Wednesday 27 February 2019

सडादाढोली युवकांकडून युवा नेते यशराज देसाईंचे जंगी स्वागत. आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर केलेल्या सडादाढेाली रस्त्याचे दिमाखात भूमिपुजन.




             दौलतनगर दि. २7 :- गेली २६ वर्षे डोंगरपठारावरील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी विरोधकांना पोत्याने भर-भरुन मते दिली त्याच विरोधकांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला? असा सवाल करीत गेली साडेचार वर्षे या तालुक्यात आमदार शंभूराज देसाईंनी कोटयावधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत. डोंगरपठारावरील गांवामध्ये कधीही न होणारी विविध विकासकामे मंजुर करुन आणण्याचे आणि ती पुर्ण करुन घेण्याचे व्रत आमदार साहेबांनी स्विकारले आहे त्यामुळेच मतदारसंघाच्या सर्वच डोंगरपठारावर चौफेर असा विकास पहावयास मिळत आहे. या डोंगरपठारासह आपल्या चाफळ विभागात त्यांनी गांवे व वाडयांवस्त्यांना विविध विकासकामांकरीता भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघ सुजलाम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी डोंगरपठारावरील व मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन युवा नेते यशराज देसाईंनी केले.
                   आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर करुन आणलेल्या महाबळवाडी ते सडादाढोली या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन व कामांचा शुभारंभ युवानेते यशराज देसाईंच्या हस्ते सडादाढोली येथे करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते,या रस्त्याच्या कामांकरीता आमदार देसाईंनी १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील, मा.संचालक प्रकाश नेवगे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे,शिवदौलत बॅंकेचे संचालक चंद्रकांत पाटील,स्कॉलर्स ॲकॅडमीचे प्रमुख शंकरराव देसाई,शंकर मोरे,सडादाढोलीचे वसंत झोरे,जयराम झोरे,राम झोरे,प्रकाश झोरे,तुकाराम झोरे,निवृत्ती झोरे,बाबुराव झोरे,सखाराम झोरे,धोंडीबा काळे,मारुती झोरे,चंद्रकांत शेळके,शिवाजी झोरे,तानाजी झोरे, सावळाराम झोरे,सचिन झोरे,दिनकर झोरे,गंगाराम झोरे,लक्ष्मण झोरे,पांडूरंग झोरे,धाऊजी यमकर,मोरेश्वर झोरे,बबन झोरे, वैभव झोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सडादाढोली गांवातील कार्यकर्ते व मुंबई मित्रमंडळातील युवक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                    याप्रसंगी बोलताना यशराज देसाई  म्हणाले, आमदार शंभूराज देसाई साहेबांनी आमदारकीच्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील पाटण मतदारसंघात 217 कोटी रुपयांची विकासकामे केली होती आणि आत्तातर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आपल्या सत्ताधारी पक्षाचा आमदार असण्याचा पुरेपुर वापर ते मतदारसंघातील जनतेकरीता करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेल्या विविध विकासकामांकरीता पाटण मतदारसंघात त्यांनी गत साडेचार वर्षात चौपट वेगाने शासनाच्या विविध योजनांमधून निधी आणून मतदारसंघातील कधीही न होणारी विकासकामे मार्गी लावली आहेत.गतवर्षी रामघळ येथील पारायण सोहळ्यास आमदारसाहेब यांनी भेट दिली होती त्या भेटीदरम्यान आपण सर्व ग्रामस्थांनी संघटीत होवून आपले गाव पोहोच रस्त्याची मागणी केली होती.आपण केलेल्या मागणीचा विचार करुन आमदारसाहेबांनी एक वर्षाच्या आत महाबळवाडी ते सडादाढोली या रस्त्याच्या कामाकरीता ग्रामविकास मंत्रालयाकडील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत १ कोटी ५४ लाख ३२ हजार रुपये एवढा भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या रस्त्याच्या कामामुळे आपली अनेक वर्षांची रस्त्याची गैरसोय दुर होणार आहे.गत तीस वर्षापासून आपल्या गावाला विरोधकांनी फक्त झुलविण्याचेच काम केले आहे,रस्ता या मुलभूत गरजेची पुर्तता ही विरोधक पुर्ण करु शकले नाहीत.ही दुर्दैवाची बाब आहे.परंतु देसाईसाहेबांनी आपल्याला दिलेला शब्द एक वर्षाच्या आत पुर्ण करुन दाखविला.आता निवडणूकीच्या अगोदर विरोधक आपल्या गावात मते मागण्यासाठी येथील त्यांना आता आपण जाब विचारला पाहिजे या चार वर्षात आमच्यासाठी काय केले याचा.फक्त निवडणूक आली की मते मागायची आणि नंतर जनतेला विकास कामांपासून वंचित ठेवायचे हे कामच विरोधकांनी आजपर्यंत केले आहे.गत साडेचार वर्षात पाटण मतदारसंघात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत.त्या विकासकामांच्या माध्यामातून पाटण मतदारसंघाचा चेहरा बदलत आहे,त्यामुळे आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत आपण आमदारसाहेबांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे राहून आमदारसाहेबांना भरघोस अशा मतांनी पुन्हा विधानसभेत पाठवायचे आहे. असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत सचिन झोरे यांनी केले व उपस्थितांचे आभार  पांडूरंग झोरे यांनी मानले.
चौकट:- सडादाढोली पठार भगव्या फेटयांनी नटले.
            आमदार शंभूराज देसाई हे महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात असलेमुळे आ. शंभूराज देसाईंनी मंजुर केलेल्या आमच्या रस्त्याचे भूमिपुजन व कामाचा शुभारंभ युवा नेते यशराज देसाईंनी करावा असा आग्रह सडादाढोली ग्रामस्थांनी धरला होता.सडादाढोली गांवामध्ये युवानेते यशराज देसाई येत आहेत हे पाहून सडादाढोली येथील युवकांच्यात एकप्रकारचा उत्साह पहावयास मिळाला.मोठया उत्साहाने या युवकांनी यशराज देसाईंचे भगवे फेटे परिधान करुन व यशराज देसाईंनाही भगवा फेटा बांधून जल्लोषात स्वागत केले.भगव्या फेटयांनी सडादाढोली पठार नटल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.

Tuesday 26 February 2019

महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी आमदार शंभूराज देसाई यांची तिसऱ्यांदा नियुक्ती.




दौलतनगर दि.2६:-महाराष्ट्र विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित झालेले शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद पाटणचे लोकप्रिय व विधानसभेतील अभ्यासू आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमदार शंभूराज देसाई यांची महाराष्ट्र विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी या पंचवार्षिकमध्ये तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.सध्या सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये आमदार शंभूराज देसाईंची तालिकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी दि.२५ फेब्रुवारी,२०१९ रोजी विधानसभा सभागृहात केली आहे.
                                    महाराष्ट्र विधानसभा हे लोकशाहीचे महामंदीर असून राज्यातील सर्वोच्च असे सभागृह आहे. या सभागृहात अधिवेशन काळात विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हे महाराष्ट्र विधानसभा नियम ८ अन्वये विधानसभेच्या सदस्यांमधून सभाध्यक्ष तालिकेवर विविध पक्षाच्या विधानसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार उत्कृष्ट संसदपटु शंभूराज देसाई यांचे विधानसभेतील कामकाज पाहून त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाने सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या तालिकाध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती केली आहे.सन २०१६  चे पावसाळी अधिवेशन, २०१८ ला अर्थसंकल्पीय अधिवेशन व सध्या सुरु असलेले फेब्रुवारीचे अधिवेशन अशा तीन अधिवेशनात आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून बसण्याचा बहूमान मिळाला आहे. आमदार शंभूराज देसाई यांना तिसऱ्यांदा तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
                                 महाराष्ट्र विधानमंडळाला देशामध्ये आगळी वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. अनेकविध क्षेत्रात देशपातळीवर तसेच राज्यपातळीवर नेतृत्व करणारे नेते या विधानमंडळाने घडविले आहेत.आमदार शंभूराज देसाई हे पाटणसारख्या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आले असून आमदारकीचा कोणताही पुर्वानुभव नसताना सन २००४ ला आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढल्यानंतर संसदीय कामकाजाचा खडान्‌खडा अभ्यास करुन त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या हुशारीचे कर्तृत्व सिध्द करुन दाखविले आहे. त्यांच्या हुशारीचे मुल्यमापन महाराष्ट्राचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या विधानसभेने करुन त्यांना पहिल्याच टर्ममध्ये विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. आमदार शंभूराज देसाई यांची ही दुसरी टर्म असून विधानसभेतील कामकाजाचा व्यासंग त्यांनी इतका वाढविला आहे की विधानसभेतील त्यांच्या उत्कृष्ट ज्ञानामुळे त्यांच्यावर शिवसेना पक्षाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या आहेत व येत आहेत. पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्याही आहेत.विधानसभेतील शिवसेनेचा बलस्थान चेहरा म्हणून त्यांच्यावर शिवसेना पक्षाचे विधिमंडळ पक्षप्रतोद म्हणून जबाबदारी सोपविली असतानाच राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे महाराष्ट्राचे कार्यकारीणीवरही त्यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेचे संपुर्ण कामकाज पाहताना निपक्ष:पातीपणे सभागृहाचे कामकाज चालवितात त्यामुळे आमदार शंभूराज देसाईंना तालिकाध्यक्ष म्हणून सर्वच पक्षाच्या वतीने नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे व मिळत आहे. सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे यांनी सभाध्यक्ष तालिकेवर त्यांची नियुक्ती केलेनंतर त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
चौकटः- राजे, तुम्हाला पाहून स्व.बाळासाहेब देसाई यांची आठवण येते.
           तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर सभागृहात उपस्थित असणाऱ्या विविध पक्षाचे विधानसभा सदस्य अभिमानाने सांगतात. राजे, तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेले पाहून महाराष्ट्राला दिशा देणारे तुमचे आजोबा स्व.बाळासाहेब देसाई यांची काहीकाळ आम्हाला आठवण येते.यामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षातीलही विधानसभा सदस्यांचा समावेश असतो.ही अभिमानास्पद बाब आहे.

पाटण मतदारसंघातील शिल्लक राहिलेल्या मागण्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्या. आ. शंभूराज देसाईंची सन २०१८-१९ च्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत मागणी.



दौलतनगर दि.2६:- पाटण विधानसभा मतदारसंघात गृह,नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व सार्वजनीक आरोग्य विभागाकडील असणाऱ्या आमच्या काही मागण्या राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी शिल्लक राहिल्या आहेत या शिल्लक राहिलेल्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने लवकरात लवकर धोरणात्मक असे निर्णय घ्यावेत व या मागण्या पुर्ण कराव्यात तसेच आवश्यक असणाऱ्या कामांना निधी मंजुर करुन दयावा अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी आज विधानसभेत केली.
                         महाराष्ट्र विधानसभेत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पुरवणी मागण्यावर आज गृह,महसूल व वन, नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व सार्वजनीक आरोग्य  व कौशल्य विकास या मागण्यांवर चर्चा होती.यावेळी आ.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील गृह,नगरविकास,सार्वजनींक बांधकाम व आरोग्य विभागाकडील शिल्लक राहिलेल्या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधून या मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात असा आग्रह धरला.
                         याप्रसंगी मागण्या करताना आ.शंभूराज देसाई म्हणाले,आमचे पाटण मतदारसंघात मल्हारपेठ हे बाजारपेठेचे गांव असून याठिकाणी असणारे मल्हारपेठचे पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन येथे पोलीस स्टेशन करण्यास मान्यता दयावी अशी आमची बरेच वर्षाची मागणी आहे. यासंदर्भातील प्रस्तावही गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री यांनी यासंदर्भात बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन देखील दिले आहे. ती बैठक लवकरात लवकर घेवून मंत्री यांनी तो निर्णय घ्यावा तसेच  पाटण पोलीस स्टेशन,मल्हारपेठ,ढेबेवाडी व कोयनानगर येथील पोलीस औटपोस्टमध्ये मनुष्य बळ कमी आहे.कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर ताण येत आहे याठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ लवकर या पोलीस स्टेशनना दयावे.असे सांगून त्यांनी नगरविकास विभागावर बोलताना पाटण या तालुक्याच्या ठिकाणी नव्यानेच नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली आहे.नगरपंचायतीला आवश्यक असणारे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या याठिकाणी कमी आहे.मुख्याधिकारी देण्यात आला आहे त्यासही चार्ज देण्यात आला आहे.नगरपंचायतीतंर्गत असणारे रस्ते,गटर इत्यादी सार्वजनीक बांधकाम विभागाकडील असणारी कामे करुन घेणेकरीता नगरपंचायतीकडे तज्ञ असे अधिकारी व कर्मचारी नाहीत त्यामुळे नगरपंचायतीकडील बांधकामांची सर्व कामे ही येथील सार्वजनीक बांधकाम उपविभागांच्या अधिकाऱ्यांकडून करुन घ्यावीत.
                             असे सांगत बांधकाम विभागावर बोलताना ते म्हणाले,पाटण मतदारसंघात ग्रामीण मार्गांची संख्या जास्त आहे.इतर जिल्हा मार्गांची संख्या १३ ते १४ इतकी आहे. दुर्गम आणि डोंगराळ विभागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा देणेकरीता एक वर्षापुर्वी पाटण मतदारसंघातील सुमारे २० रस्त्यांची कामे मी शासनाकडे प्रस्तावित केली आहेत यावर अद्यापही कसालाही निर्णय झाला नाही तो निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा.तर काशीळ-पाल-तारळे-जळव-मणदुरे-पाटण या प्रमुख जिल्हा मार्गावर महाराष्ट्रातील प्रसिध्द अशी तीन देवस्थाने आहेत यामध्ये पालीचा खंडोबा, जळवचा जोतिबा व मणदुरे येथील निवकणे येथे जानाई देवी अशी प्रसिध्द देवस्थाने आहेत या प्रमुख जिल्हा मार्गास राज्य मार्ग असा दर्जा देवून या रस्त्याचे रुंदीकरणासह काम पुर्ण करणेकरीता भरघोस असा निधी दयावा अशी माझी अनेक वर्षाची मागणी आहे. वरील दोन्ही विषयासंदर्भात राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री यांचेकडे मी आग्रह धरला होता या दोन्ही विषयांचे प्रस्ताव सादर करावेत अशा सुचनाही त्यांनी दिल्या होत्या त्यानुसार प्रस्ताव सादर केले आहेत मात्र कार्यवाही झाली नाही यावरही शासनाने निर्णय घ्यावा. तसेच नाडे ढेबेवाडी हाही प्रमुख जिल्हा मार्ग असून याठिकाणी नाडे पासून १ किमी अंतरावर असणारा सांगवड येथील मोठया पुलावर नेहमी वाहतूकीची कोंडी होती. हा पुल जुना झाला असून त्याठिकाणी पश्चिमेच्या बाजुस दुसरा मोठा पुल उभारण्यास वाव आहे.तर सार्वजनीक बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेंतर्गत सांगवड येथील सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुलांच्या उंचीचाच पश्चिमेच्या बाजुस नवीन मोठा पुल उभारण्यास आवश्यक असणारा निधी विशेष बाब म्हणून मंजुर करुन दयावा अशी मागणी केली.सार्वजनीक आरोग्य विभागावर मागणी करताना आ.देसाई म्हणाले, पाटण ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा देणेकरीताचा श्रेणीवर्धन प्रस्ताव शासनाच्या आरोग्य विभागाकडे सन २०१६ साली सादर केला आहे.तर पाटण आणि ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक सोई सुविधा मिळवून देणेकरीता आरोग्य साहित्यांची कमतरता आहे व याठिकाणी मोठया प्रमाणात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत या तिन्ही विषयासंदर्भात आमचे पक्षाचे ना.एकनाथ शिंदे हे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी याच अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक घ्यावी अशी त्यांचेकडे मागणी केली आहे तीही बैठक त्यांनी लवकर घेवून आरोग्य विभागातील तीन प्रश्नांसंदर्भात धोरणात्मक असा निर्णय घ्यावा असाही आग्रह आमदार शंभूराज देसाईंनी या पुरवणी मागण्यांवर बोलताना धरला.
चौकट :- पाटण नगरपंचायतीचा आडमुठेपणा विधानसभेत पोहचला.
             नगरविकास विभागाच्या मागण्यावंर आ.देसाईंनी पाटण नगरपंचायत ही राजकीय दृष्टीकोनातून आमदार फंड, जिल्हा वार्षिक योजनेतील नगरोथ्यान निधीमधून सुचविलेल्या विकासकामांना नगरपंचायतीचे आवश्यक असणारे ठराव, कागदपत्रे मागणी करुनही सहा- सहा महिने देत नाही.नगरपंचायतीच्या आडमुठेपणामुळे विकासकामांना खीळ बसत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.पाटणची नगरपंचायत राजकीय दृष्टीकोनातून ठराव देत नसेल तर याठिकाणी सुचविण्यात आलेल्या विविध विकासकामांना नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्याच्या सहीने १५ दिवसाच्या आत आवश्यक असणारी समंतीपत्र देवून ही कामे मार्गी लावावीत अशा सक्त सुचना नगरविकास मंत्र्यांनी संबधितांना दयाव्यात अशीही त्यांनी मागणी केली.

Sunday 24 February 2019

पाटण तालुका पुणे - पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांची एकजुट कौतुकास्पद. आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन. आमदार शंभूराज देसाईंनी मांडला पुण्यात विकासकामांचा लेखाजोखा.





दौलतनगर दि.25:- पाटण मतदारसंघातील अनेक युवक नोकरी कामधंदयानिमित्त जसे मुंबईमध्ये आहेत तसेच मोठया प्रमाणात पुण्यात देखील आहेत.मुंबईप्रमाणे पुणे-पिपंरी चिचंवड येथे मोठया संख्येने असणाऱ्या युवकांनी गांवाकडे आल्यानंतर पुण्यातील रहिवाशी सर्व युवकांना एका छताखाली आणणेकरीता आमचा एखादा युवक मेळावा घ्यावा अशी अपेक्षा अनेकदा व्यक्त केली. युवकांच्या आग्रहास्तव या शहरात दोनदा युवकांचे मेळावे पार पडले आपल्या गांवाकडे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या गांवाकरीता,वाडीवस्तीकरीता नेमके काय करतात हे जाणून घेणेकरीता सर्वांनाच उत्सुकता असते तशीच उत्सुकता येथील युवकांच्या मध्ये आहे.येथील युवकांना गावाकडच्या विकासाची आस आहे हे पाहून आनंद झाला गावाकडच्या विकासाकरीता युवकांची असणारी एकजुट ही कौतुकास्‍पद असल्याचे प्रतिपादन मदार शंभूराज देसाईंनी केले.
              पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांचेमार्फत मोठया प्रमाणात सुरु असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जाणून घेणेकरीता पाटण तालुका पुणे-पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांनी आकुर्डी येथे युवक मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी आ.शंभूराज देसाई बोलत होते.युवक मेळाव्यात आ.देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखाच पुणे-पिपंरी चिचंवडमधील रहिवाशी युवकांच्या समोर मांडला.आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी केलेल्या विकासकांमाची  माहिती दिल्याने येथील युवकांच्या मध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळाला.यावेळी मेळाव्यास आप्पासो उदुगडे,सुधीर कदम,संतोष देसाई,जुबेर चिखलकर,अशोक पाटील,संदीप देसाई,उमेश पाटील,हणमंत शेजवळ,महेश शेंडे,शंकर गालवे,राजेंद्र साळुंखे,अजित पाटील,अभिजीत पाटील,शशिकांत कानडे,अमोल मांडवेकर,जितेंद्र निळुगडे,विजयराव मोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह युवा कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी आमदार देसाई म्हणाले,आपला पाटण तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने तालुक्यातील युवक हे उच्च शिक्षण घेवून नोकरी कामधंदयानिमित्त मुंबई तसेच पुणे या मोठमोठया शहरात वास्तव्यास आहेत.घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे आपण नोकरी,कामधंदयानिमित्त बाहेरगांवी असलो तरी आपल्या गांवामध्ये,वाडीवस्तीमध्ये गावाकडच्या लोकांना त्यांच्या मुलभूत सुविधा मिळतात का नाही? याकडे आपले कायम लक्ष असते.अनेकदा मुंबई मधील युवक विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात मला भेटून त्यांच्या गांवाकडे प्रलंबीत राहिलेल्या कामांच्या संदर्भात मागणी करुन त्यांची ही मागणी पुर्णत्वाकडे कशी जाईल यासाठी पाठपुरावा करतात.आपण मोठया विश्वासाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींने आपल्या गांवाचा विकास करावा एवढीच माफक अपेक्षा त्यांची असते.मला सांगायला आनंद वाटेल ज्या विश्वासाने पाटण मतदारसंघातील मतदारांनी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा मी गेल्या साडेचार वर्षात प्रयत्न केला.सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना जनतेच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या त्या अपेक्षा पुर्ण करण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला.आज पाटण मतदारसंघात सातारा जिल्हयात एक नंबरची विकासकांमे सुरु आहेत  2014 च्या निवडणूकीत मी जनतेला दिलेल्या विविध आश्वासनांपैकी 85 ते 90 टक्के आश्वासने पुर्ण करण्याचे काम मी केले आहे हे आपण पहात आहात.एक हजार कोटी रुपयांचा निधीचा टप्पा आपण पाच वर्षात पुर्ण करीत आहोत याचा मला आनंद वाटतो मतदारसंघाचा चौफेर विकास झाला पाहिजे एवढे एकच उदिष्ट ठेवून मी काम करीत आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणूकीला जनतेच्या दारात मते मागायला जाताना आपण केलेला विकास जनतेसमोर घेवूनच मते मागायला जाणार आहे.आपण केलेला हाच चौफेर विकास मतदारसंघाला प्रगतीच्या मार्गाने नेण्यास मदत करीत आहे.मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात आतापर्यंत न झालेली विकासकामे मार्गी लावण्यात मला यश मिळाले मग यामध्ये गावांना पोहोच किवां गांवे जोडणारे बारमाही रस्ते असू दया,पिण्याच्या पाण्याच्या योजना असू दया या मुलभूत गरजा प्राधान्याने पुर्ण करण्याचे काम आपण केले याकरीता मतदार संघातील जनतेबरोबर मुंबई,पुणे-पिपंरी चिचंवड तसेच मतदारसंघाच्या बाहेरगांवी रहिवाशी असणाऱ्या आपणांसारख्या युवकांची साथ मिळाली असे सांगून ते म्हणाले या मेळाव्यामध्ये मी कुणाचे माप काढायला आलो नाही तर मी गत साडेचार वर्षात तुमच्या सर्वाच्या गांवामध्ये,वाडीवस्तीवर कोणकोणती न होणारी व न झालेली विविध विकासकांमे कशाप्रकारे मार्गी लावली हे सांगण्याकरीता आलो आहे.मी पाटण मतदारसंघातील गांवामध्ये केलेला विकास हा सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट आहे. आपल्या विरोधकांना तोच पचणी पडेना झाला आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. विकासाची कास धरुन चालण्याची व विकास करणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची आपल्या पाटण मतदारसंघाला परंपरा आहे तीच परंपरा पुणे-पिपंरी चिचंवड रहिवाशी युवकांनी कायम ठेवावी असे आवाहन करुन तुमच्या गांवाच्या विकासाकरीता आमदार म्हणून माझे कायम पाठबळ आपल्याला राहील केव्हाही व कुठेही हाक मारा आमदार म्हणून मी आपल्या पाठीशी उभा राहीन असेही ते शेवठी बोलताना म्हणाले.  
चौकट :- मतदारसंघातील युवकांनी इतिहास रचण्याचे काम केले.- आ.देसाई.
               2004 ची किंवा 2014 ची विधानसभा निवडणूक असो या दोन्ही निवडणूकांमध्ये पाटण मतदारसंघातील युवकांनी इतिहास रचण्याचे काम केले त्यामुळेच सातारा जिल्हयात सर्वाधिक मते मला मिळाली युवकाच्या या ॠणातून उतराई होणे शक्य नाही.निवडणूकीचा हंगाम आता सुरु होत आहे कधीही आपल्या सुखदु:खात सहभागी न झालेले मतापुरते आता आपल्याकडे येतील. त्यांना सांगा मते मागताय पण, गेल्या पाच वर्षात आमच्या गांवाकरीता तुम्ही काय केले एवढा एकच प्रश्न विचारा. ते नक्कीच निरुत्तर होतील यात शंका नाही असेही आ.देसाई म्हणाले.

Friday 22 February 2019

2019 ला पाटणचा आमदार कोण ? हे पाटण मतदारसंघातील जनतेने ठरविले आहे. आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.



दौलतनगर दि.2२:- पाटण मतदारसंघातील निवडणूकांना आपले विरोधक रती महारतींना आणून विरोधात प्रचार करतात. 2014 च्या निवडणूकीतही रती महारती विरोधकांच्या प्रचाराला पाटणला आले होते. या मतदारसंघाला लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व. शिवाजीराव देसाई यांच्या विचारांची परंपरा आहे. लोकनेते यांच्या पश्चात वाडयात गेलेली तालुक्याची आमदारकी आपल्या प्रामाणीक व निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठया हिकमतीने वाडयातून खेचून आणली होती.त्याच्याही पुढे जावून 2014 च्या निवडणूकीत याच कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेवून 18824 च्या मताधिक्क्याने जिल्हयात सर्वात जास्त मतदान मला मिळवून दिले आहे याची जाणिव मला आहे.ज्या विश्वासाने जनतेने मला आमदार केले आहे त्या विश्वासाने मतदारसंघातील जनतेच्या हिताकरीता मी गेली साडेचार वर्षे मतदारसंघात काम करीत असून मतदारसंघाचा चौफेर विकास कसा करायचा हे आपण दाखवून दिले आहे याच विकासाच्या माध्यमातून 2019 च्या निवडणूकीत पाटण मतदारसंघाचा आमदार कोण असणार ?  हे जनतेने ठरविले असल्याचे प्रतिपादन मदार शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
                मारुलहवेली ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष प्रयत्नातून राज्याच्या अर्थसंकल्पातून सोनाईचीवाडी ते मारुलहवेली व राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत मारुलहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे अशा विविध कामांचा भुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.या दोन्ही कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे. यावेळी युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,ॲड. डी.पी.जाधव,ॲड.मारुती नांगरे,प्रकाशराव जाधव,कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे, पांडुरंग नलवडे,जयवंतराव पाटील पापर्डेकर,पी.एन.माने,रामभाऊ पाटील,दादासो जाधव,राजाराम मोहिते या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघाला लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांनी एक दिशा ठरवून दिली आहे.लोकनेत्यांचे विचार पाटणच्या तळागाळापर्यंत पोहचले आहेत.पाटण तालुका उभा करण्याचे काम लोकनेत्यांनी केली.विकासाचा डोंगर त्यांनी उभा केला परंतू त्यांच्या पश्चात पाटण तालुक्याची काय परिस्थीती होती हे मी नव्याने सांगायला नको, आज याठिकाणी उघडपणे मी पाटण तालुक्यातील डोंगरकपारीतील पाच पन्नास गांवाची नावे दाव्याने सांगेन ज्या गांवाना माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर हे राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना रस्त्याच्या कामांकरीता निधी देवू शकले नाहीत राज्याचे बांधकाम मंत्री असताना त्यांच्या हातात बांधकाम विभागाला वर्षाकाठी दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा अधिकार होता.या हजारो कोटीतील केवळ शे-दोनशे कोटी रुपये त्यांनी तालुक्यात आणले असते तरी तालुक्यातील डोंगरकपारीतील गांवामध्ये बारमाही रस्ते पोहचले असते.परंतू ते त्यांना जमले नाही असे सांगून ते म्हणाले, माजी आमदार पाटणकर यांना बांधकाम खात्याचे मंत्री असताना पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांकरीता जेवढा निधी मंत्री म्हणून आणता आला नाही त्यापेक्षा जादाचा निधी मी केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पाटण मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात आणला आहे. हे मंत्री असताना कराड चिपळूण या मुख्य रस्त्यावरील कराड ते नवारस्ता हा २० ते २५ कोटी रुपयांचा रस्ता केला तालुक्यातील जनतेला वाटले दादांनी मोठे काम केले परंतू ज्यावेळी हा रस्ता वाहतूकीला सुरु झाला तेव्हा जनतेच्या लक्षात आले की आरे दादांनी तर आपल्याच खिशातील पैशाने हा रस्ता केला आहे दररोज पन्नास शंभर रुपयांचा टोल भरा आणि रस्त्यावरुन वाहतूक करा. ही बाब आता जनतेच्या लक्षात आली आहे. मी केवळ आमदार म्हणून केंद्रातून केद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांची एकदाच भेट घेतली व कराड पासून चिपळूणकडे जाणाऱ्या आपल्या मतदारसंघातील घाटमाथ्या पर्यंतच्या रस्त्याला ४१० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला. तोही विना टोलचा. हे जर आमदारांना जमत असेल तर बांधकाम खात्याच्या मंत्र्याना काय अवघड आहे. परंतू विकासाची दुरदृष्टी नसलेले नेतृत्व आपल्या पाटण तालुक्याला २१ वर्षे मिळाले त्यामुळे आपला तालुका अनेक वर्षे विकासाच्या बाबतीत मागे पडला असा आरोप आमदार शंभूराज देसाईंनी केला असून विकासाचे कोणतेही काम न करता निवडणूकीत कोणते ब्रम्हाअस्त्र काढायचे हे आपल्या विरोधकांना चांगलेच माहिती आहे. याला कुणी बळी पडू नका.मतदारसंघातील जनतेच्या पाठींबावर आज एवढया मोठया प्रमाणात विकासाचे काम करण्याची ताकत मला मिळाली आहे ती ताकत जनतेने अशीच कायम माझे पाठीशी ठेवावी आणि ती जनता ठेवेल अशी मला खात्री आहे. नेमका मतदारसंघाचा विकास कोण करतोय हे जनतेने ओळखल्यामुळेच २०१९ च्या निवडणूकीत या मतदारसंघाचा आमदार कोण असेल हेही जनतेने ठरविले असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.उपस्थितांचे स्वागत ॲड.मारुती नांगरे व प्रास्ताविक चेअरमन अशोकराव पाटील यांनी केले.यावेळी युवा नेते यशराज देसाई,डॉ.दिलीपराव चव्हाण, जयवंतराव शेलार यांची भाषणे झाली.

निधी कसा मंजुर करुन आणायचा याचे आमदारांना भान असावे लागते. आमदार शंभूराज देसाईंचा विरोधकांवर हल्लाबोल. लोहारवाडी रस्त्याचा लोकार्पण सोहळा.




दौलतनगर दि.2:- पक्षाच्या मेळाव्यात डुलक्या काढणाऱ्या माजी आमदारांना या मतदारसंघातील जनतेने सलग २१ वर्षे तालुक्याचा आमदार होण्याची संधी दिली. माजी आमदारांप्रमाणे डुलक्या काढत आणि हाताची घडी तोंडावर बोट ठेवून विधानसभा सभागृहात बसलो असतो तर आपल्याला आमदारांना मिळणाऱ्या आमदार फंडावरच समाधान मानावे लागले असते,जनतेच्या विकासासाठी भांडणारा,त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारा आमदार तुम्ही सर्वांनी निवडून दिल्याने कोटयावधी रुपयांचा विकासनिधी मतदारसंघात आणण्यामध्ये मला यश मिळत आहे.विकासकामांचा निधी कसा मंजुर करुन आणावा याचे भान मतदारसंघाच्या आमदारांना असावे लागते.डुलक्या काढून विकासनिधी मिळत नसतो असा हल्लाबोल आमदार शंभूराज देसाईंनी माजी आमदार पाटणकरांचे नाव न घेता केला.
                         लोहारवाडी काळगांव ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाईंनी लोहारवाडी गांवास जिल्हा नियोजन समितीतंर्गत, कोयना भूकंप निधी व राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत पुर्ण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते मौजे कुठरे व धामणी येथेही मंजुर केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सिमा मोरे,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,माजी सदस्य रघूनाथ माटेकर,दत्ताबापू चोरगे,महादेवराव पानवळ,विशाल पवार,सचिन चव्हाण,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक बबनराव पाटील,शिवदौलत बँकेचे संचालक किशोर मोरे, सुरेश पाटील,शंकर पाटील,तानाजीराव चाळके,भरत दुधडे,काकासो सुपुगडे,काळगांव सरपंच जयवंत देसाई,उपसरपंच उत्तम मानुस्करे,काशीनाथ लोहार,सुधाकर काळे,उमेश लोहार,अशोक सवादेकर,दिलीप काळे,संजय लोहार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह येथील प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
                        याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माझी आमदार म्हणुन दुसरीच टर्म आहे.आमदारकीच्या या दोन टर्ममध्ये पाटण मतदारसंघाचा चौफेर विकास कसा करता येईल याकरीताच माझे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. मी मंजुर करुन आणलेल्या विकासकांमाना एवढा निधी येतोय कुठुन? हा विरोधकांना संशोधनाचा विषय वाटू लागला आहे त्यांना या निधीबाबत काही शंका असेल तर त्यांनी शासन दरबारी आपल्या तालुक्याच्या आमदारांचा जनतेच्या हिताकरीता किती पाठपुरावा करीत असतो. याची जावून पहाणी करावी.आत्ताचा आपला आमदार जनतेच्या प्रश्नांसाठी भांडणारा आमदार आहे. आपला आमदार जनतेच्या विकासासाठी भरघोस निधी आणणारा आमदार आहे याची खात्री मतदारसंघातील जनतेला पटली आहे.जनतेच्या विकासासाठी भांडणारा,त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडणारा आमदार जर शासन दरबारी तोंडावर बोट ठेवून राहिला तर या मतदारसंघाचा विकास कसा होणार.आपल्या विरोधकांनी गेली २१ वर्षे हेच केले त्यामुळेच मतदार संघातील जनतेने त्यांना सन्मानाने घरी बसविले.असे सांगून ते म्हणाले लोहारवाडी गावचा रस्ता अतिशय कठीण होता कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करायचा हा निश्चय आमदार झाल्या झाल्याच मी केला होता.आमदारकीच्या पहिल्या दोनच वर्षात या रस्त्याच्या कामाकरीता एकत्रित निधी देण्याची इच्छा असूनही तो देता आला नाही. म्हणून जिल्हा नियोजन समितीतंर्गत १० लाख, कोयना भूकंप निधीमधून १५ लाख व राज्य शासनाच्या २५१५ योजनेतंर्गत १५ लाख असा एकूण ४० लाख रुपयांचा निधी या रस्त्याच्या कामांला मंजुर करुन दिला. अजुनही थोडा रस्ता करणे शिल्लक आहे येत्या आर्थिक वर्षात याकरीता निधी देवून हा रस्ता पुर्ण करुन घेणार असल्याचा शब्द आज याठिकाणी देत आहे. हा रस्ता व्हावा याकरीता या गांवातील नागरिक या विभागाचे यापुर्वीचे माजी आमदार विलासराव पाटील यांच्याकडे गेले होते.त्यांनीही हा रस्ता करण्याचे काम प्रस्तावित केले होते त्यानंतर २००९ ला हा विभाग पाटण मतदारसंघाला जोडला गेला. या गांवाला रस्ता देण्याची वेळ आली तेव्हा माझा ५८० मतांनी पराभव झाला. त्यामुळे हा रस्ता मला करता आला नाही.या रस्त्याला माझाच हात लागायचा होता म्हणून या कामाकरीता शासनाच्या विविध योजनेमधून मी निधी मंजुर करुन दिला.परंतू मला नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे. २००९ ते २०१४ या काळात राज्याचे माजी बांधकाम मंत्री या मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी एक रुपयाचा निधी या गावाच्या रस्त्यावर दिला नाही.यावरुनच त्यांनी मतदारसंघातील इतर विभागातील गांवाचा किती विकास केला असेल हे तुमच्या लक्षात येईल.काळगांव,कुंभारगांव भाग असेल किंवा संपुर्ण पाटण मतदारसंघ असेल मतदारसंघातील बोटावर मोजता येईल अशा गांवामध्ये विकासकामे प्रलंबित आहेत. मतदारसंघाच्या सर्व विभागात चौफेर असा विकास या साडेचार वर्षात करण्याचे काम आपण केले आहे.कोणत्या कामांसाठी कोणत्या योजनेतून कसा आणि किती निधी मंजुर करुन आणायचा याचे भान मतदारसंघाच्या आमदारांना असणे गरजेचे आहे.निधी कुठुनही आणा परंतू ते काम पुर्ण करा ही भूमिका आमदारांनी घेतली पाहिजे आणि हीच भूमिका आपण घेत असल्याने अनेक गांवाचे प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लागण्यास मदत होत आहे असेही ते शेवठी बोलताना म्हणाले. उपस्थितांचे स्वागत विष्णू लोहार यांनी केले व आभार उमेश लोहार यांनी मानले.

पाटण मतदारसंघात मारुलहवेली येथून भगव्या सप्ताहाला सुरुवात. आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते शुभारंभ. महिलांची उपस्थिती उल्लेखनीय.




दौलतनगर दि.22:- शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याच्या संपुर्ण जिल्हयात,तालुक्यात व प्रत्येक गांवामध्ये भगवा सप्ताह सुरु करुन या सप्ताहाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्हयाचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या सहकार्याने हा भगवा सप्ताह सुरु करण्यात आला आहे.याची सुरुवात मारुलहवेली ता.पाटण येथून आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या शुभारंभाला मारुलहवेली गांवातील महिलांची भगवे फेटे बांधून असणारी उपस्थिती ही उल्लेखनीय ठरली.
                        हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ९२ जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ उत्कृष्ट संसदपटु शिवसेना पक्षाचे आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते दौलतनगर येथे करण्यात आला होता.संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व नवनिर्वाचीत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून भगवा सप्ताहाचे आयोजन करुन सदस्य नोंदणी करण्याचे कामांस गती देण्याचे काम करावे असे शिवसेना पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.त्यानुसार पाटण मतदारसंघातील भगव्या सप्ताहाचा शुभारंभ मारुलहवेली येथून करण्यात आला व शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीस सुरुवात करण्यात आली यावेळी या शुभारंभ समारंभास युवा नेते यशराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी, सुरेश पानस्कर,माजी सदस्य जालंदर पाटील,बशीर खोंदू,ॲड.डी.पी.जाधव,ॲड.मारुती नांगरे,प्रकाशराव जाधव, कारखाना व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील शिवसेनेचे येथील प्रमुख शिवसैनिक,कार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट:- मारुलहवेली महिलांच्या फेंटयामुळे भगवेमय.
            आमदार शंभूराज देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत मारुलहवेली गांवामध्ये भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या गांवातील दोनशे अडीचशे माहिलांनी या सप्ताहाचे समारंभाकरीता स्वयंस्फुर्तींने भगवे फेटे बांधून समारंभाला लावलेली उपस्थिती ही उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी होती. महिलांच्या उल्लेखनीय उपस्थितीमुळे आणि त्यांच्या शिरावरील भगव्या फेंटयामुळे मारुलहवेली भगवेमय झाल्याचे दिसून आले.

Thursday 21 February 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडून पाटण मतदारसंघातील १० कामांना ०१ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



­­
दौलतनगर दि.2१:-पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते, सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                             प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील २५  गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व नळ पाणी पुरवठा योजना करणे इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.२२.११.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती.त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण २५ विविध विकासकामांना आवश्यक असणारा २ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजुर होणेकरीताची ही मागणी होती या २५ कामांपैकी १० विकासकांमाना पहिल्या टप्प्यात एकूण १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना दि.११ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे पत्रानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर झालेल्या विकासकामामध्ये कराड चिपळूण रस्ता ते मौजे माथणेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे वनवासवाडी बोंद्री पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ०७.०० लाख,मौजे सुरुल  अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख,मौजे मुरुड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे वजरोशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख, मौजे नवजा अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख,मौजे कामरगाव गोकूळ एस ते सुतारवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १०.०० लाख,मौजे जाधववाडी नुने अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १०.०० लाख, मौजे बोर्गेवाडी डेरवण अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १५.०० लाख व मौजे दुटाळवाडी नुने येथे सार्वजनिक सभागृह बांधणे ०७.०० लाख असे एकूण १० विकासकांमाना १ कोटी ०९ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असून पाणी पुरवठा विभागाकडील ४ विकासकामांना ४५ लाख रुपयांचा व सार्वजनीक बांधकाम विभागाकडील पोहोच रस्ते व सार्वजनीक सभागृह बांधणेची ११ कामे अशी एकूण १५ कामांचे प्रस्ताव अंदाजपत्रकासह कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मान्यतेकरीता दुसऱ्या टप्प्यात सादर केली आहेत. या कामांकरीता १ कोटी ६९ लाख रुपयांची आवश्यकता असून येत्या अधिवेशनात याही १५ विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेवून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द करुन याही कामांना याच आर्थिक वर्षात सुरुवात करण्यात येणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

आमदार शंभूराज देसाईंच्या चुलत आज्जी वत्सलाताई शिवराम देसाई ­­यांचे वृध्दापकाळाने निधन.


   
                    

         दौलतनगर दि.२१:-महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या भावजय,कै.शिवराम श्रीपतराव देसाई यांच्या पत्नी व पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या चुलत आज्जी श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई रा.मरळी,ता.पाटण यांचे वयाच्या 90 वर्षी वार्धक्याने निधन झाले.
                                    श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई यांचे निधनाने मरळी परिसरासह देसाई कूटुंबीयावर शोककळा पसरली असून मरळी ता.पाटण येथे शोकाकुल वातावरणात त्यांचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कै.वत्सलाताई देसाई ह्या ताई या आदरातिथ्य नावाने सर्वत्र परिचित होत्या. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या त्या चुलत आज्जी असून त्यांचे चिरंजीव रमेश देसाई  देसाई हे निवृत्त मोटर वाहन निरीक्षक असून श्रीमती वत्सलाताई शिवराम देसाई यांचे यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा व तीन मुली,सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मरळी या त्यांच्या मुळ गावी शुक्रवार दि.22/02/2019 रोजी सकाळी 10.00 होणार आहे असे देसाई परिवारामार्फत सांगण्यात आले आहे.


Wednesday 20 February 2019

कोयना पर्यटनातील विकासकामे करण्याकरीता दुसऱ्या टप्प्यात २ कोटी ०५ लाखांचा निधी मंजुर. निधी मान्यतेचा १८ फेब्रुवारी शासन निर्णय पारित. - आमदार शंभूराज देसाईंची माहिती





दौलतनगर दि.२०:- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता कोयना पर्यटनाचा संपुर्ण आराखडा शासनाकडे मान्यतेकरीता सादर केला होता त्यानुसार कोयना पर्यटनाच्या कामांस शासनाने प्रत्यक्षात सुरुवात करुन कोयना पर्यटनातील कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस पहिल्या टप्प्यात शासनाने मंजुरी दिली. तर आराखडयातील पर्यटनाच्या सुचविलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही निधी मंजुर केल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दि.१८ फेब्रुवारी, २०१९ रोजी पारित केला असून कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेस २ कोटी ५० लाख व २ कोटी ०५ लाख असे एकूण ४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                    आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण या कोयना धरणाच्या १० कि.मी चा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे जिल्हाधिकारी, सातारा यांच्यामार्फत या विभागातील महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता अंदाजपत्रक तयार करुन घेतले होते सदरचे अंदाजपत्रक हे सविस्तर प्रस्तावासह जिल्हाधिकारी,सातारा यांचेमार्फत राज्य शासनास सादर केले आहे. प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता संबधित विभागांना शासनाने निधी उपलब्ध करुन दयावा अशी माझी शासनाकडे आग्रही मागणी होती.राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन हे कोयना दौऱ्यावर आले तेव्हा या कोयना पर्यटन आराखडयाच्या संदर्भात मी जलसंपदामंत्री यांचे लक्ष वेधून कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी केली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात जलसंपदा विभागाकडून या विभागाचे कोयना सिंचन विभाग,कोयनानगर यांचेमार्फत कोयना विश्रामगृहाचे बांधकाम करणेकरीता एकूण आवश्यक असणारा २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला.या कामांची १ कोटी ९३ लाख रुपयांची निविदाही प्रसिध्द झाली. तर दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाच्या दृष्टीने आराखडयात सुचविलेल्या कोयनानगर येथील अस्तित्वात असणाऱ्या नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयनानगर येथील धरण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयना धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नुतनीकरण करणे,कोयनानगर येथे पर्यटकांना बसण्याकरीता ठिक ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे व कोयना धरणातील जलाशयामध्ये बोटिंगची व्यवस्था करणे या कामांकरीता एकूण २ कोटी ०५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे मंजुर करण्यात आला असून या शासन निर्णयामध्ये जिल्हाधिकारी,सातारा यांनी त्यांच्या स्तरावर कार्यान्वयीन यंत्रणा निश्चित करावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.शासनाकडे सादर केलेल्या कोयना पर्यटनाच्या आराखडयातील बहूतांशी कामांना राज्य शासनाने जलसंपदा व पर्यटन विभाग यांच्यामार्फत आवश्यक असणारा निधी मंजुर करुन कोयना पर्यटनाला चालना देण्याचे काम केले आहे. या निधीमुळे कोयना पर्यटनाच्या कामांना गती मिळाली असून लवकरच या कोयनानगरचे आणि कोयनानगर परिसराचे रुपडे पालटणार असल्याचा आनंद होत आहे. सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. कोयना पर्यटनाच्या आराखडयात अजुनही काही महत्वाच्या कामांना निधी मिळणे आवश्यक आहे सदरच्या उर्वरीत राहिलेल्या कामांनाही आवश्यक असणारा निधी मिळावा याकरीता मी येणाऱ्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन व पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
 चौकट :- केवळ घोषणा नाही तर करुन दाखविले.
              कोयना पर्यटनाच्या आराखडयाला राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून येथील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या ठिकाणांची तसेच महत्वाची प्रेक्षणीय स्थळांची निर्मिती व दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारा निधी कोयना पर्यटनाच्या माध्यमातून मंजुर करुन आणणार असे मी सांगितले होते. मी केवळ घोषणा करीत नाही तर त्याचा पाठपुरावा करुन जे जे ठरवतो ते दाखवून देतो त्याचप्रमाणे कोयना पर्यटनाची नुसती घोषणा केली नाही तर यातील कामांना निधी मंजुर करुन आणला आणि ते करुन दाखविले.


शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील २२ गावांना ०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १८ फेब्रुवारी, २०१९ रोजी शासन निर्णय पारित. आमदार शंभूराज देसाई.






­­
 दौलतनगर दि.२०:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री व ग्रामविकास राज्यमंत्री यांनी पाटण मतदारसंघातील एकूण २२ विविध विकासकामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे आभार मानले आहेत.
               आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील २२ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते व सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी मंजूर होणेबाबत दि.३१.०१.२०१९ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.१८ फेब्रुवारी,२०१९ रोजीचे शासन निर्णयानुसार एकूण २२ विविध विकास कामांकरीता एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव कामांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये  मौजे खिलारवाडी गावपोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, भिलारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख,खांडेकरवाडी (सोनवडे) अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकण ०७.०० लाख, खळे  ते मालदन रस्ता खडीकरण,डांबरीकरण २०.०० लाख,खळे गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजकडे जाणारा अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,कडवे बुद्रुक येथील लिंगाळेवस्ती ते ग्रामदैवत पावनाईदेवी मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, दौलतनगर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे ०७.०० लाख,रासाटी येथे गटर बांधकाम ०७.०० लाख,टेळेवाडी कोरीवळे येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,मठवाडी (महिंद) येथील रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख, गिरेवाडी रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०७.०० लाख,आडूळपेठ ते डिगेवाडी येथील दत्त मंदिरासमोरील रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख,हेळवाक मुस्लिमवस्ती नवीन गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण ०७.०० लाख, कुंभारगाव अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, मंद्रुळहवेली अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, लोहारवस्ती (केरळ) येथील अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, क्रांतीनगर (नाडे) येथील मागासवर्गीय व मातंगवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण १०.०० लाख, तोरणे येथील बौध्दवस्ती रस्ता खडीकरण,डांबरीकरण ०९.०० लाख, सुपने मंडलातील तांबवे,ता.कराड येथील मशिदीसमोर सभामंडप ०७.०० लाख व पाडळी (केसे),ता.कराड येथील मुस्लिमवस्ती येथे सभामंडप ०७.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण ०२ कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचा झंझावात. आमदार शंभूराज देसाईंचा दावा.



दौलतनगर दि.20:- पाटण मतदारसंघातील सुपने मंडल हे पाटण मतदारसंघाला जोडून 10 वर्षाचा काळ लोटला,या विभागाचे नेतृत्व यापुर्वी कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील हे करीत होते.या विभागातील नागरिकांना त्यांनी अगणित विकासाची कामे दिली त्यांच्या काळात जसा विकासाचा झंझावात या मंडलामध्ये सुरु होता तोच झंझावात आताही सुरु आहे त्यांच्याएवढे काम करणे केवळ पाच वर्षात शक्य नाही परंतू या मंडलातील प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये विकासाचे काम पोहचविण्याचा माझा गत साडेचार वर्षात प्रयत्न राहिला आहे. असा दावा आमदार शंभूराज देसाईंनी केला असून सुपने मंडलातील प्रत्येक गांवामध्ये आपण विकासाचे काम दिले आहे विकासाचा हा झंझावात असाच कायम सुरु ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील या विभागालाही पाटण मतदारसंघातील इतर विभागांच्या प्रमाणे विकास कामांत झुकते माप दिले जाईल असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेआहे.
                म्होर्पे ता.कराड याठिकाणी सुपने मंडलातील मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबे मळा,थोरातमळा (प.सुपने), वसंतगड, आबईचीवाडी,सुपने व केसे येथे आमदार शंभूराज देसाईंनी राज्य शासनाच्या 2515 योजनेतंर्गत तसेच जिल्हा नियोजन समितीतंर्गत मंजुर करुन आणलेल्या निधींच्या विविध कामांचाभुमीपूजन कार्यक्रम आमदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.या विभागातील रस्त्यांच्या तसेच साकव पुलांच्या कामांसाठी त्यांनी सुमारे १ कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेलही विविध काम आमदार शंभूराज देसाईंनी एका वर्षातच मार्गी लाल्याने सुपने मंडलातील नागरिकांमध्ये समाधान दिसून आले.यावेळी शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,पं.स सदस्य सविता संकपाळ, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,प्रभाकर शिदे,रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, बबनराव शिंदे सर,कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील,शिवाजीराव शिंदे,तुकाराम डुबल,हणंमत निकम, डॉ.पांडुरंग निकम,लक्ष्मण देसाई,सरपंच तुकाराम कोकरे,संदीप सावंत,सुनिल पाटील,संदीप साळुंखे,अर्जुन कळंबे,अमित पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक बबनराव भिसे आदी मान्यवरांसह मौजे भोळेवाडी,म्होर्पे,कळंबेमळा,थोरातमळा (प.सुपने),वसंतगड,आबईचीवाडी,सुपने व केसे येथील प्रमुख पदाधिकारीकार्यकर्ते तसेच नागरिक व महिलांची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी बोलताना आमदार देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघात सुपने मंडलाने दोन विधानसभा निवडणूकीत पाटणच्या लोकप्रतिनिधींना मतदान करण्याचे काम केले 2014 च्या विधानसभा निवडणूकीत या विभागाने मला भरघोस असे मताधिक्कय देवून माझे 18824 च्या मताधिक्कयामध्ये मोलाचा वाटा उचलला याचा मला आनंद आहे. 2009 च्या  विधानसभा निवडणूकीतही या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. केलेल्या मतदानाच्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला ‍किती विकासाची कामे दिली किती नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडविले हेही पहाणे तितकेच गरजेचे आहे.येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे.‍ शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधील सत्ताधारी सदस्य म्हणून मला या साडेचार वर्षात युतीच्या शासनाने कोटयावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांकरीता दिला त्यानिधीतील बहूतांशी वाटा या सुपने मंडलामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला.आज या विभागातील प्रत्येक गांवामध्ये विकासाचे काम सुरु आहे. विकासाचे काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची परंपरा या विभागाला आहे तीच परंपरा या विभागाने कायमस्वरुपी जपावी विकासाची प्रक्रिया ही कधीही न थांबणारी आहे. ज्यांना गरज आहे ते काम त्या त्या लोकप्रतिनिधींने देणे गरजेचे आहे.केवळ ही निवडणूक ते ती निवडणूक नागरिकांना मते मागण्यापुरते त्यांच्या दारात जायचे व मते मागून गेल्यावर त्यांच्या सुखदु:खात ढुंकूनही पहायचे नाही ही आपल्या विरोधंकाची पध्दत आहे.परंतू आपण तसे केले नाही या विभागातील समस्या जाणून घेणेकरीता आपण या विभागाचा स्वतंत्र असा जनता दरबार घेतला अनेक नागरिकांचे प्रश्न आपण जागेवर सोडविले तसेच विकासाकामांची ज्या ज्या गांवाना व वाडयावस्त्यांना आवश्यकता आहे त्या त्या गांवाना व वाडयावस्त्यांना आपण विकासाचे काम देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज एका दिवसात आपण सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांच्या कामांची भूमिपुजने केली यापुर्वीच्या माजी आमदारांच्या काळात सन  2009 ते 2014 मध्ये एवढी विकासाची कामे या विभागात त्यांनी कधी दिली आहेत कायाची तुलना सुपने मंडलातील नागरिकांनी करावी. विकासाच्या कामांकरीता यापुढेही भरघोस असा निधी या विभागाला दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.