दौलतनगर दि.२४:- सन 1999 ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचा दि. 27 ऑगस्ट रोजी,२०१९ रोजी १९ वा पुण्यस्मरण दिन पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे स्मारक भूडकेवाडी येथे आयोजीत करण्यात आला आहे. शहिद जवान कै.गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन आमदार शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, शहीद जवान यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे, बंधू विठ्ठल मोरे, भूडकेवाडी गावच्या सरपंच सौ.संध्या भिमराव मोरे हे मान्यवर तसेच तारळे विभागातील पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास भूडकेवाडी ग्रामस्थ तारळे विभागातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहीद जवान कै.गजानन मोरे मित्रमंडळ भूडकेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment