दौलतनगर दि.०३:- उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या तीन
गांवाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे तलावाचे काम भूसंपादन केलेल्या
खातेदारांना त्यांच्या भूसंपादनाची रक्कम मंजुर न झाल्याने बऱ्याच वर्षापासून
रखडले होते पाटणचे आमदार शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या
भूसंपादनाचा विषय मार्गी लागला असून या तलावाच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात झाली
आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून या कामांचा शुभारंभ
करण्यात आला. आमदार शंभूराज देसाईंच्या मुळे या तलावाच्या कामांस २८ कोटी ३२ लाख
रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामध्ये शेतकऱ्यांच्या
भूसंपदनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली आहे.
भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखाती जमा करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.
राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे यांचेकडे
आपली राजकीय ताकद वापरुन गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी
बैठक घेतल्याने उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा
अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेला विषय मार्गी लागला आहे येथील शेतकऱ्यांच्या
भूसंपादनाच्या रक्कमा बँक खाती जमा झालेनंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आमदार शंभूराज
देसाई यांच्याच हस्ते या तलावाच्या कामांस सुरुवात व्हावी असा आग्रह शेतकऱ्यांनी
धरलेनंतर आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते उरुल ता.पाटण या तलावाच्या ठिकाणीच
शुभारंभाचा समारंभ आयोजीत केला होता.
या समारंभाप्रसंगी बोलताना
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, उरुल लघु पाटबंधारे तलावाचे कामांस सन २००७ मध्ये ५ कोटी
९० लाख ०९ हजार इतक्या किमंतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. भुसंपादनाची रक्कम
प्रकल्पग्रस्ताना मिळाली नसल्याने या तलावाच्या बांधकामाचे काम पुर्णत: रखडले
होते.राज्याचे जलसंधारणमंत्री ना.राम शिंदे
यांचेकडे गतवर्षी या विषयासंदर्भात बैठक घेतल्याने शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा व
प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय मार्गी लागला. एक चांगला प्रकल्प
आपल्या या विभागात होत आहे याचा आनंद वाटत आहे. या तलावाच्या कामांस शासनाने २८
कोटी ३२ लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये उरुल,ठोमसे व
बोडकेवाडी या तीन गांवाकरीता भूसंपादनाकरीता ६ कोटी १३ लाख ९९ हजार रुपयांची रक्कम
मंजुर करण्यात आली आहे. उरुल,ठोमसे व बोडकेवाडी या गांवातील भुसंपादन
प्रस्तावातील अंतिम निवाड्याची
रक्कम अनुक्रमे २ कोटी ९२ लाख १० हजार ६६२ रुपये, ९४ लाख ७५ हजार ६7६ रुपये व 90
लाख ९८ हजार 678 रुपये असे एकूण ४ कोटी 77 लाख ८५ हजार 0१6 रुपये इतकी होत
आहे.यातील बहूतांशी भूसंपादनाच्या रक्कमा या शेतकऱ्यांच्या बँकखाती जमा करण्याचे
काम भूसंपादन अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेमार्फत प्रगतीपथावर सुरु
आहे.या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उरुल लघू पाटबंधारे तलावाची
उंची २०.६० मीटर असून लांबी ६६० मीटर आहे. या तलावामध्ये १९०० स.घ.मी. इतका
पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे २४३ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली
येणार आहे. सुधारित अंदाजपत्रकापनुसार धरणाचे काम करणेकरीता एकूण १५ कोटी ०५ लाख
रुपयांचा निधी मंजुर असून यातील ५ कोटी १४ लाख रुपयांचे काम सद्यस्थितीत झाले आहे
अजुनही ९ कोटी ९० लाख रुपयांचे धरणाचे काम करण्यास निधी उपलब्ध करुन देण्यात आला
आहे. धरणाच्या कामात सांडवा बांधकाम करणेकरीता ७३ लाख ९० हजार, सांडवा खुदाई ४२ लाख ९७ हजार, हेड रेग्युलेटर १ कोटी ३१ लाख
४४ हजार, रिंगरोडचे काम करणेकरीता ३ कोटी ५९ लाख ५७ हजार व कॅनॉल उपचारिका
करणेकरीता ८५ लाख ७० हजार रुपये अशा महत्वाच्या कामांकरीता निधीची तरतूद सुधारित
प्रशासकीय मान्यतेमध्ये करण्यात आली आहे.असे सांगून ते म्हणाले,बोडकेवाडी येथील
बोटावर मोजता येणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय अजुनही प्रलंबीत असून
याकरीता मी जिल्हाधिकारी,सातारा यांची या बोडकेवाडी प्रकल्पग्रस्तांसमवेत भेट
घेवून हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांचेशी चर्चा देखील केली आहे
भूसंपादन अधिकारी व लघू पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे याविषयी लक्ष
घालून बोडकेवाडी येथील प्रलंबीत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रस्तावही
शासनाकडे सादर करावा तोही मंजुर करुन घेता येईल असे आश्वासन देवून त्यांनी सदर ल
पा तलावाचे काम संबधित ठेकेदाराने लवकरात लवकर पुर्ण करुन दयावे अशा सुचनाही
यावेळी बोलताना दिल्या.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे संचालक
शशिकांत निकम,सरपंच सौ.वैशाली मोकाशी, उपसरंपच सतीश खामकर,ठोमसे सरपंच सौ.मंगल सुर्वे,बोडकेवाडी
सरपंच आण्णासो देसाई,बजरंग माने,शिवाजी देसाई, नितीन निकम,आबासो माने,आनंदा
धनावडे,संग्राम मोकाशी, चंद्रकांत निकम या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लघू पाटबंधारे
विभागाचे उपअभियंता कांबळे, ठेकेदार शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शुभारंभ प्रसंगी उरुल,ठोमसे व बोडकेवाडी येथील शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात
उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment