Wednesday 21 March 2018

मी बोलविल्याशिवाय आणि निमंत्रणाशिवाय बैठकांना जात नाही. पाटणकरांनी श्रेय लाटण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना वेटीस धरु नये. आमदार शंभूराज देसाईंचा डॉ.भारत पाटणकरांना टोला.





           राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दि.१९ मार्च रोजी विधानभवनात आयोजीत केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात मला राज्य शासनाच्या महसूल वन विभागाकडून बैठकीस उपस्थित राहणेसंदर्भात रितसर लेखी निमंत्रण देवून बोलविले होते.बहूतांशी कोयना प्रकल्पग्रस्त हे आमचे पाटण तालुक्यातील आहेत.ज्या मतदारसंघातील जनतेचा किंवा बाधितांचा प्रश्नासंदर्भात जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री संबधित मंत्री एखादी उच्च्स्तरीय बैठक घेतात तेव्हा त्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवणे ही परंपरा आहे.हे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकरांनी प्रथमत: माहिती करुन घ्यावे. तुम्हालाच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा ठेका दिलेला नाही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आम्हीही शासनदरबारी मांडतो म्हणूनच मला या बैठकीला बोलविले होते. आणि बैठकीत मी मांडलेले मुद्दे योग्यच होते हे मुख्यमंत्री महोदय यांचेही लक्षात आले परंतू मी त्याचे श्रेय घेत बसलो नाही मुख्यमंत्री यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना न्याय मिळाला त्यामुळे डॉ.भारत पाटणकरांनीच प्रत्येकवेळी श्रेय लाटण्यासाठी आमच्या तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना वेटीस धरु नये.मी बोलविल्याशिवाय निमंत्रणाशिवाय कुठल्याही बैठकीला जात नाही.हे डॉ.पाटणकरांनाही चांगलेच माहिती असल्याचा टोला आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकाव्दारे लगाविला आहे.
           मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजीत केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भातील बैठकीला श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकरांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना बरोबर आणून या बैठकीला त्यांनी राजकीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतू मी स्वत: तिथे उपस्थित असल्याने पाटणकरांचे श्रेय लाटण्याचे मनसुबे काही यशस्वी झाले नाहीत त्यामुळेच ही बैठक झाल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांना चुकीची माहिती सांगितल्याचा गवगवा डॉ.पाटणकरांनी पाटण तालुक्यात येवून केला.परंतू बैठकीत मी मांडलेले मुद्दे किती योग्य होते हे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांचेही लक्षात आले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी विधानभवनात विधानभवनातील या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीचे सर्व श्रेय लोकप्रतिनिधी म्हणून मला मिळेल ते मला मिळू नये ते श्रेय डॉ.पाटणकरांना मिळावे याकरीता त्यांचा हा प्रयत्न असावा कदाचित. परंतू डॉ.पाटणकरसाहेब, पाटण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे.तुमचे डावपेच पाटण तालुक्यातील जनतेने मागेच ओळखले आहेत ते पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्याही लवकरच लक्षात येतील.स्वत:च्या स्वार्थासाठी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा वापर करुन स्वत:च्या पदरात शासनाकडून काहीतरी पाडून घेणे हाच उद्योग आजपर्यंत आपणांकडून झाला आहे.हे आम्ही नेहमीच पहात आलो आहे.स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आणि श्रेय लाटण्यासाठी पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना वेटीस धरण्याचा उद्योग डॉ.पाटणकरांनी आतातरी बंद करावा.कारण पाटण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी सक्षम आहे.असे सांगुन त्यांनी म्हंटले आहे की,कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात तसेच विविध मागण्यांसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकरीता दाखविलेली कार्यतत्परता हे कोयना प्रकल्पग्रस्तांचे कष्ट आहेत प्रकल्पग्रस्तांच्या कष्टामुळेच आणि त्यांच्या त्यागामुळेच सलग २३ दिवस अहोरात्र चाललेल्या आंदोलनाला यश्आले याचे सर्व श्रेय या कोयना प्रकल्पग्रस्तांचे आहे यामध्ये कुणाचाही कसालाही संबध नाही कारण सलग २३ दिवस सुरु असलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलनामध्ये अहोरात्र बसलेले कोयना प्रकल्पग्रस्त २३ दिवस एका जागेवरुन हालले नव्हते, डॉ.पाटणकरसाहेब आपण २३ दिवस कुठे होतात.? आंदोलन सुरु करुन देणे आणि आंदोलनात ये जा केल्याने आंदोलकांचे प्रश्न सुटत नाही हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे आणि आम्हालाही. धोरणात्मक निर्णय करुन घ्यायचा असेल तर योग्य दिशेने चालून बाधित प्रकल्पग्रस्तांना योग्य दिशा देण्याची भूमिका संघटना चालविताना ठेवली पाहिजे एवढे तरी आपणांस नक्कीच ज्ञात असेल. हा श्रेय लाटण्याचा तुमचा उद्योग काही केवळ कोयना प्रकल्पग्रस्तांपुरताच नाहीतर तालुक्यातील तारळी असेा वा वांग मराठवाडी धरण प्रकल्प असो. प्रकल्पग्रस्तांना आंदोलने करायला लावायचे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून स्वत:च्या पदारात हवे ते पाडून घ्यायचे याला श्रेय लाटणे असे म्हणतात.आणि ते मला कधीही जमले नाही आणि जमणार देखील नाही. मी बैठकीत केवळ आणि केवळ प्रकल्पग्रस्तांचेच प्रश्न मांडत होतो हे आपणांस पहावले नसेल म्हणूनच माझेवर खोटे आरोप आपण केले हे मी जाणतो. मुख्यमंत्री महोदय यांचे बैठकीला मला दि.१६ मार्चचे पत्रानुसार निमंत्रण होते का नव्हते यांचे लेखी पत्र माझेकडे आहे आपणांस ते पहावयाचे असेल तर जरुर देईन परंतू डॉ. पाटणकरसाहेब एखादया गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणतेही वक्तव्य करणे चुकीचे असल्याचा टोलाही शेवठी आमदार शंभूराज देसाईंनी डॉ. भारत पाटणकरांना पत्रकात लगाविला आहे.

No comments:

Post a Comment