Wednesday 28 August 2019

आमदार शंभूराज देसाईंचे संकल्पनेतून पाटण मतदारसंघात शनिवारी एकाच दिवशी १२४ गावांत विविध विकासकामांची भूमिपुजने




दौलतनगर दि.2८:-  युतीच्या शासनाकडे २०१४ ते २०१९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गांवातील विकासकामांकरीता राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षातून तसेच योजनेतून पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला असून आमदार शंभूराज देसाईंच्या संकल्पतेतून सन २०१८ व २०१९ या आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या एकूण २१६ कामापैकी १२४ विविध विकासकामांची भूमिपुजने एकाच दिवशी एकाच वेळी शनिवार दि.31.08.2019 रोजी दुपारी 02.00 वा पाटण विधानसभा मतदारसंघातील या १२४ गांवामध्ये घेण्याचे नाविन्यपुर्ण नियोजन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे. आमदार शंभूराज देसाईंच्या या नाविन्यपुर्ण संकल्पनेतून अशा प्रकारचा भूमिपुजन समारंभ पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच होत आहे. या विविध विकासकामांमध्ये मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील जनतेला उपयुक्त असणारी जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करणारी ग्रामीण रस्त्यांची, अंतर्गत रस्त्यांची,तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना व सार्वजनीक सभागृहे या कांमाचा समावेश असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
               आमदार शंभूराज देसाईंनी या नाविण्यपुर्ण संकल्पनेसंदर्भात सांगितले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी युती शासनाच्या माध्यमातून, राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे विकसनशील व कुशल नेतृत्वाखाली तसेच शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे कुशल नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विविध लेखाशिर्षातून तसेच योजनेतून कोटयावधी रुपयांचा निधी सन २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये आणण्यात मला यश मिळाले आहे. या पंचवार्षिकमध्ये मी पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा जाहीरपणे मी मतदारसंघातील जनतेसमोर मांडला असून सन २०१८ व २०१९ या आर्थिक वर्षात मंजुर झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील जनतेला उपयुक्त असणारी जनतेच्या मुलभूत सुविधा पुर्ण करणारी ग्रामीण रस्त्यांची, अंतर्गत रस्त्यांची,तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना व सार्वजनीक सभागृहे या विविध  विकासकामांची भूमिपुजने करुन या कामांना सुरुवात करणेकरीता मंजुर झालेल्या एकूण २१६ कामापैकी १२४ विविध विकासकामांची भूमिपुजने एकाच दिवशी एकाच वेळी शनिवार दि.31.08.2019 रोजी दुपारी 02.00 वा पाटण विधानसभा मतदारसंघातील या १२४ गांवामध्ये घेण्याचा नाविन्यपुर्ण उपक्रम मतदारसंघातील जनतेसमोर मी मांडला आणि त्यापध्दतीने अशा प्रकारे भूमिपुजन घेण्याचे नियोजन करण्यात आले. पाटण विधानसभा मतदारसंघात शनिवार दि.31.08.2019 रोजी दुपारी 02.00 वा एकाच दिवशी एकाच वेळी या १२४ गावांमध्ये हे भूमिपुजनाचे कार्यक्रम 124 गांवातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे व आमचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते आयोजीत करण्यात आले आहेत मी स्वत: अतिशय ग्रामीण व डोंगरी भागातील एक ते दोन गांवातील कामांचे भूमिपुजने करणार आहे. शनिवारी एकूण १५ कोटी ४० लाख ९० हजार रुपये निधीच्या कामांचे भूमिपुजन करण्याचा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुंभारगांव भागामध्ये १२, काळगांव विभाग ०७, कोयना विभाग २०, चाफळ ०६, ढेबेवाडी १९, तारळे १०, नाटोशी मोरणा भाग १२, नाडे विभाग ०५, पाटण विभाग १०, मरळी विभाग ११, मल्हारपेठ विभाग ०३, मारुलहवेली ०५ व सुपने मंडल ०४ अशी एकूण १२४ भूमिपुजने घेण्यात येणार आहेत. हा नाविन्यपुर्ण उपक्रम पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच राबविला जात आहे त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात सर्व उत्साहाचे वातावरण आहे. या नाविन्यपुर्ण उपक्रमाबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे कौतुक करीत त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment