Wednesday 27 March 2019

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला प्रतिवर्षाप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. दि. १८ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते यांचे कार्याचा चित्ररथ व गौरवयात्रा निघणार.





दौलतनगर दि.२७:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळा वरील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात मागील नऊ वर्षाप्रमाणे यंदाही दहाव्या वर्षी भव्य अशा श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन शुक्रवार दि.२० एप्रिल ते दि. २३ एप्रिल,२०१९ पर्यंत करण्यात आले आहे. तत्पुर्वी गुरुवार दि.१८ एप्रिल,२०१९ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने मागील तीन वर्षापासून सुरु करण्यात आलेले लोकनेतेसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.
सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येत असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दि.२३ एप्रिल,२०१९ रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०१९ पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ०९.०० वा.लोकनेते बाळासाहेब देसाई संहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे वतीने लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून या चित्ररथाचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून हा चित्ररथ व गौरवयात्रा चोपदारवाडी,गव्हाणवाडी,सुर्यवंशीवाडी,पापर्डे,मारुलहवेली फाटा,सोनाईचीवाडी,नावडी,निसरे फाटा,मल्हारपेठ,  नवारस्ता,आडूळपेठ,आडूळ गावठाण,येरफळे,पाटण,नेरळे,मोरगिरी,नाटोशी,सोनवडे मार्गे पुन्हा कारखाना कार्यस्थळापर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.शनिवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन हभप जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्व्लन करुन करण्यात येणार आहे.या पारायण सोहळयात शनिवार दि. २० एप्रिल २०१९ रोजी हभप सचिन महाराज कदम,आळंदी यांचे प्रवचन,हभप संजय महाराज कावळे,आळंदी यांचे किर्तन,रविवार दि. २१ एप्रिल, २०१९ रोजी हभप दादा महाराज तुळसणकर यांचे प्रवचन तर हभप महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल,२०१९ रोजी हभप मधुकर महाराज दिक्षीत,मसूर यांचे प्रवचन तर हभप ॲङ जयवंत महाराज बोधले,पंढरपूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ३६ व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वा.आमदार श्री. शंभूराज देसाई व सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत हभप वेदांतचार्य श्रीकृष्णानंद शास्त्रीजी,गोकूळ शिरगाव,वृंदावनधाम करवीर कोल्हापूर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे दहावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झाले आहे.लोकनेते यांचे जीवनकार्यावरील विविध कार्याच्या संदर्भात तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथ व गौरव यात्रेचे तालुक्यातील जनतेतून मोठया प्रमाणांत कौतुक व स्वागत करण्यात येत आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ३६ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारायण सोहळयाचा व चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment