दौलतनगर दि.०४:-
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे
दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा १०9 वा जयंती सोहळा कार्यक्रम रविवार दि.१०
मार्च, २०१9 रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी संपन्न होणार असून
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने नव्याने उभारलेल्या
“महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात
आला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंती
कार्यक्रमापासून “महाराष्ट्र दौलत” शताब्दी स्मारक हे कार्यक्रमांना खुले करण्यात येणार
असून दि.10 मार्च जयंती सोहळयाच्या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे
जीवन चरीत्रावर शिवाजी विद्यापीठामध्ये “एम
फिल” केलेले सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रा. आत्माराम थोरात हे प्रमुख
अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमास पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटू आमदार
शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील
यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात
त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री
व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी
पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी
रविवार दि.१० मार्च, २०१9 रोजी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा १०९ वा
जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे महाराष्ट्र शासनाने नव्याने उभारलेल्या “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब
देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला असून हा कार्यक्रम अतिशय दिमाखदार
करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठामध्ये लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्रावर “एम फिल” केलेले सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष
प्रा. आत्माराम थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून लोकनेते बाळासाहेब
देसाई साहेब यांच्या जीवन कार्याची माहिती देणार आहेत. या कार्यक्रमास पाटण तालुक्याचे
उत्कृष्ट संसदपटू आमदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या जयंती सोहळ्याचे कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब
देसाई प्रेमी तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील विविध
संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे सभासद,हितचिंतक
यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे, असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.
Fantastic
ReplyDeleteloknete saheb.simply great.
Very Good program
ReplyDelete