प्रतिकुल
अशा परिस्थितीशी झगडत झगडत राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्याची मंत्रीपदे
यशस्वीपणे भूषवून राज्याला विकासाची दिशा देणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी
आपली जन्मभूमी असणारा पाटण तालुका घडविला, मोठा केला, आज पाटण तालुक्याचे दिवसणारे
वैभव आणि आपण सर्वजण हे लोकनेत्यांच्या मुळेच तालुक्यात दिसत असून तालुक्यातील
जनतेसाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचणारे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचार तळा
गाळापर्यंत पोहचविण्याचे काम तालुक्यातील प्रत्येक नागरीकांनी करावे असे प्रतिपादन
आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर,ता.पाटण
येथील कारखाना कार्यस्थळावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 108 वा जयंती सोहळा
आयेजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई बोलत होते. प्रारंभी
कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पमुळयास आमदार
शंभूराज देसाइ्र यांनी पुष्पहार व पुष्पचर्क अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी उदयोग व शिक्षण समुहाच्यावतीने लोकनेत्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी
चेअरमन डॉ. दिलीपराव
चव्हाण, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, पाटण पंचायत समितीचे माजी
उपसभापती डी. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य पंबाजराव देसाई, सुरेश पानस्कर, सीमा
मोरे, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सौ. सुग्रा खोंदू, कारखान्याचे संचालक बबनराव
भिसे, अशोक डिगे, आनंदराव चव्हाण, राजेंद्र गुरव, व्यंकट पाटील, विकास गिरी
गोसावी, बाळासो शेजवळ, विश्रांती देशमुख
जंबुरे, सौ. दिपाली पाटील, भरत साळूंखे,
गणेश भिसे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग व शिक्षण समुहातील पदाधिकारी,
अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत राज्याच्या
उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे महाराष्ट्र राज्याच्या
मंत्रीमंडळातील एक आश्वासक आणि गोरगरीब जनतेची तळमळ असणारे नेते अशीच त्यांची ओळख
होती. साहेबांनी आपल्या मंत्री पदाच्या काळात महाराष्ट्राला
दिशा देण्याचे अतुलनीय काम केले, तसेच लोकनेते साहेबांनी महराष्ट्रामध्ये विविध
खात्याचे मंत्री म्हणून काम करताना राज्य मंत्रीमंडळात प्रमुख मानली जाणारी
जी खाती आहेत त्या प्रत्येक खात्याचा कारभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळत सलग ३०
वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करुन राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या
हिताकरीता धोरणात्मक असे अनेक निर्णय घेत राज्यातील
तळागाळातील जनतेकरीता अहोरात्र कष्ट घेतले.लोकनेत्यांच्या महान कर्तृत्वामुळेच
आजही लोकनेत्यांचे नाव अत्यंत आदराने आणि श्रध्देने घेतले जाते. लोकनेते साहेबांनी
राज्यात सहकार, शिक्षण, दळणवळण यांचे गावागावांत जाळे पोहचविण्याचा पाया
रचला. महाराष्ट्र
मंत्रीमंडळातील अनेक महत्त्वपूर्ण खाती सांभाळत लोकनेते साहेबांनी
भौगोलिक दृष्टया डोंगरद-यात आणि कडया कपा-यात विस्तारलेल्या पाटण तालुक्याचा विकास
साधला. लोकांच्यासाठी सत्ता भोगणारे आणि लोकांच्यासाठीच
ती सोडणारे एकमेव मंत्री महाराष्ट्रात होवून गेले ते म्हणजे लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब म्हणून त्यांच्या ख-या कार्याची ओळख व प्रसार समाजात होणे काळाजी गरज
आहे असे स्पष्ट करुन ते म्हणाले, लोकनेते साहेबांचे कार्य नव्या पिढीला दिशा व
आकार देणार असून तालुक्यातील जनतेसाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचणारे लोकनेते
बाळासाहेब देसाई यांचे विचार तळा गाळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. लोकनेते
साहेबांच्या विचारातूनच गत तीन वर्षापासून आपण आमदारकीच्या माध्यमातून
तालुक्यामध्ये विकास कामांचे नवे पर्व सुरु केले असून युती शासनाच्या माध्यमातून
मतदार संघामध्ये आज विविध गावांमध्ये कोटयावधी रुपयांची विकास कामे करण्यास
आपल्याला यश आले असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना स्पट केले.
No comments:
Post a Comment