दौलतनगर दि.१८:- गवळीनगर (कोकीसरे),ता.पाटण येथे पंधरा वर्षापुर्वी चुलीच्या
निखाऱ्यात दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झालेली कु.अर्चना सिधु यमकर ही मुलगी
इयत्ता दहावीचे पेपर मोठया जिद्दीने आपल्या दोन्ही मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे
तिची शिक्षणांची असणारी तळमळ आणि जिद्द पाहून इयत्ता दहावीनंतरच्या तिच्या पदवीपर्यंतच्या
संपुर्ण महाविद्यालयींन शिक्षणांचा भार हा पाटण विधानसभा मतदारसंघात पाटणचे आमदार
शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाकरीता कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्ती योजनेमधून पेलण्याचा
निर्णय कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीने घेतला
असल्याची माहिती कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या
पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकामध्ये म्हंटले आहे की,पाटण
विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून व त्यांचे
मार्गदर्शनाखाली पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण त्यांच्या
कुटुंबातील गरीबीमुळे तसेच वैयक्तीक अडचणीमुळे थांबू नये याकरीता त्यांनी त्यांचे आज्जी
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु केली असून
या शिष्यवृत्ती योजनेमध्ये या इयत्ता १० वीमध्ये
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीची निवड करुन तिच्या पदवीपर्यंतच्या महाविद्यालयींन
शिक्षणाचे पालकत्व स्विकारण्यात येत आहे.ही योजना गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी
सुरु आहे.पाटण मतदारसंघातील अनेक गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे पदवीपर्यंतच्या
शिक्षणाकरीता या कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेचा
लाभ झाला आहे.
पाटण मतदारसंघातील मोरणा विभागातील डोंगरी भागामध्ये वसलेल्या गवळीनगर
(कोकीसरे), ता.पाटण या लहानशा लोकवस्तीमध्ये सुमारे पंधरा वर्षापुर्वी अत्यंत गरीब
कुटुंबामध्ये जन्माला आलेली कु.अर्चना यमकर हिचे आईवडील तिच्या लहान भावंडांचे
आधारावर सोडून मजुरीकरीता घराबाहेर गेले असताना चुलीच्या निखाऱ्यात कु.अर्चना हिची
दोन्हीही हाताची बोटं जळून खाक झाल्याने लहानपणापासून ती गंभीर दुखापत घेवून तसेच
तिचे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील एवढया कठीण परिस्थितीत परिस्थितीशी
झगडत ती शिक्षण घेत आहे. हाताला बोटे नसतानाही इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण ती
यावर्षी पुर्ण करीत असून सध्या सुरु असलेले दहावीचे पेपर ती आपल्या दोन्ही
मनगटामध्ये पेन धरुन लिहीत आहे ही कौतुकास्पद गोष्ट असून यातून तिची शिक्षणाची आवड
तळमळ व जिद्दीचे दर्शन घडून येत आहे.अशाच शिक्षणांची आवड आणि तळमळ असणाऱ्या गरीब
कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणाकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई
(ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना एक आधार म्हणून काम करीत आहे.कु.अर्चना हिच्या या परिस्थितीची माहिती सोशल मिडीयावरुन
सर्वांना माहिती झालेनंतर तिच्या या जिद्दीची सर्व स्तरातून वाहवाह केली जात असून तिला सर्वोत्तोपरी मदत
करण्याची सर्वांनी भूमिका घेतली आहे ही आनंदाची बाब आहे. आमदार शंभूराज देसाई
यांनीही कु.अर्चना हिचे दहावीचे पेपर संपलेनंतर तिची व तिच्या आईची भेट घेवून तिला
पुढील आयुष्याकरीता लागणारी सर्वोत्तोपरी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. तसे
त्यांनी आश्वासन देखील दिले असून त्याअगोदर आमदार शंभूराज देसाईंचे
मार्गदर्शनाखाली कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कु.अर्चना सिधु यमकर हिच्या इयत्ता दहावीनंतरच्या
पदवीपर्यंतच्या संपुर्ण महाविद्यालयींन शिक्षणांचा भार हा कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेतून पेलण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पत्रकात
म्हंटले आहे.
खरंच एक चांगला निर्णय घेतला आहे.
ReplyDeleteCongratulations mla
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteGreat work Mr.shambhuraj Desai
ReplyDeleteGreat work Mr.shambhuraj Desai
ReplyDeleteCongratulations saheb
ReplyDelete