Saturday 31 August 2019

आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्वाखाली नहिंबे-चिरंबे संपुर्ण गावाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. संपुर्ण गांवाने घेतला हाती भगवा झेंडा.





दौलतनगर दि.३१:- अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम राहिलेल्या कोयना पुनर्वसित असणाऱ्या नहिंबे-चिरंबे या गांवाने पुनर्वसित गावठाणातील त्यांच्या मुलभूत सुविधांची कामे राष्ट्रवादी पक्षाकडून सत्तेत असताना अनेकदा मागणी करुनही झाली नसल्याने राष्ट्रवादी पक्षाला व मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाला रामराम करीत या संपुर्ण गांवाने एकत्रितपणे निर्णय घेत शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली हाती भगवा झेंडा घेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या संपुर्ण नहिंबे-चिंरबे गांवातील नागरिक महिलांचे स्वागत आमदार शंभूराज देसाईंनी केले. व पुनर्वसित गावठाणांतील त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी ग्रामस्थ व महिलांना दिली.
              पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित असणाऱ्या नहिंबे-चिंरबे या गांवातील सर्व नागरिकांनी गांवातील महिलांना बरोबर बैठक घेवून गावच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता सातत्याने राष्ट्रवादी पक्षाकडे व पक्षाच्या नेतृत्वाकडे मागणी करुनही आपली मागणी पुर्ण होत नसल्याने आपल्या गांवाच्या मुलभूत सुविधा न मागता देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठाम उभे राहू या असा एकमुखाने निर्णय गावामध्येच घेतला व सर्व गांवानी एकत्रित येवून नहिंबे-चिरंबे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह सरंपच, उपसरंपचांनी आमदार शंभूराज देसाईंची त्यांचे दौलतनगर येथील निवासस्थानी भेट घेतली व आम्ही संपुर्ण गांव आपले नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नहिंबे-चिरंबे गावच्या सरपंच स्नेहल सुनिल साळवी,उपसरपंच शैलेश कदम,सदस्य चंद्रकांत साळवी, सदस्या सुशिला यादव,योगिता साळुंखे, साक्षी साळुंखे, सुरेश साळवी,किरण साळवी,सुरेश साळवी, मानसिंग साळुंखे,यादवराव साळुंखे,अधिक साळुंखे,दिपक साळुंखे,राजेंद्र घोरपडे,अरूण पाळांडे,राजेंद्र सावंत, प्रतिभा साळुंखे,वनिता साळुंखे,सुपर्णा साळवी,ओंकार साळवी,प्रकाश साळुंखे,प्रविण साळुंखे,बळीराम साळवी, वसंत साळवी, संदेश साळवी,संजय साळवी,पांडुरंग पाळांडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला व यापुढे आम्ही सर्वजण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने स्विकारत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
               आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर नहिंबे-चिंरबे गांवातील महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही गत आठ वर्षापासून आमच्या पुनर्वसीत गावठाणांतील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करणेकरीता राष्ट्रवादी पक्षाचे पाटण तालुक्यातील नेते यांचेकडे पाठपुरावा करीत होतो मात्र आमच्या कामांकडे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने लक्षच दिले नसल्याने आम्ही गत आठ वर्षापासून पाण्याकरीता वणवण करीत आहोत. आपला विकासकामांचा अहवाल वाचलेनंतर आमचे गावातील सर्व ज्येष्ठ, वयोवृध्द तसेच महिलांनी एकत्रित येवून आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व स्विकारुन गांवातील पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण करुन घेवू असा आम्ही निर्णय घेतला आणि आपली भेट घेणेकरीता आलो असे सांगितल्यानंतर तात्काळ आमदार शंभूराज देसाईंनी या ग्रामस्थांची व महिलांची दखल घेत राष्ट्रीय पेयजलच्या सन २०१९ मधील नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून मी उद्याच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर साहेब यांचेशी चर्चा करुन आपले गावांतील नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत करण्याचा प्रयत्न करतो असे जाहीर केले हे नुसते जाहीर करीत नाही तर नहिंबे-चिंरबे गावाला पिण्याच्या पाण्याची योजना मंजुर करण्याची जबाबदारी आता माझी आहे असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी सर्वांना सांगितले.

Friday 30 August 2019

टक्केवारीचा आरोप सिध्द करा होत नसेल तर आरोप मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा आमदार शंभूराज देसाईंचे सत्यजितसिंह पाटणकरांना जाहीर आव्हान.





दौलतनगर दि.३०:- मी गत पाच वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मला पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी करणेकरीता पाटण मतदारसंघातील जनता सज्ज झाली असताना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा भरघोस मतांनी स्पष्ट पराभूत समोर दिसू लागल्याने माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकरांचे संतुलन आताच ढळू लागले आहे. त्यामुळे माजी आमदार पुत्र माझेवर वैफल्यग्रस्त विधाने तसेच खोटेनाटे आरोप करुन  नको ती सहानुभूती मिळवू पहात आहेत परंतू माजी आमदारपुत्रांना माझे सांगणे आहे, पाटण मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे.तुमच्या आरोपांनी ती भीक घालणार नाही.आमच्यावर जो काही टक्केवारीचा आरोप सत्यजितसिंह पाटणकर करीत आहेत तो आरोप त्यांनी पुराव्यानिशी सिध्द करावा,सिध्द होत नसेल तर आरोप मागे घ्यावा नाहीतर भविष्यात येणाऱ्या काही दिवसातच बिनबुडाचे आरोप करणाऱ्यां पाटणकरांनी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे जाहीर आव्हान आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिले आहे.
                  आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे, सत्यजितसिंह पाटणकर आणि त्यांचे पिताश्री धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे भासवत असले तरी गेल्या २६ वर्षाच्या आमदारकीच्या काळात आणि मंत्री पदाच्या काळात त्यांनी काय काय उद्योग केले आहेत हे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहेत. मंत्रालयात सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नॅशनल हायवेचे ठेकेदार काय करीत होते हे माजी मंत्र्याच्या बरोबर तेव्हा काम करणाऱ्या आणि आता आमच्या पक्षात आलेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खुमासदारपणे आम्हास सांगितले आहे.माजी आमदारांना सन १९८६ च्या विधानसभा निवडणूकीला मतदारसंघातील जनतेने पैसा गोळा करुन दिला होता असे आपणच सांगता मग जनतेकडून पैसे गोळा करुन विधानसभेची निवडणूक लढलेल्या माजी आमदारांनी त्यानंतरच्या पाच विधानसभेच्या निवडणूका खेळायला यांचेकडे पैसे आले कुठुंन? पाटणकरांकडून लढणाऱ्या प्रत्येक निवडणूका या त्यांचेकडील धनशक्ती विरुध्द आमची जनशकती अशाच प्रकारे यापुर्वीच्या निवडणूका झाल्याचा पाटण मतदारसंघाचा इतिहास आहे. विधानसभा निवडणूकामध्ये कोटयावधी रुपयांचा चुराडा करायची सवय याच पाटणकरांनी पाटण मतदारसंघात लावली आणि त्यांचे हुशार चिरंजीव आमच्यावर टक्केवारीचा आरोप करीत आहेत. माजी आमदारपुत्र आरोप करा परंतू त्याचे पुरावे अगोदर सादर करा. बिनबुडाचे आरोप ना आम्ही सहन केले आहेत ना मतदारसंघातील जनतेने. मतदारसंघातील डोंगर पठारावरील गोरगरीब जनतेच्या जमिनी पवनचक्की प्रकल्पांना विकून त्या कंपन्यांच्या मालकांकडून गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पाटणकर पितापुत्रांनी आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा उद्योग आतातरी बंद करावा. या तालुक्याचा आमदार म्हणून मी गेल्या पाच वर्षात पाटण मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर नवी आव्हाने स्विकारण्याकरीता पाटण मतदारसंघातील जनता मला पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणूकीत मागच्यापेक्षा भरघोस अशा मतांनी आमदार करण्याकरीता सज्ज झाली आहे आणि माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकरांची पुन्हा एकदा भरघोस मतांनी पाठ लावण्याची तयारीत असताना तालुक्याच्या आमदारांनी एवढी कामे मतदारसंघात केली आहेत आता त्या कामांपुढे आपले कसे होणार या भितीने आणि स्पष्टपणे पराभव पुढे दिसत असल्यामुळे सत्यजितसिंह पाटणकर हतबल झाले आहेत त्यातच ते ज्या पक्षातून निवडणूक लढवायला उतावळे झाले आहेत त्या पक्षाला दिवसेंदिवस गळतीच लागली आहे. तालुक्याचे आमदार सगळयाच ठिकाणी आपल्याला भारी पडत असल्यामुळे माझी प्रतिमा मलीन कशी होईल याकरीता सत्यजितसिंह पाटणकरांचे प्रयत्न सुरु आहेत परंतू पाटणकरांच्या या प्रयत्नांना यश मिळणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. येणारी विधानसभा निवडणूक निवडणूकीप्रमाणे होईल मात्र निवडणूकीत पाटणकरांनी माझेवर आरोप करताना विचार करुन आरोप करावेत बिनबुडाचे आरोप केले तर जशाच तसे उत्तर माजी आमदारपुत्रांना दिले जाईल याचे भान त्यांनी ठेवावे. असेही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना शेवठी ठणकावले आहे.

Thursday 29 August 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतंर्गत पाटण तालुक्यातील दोन रस्त्यांच्या कामांना ०१ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीस शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.





दौलतनगर दि.2९:- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षात सुचविलेल्या  मरळी ते कदमवाडी व कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता या दोन रस्त्यांच्या कामांना एकूण ०१ कोटी ८७ लाख ०६ हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांचा प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२८ ऑगस्ट,२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये एकूण १० रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती केली होती त्यानुसार ०८ कामांना शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ०७ जून, २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता दिला असल्याचा शासन निर्णय पारित केला होता यामध्ये बॅच २ मध्ये कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता १.२०० किमी व मरळी-मंगेवाडी ते कदमवाडी रस्ता १.५०० किमी असे एकूण दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळणेकरीताचे प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे सादर झाले होते मात्र या मान्यता मिळाली नव्हती त्यास ग्रामविकास विभागाने दि.२८ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता १.२०० किमी च्या रस्त्याकरीता ९८ लाख ८८ हजार व मरळी-मंगेवाडी ते कदमवाडी रस्ता १.५०० किमीकरीता ८८ लाख १८ हजार रुपये निधी मंजुर केला आहे. या दोन रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ०१ कोटी ८७ लाख ०६ हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्यांची कामे मंजुर करुन आणलेबाबत या दोन्ही गांवातील नागरिकांनी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष आभार मानले आहेत.

Wednesday 28 August 2019

आमदार शंभूराज देसाईंचे संकल्पनेतून पाटण मतदारसंघात शनिवारी एकाच दिवशी १२४ गावांत विविध विकासकामांची भूमिपुजने




दौलतनगर दि.2८:-  युतीच्या शासनाकडे २०१४ ते २०१९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गांवातील विकासकामांकरीता राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षातून तसेच योजनेतून पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला असून आमदार शंभूराज देसाईंच्या संकल्पतेतून सन २०१८ व २०१९ या आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या एकूण २१६ कामापैकी १२४ विविध विकासकामांची भूमिपुजने एकाच दिवशी एकाच वेळी शनिवार दि.31.08.2019 रोजी दुपारी 02.00 वा पाटण विधानसभा मतदारसंघातील या १२४ गांवामध्ये घेण्याचे नाविन्यपुर्ण नियोजन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे. आमदार शंभूराज देसाईंच्या या नाविन्यपुर्ण संकल्पनेतून अशा प्रकारचा भूमिपुजन समारंभ पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच होत आहे. या विविध विकासकामांमध्ये मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील जनतेला उपयुक्त असणारी जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करणारी ग्रामीण रस्त्यांची, अंतर्गत रस्त्यांची,तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना व सार्वजनीक सभागृहे या कांमाचा समावेश असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
               आमदार शंभूराज देसाईंनी या नाविण्यपुर्ण संकल्पनेसंदर्भात सांगितले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी युती शासनाच्या माध्यमातून, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे विकसनशील व कुशल नेतृत्वाखाली तसेच शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे कुशल नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षातून तसेच योजनेतून कोटयावधी रुपयांचा निधी सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये आणण्यात मला यश मिळाले आहे. या पंचवार्षिकमध्ये मी पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा जाहीरपणे मी मतदारसंघातील जनतेसमोर मांडला असून सन २०१८ व २०१९ या आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील जनतेला उपयुक्त असणारी जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करणारी ग्रामीण रस्त्यांची, अंतर्गत रस्त्यांची,तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना व सार्वजनीक सभागृहे या विविध  विकासकामांची भूमिपुजने करुन या कामांना सुरुवात करणेकरीता मंजुर झालेल्या एकूण २१६ कामापैकी १२४ विविध विकासकामांची भूमिपुजने एकाच दिवशी एकाच वेळी शनिवार दि.31.08.2019 रोजी दुपारी 02.00 वा पाटण विधानसभा मतदारसंघातील या १२४ गांवामध्ये घेण्याचा नाविन्यपुर्ण उपक्रम मतदारसंघातील जनतेसमोर मी मांडला आणि त्यापध्दतीने अशा प्रकारे भूमिपुजन घेण्याचे नियोजन करण्यात आले. पाटण विधानसभा मतदारसंघात शनिवार दि.31.08.2019 रोजी दुपारी 02.00 वा एकाच दिवशी एकाच वेळी या १२४ गावांमध्ये हे भूमिपुजनाचे कार्यक्रम 124 गांवातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे व आमचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते आयोजीत करण्यात आले आहेत मी स्वत: अतिशय ग्रामीण व डोंगरी भागातील एक ते दोन गांवातील कामांचे भूमिपुजने करणार आहे. शनिवारी एकूण १५ कोटी ४० लाख ९० हजार रुपये निधीच्या कामांचे भूमिपुजन करण्याचा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुंभारगांव भागामध्ये १२, काळगांव विभाग ०७, कोयना विभाग २०, चाफळ ०६, ढेबेवाडी १९, तारळे १०, नाटोशी मोरणा भाग १२, नाडे विभाग ०५, पाटण विभाग १०, मरळी विभाग ११, मल्हारपेठ विभाग ०३, मारुलहवेली ०५ व सुपने मंडल ०४ अशी एकूण १२४ भूमिपुजने घेण्यात येणार आहेत. हा नाविन्यपुर्ण उपक्रम पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच राबविला जात आहे त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात सर्व उत्साहाचे वातावरण आहे. या नाविन्यपुर्ण उपक्रमाबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे कौतुक करीत त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Tuesday 27 August 2019

राज्य शासनाने घेतला नोकरीच्या मेगाभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना ५ % व भूकंपग्रस्तांना २% जागा जाहिरातींमध्ये आरक्षित ठेवणेचा निर्णय . आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीला यश.



                                                                      


दौलतनगर दि.2८:- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली युतीच्या शासनाने घोषित केलेल्या नोकरीच्या मेगाभरतीमध्ये शासकीय सेवेत समाविष्ठ करावयाच्या राज्यातील प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांना अनुक्रमे ५ % व २ % कोटा नोकरीच्या प्रत्येक जाहिरातींमध्ये आरक्षित ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय युतीच्या शासनाने घेतला असून या धोरणात्मक निणर्याकरीता मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व युती शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आदेशावरुन सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री ना.मदन येरावार यांनी यासंबधी आपले मागणीप्रमाणे शासनाने निर्णय घेतला असल्याचे लेखी पत्र आमदार शंभूराज देसाईंनी पाठविले आहे.
              नोकरीच्या मेगाभरतीमध्ये शासकीय सेवेत समाविष्ठ करावयाच्या राज्यातील प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांना शासनाने ठरवून दिलेप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना ५ % व भूकंपग्रस्तांना २% जागा  आरक्षित ठेवण्याचे शासनाने धोरण ठरवून दिले होते मात्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली युतीच्या शासनाने घोषित केलेल्या नोकरीच्या मेगाभरतीमध्ये नोकरीच्या प्रत्येक जाहिरातींमध्ये प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त बाधितांचा असणारा कोटा आरक्षित ठेवण्यात येत नसलेबाबतची बाब पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व युती शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून देणेकरीता मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून याबाबतचे पत्र देवून चर्चा करुन ही बाब मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस निदर्शनास आणून दिली. या पत्रामध्ये त्यांनी मुख्यमंत्री यांना आपले नेतृत्वाखाली राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरीची मेगाभरती करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे त्याबद्दल प्रथमत: त्यांनी मुख्यमंत्री ना.फडणवीस यांचे पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने मनपुर्वक आभार व्यक्त केले. व आपले महाराष्ट्र राज्यामध्ये मोठया प्रमाणात प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असून माझे सातत्याच्या विनंतीवरुन आपण दि.18 डिसेंबर,2015 रोजी पाटण तालुक्यासह संपुर्ण राज्यातील भूकंपग्रस्तांना भूकंपाचे दाखले देण्याचा धोरणात्मक निर्णयही घेतला आहे.या धोरणात्मक निर्णयामुळे आमचे पाटण तालुक्यातील सुमारे 55213 एवढया भूकंपग्रस्तांसह राज्यातील सर्व विभागातील भूकंपग्रस्तांना या दाखल्यांचा लाभ होणार आहे. पाटण तालुक्यातील सुमारे दोन ते अडीच हजार भूकंपबाधित कुटुंबातील युवकांनी नोकरीकरीता भूकंपाचे दाखलेही काढून ठेवले आहेत.तसेच आमचे पाटण तालुक्यात कोयना धरणांसह इतर धरणातील प्रकल्पग्रस्तांचीही संख्या मोठया प्रमाणांत आहे.शासकीय सेवेच्या नोकरीच्या मेगाभरतीच्या जाहिराती प्रसिध्द करताना या जाहिरातींमध्ये राज्यातील भूकंपबाधित भूकंपग्रस्तांचा असणारा 2 टक्के व प्रकल्पग्रस्तांचा असणारा 5 टक्के कोटा हा शासनाने जाहिर केलेला आहे.त्याप्रमाणे शासकीय सेवेच्या नोकरीकरीता हा भूकंपग्रस्तांचा व प्रकल्पग्रस्तांचा कोटा आरक्षित ठेवण्यात यावा जेणेकरुन याचा लाभ राज्यातील भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्तांना होईल अशी मागणी केली होती.त्यानुसार शासनाने जाहिर केलेल्या शासकीय सेवेच्या नोकरीच्या मेगा भरतीच्या जाहिराती प्रसिध्द करताना या जाहिरातींमध्ये राज्यातील भूकंपबाधित भूकंपग्रस्तांचा असणारा 2 टक्के व प्रकल्पग्रस्तांचा असणारा 5 टक्के कोटा आरक्षित ठेवत तसा उल्लेख संपुर्ण शासकीय नोकरीच्या मेगाभरतीच्या जाहिरातीमधून करण्यात येण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी घेतला व त्यांचे आदेशाने यासंबधीची कार्यवाही देखील सुरु झाली. आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे मागणी केलेनुसार राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री ना.मदन येरावार यांनी आमदार शंभूराज देसाईंनी लेखी पत्र देत आपण दि.२१.१२.२०१८ रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी लिहलेल्या पत्राच्या अनुषगांने आपणांस कळविण्यात येते की, विभागाने दि.०६ सप्टेंबर,२०१८ च्या परिपत्रकान्वये राज्यातील भूकंपग्रस्त तसेच इतर सर्व समातंर आरक्षण घटकांची विहित आरक्षणानुसार काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत सुचना दिल्या आहेत तसेच दि.२८.१२.२०१८ च्या पत्रान्वये विविध पदभरतीमध्ये समातंर आरक्षणाची पदे विहित आरक्षणाप्रमाणे निश्चित करुन भरणेबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या सचिवांना सुचना देण्यात आल्या असल्याचे म्हंटले आहे. या धोरणात्मक निर्णयाबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस  व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री ना.मदन येरावार यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Saturday 24 August 2019

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचा दि.२७ ऑगस्ट रोजी १९ वा पुण्यस्मरण दिन आमदार शंभूराज देसाई अभिवादन करण्यास उपस्थित राहणार.





दौलतनगर दि.२४:- सन 1999 ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचा दि. 27 ऑगस्ट रोजी,२०१९ रोजी १९ वा पुण्यस्मरण दिन पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे स्मारक भूडकेवाडी येथे आयोजीत करण्यात आला आहे. शहिद जवान कै.गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन आमदार शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन करण्यात येणार आहे.
                          या कार्यक्रमास आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, शहीद जवान यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे, बंधू विठ्ठल मोरे, भूडकेवाडी गावच्या सरपंच सौ.संध्या भिमराव मोरे हे मान्यवर तसेच तारळे विभागातील पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास भूडकेवाडी ग्रामस्थ तारळे विभागातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  शहीद जवान कै.गजानन मोरे मित्रमंडळ भूडकेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचा दि.२७ ऑगस्ट रोजी १९ वा पुण्यस्मरण दिन आमदार शंभूराज देसाई अभिवादन करण्यास उपस्थित राहणार.




दौलतनगर दि.२४:- सन 1999 ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचा दि. 27 ऑगस्ट रोजी,२०१९ रोजी १९ वा पुण्यस्मरण दिन पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे स्मारक भूडकेवाडी येथे आयोजीत करण्यात आला आहे. शहिद जवान कै.गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन आमदार शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन करण्यात येणार आहे.
                          या कार्यक्रमास आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, शहीद जवान यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे, बंधू विठ्ठल मोरे, भूडकेवाडी गावच्या सरपंच सौ.संध्या भिमराव मोरे हे मान्यवर तसेच तारळे विभागातील पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास भूडकेवाडी ग्रामस्थ तारळे विभागातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  शहीद जवान कै.गजानन मोरे मित्रमंडळ भूडकेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Friday 23 August 2019

पुरग्रस्तांना न्याय दयायला कोण अपयशी ठरले हे पहायला अन् माझेवरील आरोपाची उत्तरे घ्यायला सत्यजितसिंह समोरासमोर या. आमदार शंभूराज देसाईंचे सत्यजितसिंह पाटणकरांना जाहीर आवाहन




दौलतनगर दि.2४:- सत्यजितसिंह पाटणकर महाशय, तुम्हाला वाडयात बसून काही कामे नाहीत म्हणूनच पत्रके काढायला वेळ मिळतोय, माझे तसे नाही मला जनतेने तुम्हाला घरी बसवून चांगल्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे.यावरुनच तुमची निष्क्रीयता आणि पापाचा घडा किती भरला आहे हे दिसून येत आहे. तुमच्याच पापाचा घडा रिता करायला आता पाटण मतदारसंघातील जनता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पाटण मतदारसंघातील पुरग्रस्तांना न्याय दयायला कोण धावले आणि कोण धावण्याचे नाटक करीत आहे हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. राहता राहिला प्रश्न माझेवरील आरोपांचा पाटणकर महाशय आरोप करताना जरा अभ्यास करा बघेल तेव्हा तेच तेच आरोप येणाऱ्या प्रत्येक पत्रकात करताय. पत्रकातून आरोप करण्यापेक्षा हिम्मत असेल तर माझेवरील आरोपाची उत्तरे घ्यायला आणि पुरग्रस्तांना न्याय दयायला कोण अपशयी ठरले हे पहायला एकदा जनतेच्या समोरासमोर या असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिले आहे.
              आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की,पाटणच्या युवा नेत्यांचा बालिशपणा वयाची पन्नाशी ओलंडली तरी कधी जाणार हे न सुटणारे कोडे आहे. पाटणकरांनी माझी काळजी करण्यापेक्षा स्वत:ची काळजी करावी असा जाहीर सल्ला मी त्यांना दिला होता. परंतू त्यांचा बालिशपणा जाता जात नाही त्याला आपण तरी काय करायचे. मी पुरपरिस्थीतीत फुटभर पाण्यातून जावू दे नाहीतर 10 फुट पाण्यातून किंवा चिखलातून जावू दे,सत्यजितसिहं मी मतदारसंघावर आलेल्या पुरपरिस्थितीच्या व अतिवृष्टीच्या संकटात मतदारसंघातील जनतेच्या मदतीला धावून तरी गेलो.नुसता धावून गेलो नाही तर पुरपरिस्थितीत व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या तळागाळातल्या आपदग्रस्तांना वैयक्तीक तसेच सार्वजनीक मालमत्तेची पुर्नंबांधणी करण्याकरीता मी करीत असलेले प्रयत्न मतदारसंघातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे.तुमच्यासारखी नुसते नावापुरते पहाणी दौरे करुन मदतीची नौटंकी तर मी करीत नाही त्यामुळे थोडा धीर धरा तुमची निष्क्रीयता पुन्हा एकदा येणारा काळच ठरविणार आहे.
                आपदग्रस्तांना भेटी देवून मला जनतेची किती काळजी आहे याचा जो काही अविर्भाव आपण आणत आहात हे मतदारसंघातील जनतेच्याही आता लक्षात आले आहे.नुसत्या भेटी देवून पाटणकर करतायत काय? कारण माजी आमदार पुत्रांच्या हातात आपदग्रस्तांना देण्यासारखे आश्वासनाशिवाय दुसरे काहीच नाही. त्यांच्या पक्षाकडून मदत आली ती ही तोकडी ती दयायची कोणाला? माजी आमदार पुत्रांनाच मदत करायला कुणी येईना ते काय दुसऱ्याला मदत देणार. आम्ही किती मदत दिली कुणाला दिली याची मापे काढण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही आपदग्रस्तांना किती मदत दिली हे एकदा मतदारसंघातील जनतेसमोर जाहीरपणे मांडा. सत्यजितसिंह प्रत्येक गोष्टीचे राजकारण करुन चालत नाही. आपदग्रस्तांना मी करीत असलेल्या मदतीचे राजकीय भांडवल करीत नाही आणि कधी करणारही नाही ती शिकवण मला नाही परंतू राजकीय व्देषातून आपण जी टीका करीत आहात म्हणूनच नाईलाजास्तव मलाही आपल्याला याचे प्रतिउत्तर दयावे लागत आहे. आणि तुमच्या असल्या राजकारणाला मी तर भीक घालत नाही मला माझ्या मतदारसंघातील जनतेची काळजी आहे. आपत्तीत सापडलेल्या आपदग्रस्तांना आवश्यक ती मदत मागून आणायला मला लाज वाटत नाही. मी जनतेसाठी शासनाकडे, पक्षाकडे, सेवाभावी संस्थाकडे हात पसरत आहे. शासनाकडून, पक्षाकडून, सेवाभावी संस्थाकडून आलेली मदत कारखान्यावर नेवून ती मी घरी नेत नाही.योग्य प्रकारे ज्या गरजूंना त्यांची गरज आहे त्या गरजू व्यक्तीपर्यंत माझे माध्यमातून मदत जात आहे हे तुम्हाला भागा भागात दिसू लागल्याने अन् आमदार मतदारसंघात ठाण मांडुन सत्ताधारी पक्षाच्या मंत्रीमहोदयांच्या मागे लागून मतदारसंघातील आपदग्रस्तांना आधार आणि दिलासा देण्याकरीता सर्वोत्तोपरी प्रयत्न करुन आपदग्रस्तांपर्यत आवश्यक ती मदत पोहचवत आहे हे पाहून आपल्या पोटात दुखु लागले आहे. तांबव्याचा पुल पडण्यास म्हणे आमदार जबाबदार आहे अहो महाशय तुमचे पिताश्री आमदार असताना हेळवाक पुल पडला होता तेव्हा आम्ही त्याचे राजकारण केले नव्हते. कारण हेळवाकचा तो पुल पडायला ना तुमचे पिताश्री गेले होते ना तांबव्याचा पुल पडायला मी गेलो होतो.त्यामुळे पन्नाशी ओंलडलेल्या युवा नेत्याने अशा परिस्थितीत अकलेचे तारे तोडू नयेत. तांबव्याचा पुल पडला असला तरी दुसरा पुल आठव्या दिवशी चालू करण्याची धमक फक्त माझ्यातच आहे.ते तुम्हाला तुमच्या राजकीय कारकीर्दीत जमणार नाही.
               तुमच्या पाटणकर पितापुत्रांचे काम म्हणजे बैल गेला अन् झोपा केला असेच आहे. ज्या पुरग्रस्तांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची आपण भाषा करीत आहात ती सत्ताधारी पक्षाच्या युतीच्या शासनाने पुरग्रस्तांना भरघोस अशी मदत देण्याचे जाहीर करण्यापुर्वी केली असती तर मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आपले कतृत्व आले असते. परंतू आपले निष्क्रीय कतृत्वाचे दर्शन पाटण मतदारसंघातील जनतेला घडू लागले आहे. कशाचा दिखावा कधी करायचा तेही आपल्या लक्षात येत नाही. मतदारसंघात पुर आला तेव्हा आपण मतदारसंघाबाहेर होतात स्वत:च्या तालुक्यातील जनता किती दिवस पाण्यात होती हे पाहण्याकरीता तुम्हाला आठ दिवस लागले तर तुम्ही मतदारसंघातील जनतेची काय काळजी घेणार. आपले पिताश्री आम्ही पाटणला जेसीबी मधून का होईना पोहचल्यानंतर पाटणचा पुर पहायला आले होते तेव्हा त्यांनी तालुका प्रशासनाने काहीच न करता माझ्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाने आणि नगरसेवकांनी पुरात अडकलेल्या लोकांना पुरातून बाहेर काढले त्यांना आधार दिला असे सांगून गेले.तालुक्याचे प्रशासन माझे देखरेखीखाली आठ दिवस पाण्यातील जनतेला दिलासा देत होते तेव्हा तुमचे पिताश्री प्रशासनावर वृत्तपत्रातून टिका करण्यात धन्यता मानत होते आणि त्याच प्रशासनाने पुरपरिस्थितीत चांगले काम केले म्हणून 15 ऑगस्टला प्रशासनाचे सत्कार करण्याची नौटंकी तुम्ही करीत होतात ही तुम्हा पाटणकर पितापुत्रांची केवळ स्टंटबाजी असून या स्टंटबाजीचा मतदारसंघातील जनतेला काडीचाही उपयोग नसल्याचा टोला आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पाटणकरांना लगाविला आहे.
चौकट:- खुमखुमी असेल तर तारीख,वेळ तुम्हीच ठरवा.
               तुमचे पिताश्री आणि तुम्हाला अनेकदा समोरासमोर येण्याचे आव्हान दिले होते. ते तुम्ही दोघांनीही आजपर्यंत स्विकारले नाही तुम्हाला सर्व बाबींची उत्तरे हवी असतील आणि खुमखुमी असेल तर तारीख, वेळ तुम्हीच ठरवा मी सर्व उत्तरे देण्यास तयार आहे.- आमदार शंभूराज देसाई

आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघात शिवसेनेत जोरदार इनकंमिग सुरु आमदार शंभूराज देसाईंचे निवासस्थानी पक्षप्रवेशासाठी झुंबड.


                                                          


दौलतनगर दि.23:- पाटणचे शिवसेनेचे आमदार यांची राजकीय ताकत दिवसेंदिवस त्यांच्या कतृत्वामुळे पाटण मतदारसंघात वाढू लागली आहे.त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात गत पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर पाटण मतदारसंघात त्यांच्या विरोधात काम करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करुन आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे. आज शुक्रवारी आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी पक्षप्रवेशासाठी मतदारसंघातील शेडगेवाडी विहे,मोरगिरी,वजरोशी,बाटेवाडी पाठवडे,सुळेवाडी,पाळेकरवाडी बहुले, सलतेवाडी ताटेवाडी,भारसाखळे,तारळे,उत्तर तांबवे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अशरक्ष: झुंबड पहावयास मिळाली. आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली या वरील गांवातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात आज जाहीर प्रवेश करीत आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व आम्ही स्विकारले असल्याचे या सर्वांनी दौलतनगरला जाहीर केले.
                         विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाला व राष्ट्रवादीच्या पाटणच्या नेतृत्वाला कंटाळून आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याचे वातावरण गेल्या १५ दिवसापासून पाटण मतदारसंघात पहावयास मिळत आहे. पाटण मतदारसंघातील अनेक राष्ट्रवादी पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गत १५ दिवसात आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटणच्या शिवसेनेत इनकंमिग मोठया संख्येने सुरु असून विधानसभा निवडणूकीच्या दोन महिने अगोदरच आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगरला राजकीय वातावरण एैन पावसाळयात तापू लागले आहे. दौलतनगरला आठवडयातील मंगळवार व शुक्रवार पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम दौलतनगरला आमदार देसाईंच्या निवासस्थानी दर आठवडयात आता पहावयास मिळत आहे. आज शुक्रवारी आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी सकाळपासून दुपारी चार पर्यंत पक्षप्रवेशासाठी मतदारसंघातील शेडगेवाडी विहे,मोरगिरी,वजरोशी,बाटेवाडी पाठवडे,सुळेवाडी,पाळेकरवाडी बहुले,सलतेवाडी ताटेवाडी,भारसाखळे,तारळे,उत्तर तांबवे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अशरक्ष: झुंबड पहावयास मिळाली. येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आत्ममियतेने भेट घेतली. प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांचे पक्षात जाहीर स्वागत केले. गेल्या पाच वर्षात व त्याही अगोदर विकासाच्या प्रतिक्षेत आम्ही राहिलो परंतू आमच्या हाती काहीच लागले नाही आमच्या गांवातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपणांकडून कोटयावधी रुपयांचा विकासनिधी गावाच्या विकासासाठी गांवात आणला आपले कार्य जनहितार्थ आहे अशा नेतृत्वाला ताकत देण्याची गरज आहे म्हणूनच आम्ही मोठया संख्येने आपले नेतृत्व मानण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत. आपल्या नेतृत्वाखाली आणखिन गावांचा वाडयावस्त्यांचा विकास करुन घेणेकरीता शिवसेनेचा झेंडा आम्ही खांदयावर घेत असल्याच्या प्रतिक्रिया या वरील गावांतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या प्रक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या.
चौकट:- दिलेल्या कामांचे आभार मानायलाही तितकीच गर्दी.
            नुकतेच आमदार शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे पाटण मतदारसंघात कोयना भूकंप निधी, २५१५ योजनेतील निधी तसेच अर्थसंकल्प व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ९४ गावांमध्ये कोठयावधी रुपयांचा निधी मंजुर झाला असून या गांवातील मान्यवर आमदार शंभूराज देसाईंचे आभार मानण्याकरीता दौलतनगर आले होते. पक्षप्रवेशासाठी जेवढी गर्दी होती तितकीच गर्दी आभार मानण्यासाठी होती हे यावेळी दिसून आले.


पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांचेवरील बेछुट आरोप कदापिही सहन करणार नाही. जशाच तसे उत्तर देवू- आमदार शंभूराज देसाईंचा इशारा



दौलतनगर दि.23:- सातारा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांनी जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेत सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांची जाणिवपुर्वक बदनामी करण्याच्या हेतूनेच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. ही बाब पुर्णत: चुकीची असून पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांचेवरील बेछुट आरोप कदापिही सहन करणार नाही. पालकमंत्र्यावर बेछुट आरोप करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असून प्रशासनाला वेटीस धरुन स्वत:ची पोळी भाजण्याचा सातारा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचा उद्योग यावरुन जाहीरपणे स्पष्ट होत आहे.             
                  सातारा जिल्हा परीषदेतील सर्वसाधारण सभेतील पालकमंत्र्यांवरील धमकीच्या आरोपासंदर्भात पाटणचे आमदार शंभूराज देसाईंना विचारले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या विषया संदर्भात वृत्तपत्रात आलेल्या बातम्या पाहिल्यानंतर पालकमंत्री यांचेशी मी स्वत: बोललो असता, उपाध्यक्ष यांचे वक्तव्य  हे विपर्यास निर्माण करणारे आहे.सातारा जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणते विषय मांडावेत आणि कोणते नाही. यालाही मर्यादा आहेत. सलग 10 वर्षे आम्हीही जिल्हा परीषद सदस्य म्हणून जिल्हा परीषदेत होतो.आताच्या जिल्हा परीषद सदस्यांनी आपले नेमके अधिकार काय आहेत हे तपासण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.पालकमंत्री यांनी जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष यांचे बद्दल केलेल्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढला गेला आहे. जिल्हा परीषद उपाध्यक्षांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप बेछुट असून जाणिवपुर्वक त्यांना बदनाम करण्याचा जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचा डाव असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले आहे.केंजळ येथील खाणपट्टयाचा विषय महसूल विभागांशी संबधित असून प्रशासनाला वेटीस धरुन स्वत:ची पोळी भाजण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.जिल्हयाच्या पालकमंत्र्यांवर तसेच प्रशासनाच्या प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्यावर आरोप करताना आपण पुराव्यानिशी व जबाबदारीने आरोप करावेत याचे भानही जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राखले गेले नाही ही बाब पुर्णत: चुकीची असून पालकमंत्री तुमच्या विरोधी पक्षाचे आहेत म्हणून त्यांच्यावर बेछुटपणे आरोप करणे जिल्हा परीषदेच्या पंरपरेला धरुन नाही असे माझेही स्पष्ट मत असून पालकमंत्र्यावर बेछुट आरोप करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल.
               असे सांगून ते म्हणाले,केंजळ येथील खाणपट्टयाच्या संदर्भात सातारा जिल्हा परीषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हयाचे पालकमंत्री यांच्यावर जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांना पालकमंत्र्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तुरुंगात डांबेन अशी धमकी दिल्याची बातमी माझे वाचनात आले नंतर मी तात्काळ रुग्णालयात असणाऱ्या पालकमंत्री ना.विजय शिवतारेबापू यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला व या प्रकरणाची माहिती घेतली त्यांनी मला स्पष्टपणे या गोष्टीचा चूकीचा अर्थ काढला गेला असून रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मी नक्कीच या गोष्टी प्रसिध्दीमाध्यमांच्या समोर आणेन मी कुणालाही कसलीही धमकी वगैरे काही दिली नसून जिल्हा परीषदेच्या उपाध्यक्षांचे  बाबतीतील या विषयी संबंधी सर्व वस्तूस्थिती समोर आणेन असे त्यांनी दुरध्वनीवरुन मला सांगितले असून पालकमंत्री यांनी घेतलेली भूमिका प्रशासकीय असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.


Thursday 22 August 2019

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 09 मोठया रस्त्यांच्या कामांना 12 कोटी 3५ लाख 48 हजार रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.22:- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० करीता संशोधन व विकास अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील नऊ मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 22 ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील नऊ महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून १5.540 किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत संशोधन व विकास अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती करुन या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी मान्यता देवून या नऊ रस्त्यांच्या कामांकरीता एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून १5.540 किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील पाचगणी ते नागवाणटेक पोहोच रस्ता करणे 3.०7० किमी ०२ कोटी 32 लाख 66 हजार, धावडे ते शिद्रुकवाडी पोहोच रस्ता करणे 1.27० किमी 99 लाख 45 हजार, आटोली ते भाकरमळी पोहोच रस्ता करणे 1.400 किमी 01 कोटी 20 लाख, पांढरेपाणी पोहोच रस्ता करणे 2.00० किमी 01 कोटी 93 लाख 7० हजार, नुने गांव पोहोच रस्ता करणे 1.050 किमी 7६ लाख 63 हजार, भारसाखळे ते जौरातवाडी पोहोच रस्ता करणे 1.900 किमी 01 कोटी 53 लाख 1७ हजार, बहुले ते पाळेकरवाडी पोहोच रस्ता करणे 2.400 किमी 01 कोटी 64 लाख ०5 हजार, खिवशी पोहोच रस्ता करणे 0.750 किमी 60 लाख 85 हजार,  तोरणे पोहोच रस्ता करणे 1.700 किमी ०1 कोटी 34 लाख 9७ हजार असा एकूण 12 कोटी 3५ लाख ४8 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 22 ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे.या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Wednesday 21 August 2019

मी कोणत्या पक्षातून लढणार याची काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहाना उभे राहावयाच्या पक्षाची काय अवस्था असेल ? याची काळजी करा. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना टोला.




           दौलतनगर दि.2१:-मी कोणत्या पक्षातून येणारी विधानसभेची निवडणूक लढणार याची सत्यजितसिंह पाटणकरांनी काळजी करण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपण ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविण्यास गुडघ्याला बांशिग बांधून उताविळ झाला आहात त्या पक्षाची विधानसभा निवडणूकीपर्यंत काय अवस्था असेल ? याची काळजी करावी. असा खरमरीत टोला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना लगाविला आहे.
              वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,संपूर्ण पाटण मतदारसंघ  महापुराच्या वेढ्यात असताना स्वतःला पाटण विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार समजणारे पाटणपुरते युवा नेते असणारे सत्यजितसिंह पाटणकरांना मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची काळजी लागून राहिली आहे. परंतू मला त्यांना सांगावेसे वाटते,मी कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे हे पाटण मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे.तुम्ही त्याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार आहात त्या पक्षाची पहिल्यांदा काळजी करा.कारण विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र राज्याची आहे आणि सध्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या पक्षाचे विधानसभेचे असणारे अनेक उमेदवार हे तुमच्या पक्षाला रामराम करुन कोण शिवसेनेत तर कोण भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत.त्यामुळे तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणूकी पर्यंत महाराष्ट्रात काय अवस्था असेल याची भिती तुमच्या पक्षप्रमुखांनाच लागून राहीली आहे. राज्यातील तुमच्या पक्षाकडे लक्ष देण्यापेक्षा सत्यजितसिंहानी आपल्या सातारा जिल्हयातीलच त्यांच्या पक्षाची परिस्थिती पहावी की पक्षाला जिल्हयात कशी गळती लागली आहे ते. मतदारसंघातील जनतेने पाटणचे युवा नेते या पुरपरिस्थितीत कुठे दिसले नाहीत ते आहेत तरी कुठे याची माहिती घेतली असता युवा नेते परदेशात मजा मारीत आहेत हे समजल्यानंतर जनतेनेच याबाबत आपणाला जाब विचारला असता आपण फॅक्टरीच्या कामासाठी गेल्याचा निर्वाळा देऊन परदेशवारीचे प्रकरण सोपस्कर दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी अशा कोणत्या फॅक्टरीसाठी आपण परदेशात गेला होता.तेथीलही आम्ही माहिती घेतली असता त्या देशात ऊसापासून साखर उत्पादन न करता बिटापासून साखर तयार केली जाते. हे जनतेच्याही लक्षात आले आहे.
                सत्यजितसिंह पाटणकरांचा २० वर्ष येत असलेला साखर प्रकल्प त्यांचा त्यांनाच लखलाभ कारण या प्रकल्पातून ते शेतकऱ्यांना काय देणार आहेत हे मतदारसंघातील शेतकऱ्यांचेही लक्षात आले आहे. 20 वर्षापासून आम्ही साखर कारखाना काढणार,साखर कारखाना काढणार म्हणून विधानसभेच्या,कारखान्याच्या,जिल्हा परीषदेच्या निवडणूका पाटणकरांनी लढविल्या आता तर विधानसभा दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. साखर कारखान्याचे गाजर यंदाच्याही निवडणूकीपुर्वी पाटणकरांनी दाखविले असले तरी ज्या प्रकल्पाचे भूमिपुजन करुन दोन महिने उलटले त्याची साधी वीट कुठे उभी राहल्याची जनतेला दिसत नाही.20 वर्षापासून ज्या कोयना शुगरचे आपण गोडवे गात आहात त्याचा अभ्यास 20 वर्षानंतर करण्याची आपणांस का गरज भासली? आपण प्रकल्पाच्या अभ्यासाकरीता मतदारसंघ पुरात अडकलेला असताना परदेशात गेला होता तिथे नेमके कोणत्या कंपनीचा,कुठल्या फॅक्टरी उत्पादनाचा आपण अभ्यास केला हे जरा मतदारसंघातील जनतेसमोर सांगितले तर बरे होईल. पुरपरिस्थितीत आणि महापुरात किती नुकसान झाले याची पहाणी करण्याचे सत्यजितसिंहाचे नाटक हा केवळ जनतेच्या काळजीचा बेगडीपणा आहे.दुसरे काहीही नाही कारण पहाणी करुन जनतेला मदत करण्यासाठी त्यांच्या हातात काहीही नाही आणि पाटणकर महाशय आता कसली पहाणी करताय अतिवृष्टी, महापुरात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना नुकसानीची मदत आणि पुर्नंबांधणी करण्याचे आदेश ज्यांच्या हातात सत्ता आहे असे राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री यांनी तुम्ही परदेशातून येण्याअगोदरच दिले आहेत त्यावर कार्यवाही सुरु झाली आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत स्वत:ची निष्क्रीयता लपविण्याकरीता सत्यजितसिंहांचा सुरु असलेला बालिशपणा हा जनतेने पुर्णपणे ओळखला आहे.
चौकट:- आम्ही किती मदत दिल्याचे आकडे तपासण्यापेक्षा तुम्ही काय दिले हे जनतेला सांगा.
            मतदारसंघाचा आमदार म्हणून मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना मी किती व कशी मदत दिली याचे आकडे दुर्भिण लावून तपासण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर आपण दानशुरपणा दाखवून मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना किती मदत दिली त्याची आकडेवारी जाहीर करा असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंहाना दिला आहे.

Tuesday 20 August 2019

मुंबईचे पक्षप्रवेशाचे वारे पाटण विधानसभा मतदारसंघात. आमदार शंभूराज देसाईच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर शिवसेनेत दाखल.





           दौलतनगर दि.20:- लोकसभा निवडणूकीपुर्वी व निवडणूकीनंतर गेल्या अनेक दिवसापासून 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर संपुर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातून भाजप शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करण्याऱ्यां मान्यवरांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असून मुंबईच्या पक्षप्रवेशाचे वारे मोठया प्रमाणात आता पाटण विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहचले आहे.पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली गत पंधरा दिवसापासून मतदारसंघातील त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे राष्ट्रवादी पक्षातील अनेक मान्यवर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला व राष्ट्रवादीच्या त्यांच्या नेत्यांना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होत असल्याचे चित्र मोठया प्रमाणात आमदार शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी प्रतिरोज दिसून येत आहे.
           पाटण विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्हयाच्या आणि पर्यायाने राज्याच्या नेहमीच चर्चेत असणारा मतदारसंघ असून या मतदारसंघातील राजकीय उलथापालथ नेहमीच सातारा जिल्हयाचे अनुभवली आहे. पाटण मतदारसंघाचे विद्यमान आमदार,महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करीत असून अभ्यासपुर्ण आमदार म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेत व संपुर्ण महाराष्ट्रात दबादबा आहे. गत पाच वर्षात मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करताना त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मतदारसंघातील जनतेला दिलेल्या विविध आश्वासनापैकी अनेक आश्वासने आपल्या कुशलतेने आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या युतीशासनाच्या माध्यमातून पुर्ण करुन दाखविली आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गांव, वाडयावस्त्यांपर्यंत त्यांनी गत पाच वर्षात कोठयावधी रुपयांचा विकासाचा डोंगर उभा केला आहे.मी जे बोललो ते मी करुन दाखविले ही दिशा घेवून ते येणारी विधानसभा निवडणूक लढविण्यास सज्ज्‍ झाले असून रखडलेला विकास करण्याकरीता मला आमदार होण्याची संधी दया अशी हाक 2014 च्या विधानसभा निवडणूकीत मतदारांना दिली होती. त्या हाकेला साद देत 18824 इतक्या भरघोस मतांनी निवडून आलेल्या आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात लावलेला विकासकामांचा धडाका अनेकांना अचंबीत करणारा व धडकी भरवणारा आहे. मागेल त्या गांवाला, वाडीवस्तीला विविध विकासकांमे देण्यात ते पाच वर्षात यशस्वी झाले आहेत. आपल्या गांवाचा रखडलेला विकास आमदारांच्या माध्यमातून होत आहे हे पाहून आतापर्यंत त्यांच्या विरोधात काम केलेले राष्ट्रवादी पक्षाचे अनेक मान्यवरांच्यामध्ये परीवर्तन होवून या मान्यवरांनी आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व स्विकारण्याचे कामास गेल्या पंधरा दिवसापासून विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सुरुवात केली आहे. आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा धडाकाच आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी प्रतिरोज दिसू लागला असून मुंबईच्या भाजप शिवसेना पक्षात होणाऱ्या राष्ट्रवादी व कॉग्रेस पक्षातील मान्यवरांप्रमाणे पाटण मतदारसंघातही राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. तर अनेक मान्यवर दाखल होण्याच्या तयारीत आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश विधानसभा निवडणूकीच्या अगोदरच करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
               आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात दाखल झालेली गांवे व या गांवातील मान्यवरांची नांवे आवर्डे श्री.हणमंत चव्हाण निवडे युवराज शिंदे, शंकर शिंदे फडतरवाडी प्रल्हाद साळुंखे अध्यक्ष याञा कमिटी खडकवाडी विकास साळुंखे,चंद्रकांत शिंदे, महादेव शिंदे, आनंदराव साळुंखे,यशवंत  साळुंखे,सुरेश शिंदे,संतोष शिंदे, दिलीप शिंदे ,कांताराम शिंदे, विठ्ठल साळुंखे, अंकुश साळुंखे,ढोरोशी संदिप मगर, सुनिल लोहार, जगन्नाथ साळुंखे, महेश मगर, सचिन सुतार,दत्ताञय मगर,अमोल काटे,अक्षय मगर, दादासो मगर, प्रकाश मगर,अंकुश सुतार गायमुखवाडी दत्ताञय पवार उत्तम पवार.शंकर साळुंखे,शंकर पवार, बजरंग पवार गुढे शिवाजी शिद्रुक उप.सरपंच,विकास पुजारी ग्राम सदस्य,वसंतराव पाटील ग्राम.सदस्य पंकज पाटील,राजेश पाटील, राजेंद्र कदम,बजरंग शिद्रुक, अनिल पाटील  वाडीकोतावडे  जगन्नाथ सुर्वे, शंकर सुर्वे, नथूराम सुर्वे पापर्डे शिवाजी देसाई (माजी रयत सेवक), कळंबे  बाळू जाधव राजाराम जाधव,अंकुश जाधव, जगन्नाथ जाधव,सर्जेराव जाधव,ज्ञानदेव जाधव,बबन जाधव,सत्यवान जाधव,धोंडिबा जाधव,गोरेवाडी जोतीराम घाडगे,विश्वनाथ घाडगे, सखाराम घाडगे,मारुती घाडगे अशी प्रवेश करणाऱ्या विविध संस्थाच्या, ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मांदियाळी शिवसेनेत दाखल झाल्याचे दिसून येत आहे.


पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील विकासकामांना ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर.





           दौलतनगर दि.१९:- सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे मागणी केलेप्रमाणे त्यांनी पाटण तालुक्यातील ९ गांवातील बौध्द, मातंग व दलितवस्तीमध्ये ०१ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्याकरीता निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                    सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचेकडे पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केली होती त्यानुसार त्यांनी पाटण तालुक्यातील ०९ गावांतील विविध विकासकामांना ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.१६ ऑगस्ट, २०१९ रोजी पारित केला आहे.या निर्णयामध्ये पाटण तालुक्यातील ०९ गावांतील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील कामांचा समावेश असून समावेश असणारी कामे क्रांतीनगर नाडे येथे मातंगवस्तीकरीता रस्ता व संरक्षक कठडा बांधणे १५ लाख, चोपडी येथील दलितवस्तीतील रस्ता सुधारणा करणे १५ लाख,मणेरी चिंचेचे आव्हाड बौध्दवस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, वजरोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, चोपदारवाडी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, येराड बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, मालोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख, पाळशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख व पापर्डे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे १० लाख असे एकूण ०१ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून पाटण तालुक्यातील बौध्द, मातंग व दलितवस्तीतील अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते तसेच संरक्षक भिंती बांधणे अशा विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर केलेबद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश खाडे यांचे आभार व्यक्त केले आहेत दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.