दौलतनगर दि.2९:- राज्य
शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षात
सुचविलेल्या मरळी ते कदमवाडी व कराड
चिपळूण रोड ते शिरळ रस्ता या दोन रस्त्यांच्या कामांना एकूण ०१ कोटी ८७ लाख ०६
हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून मंजुरी देण्यात
आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांचा प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय
शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२८ ऑगस्ट,२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती
आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकामध्ये
आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१९-२० मध्ये एकूण १० रस्त्यांच्या कामांना आवश्यक
असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे
यांचेकडे विनंती केली होती त्यानुसार ०८ कामांना शासनाच्या ग्रामविकास विभागाने
दि. ०७ जून, २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता दिला असल्याचा शासन निर्णय पारित केला
होता यामध्ये बॅच २ मध्ये कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता १.२०० किमी व मरळी-मंगेवाडी
ते कदमवाडी रस्ता १.५०० किमी असे एकूण दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी
मिळणेकरीताचे प्रस्ताव ग्रामीण विकास विभागाकडे सादर झाले होते मात्र या मान्यता
मिळाली नव्हती त्यास ग्रामविकास विभागाने दि.२८ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन
निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. कराड चिपळूण रोड ते शिरळ रस्ता १.२०० किमी च्या
रस्त्याकरीता ९८ लाख ८८ हजार व मरळी-मंगेवाडी ते कदमवाडी रस्ता १.५०० किमीकरीता ८८
लाख १८ हजार रुपये निधी मंजुर केला आहे. या दोन रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ०१
कोटी ८७ लाख ०६ हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे या कामांच्या
निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज
देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्यांची कामे
मंजुर करुन आणलेबाबत या दोन्ही गांवातील नागरिकांनी आमदार शंभूराज देसाईंचे विशेष
आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment