Thursday 15 August 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडून पाटण मतदारसंघातील 53 गावांना 06 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर. आमदार शंभूराज देसाई.




दौलतनगर दि.15:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१9-20 या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून 6 कोटी 09 लाख 89 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
          प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील 53 गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१9-20 या आर्थिक वर्षामध्ये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडे निधी मंजूर होणेकरीता दि.14.06.२०१9 व दि.28.06.2019 रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती.त्यानुसार सन २०१9-20 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती न्यासाकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण 53 विविध विकासकामांना 6 कोटी 09 लाख 89 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना दि.०१ ऑगस्ट,२०१९ रोजीचे पत्रानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.मंजूर झालेल्या विकासकामामध्ये पागेवाडी कुठरे,ता.पाटण पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,बोंद्री,ता.पाटण पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 20.00 लाख,महिंद पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,जानुगडेवाडी ते यादवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,मसुगडेवाडी दाढोली  पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 09.99 लाख,मोरगावाडी कोंजवडे रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख,नाव  पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,कोचरेवाडी पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख,गोरेवाडी (मुरुड) माळवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,कुसरुंड धारमाऊली मंदिर ते शिंदेवार्ड पाटीलवार्ड पोहोच रस्ता खडी.डांबरीकरण 10.00 लाख,शिंगमोडेवाडी (बनपूरी) रस्ता सुधारणा 10.00 लाख,ढाणकल  शंभू महादेव मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 14.99 लाख,त्रिपुडी बेघरवस्ती उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण  15.00 लाख,रुवले ते पाटीलवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,कोतावडेवाडी साखरी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,भारसाखळे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 30.00 लाख,तामकडे पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,शेजवळवाडी (साबळेवाडी) पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15.00 लाख,मणेरी चिंचेचे आवाड बौध्दवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,सुळेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,आंबेघर तर्फ मरळी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,पवारवाडी कुठरे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,तळमावले धुमाळवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 7.00 लाख,दिवशी बुद्रुक अंतर्गत रस्ता सुधारणा 10.00 लाख,हुंबरवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 10.00 लाख,काढोली रामवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,दास्तान येथील अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण  09.99 लाख,मंद्रुळकोळे मधलेआवाड अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20.00 लाख,मौजे चोपडी  अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,रासाटी दलितवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 08.00 लाख,फडतरवाडी घोट अंतर्गत रस्ता सुधारणा  07.50 लाख,कै.सौ.वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी येथे मुख्य शाळेचे नुतनीकरण  20.00 लाख,शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे शाळेकरीता सभागृह  15.00 लाख,येळेवाडी काळगाव येथे पत्रा सभास्टेज 05.00 लाख,चव्हाणवाडी धामणी, येथे सामाजिक सभागृह  07.50 लाख,सळवे पाटील आवाड येथे सामाजिक सभागृह 07.50 लाख,दिक्षी येथे सामाजिक सभागृह 07.50 लाख,चोरगेवाडी कुंभारगाव येथे सामाजिक सभागृह  07.50 लाख,मोरेवाडी पेठशिवापूर  येथे सामाजिक सभागृह  7.50 लाख,चाफळ ते जंगलवाडी  रस्ता खडीकरण,डांबरीकरण  24.98 लाख,निनाईवाडी कसणी 01 किमी रस्ता खडीकरण  डांबरीकरण  15.00 लाख,अंबवडे खुर्द शिंदेवाडी ते चोरगेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख,सावरघर पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण  10.00 लाख,कारळे गावठाण नवाळवाडी,पाटीलवाडी व डागेची आळी रस्ता खडी. डंबरीकरण 10.00 लाख,तामिणे मानेवस्ती अंतर्गत रस्ता  काँक्रीटीकरण  07.50 लाख,तामिणे रासू आवाड अंतर्गत रस्ता  काँक्रीटीकरण 07.50 लाख,हेळवाक सुतारवस्ती ते मुस्लिमवस्ती पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 10.00 लाख,गोकूळ तर्फ हेळवाक मुस्लिम मदरसा सभोवती संरक्षक‍ भिंत 10.00 लाख,येराडवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 9.99 लाख,लोहारवस्ती केरळ पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,निवडे पुनर्वसन पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,चौगुलेवाडी मुठ्ठलवाडी कात्रेवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 10.00 लाख,रामापूर  येथे मुस्लिम समाजाकरीता सार्वजनिक सभागृह 15.00 लाख असे 53 कामांसाठी एकूण 6 कोटी 09 लाख 89 हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment