Friday 23 August 2019

आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटण मतदारसंघात शिवसेनेत जोरदार इनकंमिग सुरु आमदार शंभूराज देसाईंचे निवासस्थानी पक्षप्रवेशासाठी झुंबड.


                                                          


दौलतनगर दि.23:- पाटणचे शिवसेनेचे आमदार यांची राजकीय ताकत दिवसेंदिवस त्यांच्या कतृत्वामुळे पाटण मतदारसंघात वाढू लागली आहे.त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात गत पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर पाटण मतदारसंघात त्यांच्या विरोधात काम करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करुन आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे. आज शुक्रवारी आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी पक्षप्रवेशासाठी मतदारसंघातील शेडगेवाडी विहे,मोरगिरी,वजरोशी,बाटेवाडी पाठवडे,सुळेवाडी,पाळेकरवाडी बहुले, सलतेवाडी ताटेवाडी,भारसाखळे,तारळे,उत्तर तांबवे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अशरक्ष: झुंबड पहावयास मिळाली. आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली या वरील गांवातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात आज जाहीर प्रवेश करीत आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व आम्ही स्विकारले असल्याचे या सर्वांनी दौलतनगरला जाहीर केले.
                         विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पाटण मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे राष्ट्रवादी पक्षाला व राष्ट्रवादीच्या पाटणच्या नेतृत्वाला कंटाळून आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याचे वातावरण गेल्या १५ दिवसापासून पाटण मतदारसंघात पहावयास मिळत आहे. पाटण मतदारसंघातील अनेक राष्ट्रवादी पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गत १५ दिवसात आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे.आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली पाटणच्या शिवसेनेत इनकंमिग मोठया संख्येने सुरु असून विधानसभा निवडणूकीच्या दोन महिने अगोदरच आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगरला राजकीय वातावरण एैन पावसाळयात तापू लागले आहे. दौलतनगरला आठवडयातील मंगळवार व शुक्रवार पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम दौलतनगरला आमदार देसाईंच्या निवासस्थानी दर आठवडयात आता पहावयास मिळत आहे. आज शुक्रवारी आमदार शंभूराज देसाईंच्या दौलतनगर येथील निवासस्थानी सकाळपासून दुपारी चार पर्यंत पक्षप्रवेशासाठी मतदारसंघातील शेडगेवाडी विहे,मोरगिरी,वजरोशी,बाटेवाडी पाठवडे,सुळेवाडी,पाळेकरवाडी बहुले,सलतेवाडी ताटेवाडी,भारसाखळे,तारळे,उत्तर तांबवे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अशरक्ष: झुंबड पहावयास मिळाली. येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आत्ममियतेने भेट घेतली. प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांचे पक्षात जाहीर स्वागत केले. गेल्या पाच वर्षात व त्याही अगोदर विकासाच्या प्रतिक्षेत आम्ही राहिलो परंतू आमच्या हाती काहीच लागले नाही आमच्या गांवातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपणांकडून कोटयावधी रुपयांचा विकासनिधी गावाच्या विकासासाठी गांवात आणला आपले कार्य जनहितार्थ आहे अशा नेतृत्वाला ताकत देण्याची गरज आहे म्हणूनच आम्ही मोठया संख्येने आपले नेतृत्व मानण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत. आपल्या नेतृत्वाखाली आणखिन गावांचा वाडयावस्त्यांचा विकास करुन घेणेकरीता शिवसेनेचा झेंडा आम्ही खांदयावर घेत असल्याच्या प्रतिक्रिया या वरील गावांतील अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या प्रक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या.
चौकट:- दिलेल्या कामांचे आभार मानायलाही तितकीच गर्दी.
            नुकतेच आमदार शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे पाटण मतदारसंघात कोयना भूकंप निधी, २५१५ योजनेतील निधी तसेच अर्थसंकल्प व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ९४ गावांमध्ये कोठयावधी रुपयांचा निधी मंजुर झाला असून या गांवातील मान्यवर आमदार शंभूराज देसाईंचे आभार मानण्याकरीता दौलतनगर आले होते. पक्षप्रवेशासाठी जेवढी गर्दी होती तितकीच गर्दी आभार मानण्यासाठी होती हे यावेळी दिसून आले.


No comments:

Post a Comment