दौलतनगर दि.३०:- मी गत
पाच वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर मला
पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी करणेकरीता पाटण मतदारसंघातील जनता सज्ज झाली
असताना येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत
पुन्हा एकदा भरघोस मतांनी स्पष्ट पराभूत समोर दिसू लागल्याने माजी आमदार पुत्र
सत्यजितसिंह पाटणकरांचे संतुलन आताच ढळू लागले आहे. त्यामुळे माजी आमदार पुत्र
माझेवर वैफल्यग्रस्त विधाने तसेच खोटेनाटे आरोप करुन नको ती सहानुभूती मिळवू पहात आहेत परंतू माजी
आमदारपुत्रांना माझे सांगणे आहे, पाटण मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे.तुमच्या
आरोपांनी ती भीक घालणार नाही.आमच्यावर जो काही टक्केवारीचा आरोप सत्यजितसिंह
पाटणकर करीत आहेत तो आरोप त्यांनी पुराव्यानिशी सिध्द करावा,सिध्द होत नसेल तर
आरोप मागे घ्यावा नाहीतर भविष्यात येणाऱ्या काही दिवसातच बिनबुडाचे आरोप करणाऱ्यां
पाटणकरांनी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे जाहीर आव्हान आमदार शंभूराज
देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिले आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे, सत्यजितसिंह पाटणकर
आणि त्यांचे पिताश्री धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे भासवत असले तरी गेल्या
२६ वर्षाच्या आमदारकीच्या काळात आणि मंत्री पदाच्या काळात त्यांनी काय काय उद्योग
केले आहेत हे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहेत. मंत्रालयात
सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नॅशनल हायवेचे ठेकेदार काय करीत होते हे
माजी मंत्र्याच्या बरोबर तेव्हा काम करणाऱ्या आणि आता आमच्या पक्षात आलेल्या अनेक
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खुमासदारपणे आम्हास सांगितले आहे.माजी आमदारांना सन
१९८६ च्या विधानसभा निवडणूकीला मतदारसंघातील जनतेने पैसा गोळा करुन दिला होता असे
आपणच सांगता मग जनतेकडून पैसे गोळा करुन विधानसभेची निवडणूक लढलेल्या माजी
आमदारांनी त्यानंतरच्या पाच विधानसभेच्या निवडणूका खेळायला यांचेकडे पैसे आले
कुठुंन? पाटणकरांकडून लढणाऱ्या प्रत्येक निवडणूका या त्यांचेकडील धनशक्ती विरुध्द
आमची जनशकती अशाच प्रकारे यापुर्वीच्या निवडणूका झाल्याचा पाटण मतदारसंघाचा इतिहास
आहे. विधानसभा निवडणूकामध्ये कोटयावधी रुपयांचा चुराडा करायची सवय याच पाटणकरांनी
पाटण मतदारसंघात लावली आणि त्यांचे हुशार चिरंजीव आमच्यावर टक्केवारीचा आरोप करीत
आहेत. माजी आमदारपुत्र आरोप करा परंतू त्याचे पुरावे अगोदर सादर करा. बिनबुडाचे
आरोप ना आम्ही सहन केले आहेत ना मतदारसंघातील जनतेने. मतदारसंघातील डोंगर
पठारावरील गोरगरीब जनतेच्या जमिनी पवनचक्की प्रकल्पांना विकून त्या कंपन्यांच्या
मालकांकडून गरीब शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पाटणकर पितापुत्रांनी आपले ठेवायचे
झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा उद्योग आतातरी बंद करावा. या तालुक्याचा
आमदार म्हणून मी गेल्या पाच वर्षात पाटण मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांच्या
जोरावर नवी आव्हाने स्विकारण्याकरीता पाटण मतदारसंघातील जनता मला पुन्हा एकदा
येणाऱ्या निवडणूकीत मागच्यापेक्षा भरघोस अशा मतांनी आमदार करण्याकरीता सज्ज झाली
आहे आणि माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकरांची पुन्हा एकदा भरघोस मतांनी पाठ
लावण्याची तयारीत असताना तालुक्याच्या आमदारांनी एवढी कामे मतदारसंघात केली आहेत
आता त्या कामांपुढे आपले कसे होणार या भितीने आणि स्पष्टपणे पराभव पुढे दिसत
असल्यामुळे सत्यजितसिंह पाटणकर हतबल झाले आहेत त्यातच ते ज्या पक्षातून निवडणूक
लढवायला उतावळे झाले आहेत त्या पक्षाला दिवसेंदिवस गळतीच लागली आहे. तालुक्याचे
आमदार सगळयाच ठिकाणी आपल्याला भारी पडत असल्यामुळे माझी प्रतिमा मलीन कशी होईल
याकरीता सत्यजितसिंह पाटणकरांचे प्रयत्न सुरु आहेत परंतू पाटणकरांच्या या
प्रयत्नांना यश मिळणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. येणारी विधानसभा
निवडणूक निवडणूकीप्रमाणे होईल मात्र निवडणूकीत पाटणकरांनी माझेवर आरोप करताना
विचार करुन आरोप करावेत बिनबुडाचे आरोप केले तर जशाच तसे उत्तर माजी
आमदारपुत्रांना दिले जाईल याचे भान त्यांनी ठेवावे. असेही आमदार शंभूराज देसाईंनी
सत्यजितसिंह पाटणकरांना शेवठी ठणकावले आहे.
No comments:
Post a Comment