दौलतनगर दि.०४:- मी आमदार म्हणून
विकासकामांकरीता जो निधी आणलाय तो जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे तुम्ही
काय केले असेल तर जनतेला जरुर सांगा. पण तुम्ही काही केलेच नाही अशी जनताच सांगतेय
म्हणूनच विकासाची एवढी कामे मला करावी लागत आहेत. केवळ वाडयात बसायचे आणि पत्रके
काढायची हा उद्योग करणाऱ्या माजी आमदारांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी नुसती करतोय
त्याची मापे काढण्यापेक्षा तुम्हाला जे जमले नाही ते मी करुन दाखविले आहे गेल्या
साडेचार वर्षात पाटण मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला आणि झालेला विकास व कामे
बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याकडून किती विकासाची कामे करणे शिल्लक राहिले
होते असा टोला आ.शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
मत्रेवाडी ता.पाटण येथे
आमदार शंभूराज देसाईंनी आमदार फंडातून मंजुर केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या
योजनेचे उद्घाटन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते.याप्रसंगी
ते बोलत होते. या योजनेकरीता त्यांनी १० लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दिला
आहे.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव
चव्हाण,पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील, पंचायत समिती गटनेने पंजाबराव
देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी,वसंत कदम,बबनराव
भिसे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण,नारायण कारंडे,मनोज मोहिते,अंकुश
महाडिक,नानासो साबळे,कसणी सरपंच सौ.मिनल मस्कर,पवारवाडी सरपंच सौ.सविता देसाई,मेंढ
उपसरपंच विलास जाधव,दिलीप शेलार,बाबुराव साबळे,मत्रेवाडी सरपंच दत्तात्रय
मत्रे,उपसरपंच सखाराम मत्रे,भगवान मत्रे या प्रमुख पदाधिकाऱ्यां सह मत्रेवाडी
गांवातील कार्यकर्ते व मुंबई मित्र मंडळातील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती
होती.
याप्रसंगी बोलताना आमदार
शंभूराज देसाई म्हणाले, माजी आमदारपुत्रांनी मी मंजुर करुन आणलेली कामे कागदावरची
आहेत असा या विभागातील एका कार्यक्रमात आरोप केला होता. मी मंजुर करुन आणलेली कामे
ही कागदावर आहेत का प्रत्यक्षात आहेत हे त्यांना मतदारसंघातील जनतेनेच दाखवून दिले
आहे. तरीही त्यांची खात्री पटत नसेल तर त्यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात माझे
माध्यमातून झालेल्या, सुरु असलेल्या
कामांची पहाणी करावी म्हणजे त्यांच्या लक्षात येईल हे आपल्याला जमले नाही
ते मतदारसंघाच्या आमदारांनी करुन दाखविले आहे. मत्रेवाडी सारखे गाव इतक्या वर्षे
पिण्याच्या पाण्यापासून वंचीत होते मग तालुक्याचे माजी आमदार काय करीत होते
त्यांना ही योजना इतक्या वर्षात का दिसली नाही. मत्रेवाडीसारखीच या गावाच्या
खालच्या जाधववाडी मेंढ या गावाची आहे. या विभागातील कार्यक्रम उरकून जाताना जाधववाडी
मेंढ येथील ग्रामस्थ गढूळ पाण्याची बाटली घेवून रस्त्यावर उभे होते. त्या बाटलीतील
पाणी आपण जनावरांना सुध्दा देवू शकत नाही असले पाणी त्या ग्रामस्थांनी मला
दाखविले.वांग मराठवाडीचे धरण उशाला आणि गढूळ पाणी पिण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर
येत होती त्याच वर्षीच्या टंचाई आराखडयामध्ये या गांवाचा समावेश करुन या गांवाला
पिण्याच्या पाण्याची योजना आपले गांवाप्रमाणे मंजुर करुन दिली.आज त्या गांवातील
पिण्याचे पाणी सोडण्याचा कार्यक्रम करुनच या गांवातील पिण्याच्या पाण्याच्या
योजनेचे उद्घघाटन करायला मी इथे आलो आहे. या विभागात रस्त्याचे काम असो,
पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम असो,किंवा सार्वजनीक जनहितार्थ कोणतेही काम असो
ते पुर्ण करुन देण्याचे काम मी मतदारसंघाचा आमदार म्हणून गेल्या साडेचार वर्षात
केले. पाटणकरांना या तालुक्याने सलग २१ वर्षे या तालुक्याचा आमदार होण्याची संधी
दिली होती तेव्हा त्यांना आमदार म्हणून या विभागातील गांवाचा का अविकसीतपणा दिसला
नाही याचे आश्चर्य वाटते. मग त्यांनी आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून
गेल्या २६ वर्षात नेमके काय केले असा प्रश्न माझेसारखे कार्यकर्त्याला पडणे सहाजिक
आहे असे सांगून ते म्हणाले, पाण्याचे महत्व महिलांना जास्त कळते म्हणूनच या
योजनेच्या उदघाटन समारंभाला उपस्थित असणाऱ्या महिला पाहिल्या नंतर आपल्या हातून आज
चांगले काम झाले.याचा आनंद वाटतो.एखादा रस्ता केला,सभामंडप उभारला यापेक्षा
लोकांना व महिलांना पिण्याचे पाणी मिळवून दिले याचा आनंद खुप मोठा वाटतो. या
गांवाने पिण्याच्या पाण्याच्या योजनेत वितरण व्यवस्था पुर्ण करुन दयावी तसेच
गावपोहोच रस्ता करुन दयावा अशी मागणी केली
आहे येणाऱ्या आर्थिक वर्षात या गावच्या पिण्याच्या पाण्याचे वितरण व्यवस्थेचे काम
पुर्ण करुन दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.यावेळी डॉ.दिलीपराव
चव्हाण,पंजाबराव देसाई यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम मत्रे
यांनी केले व उपस्थितांचे आभार भगवान
मत्रे यांनी मानले.
No comments:
Post a Comment