दौलतनगर दि.१४
:- कुंभारगांव विभागातील चाळकेवाडी व चाफळ विभागातील डेरवण
बंधाऱ्यांची मोठया प्रमाणात नादुरुस्ती झाली असून या दोन्ही बंधाऱ्यांमध्ये येत्या
पावसाळयातील पाणी मोठया प्रमाणात साचण्यासाठी दुरुस्तीची कामे पावसाळयापुर्वी
पुर्ण करावीत अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी दि.०५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत
संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची
कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे नियोजन कोयना धरण व्यवस्थापनच्या संबधित
अधिकाऱ्यांनी केले आहे.
कुंभारगांव विभागातील चाळकेवाडी व चाफळ विभागातील डेरवण
बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती तसेच पाणीसाठा नियोजनाची जबाबदारी कोयना धरण
व्यवस्थापन कडे असून याचे सर्व नियोजन कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्याकडे
आहे. या दोन्ही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देवून येत्या पावसाळयातील
पाणी या दोन्ही बंधाऱ्यांत अडविणेकरीता दि.०५ मार्च रोजी आमदार शंभूराज देसाई
यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.त्यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी
चाळकेवाडी व डेरवण बंधाऱ्यांच्या नादुरुस्तीच्या कामांचा सविस्तर आढावा कार्यकारी
अभियंता पाटील यांचेकडून घेतला व त्यानुसार वरीलप्रमाणे त्यांनी पाटील यांना सुचना
केल्या आहेत.
चाळकेवाडी कुंभारगांव येथील बंधाऱ्यांची
सांडवा गळती,गेटची दुरुस्ती,मातीकाम,कॅनॉल दुरुस्ती तसेच बंधाऱ्यांच्या मुख्य
भिंतीचे पिचींग करुन बंधाऱ्यामध्ये व बंधाऱ्यांच्या बाहेर मोठया प्रमाणात वाढलेली
झाडे झुडपे काढणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे असून डेरवण येथील बंधाऱ्याचे
मुख्य गेटच्या दुरुस्तीचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.डेरवण बंधाऱ्यामध्ये मोठया
प्रमाणात गाळही साचला असून तो गाळही काढण्याचे काम करणे अत्यंत आवश्यक
आहे.चाळकेवाडी कुंभारगांव बंधाऱ्याच्या गेटच्या दुरुस्तीच्या कामांला संबधित
विभागाला शासनाने निधी मंजुर करुन दिला आहे.मंजुर झालेल्या निधीतून या गेटचे काम
लवकरात लवकर पुर्ण करुन घेण्याचे नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे तसेच
बंधाऱ्यांची सांडवा गळती,मातीकाम,कॅनॉल दुरुस्ती तसेच बंधाऱ्यांच्या मुख्य भिंतीचे
पिचींग करुन बंधाऱ्यामध्ये व बंधाऱ्यांच्या बाहेर मोठया प्रमाणात वाढलेली झाडे
झुडपे काढणे ही ही कांमे पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.डेरवण
बंधाऱ्यांच्या मुख्य गेटचे काम येत्या पावसाळयापुर्वी पुर्ण करुन घेणेकरीता आवश्यक
असणारा निधी मंजुर करुन देण्यात येणार असल्याचे सिंचन मंडळ,सातारा विभागाकडून
सांगण्यात आले असून याही बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम पावसाळयापुर्वी करण्यात
येणार असल्याचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी आमदार शंभूराज देसाईंना
सांगितले.यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी हे दोन्ही बंधारे गाळमुक्त करण्याकरीता जिल्हाधिकारी,सातारा
यांनी जलयुक्त शिवार योजनेतंर्गत आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध करुन दयावी याकरीता
लोकसभेची आचारंसहिता झालेनंतर जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे बैठकही घेणार असल्याचे
यावेळी म्हणाले.दरम्यान चाळकेवाडी व डेरवण या दोन्ही बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या
कामांना गती देवून या दोन्ही बंधाऱ्यामध्ये यंदाच्या पावसाळयातील पाणी मोठया
प्रमाणात साठावे याकरीताचे नियोजन संबधित यंत्रणेने तातडीने करावे व ही दुरुस्तीची
कामेही लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावीत तसेच पाणीवाटपाच्या संदर्भातील निर्णय हा
बंधाऱ्यांची कामे पुर्ण झालेनंतर घेवू असेही आमदार शंभूराज देसाईंनी कार्यकारी
अभियंता व त्यांचे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
No comments:
Post a Comment