Sunday 11 August 2019

महापुरामुळे पाटण शहरातील बाधित कुटुंबिंयाना पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे यांचेकडून मदतीचा हात. बाधित कुटुंबिंयाना पालकमंत्र्याच्या वतीने बँल्केट वाटप आमदार शंभूराज देसाईंनी मानले आभार.





दौलतनगर दि.११:-  गेले पाच ते सहा दिवस पाटण तालुक्यात सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी वसलेल्या पाटण शहरामध्ये महापुराचे पाणी घरांमध्ये घुसलेल्या बाधित कुटुंबियांना जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे यांचेकडून मदतीचा हात देण्यात आला असून पाटण शहरातील बाधित कुटुंबिंयाना त्यांच्यावतीने बँल्केटचे वाटप आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आले.
पाटण शहरामध्ये कोयना नदीस आलेल्या महापुराचे पाणी घरांमध्ये घुसल्यामुळे बाधित झालेल्या तसेच स्थलातंरीत करण्यात आलेल्या कुटुंबियांना आधार म्हणून जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे यांचेकडून  देण्यात आलेल्या बँल्केटचे वाटप आज पाटण याठिकाणी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी तालुका प्रशासनातील पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,गट विकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह पाटण नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ.मनिषा जंगम, बबनराव माळी, नानासो पवार,कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेजवळ,पाटण शिवसेना शहरप्रमुख शंकर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटण शहरात तसेच मतदारसंघात गेले पाच ते सहा दिवस निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीच्या नुकसानीची तसेच बाधितांना दयावयाच्या मदतीची विचारणा जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजयबापू शिवतारे यांचेकडून रोज करण्यात येत होती.तसेच पुरग्रस्तांच्या मदतीकरीता प्रशासन विभागाने सतर्क राहण्याच्या सुचनाही त्यांच्याकडून देण्यात येत होत्या.पुरपरिस्थितीत पालकमंत्री यांचे चांगले सहकार्य आम्हास मिळाले असून पुराचे पाणी ओसरलेनंतर या पुरात तसेच अतिवृष्टीत बाधित झालेल्या कुटुंबिंयाना पाटण तालुक्यातील इतर भागातही त्यांनी बँल्केटच्या रुपाने केलेली मदत याबद्दल या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.


No comments:

Post a Comment