Tuesday 12 March 2019

पाटण तालुक्यातील डोंगर पठारावरील रस्त्यांना मंजुरी दिलेबद्दल आ.शंभूराज देसाईंनी मानले ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार.






दौलतनगर दि.१२ :-पाटण तालुक्यातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे डोंगरपठारावर जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेबद्दल पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले आहेत.
                       राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे दि.२५.१०.२०१८ रोजी पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा नाडे नवारस्ता याठिकाणी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना यापुर्वी भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण मतदारसंघाच्यावतीने ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या दरम्यानच आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना पाटण तालुक्यात पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कामे अजुनही प्रलंबीत असून या कामांना मंजुरी दयावी अशी आग्रही मागणी त्यांचेकडे केली होती.त्यावेळी अशा रस्त्यांना निधी न देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून आमदार शंभूराज देसाईंची आग्रही मागणी या खात्याचा मंत्री असल्याने मला मोडवत नसल्याने निर्णयात बदल करुन पाटण तालुक्यातील अशा रस्त्यांना हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुरी मिळणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार            शासनाच्या ऊर्जा विभागाकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आलेल्या कोकीसरे नवलाई वार्ड ते गवळीनगर रस्ता, वेताळवस्ती काळगाव ते मस्करवाडी ग्रामा 361 रस्ता, माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर रस्ता, भोसगाव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी रस्ता, कोळेकरवाडी ते अनुतेवाडी ते कारळे रस्ता, नेरळे ते गुंजाळी ग्रामा 188 रस्ता, घेरादातेगड गावपोहोच रस्ता, गावडेवाडी फाटा ते धुईलवाडी ग्रामा 63 रस्ता, काठीटेक ते आवसरी ग्रामा 55 रस्ता, रामेल फाटा ते रामेल ग्रामा 52 रस्ता या १० रस्त्यांच्या कामांना ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.०८ मार्च, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी दिली असून रस्त्यांच्या कामांना विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले आहेत.

1 comment: