Friday 23 August 2019

पुरग्रस्तांना न्याय दयायला कोण अपयशी ठरले हे पहायला अन् माझेवरील आरोपाची उत्तरे घ्यायला सत्यजितसिंह समोरासमोर या. आमदार शंभूराज देसाईंचे सत्यजितसिंह पाटणकरांना जाहीर आवाहन




दौलतनगर दि.2४:- सत्यजितसिंह पाटणकर महाशय, तुम्हाला वाडयात बसून काही कामे नाहीत म्हणूनच पत्रके काढायला वेळ मिळतोय, माझे तसे नाही मला जनतेने तुम्हाला घरी बसवून चांगल्या मताधिक्क्याने निवडून दिले आहे.यावरुनच तुमची निष्क्रीयता आणि पापाचा घडा किती भरला आहे हे दिसून येत आहे. तुमच्याच पापाचा घडा रिता करायला आता पाटण मतदारसंघातील जनता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पाटण मतदारसंघातील पुरग्रस्तांना न्याय दयायला कोण धावले आणि कोण धावण्याचे नाटक करीत आहे हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. राहता राहिला प्रश्न माझेवरील आरोपांचा पाटणकर महाशय आरोप करताना जरा अभ्यास करा बघेल तेव्हा तेच तेच आरोप येणाऱ्या प्रत्येक पत्रकात करताय. पत्रकातून आरोप करण्यापेक्षा हिम्मत असेल तर माझेवरील आरोपाची उत्तरे घ्यायला आणि पुरग्रस्तांना न्याय दयायला कोण अपशयी ठरले हे पहायला एकदा जनतेच्या समोरासमोर या असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिले आहे.
              आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की,पाटणच्या युवा नेत्यांचा बालिशपणा वयाची पन्नाशी ओलंडली तरी कधी जाणार हे न सुटणारे कोडे आहे. पाटणकरांनी माझी काळजी करण्यापेक्षा स्वत:ची काळजी करावी असा जाहीर सल्ला मी त्यांना दिला होता. परंतू त्यांचा बालिशपणा जाता जात नाही त्याला आपण तरी काय करायचे. मी पुरपरिस्थीतीत फुटभर पाण्यातून जावू दे नाहीतर 10 फुट पाण्यातून किंवा चिखलातून जावू दे,सत्यजितसिहं मी मतदारसंघावर आलेल्या पुरपरिस्थितीच्या व अतिवृष्टीच्या संकटात मतदारसंघातील जनतेच्या मदतीला धावून तरी गेलो.नुसता धावून गेलो नाही तर पुरपरिस्थितीत व अतिवृष्टीत नुकसान झालेल्या तळागाळातल्या आपदग्रस्तांना वैयक्तीक तसेच सार्वजनीक मालमत्तेची पुर्नंबांधणी करण्याकरीता मी करीत असलेले प्रयत्न मतदारसंघातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे.तुमच्यासारखी नुसते नावापुरते पहाणी दौरे करुन मदतीची नौटंकी तर मी करीत नाही त्यामुळे थोडा धीर धरा तुमची निष्क्रीयता पुन्हा एकदा येणारा काळच ठरविणार आहे.
                आपदग्रस्तांना भेटी देवून मला जनतेची किती काळजी आहे याचा जो काही अविर्भाव आपण आणत आहात हे मतदारसंघातील जनतेच्याही आता लक्षात आले आहे.नुसत्या भेटी देवून पाटणकर करतायत काय? कारण माजी आमदार पुत्रांच्या हातात आपदग्रस्तांना देण्यासारखे आश्वासनाशिवाय दुसरे काहीच नाही. त्यांच्या पक्षाकडून मदत आली ती ही तोकडी ती दयायची कोणाला? माजी आमदार पुत्रांनाच मदत करायला कुणी येईना ते काय दुसऱ्याला मदत देणार. आम्ही किती मदत दिली कुणाला दिली याची मापे काढण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही आपदग्रस्तांना किती मदत दिली हे एकदा मतदारसंघातील जनतेसमोर जाहीरपणे मांडा. सत्यजितसिंह प्रत्येक गोष्टीचे राजकारण करुन चालत नाही. आपदग्रस्तांना मी करीत असलेल्या मदतीचे राजकीय भांडवल करीत नाही आणि कधी करणारही नाही ती शिकवण मला नाही परंतू राजकीय व्देषातून आपण जी टीका करीत आहात म्हणूनच नाईलाजास्तव मलाही आपल्याला याचे प्रतिउत्तर दयावे लागत आहे. आणि तुमच्या असल्या राजकारणाला मी तर भीक घालत नाही मला माझ्या मतदारसंघातील जनतेची काळजी आहे. आपत्तीत सापडलेल्या आपदग्रस्तांना आवश्यक ती मदत मागून आणायला मला लाज वाटत नाही. मी जनतेसाठी शासनाकडे, पक्षाकडे, सेवाभावी संस्थाकडे हात पसरत आहे. शासनाकडून, पक्षाकडून, सेवाभावी संस्थाकडून आलेली मदत कारखान्यावर नेवून ती मी घरी नेत नाही.योग्य प्रकारे ज्या गरजूंना त्यांची गरज आहे त्या गरजू व्यक्तीपर्यंत माझे माध्यमातून मदत जात आहे हे तुम्हाला भागा भागात दिसू लागल्याने अन् आमदार मतदारसंघात ठाण मांडुन सत्ताधारी पक्षाच्या मंत्रीमहोदयांच्या मागे लागून मतदारसंघातील आपदग्रस्तांना आधार आणि दिलासा देण्याकरीता सर्वोत्तोपरी प्रयत्न करुन आपदग्रस्तांपर्यत आवश्यक ती मदत पोहचवत आहे हे पाहून आपल्या पोटात दुखु लागले आहे. तांबव्याचा पुल पडण्यास म्हणे आमदार जबाबदार आहे अहो महाशय तुमचे पिताश्री आमदार असताना हेळवाक पुल पडला होता तेव्हा आम्ही त्याचे राजकारण केले नव्हते. कारण हेळवाकचा तो पुल पडायला ना तुमचे पिताश्री गेले होते ना तांबव्याचा पुल पडायला मी गेलो होतो.त्यामुळे पन्नाशी ओंलडलेल्या युवा नेत्याने अशा परिस्थितीत अकलेचे तारे तोडू नयेत. तांबव्याचा पुल पडला असला तरी दुसरा पुल आठव्या दिवशी चालू करण्याची धमक फक्त माझ्यातच आहे.ते तुम्हाला तुमच्या राजकीय कारकीर्दीत जमणार नाही.
               तुमच्या पाटणकर पितापुत्रांचे काम म्हणजे बैल गेला अन् झोपा केला असेच आहे. ज्या पुरग्रस्तांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची आपण भाषा करीत आहात ती सत्ताधारी पक्षाच्या युतीच्या शासनाने पुरग्रस्तांना भरघोस अशी मदत देण्याचे जाहीर करण्यापुर्वी केली असती तर मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आपले कतृत्व आले असते. परंतू आपले निष्क्रीय कतृत्वाचे दर्शन पाटण मतदारसंघातील जनतेला घडू लागले आहे. कशाचा दिखावा कधी करायचा तेही आपल्या लक्षात येत नाही. मतदारसंघात पुर आला तेव्हा आपण मतदारसंघाबाहेर होतात स्वत:च्या तालुक्यातील जनता किती दिवस पाण्यात होती हे पाहण्याकरीता तुम्हाला आठ दिवस लागले तर तुम्ही मतदारसंघातील जनतेची काय काळजी घेणार. आपले पिताश्री आम्ही पाटणला जेसीबी मधून का होईना पोहचल्यानंतर पाटणचा पुर पहायला आले होते तेव्हा त्यांनी तालुका प्रशासनाने काहीच न करता माझ्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाने आणि नगरसेवकांनी पुरात अडकलेल्या लोकांना पुरातून बाहेर काढले त्यांना आधार दिला असे सांगून गेले.तालुक्याचे प्रशासन माझे देखरेखीखाली आठ दिवस पाण्यातील जनतेला दिलासा देत होते तेव्हा तुमचे पिताश्री प्रशासनावर वृत्तपत्रातून टिका करण्यात धन्यता मानत होते आणि त्याच प्रशासनाने पुरपरिस्थितीत चांगले काम केले म्हणून 15 ऑगस्टला प्रशासनाचे सत्कार करण्याची नौटंकी तुम्ही करीत होतात ही तुम्हा पाटणकर पितापुत्रांची केवळ स्टंटबाजी असून या स्टंटबाजीचा मतदारसंघातील जनतेला काडीचाही उपयोग नसल्याचा टोला आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पाटणकरांना लगाविला आहे.
चौकट:- खुमखुमी असेल तर तारीख,वेळ तुम्हीच ठरवा.
               तुमचे पिताश्री आणि तुम्हाला अनेकदा समोरासमोर येण्याचे आव्हान दिले होते. ते तुम्ही दोघांनीही आजपर्यंत स्विकारले नाही तुम्हाला सर्व बाबींची उत्तरे हवी असतील आणि खुमखुमी असेल तर तारीख, वेळ तुम्हीच ठरवा मी सर्व उत्तरे देण्यास तयार आहे.- आमदार शंभूराज देसाई

No comments:

Post a Comment