दौलतनगर दि.०८:- पाटण तालुक्यात रस्ते नसल्याने आपल्या आमदारकीच्या काळात
सातत्याने दुर्गम डोंगराळ भागातील रस्त्यावर भर दिल्याने संपुर्ण मतदारसंघात
रस्त्याचे जाळे झाले आहे. नवीन रस्ते करण्यास संधीच नाही जुन्याच रस्त्यावर
डांबराचे कार्पेट करण्याचे व खड्डे भरण्याचे काम सुरु आहे असे म्हणणारे पाटणचे
निष्क्रीय माजी आमदार साहेब,मी सांगतो त्या वरची
केळेवाडी,जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी,गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी
जाधववाडी,भालेकरवाडी,महिंद वर्पेवाडी,निगडे माईंगडेवाडी,मोडकवाडी,सातर,गुढे शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी,
डाकेवाडी,लोहारवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी या २१ ते २२ प्रमुख गावांच्या रस्त्यावर आतापर्यंत डांबर राहू दया परंतू साधी
खडी किेंवा मुरुम टाकण्याचेही काम तुम्ही का करु शकला नाहीत? असा सवाल आ.शंभूराज
देसाईंनी पाटणकरांना केला असून हे रस्ते तुमच्या काळात का होवू शकले नाहीत याचे
उत्तर मतदारसंघातील जनतेला दया असे आवाहन आ.शंभूराज देसाईंनी पाटणकरांना केले आहे.
चिखलेवाडी कुंभारगांव
ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंनी हरीत ऊर्जा निधी योजनेतंर्गत मंजुर केलेल्या
कुंभारगांव-माटेकरवाडी ते वरेकरवाडी या ०४ किमी रस्त्याचे भूमिपुजन आमदार शंभूराज
देसाईंचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कामांकरीता
त्यांनी १ कोटी ८१ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी लोकनेते
बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत
समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,जितेंद्र केसेकर,पंचायत समिती
गटनेने पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,शंकरराव चव्हाण,चंद्रकांत चाळके,सरपंच
सौ.कविता घाडगे,उपसरपंच केशव माटेकर,अजित वरेकर, भगवान वरेकर,दत्तात्रय चोरगे,भरत
चाळके,विशाल पवार,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,विकास गिरी गोसावी, प्रकाशराव
तवटे,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,महादेवराव पानवळ,शाखा अभियंता
राजाराम खंडागळे
या
प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिखलेवाडी,माटेकरवाडी,वरेकरवाडी,चाळकेवाडी,कुंभारगांव गांवातील
कार्यकर्ते व मुंबई मित्रमंडळा तील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.शंभूराज देसाई
म्हणाले,आपल्या तालुक्याचे माजी आमदार पाटण येथील शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात
मागील आठवडयात बोलताना म्हणाले की,पाटण
तालुक्यात रस्ते नसल्याने त्यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात रस्त्यांना
प्राधान्य देवून प्रत्येक गांव आणि वाडीवस्तीवर रस्त्यांची सुविधा पुरविली. नवीन
रस्ते करण्यास आता संधीच नाही जुन्याच रस्त्यावर डांबराचे कार्पेट करण्याचे व
खड्डे भरण्याचे उद्योग सुरु आहे.मला या रस्त्याच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने
त्यांना सवाल करायचा आहे.पाटणकरसाहेब जर खरोखरच आपण आपल्या आमदारकींच्या काळात
रस्त्यांना प्राधान्य दिले असे म्हणता तर स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली
कुंभारगांव विभागातील वरेकरवाडी या वाडीला पोहचलेल्या रस्त्यांवर डांबर राहू दया
परंतू साधी खडी किंवा मुरुम टाकण्याचेही काम तुम्हाला का जमले नाही. नवीन रस्ते करायला
संधीच नाही तर मग वरेकरवाडी गांवाप्रमाणे वरची केळेवाडी,जन्नेवाडी,बोर्गेवाडी,जंगलवाडी,
गणेवाडी,गाढखोप,बाहे,हुंबरणे,पाळशी,नाटोशी जाधववाडी,महिंद वर्पेवाडी,निगडे
माईंगडेवाडी,भालेकरवाडी,सातर, मोडकवाडी,गुढे शिबेवाडी,करपेवाडी,टेटमेवाडी,डाकेवाडी,लोहारवाडी
या २१ ते २२ गांवाच्या आणि वाडयांच्या रस्त्यांची कामे आतापर्यंत का होवू शकली
नाहीत जी तुम्हाला नाही परंतू मला नव्याने करावी लागली आहेत.वरेकरवाडीचा हा रस्ता
होतोय या वाडीला स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने रस्ता पुर्ण झालेनंतर स्वातंत्र्य
मिळणार आहे याचा मला आनंद होत आहे. असे सांगुन ते म्हणाले,येथील चाळकेवाडी
बंधाऱ्यांचे कामाचाही प्रश्न प्रलंबीत आहे.मागील आठवडयात या विभागातील
भूमिपुजनांच्या कार्यक्रमानिमित्त आलेनंतर चाळकेवाडी बंधाऱ्याच्या कामांचे
अंदाजपत्रक तयार करुन ते निधीसाठी मुख्य अभियंता,पुणे यांचेकडे सादर करण्याच्या
सुचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.या बंधाऱ्याकरीता आवश्यक असणारा निधी
शासनाकडून मंजुर करुन आणणेकरीता मी कटीबध्द आहे. कुंभारगांव विभागातील प्रत्येक
गांवामध्ये या साडेचार वर्षात मोठया प्रमाणात विकासाचे कामे देवून शिल्लक राहिलेला
विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचे काम आपण केले आहे. कुंभारगांव जिल्हा परीषद
मतदारसंघामध्ये माजी आमदारांच्या काळात जेवढा निधी मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी
पटीने जादा निधी विकासकामांना देण्याचे काम आपण केले आहे. ज्याप्रमाणे कामांसाठी
या विभागात निधी दिला आहे त्याप्रमाणातच येणाऱ्या निवडणूकीत या विभागातील
मतदारांनी मते देवून विकासकामे मार्गी लावणाऱ्यांच्या पाठीशी आपली ताकत उभी करावी.मतदारसंघाच्या
विकासाकरीता आपण कुठेही कमी पडणार नाही.विकासाची कामे मागताना ज्याप्रमाणे
पदाधिकारी चढाओढ करतात त्याचप्रमाणे निवडणूकीत मते मिळविण्याकरीताही चढाओढ लागणे
गरजेचे असल्याचेही त्यांनी शेवठी बोलताना सांगितले यावेळी डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे
भाषण झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवबा वायचळ यांनी केले व उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत
सदस्य केशव टोळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment