महाराष्ट्राचे पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म आणि जन्मभूमित महाराष्ट्र राज्यातील युती
शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाचा पहिल्या टप्प्याचे
दिमाखदार उद्घाटन व दुस-या टप्प्याचे भूमिपूजन
असा भव्य समारंभ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते व राज्यातील विविध मंत्रीमहोदयांचे प्रमुख
उपस्थितीमध्ये रविवार दि. ११ मार्च, २०१८
रोजी दुपारी ०२.३० वा. दौलतनगर,
ता. पाटण याठिकाणी संपन्न होत असून या समारंभाबरोबरच
सातारा जिल्हा कृषी विभागामार्फत आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन आणि पहिल्यांदाच
राज्यात सर्वात जास्त म्हणजेच पाटण विधानसभा मतदारसंघातील एकूण ५३ गावातील नळ पाणी
पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन असा संयुक्तीक समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती या
समारंभाचे निमंत्रक आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज
देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत
पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म
आणि जन्मभूमित लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्य उभारणीत दिलेल्या
अमुल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने त्यांचे पाटण तालुक्यात भव्य असे शताब्दी
स्मारक उभारावे अशी आमची राज्य शासनाकडे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जन्मशताब्दी
वर्षापासून मागणी होती त्या मागणीस सध्या राज्यात कार्यरत असलेल्या युतीच्या शासनाने
मुर्हुत स्वरुप देवून सन २०१५ मध्ये राज्याच्या अर्थसंकल्पातून १० कोटी रुपयांचा निधी
मंजुर करीत पाटण तालुक्यातील दौलतनगर, येथील जन्मभूमित शताब्दी
स्मारक उभारण्याचे कामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी
फडणवीस यांचे शुभहस्ते भूमिपुजन करुन करण्यात आला होता नुकतेच या शताब्दी स्मारकाचा
पहिला टप्पा पुर्णत्वाकडे गेला असून या शताब्दी स्मारकाचे उदघाटनही राज्याचे मुख्यमंत्री
ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते रविवार दि. ११ मार्च, २०१८ रोजी आयोजीत करण्यात आले आहे.
उदघाटनानंतर आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे हे शताब्दी स्मारक
महाराष्ट्र दौलत या नावाने ओळखले जाणार आहे. शताब्दी स्मारकाच्या
पहिल्या टप्प्याच्या कामांमध्ये आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे उभारण्यात आलेल्या ५० फुट उंचीच्या
पुतळयाचे अनावरणही मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. हा पुतळा देशामध्ये पहिल्यांदा पाटण तालुक्यात उभारण्यात आला आहे. याचबरोबर शताब्दी स्मारकाच्या दुस-या टप्प्यास आवश्यक
असणारा निधी राज्य शासनाकडून मिळावा याकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून याचेही
भूमिपूजन यादिवशी आयोजीत करण्यात आले आहे. याचबरोबर सातारा जिल्हा
कृषी विभागामार्फत यंदाच्या वर्षी आयोजित करावयाचा जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन
आणि राज्यात पहिल्यांदा युती शासनाच्या काळातील सर्वात जास्त एकाचवेळी पाटण विधानसभा
मतदारसंघातील ५३ नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन असा संयुक्तीक समारंभ रविवार दि.
११ मार्च, २०१८ रोजी दुपारी ०२.३० वा. दौलतनगर, ता. पाटण याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभहस्ते, महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.
चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री ना.
सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.
बबनराव लोणीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.
एकनाथ शिंदे, जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री ना.
राम शिंदे, रोजगार हमी व पर्यटन मंत्री ना.
जयकुमार रावल, कामगार, भूकंप
पुनर्वसन व कौशल्य विकास मंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर,पशुसंवर्धन मंत्री ना.महोदव जानकर, सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे, सातारा जिल्हयाचे सहपालकमंत्री तथा कृषी
राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत, गृह
(ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री ना.
दिपक केसरकर, सहकार राज्यमत्री ना. गुलाबराव पाटील व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे
भोसले महाराज या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे आमदार शंभूराज
देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment