दौलतनगर दि.१४:- शंभूराजेंना गांवे पण माहिती नाहीत असे सांगणारे माजी आमदार
पाटणकर दादा,शंभूराजेना तालुक्यातील गांवे माहिती नसती तर तालुक्याच्या
गांवागावांत आणि वाडीवस्तीवर याच शंभूराजने आमदार म्हणून गत साडेचार वर्षात
केलेल्या विविध विकासकामांचे बॅनर गांवातील जनतेने लावले नसते.मतदारसंघाच्या
गांवागांवात आणि वाडीवस्तीवर याच शंभूराजच्या माध्यमातून विकासकांमे पोहचली आहेत
याचे पुरावे जनतेनेच तुम्हाला दिले आहेत.तुमच्या बालेकिल्लयात तर माझ्या
विकासकामांचा पुरावा या विभागातील जनतेनेच तुम्हाला भलेमोठे बॅनर लावून दिला
आहे.शंभूराजेंना गांवे माहिती आहेत का नाहीत?याचे उत्तर मी नाही मतदारसंघातील
जनताच तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत देईल. पाटणकर दादा,इतकीही घाई करु नका
असा प्रतिटोला आ.शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांना लगाविला आहे.
घोट ता.पाटण येथे हरीतऊर्जा योजनेतंर्गत घोट
ते जन्नेवाडी गावपोहोच रस्त्याचा भूमिपुजन समारंभ आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते
संपन्न झाला.याप्रसंगी ते बोलत होते.या रस्त्यांच्या कामांस त्यांनी १ कोटी ३६ लाख
९४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास माजी पंचायत समिती
सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सोमनाथ खामकर,बबनराव
भिसे,शंभूराज युवा संघटना उपाध्यक्ष अभिजीत पाटील,शिवदौलत बँक संचालक संजय
देशमुख,माणिकराव पवार,विजय पवार फौजी,उत्तमराव मगर,घोट सरपंच मधूकर
आरेकर,उपसरपंच पुष्पाताई शिंदे,सर्जेराव आरेकर,बळीराम आरेकर,उत्तम आरेकर,संजय
आरेकर,श्रीरंग आरेकर,रणजित शिंदे,भानूदास शिंदे,रवींद्र सावंत,राजेंद्र शिंदे, रविंद्र
बोर्गे,पांडूरंग सोनवले,प्रल्हाद सोनवले,महिपती सोनवले,मारुती सावंत,शंकर
सावंत,किसन साळुंखे,शुभांगी साळुंखे, सुलोचना
महाडिक,सागर सोनवले,गौरव परदेशी,अमोल
घाडगे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह घोट,जन्नेवाडी,जुगाईवाडी, फडतरवाडी व
बोर्गेवाडी येथील कार्यकर्ते,युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.शंभूराज देसाई म्हणाले,पाटण
तालुक्यातील डोंगरपठारावर विकास करताना आम्ही विरोध करीत होतो असे पाटणकरांचे
म्हणणे आहे.आम्ही कोणत्या विकासकामांना विरोध करीत होतो हे पाटणकरांना चांगलेच
माहिती आहे.ज्या ठिकाणी भविष्यात पवनचक्कया येणार आहेत त्याठिकाणी यांचा विकास
सुरु होता हे मतदारसंघातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे. पाटणकरांना आमदार
असताना पवनचक्कयांचीच तेवढी गांवे दिसली. घोटच्या वर असणारी जन्नेवाडी त्यांना
दिसली नाही.याच जन्नेवाडीला आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पहिल्यांदा
रस्ता दिला त्यावर पाटणकरांना एवढया वर्षात एक रुपयांचा निधी टाकता आला नाही.जन्नेवाडी
सारखीच मतदारसंघातील डोंगर पठारावरील इतर गांवाचीही परिस्थिती आहे.माजी
मंत्र्यांनी तालुक्यातील डोंगरपठारावरील रस्ते केले म्हणून पाटणकर ढोल वाजवित
आहेत.त्याच पाटणकरांना मी अनेकदा मतदारसंघातील डोंगरपठारावरील असे २१ ते २२ रस्ते
सांगितले ते त्यांना राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना का करता आले नाहीत
त्याचे उत्तर पाटणकरांना देता आले नाही. बोलाचीच कढी अन बोलाचाच भात अशीच अवस्था
पाटणकरांची असून काहीही न करता हे मी केले ते मी केले अशा बतावण्या मारण्यातच
त्यांनी त्यांच्या आमदारकीचा काळ घालविला.डोळयाला दिसेल असे एकही काम त्यांना पाटण
मतदारसंघात त्यांच्या आमदारकीच्या काळात करता आले नाही.निवडणूका जवळ आल्या की
यांनाच जनतेची आठवण होते.आणि निवडणूका संपल्या की, परत हे मतदारसंघातील जनतेकडे
ढुंकुनसुध्दा पहात नाहीत.कारण निवडणूकीत काही ठराविक लोकांना चिरीमिरी देवून या
मंडळीनी गप्प केलेले असते.असा आरोप करीत ते म्हणाले,घोट असेा किंवा घोटच्या सर्व
वाडया असो,या गांवाचा विकास मुलभूत सुविधा देवून पुर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला
आहे.पाटणकरांनी आपल्यावर कितीही आरोप केले तरी आपल्यावरील आरोपाचे उत्तर हे
मतदारसंघातील जनतेने शोधून ठेवले आहे.योग्य वेळी ते उत्तर जनताच त्यांना देणार
आहे.वाडयात बसून पत्रके काढणे एवढा एकमेव उद्योग त्यांचेकडे शिल्लक राहिला आहे
त्यामुळे त्यांच्या आरेापांकडे लक्ष न देता आपण गत साडेचार वर्षात या विभागात
केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गतवेळच्या
निवडणूकीपेक्षा कसे जादा मतदान घेवू शकू यादृष्टीने सर्व पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले.यावेळी
बबनराव शिंदे यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित शिंदे यांनी करुन
उपस्थितांचे आभार भानूदास शिंदे यांनी मानले.
चौकट:-
माझ्या विकासकामांचे व पाटणकरांच्या निषक्रीयतेचे मुल्यमापन जनता निवडणूकीत करेल.
आपण केलेली विकासकामे ही जनतेला
उघडपणे दिसत आहेत तरीही पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र हे आपला विकास कुठेच दिसत नाही
हा कागदावरचा विकास आहे अशा खोटया वल्गना करीत असले तरी माझ्या विकासकांमाचे व
पाटणकर पितापुत्रांच्या निष्क्रीयतेचे मुल्यमापन जनता निवडणूकीतच करणार आहे
त्यामुळे येणारा काळच ठरविणार आहे कोण कामाचा आणि कोण बिनकामांचा आहे ते ? असेही
ते शेवठी बोलताना म्हणाले.
No comments:
Post a Comment