Wednesday 14 August 2019

सत्यजितसिंहाची फॅक्टरी २० वर्षापासून पाटण तालुक्यात येतच आहे. परदेशवारी मौजमजेसाठी,नवीन प्रकल्पाचा केवळ दिखावा. आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंहाना प्रतिटोला.




           दौलतनगर दि.१४:- साखर कारखान्याच्या मशनरी देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मिळतात त्यासाठी परदेशात जाण्याची काहीच गरज नाही सत्यजितसिंह पाटणकर असा कोणता जगावेगळा कारखाना पाटण तालुक्यात उभा करीत आहेत ज्यासाठी त्यांना परदेशात जाण्याची गरज पडली.नवीन प्रकल्पासाठी परदेशात गेलो होतो अशा केवळ त्यांच्या बतावण्या आहेत.तालुका पाण्यात असताना हे परदेशवारीत मौजमजा करीत होते हेच त्रिवार सत्य असून सत्यजितसिंहाची ती फॅक्टरी गेल्या २० वर्षापासून पाटण तालुक्यात येतच असून नवीन प्रकल्पासाठी परदेशात गेलो होतो हा केवळ दिखावा आहे.सदैव भावीच आमदार राहणारे सत्यजितसिंह पाटणकर हे पाटण तालुका पुरात असताना परदेशात मौजमजा करीत आहे हे जनतेसमोर आल्याने स्वत:चेच पाप लपविण्यासाठी ते मला व पालकमंत्र्यांना नको तो शहाणपणा शिकवत असल्याचा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
             आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण मतदारसंघाचा भावी आमदार म्हणून घेणाऱ्या सत्यजितसिंहांच्या उलटया बोंबा पाटण मतदारसंघातील जनता अनुभवत आहे.सत्यजितसिंह पाटणकर सदैव भावीच आमदार राहणार आहेत हे पाटण मतदारसंघातील जनतेनेही त्यांच्या कर्तत्वावरुन ओळखले आहे.पाटण मतदारसंघात अनपेक्षित पाऊस कोसळला आणि अनपेक्षित महापुर आला असे सांगणारे पाटणकर यांना पाटण मतदारसंघातील जनतेची किती काळजी आहे. हे मतदारसंघातील जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे.जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी १८ तासापेक्षा जादा वेळ मुंबईत यायला लागत नाही हे महाशय तर सलग १० दिवस गायब होते.परदेशात माणसे प्रकल्पाचा अभ्यास करायला जात नाहीत तर मौजमजाच करायला जातात हे बारक्या पोरालाही कळते आणि सत्यजितसिंह पाटणकर नवीन प्रकल्प आणायला परेदशात गेलो होतो असे सांगत बसले आहेत.आपली निष्क्रीयता झाकण्यासाठी नेहमीच पाटणकर पितापुत्रांनी अशा अनेक बतावण्या केल्या आहेत.सत्यजितसिंह पाटणकर बघितले तर साखरेचा कारखाना उभा करीत आहेत.त्यामध्ये साखर निघणार का गुळ पावडर हे अजून त्यांनी मतदारसंघातील जनतेला सांगितले नाही आणि म्हणतात तालुक्याला नवीन प्रकल्पाची भेट देणार.अहो बच्चूदादा गेली ३३ वर्षे मी पाटण तालुक्यात साखर कारखान्याचे काम पहात आहे. साखर कारखाना चालविताना मला कुठे परेदशात अभ्यासाला जायची वेळ आली नाही.जे काही शिकलो ते याच कारखान्यात आणि आपल्याच देशातच शिकलो.तुमचे अज्ञान इथेही कशाला प्रगट करताय असा बोचरा टोला लगावून ते म्हणाले,आमचे पाप काढण्यापेक्षा आपण कारखान्याच्या अभ्यासाकरीता परदेशात गेला होता का आणखीन कशासाठी? हे लवकरच तालुक्यातील जनतेच्या समोर येईल.
          मला रोड शो करण्याची गरज भासत नाही उलट तुम्हालाच आता रोड शो करण्याची गरज पडली आहे म्हणूनच परदेशातून आल्यानंतर मी किती सक्रीय आहे हे दाखविण्याकरीता तुम्ही आता गावोगावी जाण्याचे नाटक करीत आहात. पण तुम्ही तिथे जावून करताय काय? तुमच्या हातात आहेच काय? मी अगोदरच जिथे जिथे अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाले आहे तिथे तिथे शासनाच्या मदतीच्या व्यतिरिक्त स्वत: सगळे प्रयत्न करुन आवश्यक ती मदत पोहचविण्याचे काम केले आहे.म्हणूनच पाटण मतदारसंघातील सुमारे ५१९५ बाधित कुटुंबापर्यंत पोहचून या कुटुंबातील सुमारे १९,३६२ बाधित व्यक्तीपर्यंत मदत पोहचली आहे.आणि अजुनही जादाची मदत मिळवून ती बाधित कुटुंबापर्यंत पोहचविण्याकरीता मी आमदार म्हणून कटीबध्द आहे.ते तुमच्यासारख्यांचे काम नाही हेही तालुक्यातील जनता जाणते.तोंड बघून मदत दिली असती तर इतक्या बाधित जनतेपर्यंत ही मदत पोहचली नसती त्यामुळे बालिशपणा सोडून तुम्ही किती मदत जनतेपर्यंत पोहचवली याची माहिती जनतेसमोर जाहीर केले तर बरे होईल. मी ज्या जेसीबी मधून पाटणमध्ये आलो तो त्त्या चार ठिकाणी किती पाणी होते याची माहिती अगोदर करुन घ्या. जेसीबीमधील माझा व्हिडीओ कार्यकर्त्यांनी काठावर उभा राहून घेतला आहे. तो व्हिडीओ मी घेतला असता म्हणजे तुमच्या लक्षात आले असते पाटणचे आमदार किती पाण्यातून प्रवास करीत होते ते.
चौकट:- पालकमंत्र्यांना, आमदारांना काय अधिकार असतात हे पिताश्रींना खाजगीत विचारा.
              सत्यजितसिंह पाटणकर,पालकमंत्र्यांना,आमदारांना काय अधिकार असतात हे तुम्हाला शासनाची आयुधे अजुन माहिती नसल्याने कळणार नाही.पालकमंत्र्याचे आणि आमदारांचे अधिकार काय असतात हे स्वत:च्या जिल्हयाचे न होवू शकलेल्या परंतू बीड जिल्हयाचे पालकमंत्री राहिलेल्या आपल्या पिताश्रींना खाजगीत विचारा.म्हणजे तुम्हाला कळेल. पालकमंत्र्यांच्या आणि माझ्यातील आरोपांची तुम्ही काळजी करु नका आमच्यात कोणतेही भांडण अथवा दुरावा नव्हता गेल्या पाच वर्षात आम्ही एकत्रितपणेच काम केले आहे ते तुमच्या लक्षात यायला अजुन खुप वेळ असल्याचा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंहाना लगाविला आहे.



1 comment: