Saturday 31 August 2019

आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्वाखाली नहिंबे-चिरंबे संपुर्ण गावाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. संपुर्ण गांवाने घेतला हाती भगवा झेंडा.





दौलतनगर दि.३१:- अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम राहिलेल्या कोयना पुनर्वसित असणाऱ्या नहिंबे-चिरंबे या गांवाने पुनर्वसित गावठाणातील त्यांच्या मुलभूत सुविधांची कामे राष्ट्रवादी पक्षाकडून सत्तेत असताना अनेकदा मागणी करुनही झाली नसल्याने राष्ट्रवादी पक्षाला व मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाला रामराम करीत या संपुर्ण गांवाने एकत्रितपणे निर्णय घेत शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली हाती भगवा झेंडा घेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या संपुर्ण नहिंबे-चिंरबे गांवातील नागरिक महिलांचे स्वागत आमदार शंभूराज देसाईंनी केले. व पुनर्वसित गावठाणांतील त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी ग्रामस्थ व महिलांना दिली.
              पाटण तालुक्यातील कोयना पुनर्वसित असणाऱ्या नहिंबे-चिंरबे या गांवातील सर्व नागरिकांनी गांवातील महिलांना बरोबर बैठक घेवून गावच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याकरीता सातत्याने राष्ट्रवादी पक्षाकडे व पक्षाच्या नेतृत्वाकडे मागणी करुनही आपली मागणी पुर्ण होत नसल्याने आपल्या गांवाच्या मुलभूत सुविधा न मागता देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठाम उभे राहू या असा एकमुखाने निर्णय गावामध्येच घेतला व सर्व गांवानी एकत्रित येवून नहिंबे-चिरंबे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह सरंपच, उपसरंपचांनी आमदार शंभूराज देसाईंची त्यांचे दौलतनगर येथील निवासस्थानी भेट घेतली व आम्ही संपुर्ण गांव आपले नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नहिंबे-चिरंबे गावच्या सरपंच स्नेहल सुनिल साळवी,उपसरपंच शैलेश कदम,सदस्य चंद्रकांत साळवी, सदस्या सुशिला यादव,योगिता साळुंखे, साक्षी साळुंखे, सुरेश साळवी,किरण साळवी,सुरेश साळवी, मानसिंग साळुंखे,यादवराव साळुंखे,अधिक साळुंखे,दिपक साळुंखे,राजेंद्र घोरपडे,अरूण पाळांडे,राजेंद्र सावंत, प्रतिभा साळुंखे,वनिता साळुंखे,सुपर्णा साळवी,ओंकार साळवी,प्रकाश साळुंखे,प्रविण साळुंखे,बळीराम साळवी, वसंत साळवी, संदेश साळवी,संजय साळवी,पांडुरंग पाळांडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला व यापुढे आम्ही सर्वजण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने स्विकारत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
               आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर नहिंबे-चिंरबे गांवातील महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही गत आठ वर्षापासून आमच्या पुनर्वसीत गावठाणांतील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करणेकरीता राष्ट्रवादी पक्षाचे पाटण तालुक्यातील नेते यांचेकडे पाठपुरावा करीत होतो मात्र आमच्या कामांकडे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने लक्षच दिले नसल्याने आम्ही गत आठ वर्षापासून पाण्याकरीता वणवण करीत आहोत. आपला विकासकामांचा अहवाल वाचलेनंतर आमचे गावातील सर्व ज्येष्ठ, वयोवृध्द तसेच महिलांनी एकत्रित येवून आमदार शंभूराज देसाईंचे नेतृत्व स्विकारुन गांवातील पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण करुन घेवू असा आम्ही निर्णय घेतला आणि आपली भेट घेणेकरीता आलो असे सांगितल्यानंतर तात्काळ आमदार शंभूराज देसाईंनी या ग्रामस्थांची व महिलांची दखल घेत राष्ट्रीय पेयजलच्या सन २०१९ मधील नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून मी उद्याच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर साहेब यांचेशी चर्चा करुन आपले गावांतील नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेत करण्याचा प्रयत्न करतो असे जाहीर केले हे नुसते जाहीर करीत नाही तर नहिंबे-चिंरबे गावाला पिण्याच्या पाण्याची योजना मंजुर करण्याची जबाबदारी आता माझी आहे असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी सर्वांना सांगितले.

No comments:

Post a Comment