Thursday 28 March 2019

घाटमाथा पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे कामास गती देण्याच्या सक्त सुचना कराव्यात. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे आमदार शंभूराज देसाईंची लेखी मागणी.





दौलतनगर दि.२८:- पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग       विकास योजनेतंर्गत सुरु असणाऱ्या घाटमाथा हेळवाक- पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गत दीड वर्षापासून संथ गतीने सुरु असल्याने मतदारसंघातील नागरिकांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती देण्याच्या व या रस्त्याचे यंदाच्या पावसाळयापुर्वी बहूतांशी काम हे पुर्णत्वाकडे नेण्याच्या सक्त सुचना आपणांकडून संबधित यंत्रणांना देणेत याव्यात अशी आग्रही मागणी पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी लेखी पत्राव्दारे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.
                        मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या लेखी पत्रामध्ये म्हंटले आहे की, माझे पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत गुहागर चिपळुण कराड जत विजापुर या महामार्गावरील पाटण विधानसभा मतदारसंघातील घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षापुर्वी मंजुर करण्यात आले आहे. गत दीड वर्षापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने या रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम संथगतीने गत दीड वर्षापासून सुरु आहे. रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहन धारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने वारंवार राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या आहेत. तरीही या कामास गती देण्यात आली नाही. पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे ४० टक्केही काम पुर्ण झाले नाही.पावसाळा येण्यास दोन महिन्यांचा कालावधी राहिला असून पावसाळयापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाचे बहूतांशी काम पुर्ण न झाल्यास मतदारसंघातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने संबधित कंपनीकडे अजुनही दोन महिन्यांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये बहूतांशी रस्त्याचे काम पुर्ण करण्यास या कंपनीस वाव आहे.सदरचे रस्त्याचे कामांस प्राधान्याने गती दयावी याकरीता आपणांकडून संबधित यंत्रणांना सक्त सुचना होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत गुहागर चिपळुण कराड जत विजापुर या महामार्गावरील पाटण विधानसभा मतदार संघातील घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे कामास प्राधान्याने गती देवून या रस्त्याचे यंदाच्या पावसाळयापुर्वी बहूतांशी काम हे पुर्णत्वाकडे नेणेकरीता आपणांकडून संबधित यंत्रणांना सक्त सुचना करण्यात यावी अशी आग्रही मागणी व विनंती आमदार शंभूराज देसाईंनी  पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रामध्ये केली असल्याचे म्हंटले आहे.

3 comments: