Wednesday 14 March 2018


आमदार शंभूराज देसाईंचे प्रयत्नातून ग्रामीण भागात साकारलेल्या जिल्हा कृषी महोत्सवाला शेतक-यांचा उदंड प्रतिसाद.
चार दिवसात ४० हजारांहून अधिेक शेतक-यांनी घेतला कृषी प्रदर्शनाचा लाभ.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि माजी कृषीमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे १०८ व्या जयंती सोहळयाच्या निमित्ताने जिल्हयाच्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने भरविण्यात येणारा जिल्हा कृषी महोत्सव हा ग्रामीण भागातील पाटण तालुक्यात आयोजीत करण्यात यावा याकरीता आग्रही राहून ग्रामीण भागात जिल्हा कृषी महोत्सव आयोजीत करणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांना जिल्हा कृषी महोत्सवाचा आनंद लुटता आला. चार दिवस सुरु असलेल्या कृषी महोत्सवात पाटण तालुक्यासह जिल्हयातील ४० हजारांहून अधिक शेतक-यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला.प्रदर्शनात अनेक शेतक-यांनी त्यांना आवश्यक असणा-या शेतीपुरक साहित्यांची खरेदी देखील केली. कृषी महोत्सवाच्या सुरुवातीस आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते शेतक-यांना कृषी विभागामार्फत देण्यात येणा-या ट्रॅक्टरच्या चाव्याही प्रधान करण्यात आल्या.
राज्य शासनाच्या वतीने भरविण्यात येणारा जिल्हा कृषी महोत्सव हा राज्याचे माजी कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जयंती सोहळयाचे औचित्य साधून जिल्हा कृषी विभाग व आत्मा विभागाने ग्रामीण आणि डोंगरी असणा-या पाटण तालुक्यात आयोजीत करावा अशी आग्रही भूमिका आमदार शंभूराज देसाई यांनी शासनाकडे मांडली होती. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांना या जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घेता यावा हा त्यांचा यामागचा मुळ उद्देश होता. त्यानुसार दि.१० मार्च ते १४ मार्च २०१८ या कालावधीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांची कर्मभूमि असणा-या पाटण तालुक्यातील दौलतनगर (मरळी) याठिकाणी हा जिल्हा कृषी महोत्सव आयोजीत करण्यात आला होता.सदर जिल्हा कृषी महोत्सवामध्ये शासकीय ४० स्टॉल तसेच सेंद्रीय शेतीचे १० स्टॉल व इतर कृषीपुरक कंपन्याचे १०० स्टॉल व खाद्यान्न आणि इतर ५० स्टॉल असे एकूण २०० स्टॉल उभारण्यात आले होते.
या जिल्हा कृषी महोत्सवात प्रगतशील उत्पादक शेतक-यांनी ग्राहकांना आपल्या मालांची थेट विक्री व्यवस्था केली होती तर धान्य महोत्सवही आयोजीत करण्यात आला होता.शेतमाल मूल्यवर्धन, सेंद्रिय शेयमल, आकर्षक पॅकेजींग, कृषी यांत्रिकीकरण, विविध कृषी विषयक व विविध शासकीय योजना, कृषी निविष्ठा, शेतकऱ्यांची फळे, फुले, भाजीपाला व धान्ये यांचे उत्कृष्ठ नमुने,पाणलोट चे जलयुक्त शिवार मॉडेल,शेती पद्धतीचे विकसित मॉडेल तसेच वनविभाग, शासनाच्या कर्जमुक्ती योजनांची माहिती शेतक-यांना करुन देणेकरीताही व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जिल्हयामधील हळद पिक घेणा-या तसेच ऊस पिक घेणा-या शेतक-यांकरीता सदर महोत्सवामध्ये हळद पिक व ऊस पिक परिसंवादही आयोजीत करण्यात आले होते. या परिसंवादांचाही शेतक-यांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.सलग चार दिवस सुरु असणा-या या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी,ग्राहक आणि महिला यांनी गर्दी केली होती पाटण तालुक्यासह जिल्हयातील ४० हजारांहून अधिक शेतक-यांनी या जिल्हा कृषी महोत्सवाचा लाभ घेतला पाटण तालुक्यासह जिल्हयातील इतर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आमदार शंभूराज देसाईंनी कृषीपर्वणीच मिळवून दिल्याची प्रतिक्रिया पाटण तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतक-यांनी व्यक्त केल्या. दि.१४ रोजी सायंकाळी या जिल्हा कृषी महोत्सवाची सांगता करण्यात आली.
सदरचा जिल्हा कृषी महोत्सव यशस्वी करणेकरीता जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधिक्षक सुनील बोरकर,सातारा जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक अशोक देसाई,आत्माचे प्रकल्प उपसंचालक विजयकुमार राऊत, सातारा जिल्हा कृषी उपसंचालक गुरुदत्त काळे,सातारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, फलटणचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर,पाटणचे कृषी अधिकारी प्रवीण आवटे,कराडचे कृषी अधिकारी दत्तात्रय खरात,सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाययक,जिल्हा परिषद पंचायत समितींचे कृषी अधिकारी, आत्म्याचे अधिकारी,शेतकरी,कृषी मित्र यांचे मोठया प्रमाणात सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment