Thursday 15 August 2019

२५१५ योजनेमधून पाटण मतदारसंघातील ३२ गावांना ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.



­­
          दौलतनगर दि.15:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत २५१५ योजनेमधून ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
          प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राज्यशासनाच्या २५१५ योजनेमधून निधी मंजूर होणेकरीता दि.११.०७.२०१९ रोजीचे पत्रानुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंढे व राज्यमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.०८ ऑगस्ट, २०१९ रोजी शासन निर्णयानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ३२ विविध विकासकामांना ०५ कोटी  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये मराठवाडी ते भारसाखळे रस्ता खडीकरण डांबरीकरण  २०.०० लाख,आडदेव पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण २०.०० लाख,बावीचावाडा कोंढावळे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  २०.०० लाख,कोचरेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  २०.०० लाख,बांबवडे ते कळंबे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण २०.०० लाख,किल्ले मोरगिरी ते गुंजाळी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  २०.०० लाख,तांबवे ते उत्तर तांबवे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण २०.०० लाख,आरेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण २०.०० लाख,रामेल ते शेळकेवस्ती पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १५.०० लाख,वन पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १५.०० लाख,ताटेवाडी ते सलतेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १५.०० लाख,शिंगमोडेवाडी बनपूरी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १०.०० लाख,मठवाडी महिंद पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख,चेणगेवाडी सळवे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख,देशपांडेवाडी किसरुळे पाहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख,शिबेवाडी कुंभारगावाडी कुंभारगाव पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १०.०० लाख,लोहारवाडा शिंबेवाडी कुंभरगाव पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख,दौलतनगर मरळी नविन वसाहत अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  ५५.०० लाख, कुशी पुनर्वसन वेखंडवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा  २५.०० लाख,ढेबेवाडी चर्मकारवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा  २०.०० लाख,नेताजीनगर गोकूळ तर्फ हेळवाक अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  २०.०० लाख,माथणेवाडी चाफळ अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  १५.०० लाख,सुर्यवंशीवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख, मुळगाव मागासवर्गीयवस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण १०.०० लाख,खराडवाडी नाणेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा  १०.०० लाख,सदुवर्पेवाडी सळवे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख,बोपोली अंबाखेळती मंदिर पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण १०.०० लाख,जमदाडवाडी मळावस्ती रस्ता डांबरीकरण  १०.०० लाख, कोतावडेवाडी साखरी रस्ता खडीकरण डांबरीकरण  १०.०० लाख,सुपने अंतर्गत रस्ता सुधारणा  १०.०० लाख,पाडळी केसे अंतर्गत रस्ता सुधारणा  १०.०० लाख,मौजे साकुर्डी अंतर्गत रस्ता सुधारणा १०.०० लाख असे ३२ कामांसाठी एकूण ०५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment