साकव पुलाचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते करण्यात आले या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या तिन्ही कामांकरीता त्यांनी २ कोटी 54 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी जिल्हा परीषद सदस्य सौ.सुग्रा खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव,नथूराम कुंभार,विष्णुपंत देसाई,रामचंद्र देसाई,किसन गालवे,गणेश भिसे,ॲड.मारुती देसाई,नाटोशी सरपंच अविनाश कुंभार, उपसरपंच उदय देसाई,शाबुदिन मुलाणी,सचिन भिसे,प्रवीण आगाणे,चेतन देसाई,जयदीप पाटील,नाथा भिसे,प्रदीप जाधव, संजय जाधव,अशोक शिर्के, विक्रम देसाई या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील कार्यकर्ते,युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                  याप्रसंगी बोलताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,हातात सध्या काहीच नसताना माजी आ.पाटणकर दादांनी सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानादेखील कोटयावधी रुपयांची विकासकामे केली असल्याच्या खोटया वल्गना माजी आ. पाटणकर पितापुत्रांकडून सध्या तालुक्यात सुरु आहेत.माजी आ.पाटणकरांनी कोटयावधी रुपयांचा विकास केला असता तर नाटोशी जाधववाडी गांवाचा रस्ता त्यांना इतक्या वर्षात का करता आला नाही.? याचे उत्तर आतापर्यंत पाटणकरांचे नेतृत्व मानणाऱ्या मंडळीनी मला दयावे.त्यांची निष्क्रीयता त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली आहे.नाटोशी गांव असो किंवा या गावच्या वाडया.प्रत्येक वाडीमध्ये आपण या साडेचार वर्षात एक ना एक तरी विकासाचे काम दिले आहे.नाटोशीची पाणी पुरवठा योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सुरु झाली आहे.जाधववाडीच्या रस्त्याचे आताच आपण भूमिपुजन केले.इतक्या वर्षे न झालेला हा रस्ता आता मार्गी लागणार आहे.खोटया वल्गना करुन लोकांना कामे दिसत नाहीत त्यासाठी प्रत्यक्षात काम करावे लागते. हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी मतदारसंघात आणला तो विकासनिधी मतदारसंघातील जनता उघडया डोळयांनी गांवागावात आणि वाडीवस्तीवर पहात आहे.पाटणकरांनी खोटारडेपणा तरी किती करावा? मी केलेला विकास जनतेला दिसतोय तसा तुमचा विकास जनतेला शोधावा लागतोय,पाटणकर दादांना मागणी करुनही आतापर्यंत आमचे हे काम झाले नाही ते तालुक्याच्या आतांच्या आमदारांनी केले हेच पाटणकर पितापुत्रांना रुचत नाहीये.मी केलेला विकास पहायला त्यांना नाटोशीत यावे लागेल,जाधववाडीत यावे लागेल,कुसरुंडमध्ये यावे लागेल,तालुक्याच्या भागा-भागात फिरावे लागेल.परंतू निवडणूका जवळ आल्या की पाच वर्षातुन ते एकदा तालुक्याच्या गांवागावांत जाणार मग त्यांना आपण करीत असलेला विकास कसा दिसणार? असा सवाल करुन ते म्हणाले,माजी आमदार पाटणकरांनी पवनचक्की कंपन्यांनी खराब केलेले किती रस्ते त्यांच्या आमदारकीच्या काळात नव्याने करुन घेतले, हे त्यांनी आकडेवारीसह प्रसिध्द करावे. आणि मी किती रस्ते करुन घेतले हे मी आकडेवारीसह प्रसिध्द करायला तयार आहे. २००४ ते २००९ मध्ये मी आमदार असताना या हरीत ऊर्जा योजनेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.पाटण तालुक्यात पवनचक्की प्रकल्पांच्या कामांमुळे मोठया प्रमाणावर डोंगरपठारावरील ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था झाला असून या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करुन दयावा अशी मागणी मी तत्कालीन अपारंपारिक ऊर्जा मंत्री विनय कोरे यांचेकडे केली होती तेव्हा प्रति किमी १० लाख रुपयांचा निर्णय करण्यात आला. त्यानंतर २००९ ते २०१४ पर्यंत पाटणकर या मतदारसंघाचे आमदार होते.त्या निर्णयाची त्या पाच वर्षात पाटणकर साधी अंमलबजावणीही करु शकले नाहीत. म्हणूनच या योजनेचा निधी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांकरीता येवू शकला नाही. २०१४ ला परत मी आमदार झालेनंतर या १० लाखाच्या निधीत एक किमी रस्ता पुर्ण होणार नाही त्याकरीता जादा निधी लागणार याकरीता मी शासनाकडे पाठपुरावा केला म्हणूनच हरीत ऊर्जा निधीमधून तालुक्यात ज्या ज्या ठिकाणचे रस्ते पवनचक्की प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीने खराब झाले ते ते रस्ते नव्याने करण्याचे काम मी करु शकलो. ते पाटणकरांना मागच्या पाच वर्षात करता आले नाही.त्यामुळे विरोधकांच्या कोटयावधीच्या वल्गना किती खऱ्या आणि किती खोटया  आहेत हे यावरुनच स्पष्ट होते. खोटया वल्गना करणाऱ्यांना मतदार थारा देत नाहीत हे विरोधकांनीच चांगले ध्यानात घ्यावे असेही आ.शंभूराज देसाई शेवठी बोलताना म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण आगाणे यांनी केले व उपस्थितांचे आभार रामचंद्र कदम यांनी मानले.
चौकट:- निष्क्रीय पाटणकर पितापुत्रांनी हे तरी आवाहन स्विकारावे.
            मी केलेला विकास पाटणकर पितापुत्रांना दिसत नाही.त्यांना तो पहायचा असेल तर वाडयातून जरा बाहेर पडा. विकासासंदर्भात काही शंका असेल तर समोरासमोर या असे मी अनेकदा आवाहन त्या पितापुत्रांना दिले आहे पण ते स्विकारत नाहीत.साडेचार वर्षात मी केलेला विकास त्यांना पहायचा असेल तर आता आचारसंहिता सुरु होईल.आचारसंहितेत फारसे काही काम नसते मी केलेला विकास दाखवायला गांवागावात मी वाटाडया होतो.पाटणकर पितापुत्रांनी त्यांच्या वाहनातून माझेबरोबर यावे.असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना दिले.

No comments:

Post a Comment