Wednesday 14 August 2019

पाटणकर महाशय,मा.ना.विजय शिवतारेबापूंनी पाटणला येवून किती धोरणात्मक निर्णय घेतले याची शासकीय माहिती घ्या. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना सल्ला.




­­
          दौलतनगर दि.14:- सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू सातारा जिल्हयात कधी येतात आणि कधी नाही हे पहायला सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही जिल्हयात असायला हवे ना? तुम्हाला तुमचा चिरेबंदी वाडा सुटत नाही ते जिल्हयाला तुम्ही कधी जाणार.जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू पाटणला पर्यटनाला आले होते का? पाण्यात असलेल्या पाटणमधील जनतेला दिलासा देण्याकरीता हे पाटणमधील जनतेने आणि तुम्हीही पाहिले आहे. पाटण पाण्यात असताना वाडयात बसून पत्रके काढणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकरांनी जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. विजय शिवतारेबापू यांनी जिल्हयातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवून पाटणला येवून पुरपरिस्थितीत नुकसान झालेल्यांना कशाप्रकारे मदत देता येईल यासंबधीने किती धोरणात्मक निर्णय घेतले याची शासकीय माहिती जरा घ्या.असा सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिला.                       
           प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू पाटण तालुक्यात किती वेळा आले हे पाटण तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे त्याकरीता आपल्या दाखल्याची गरज ना आम्हाला आहे ना तालुक्यातील जनतेला आहे.जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू यांचे आणि माझे कधीही मतभेद नव्हते आणि नाहीत. आमच्या दोघांमध्ये जिल्हयामध्ये चांगले चालले असताना केवळ दोघांत गैरसमज  पसरवून चांगल्या चाललेल्या विकासकामांत कसा खोडा घालायचा याशिवाय तुम्हाला आणि तुमच्या पक्षाच्या नेत्यांना दुसरे काही येतच नाही याचाही अनुभव पाटण तालुक्याने नव्हे तर संपुर्ण सातारा जिल्हयाने घेतला आहे. आमच्या दोघांच्या संदर्भात विपर्यास करणाऱ्या बातम्या मागील काळात प्रसिध्द झाल्या होत्या. त्याची काळजी सत्यजितसिंह पाटणकरांनी करु नये.आमच्या दोघांत मतभेद आणि मी त्यांची मापे काढली असती तर ते पाटण तालुक्यात आलेच नसते आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी पाटण तालुक्याला आवश्यक असणारा निधी दिलाच नसता हे न समजण्याइतपत आपण अजुनही इतके बालीश आहात याचे नवल करावे एवढे थोडेच आहे.
               पाटण तालुक्यातला पुर ओसरल्यानंतर जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू आले असल्याची बालीश टिका करणारे सत्यजितसिंह पाटणकर गेल्या आठ दिवसाच्या पुराच्या काळात जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू दिवसातून दोन ते तीन वेळा माझे संपर्कात होते.सातत्याने त्यांच्याकडून या पुरासंदर्भात विचारणा होत होती.तेव्हा तुम्ही परदेश दौऱ्यात मग्न होतात. तुम्हाला कसे कळणार पालकमंत्र्यांना आपल्या तालुक्याची किती काळजी आहे ते? आमचा पक्ष, आमचे नेते यांची टिमकी वाजविणारे पाटणकर तुमच्या पक्षाचा एकही नेता पाटण तालुक्यात फिरकला नाही. तुमचे नेते मतदारसंघातील तांबव्यात आले तेव्हा त्यांना पाटण लांब नव्हते आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून हे उद्योग बंद करा. पाटण शहरातीलच लोकांना आपण अमावस्या, पौर्णिमेला दिसत आहात आणि मापे पालकमंत्र्यांची कसली काढताय?  पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारे बापू पाटणचा पुर ओसरल्यानंतर आले असले तरी खरी गरज ही पुर ओसरल्यानंतरच होती कारण पुरात नुकसान झालेल्यांना पुरात असताना बाहेर काढायला तालुक्याचा आमदार म्हणून मी सक्षम आहे. पालकमंत्री मा.ना.विजय शिवतारेबापू येतानाच जिल्हास्तरीय सर्व अधिकारी बरोबर आणून त्यांनी पाटण शहरातील पहाणी केली आणि तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला नुसता आढावा घेतला नाही तर पाटण तालुक्यातील बाधित सर्वांना कशाप्रकारे मदत करता येईल यासंदर्भात त्यांनी अनेक निर्णयही घेतले आणि आवश्यक निधी कसा उपलब्ध करायचा याचेही त्यांनी नियोजन केले.तुम्ही काय केले हे जरा तालुक्यातील जनतेला सांगता का? असा सवालही त्यांनी शेवठी बोलताना केला.


1 comment:

  1. 🚩बालिश ते बालिशच राहणार त्यांना फक भावीची स्वप्न पडत्यात दिवसा पण🚩

    ReplyDelete