दौलतनगर दि.०३:- ही निवडणूक ते ती निवडणूक केवळ मते मागायला जनतेच्या दारात
येणाऱ्या विरोधकांना तुम्ही गत चार वर्षात आमचेसाठी नेमके काय केले म्हणून आम्ही
तुम्हाला मते दयायची असा जाब विचारावा व विकासकामांच्या माध्यमातून गाव समृध्द
करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन आमदार शंभूराज
देसाईंनी केले आहे.
काठी ता.पाटण येथे आमदार
शंभूराज देसाईंनी जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर केलेल्या आवसरी ते काठीटेक
ग्रामा ५५ या रस्त्याच्या व लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परीषदेतंर्गत काठी येथील
आडवे पाटाचे बांधकाम करणे या संयुक्त कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे
हस्ते आयोजीत करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी पाटण पंचायत
समितीच्या माजी सभापती,सौ.मुक्ताबाई माळी,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी
पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,बबनराव
माळी,राम पवार,रामभाऊ बावधने,ग्रा.पं.सदस्या स्वाती शिर्के,अश्विनी पवार,सुरेश
शेळके,लक्ष्मण पवार,प्रदिप पवार,योगेश शिर्के,जगन्नाथ शिर्के,कोंडिबा
शिर्के,प्रकाश शिर्के,विश्वनाथ पवार,सुनिल पवार,राम झोरे,विठ्ठल येडगे,दिलीप
सपकाळ,लक्ष्मण सपकाळ,तसेच शंभूराज डोंगरी संघटनेतील युवा पदाधिकारी,कार्यकर्ते व
मुंबई मित्र मंडळातील युवक व गावांतील महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार
शंभूराज देसाई म्हणाले, काठी या गांवाकरीता या विभागातून वाहून जाणारे पाणी हे
आडव्या पाठाच्या माध्यमातून आडवून दयावे अशी येथील नागरिकांची बरेच दिवसाची मागणी
होती. तसेच आवसरी ते काठीटेक हा रस्ताही करुन दयावा याकरीता आग्रह होता आज या
दोन्ही कामांची भूमिपुजने झाली त्यामुळे या दोन्ही कामांना लवकरच सुरुवात होईल व
या दोन्ही गांवाचा निकडीचा प्रश्न सुटेल याचा आनंद वाटतो. जनतेने निवडून दिलेल्या
लोकप्रतिनिधीने आपल्याला कोणत्या गांवात किती मते पडली याचा विचार न करता जे
जनतेच्या निकडीचे आहे ते ते विकासकाम देण्याची गरज आहे.मी माझ्या आमदारकीच्या
काळात मला गावात, वाडीवस्तीवर किती मतदान पडले याचा विचार न करता गत साडेचार
वर्षात आणि मागील आमदारकीच्या काळात विविध विकासकामे देण्याचा प्रयत्न
केला.विशेषत: हा भाग माजी आमदार पाटणकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला
जातो.आतापर्यंत आपण सर्वांनी त्यांना पोत्याने भरभरुन या विभागातून मतदान देत
राहिला परंतू निवडून गेलेल्या माजी आमदारांनी तुम्हा जनतेच्या मुलभूत सुविधा असणारी
कामे करण्याकरीता पोत्याने भरुन निधी मंजुर करुन दिला का? तो निधी दिला असता तर या
विभागातील एकही विकासाचे काम शिल्लक राहिले नसते त्यांना पवनचक्की कडे जाणारे
रस्ते दिसले परंतू याच पवनचक्कीच्या रस्त्याला लागून असणाऱ्या अवसरी किंवा काठी
गांवाना जोडणारे रस्ते दिसले नाहीत.स्वत:च्या बालेकिल्लयातील गांवे आणि
वाडयावस्त्यांमध्ये जर माजी आमदारांना विकासाची कामे करता आली नसतील तर त्यांनी
मतदारसंघातील इतर विभागांचा काय विकास केला असेल हे तुमच्या लक्षात येईलच केवळ ही
निवडणूक ते ती निवडणूक मते मागायला जनतेच्या दारात जायचे आणि मते मागून गेल्यानंतर
मते दिलेल्या जनतेला काय हवे, काय नको याकडे ढुंकुनही पहायचे नाही. मग अशा
नेतृत्वाच्या मागे आपले उभे आयुष्य घालविण्यात काय अर्थ आहे याचा विचार या
विभागातील जनता कधी करणार आहे का नाही? का कामे करायला आमदार आणि मते घ्यायला माजी
आमदार अशी परिस्थिती होवू नये. मागेल त्याचे काम करण्याचे ध्येय आपण बाळगल्यामुळेच
गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात कोटयावधी रुपयांचा विकासनिधी आपण मंजुर करुन
आणू शकलो.तालुक्याचे माजी आमदार केवळ पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत.विकासाच्या
गप्पा तर इतक्या मारल्या जातात मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे काठी असो
अवसरी असो या गांवानी तुम्हाला निवडणूकीच्या काळात डोक्यावर घेतले होते तरीही
त्यांच्या रस्त्यांची,पिण्याच्या पाण्याच्या योजनांची तसेच शेतीचे पाणी
अडविण्याकरीता आडव्या पाटांची कामे तुम्हाला इतक्या वर्षाच्या आमदारीच्या काळात का
मंजुर करुन देता आली नाहीत असा सवाल त्यांनी शेवठी उपस्थित केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
जगन्नाथ शिर्के, स्वागत दिनेश पवार यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रदिप पवार यांनी मानले.
चौकट:- काम मंजुर करणारा, काम करुन घेणारा व काम करणारा तुमच्यासमोर
आहे.
कोणत्याही गांवात भूमिपुजनाच्या
कार्यक्रमाला जाताना माझेसोबत काम करुन घेणारा अधिकारी, काम करणारा ठेकेदार असतो.
मी केवळ कामाचा दिखावा करीत नाही तुमच्या गांवाचे काम मंजुर केलेय म्हणून त्याचे
भूमिपुजन करायला मी आलोय असे सांगतो. काम मंजुर करणारा पण, काम करुन घेणारा पण आणि
प्रत्यक्षात काम करणारा पण तुमच्यासमोर आहेत.माजी आमदारांना असे कधी जमले का? असा
टोलाही त्यांनी भाषणात लगाविला.
No comments:
Post a Comment