Thursday 8 March 2018

ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी लाटुन फसवणूक करणा-या फलटण ट्रेडर्स सह.पतसंस्थेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करा. आमदार शंभूराज देसाईंची विधानसभेत लक्षवेदीव्दारे मागणी. कारवाई करण्याचे सहकार मंत्री यांचे आश्वासन.




      फलटण तालुक्यातील फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या सहकारी पतसंस्थेने राज्यातील अनेक शाखांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी लाटून त्यांची फसवणूक करुन या पतसंस्थेचे संचालक मंडळ फरार झाले आहे. कोटयावधी रुपयांच्या ठेवी ज्येष्ठ नागरिकांकडून घेवून मोठया प्रमाणात नागरिकांच्या पैशांचा अपवव्य या पतसंस्थेने केला आहे.या पतसंस्थेच्या संचालक मंडळावर कडक कायदेशीर कारवाई करुन या पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून दयाव्यात अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी राज्यातील सहकारी पतसंस्थांनी ठेवीदारांच्या बुडविलेल्या ठेवीसंदर्भात चर्चेला आलेल्या लक्षवेदी सुचनेवर बोलताना आज विधानसभेत केली. यावर सहकार मंत्री यांनी या लक्षवेदी सुचनेला उत्तर देताना फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
       राज्यातील सहकारी पतसंस्थांनी ठेवीदारांच्या बुडविलेल्या ठेवीसंदर्भात आज विधानसभेत लक्षवेदी सुचना चर्चेला आली होती या लक्षवेदी सुचनेवर बोलताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यातील फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्थेने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी लाटुन त्यांची फसणवूक करुन या संस्थेचे संचालक मंडळ फरार झाले असलेबाबतची बाब या लक्षवेदी सुचनेच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना ते म्हणाले, फलटण तालुक्यातील फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या राज्यभर शाखा असून या सहकारी पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांच्या कोटयावधी रुपयांच्या ठेवी लाटल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या आयुष्याची जमा केलेली पुंजी पतसंस्थेमध्ये ठेवीच्या रुपाने ठेवल्या होत्या. यामध्ये माझे पाटण तालुक्यातील कराड रहिवाशी असलेल्या बहुतांशी नागरीकांनी ठेवी ठेवल्या असून ठेवीदार त्यांच्या ठेवी मागण्याकरीता पतसंस्थांमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांच्या ठेवी देण्यास या पतसंस्थेकडून नकार देण्यात असून ठेवी लाटणा-या या पतसंस्थेचे संचालक मंडळ हे फरार झाले असून अनेक वर्षापासून या संचालक मंडळातील व्यक्तींचा शोध सुरु आहे. सुमारे सन २००८ साली या सहकारी पतसंस्थेतील घोटाळयांमुळे ही पतसंस्था बंद पडली असून अनेक ठेवीदारांनी त्यांच्या ठेवी परत मिळाव्यात याकरीता प्रयत्न करुनही त्यांना त्यांच्या ठेवी परत मिळत नसल्याने या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील व्यक्तींचा ठेवीदारांनीच शोध घेतला असून या पतसंस्थेचे संचालक मंडळातील अनेक व्यक्ती या पुणे याठिकाणी लपून बसल्या आहेत त्यांचा शोध पोलीस यंत्रणेमार्फत घेवून सहकार विभागाने या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी व ऐन वार्धक्याच्या काळामध्ये आयुष्यभर काबाड कष्ट करुन ज्येष्ठ नागरिकांनी या पतसंस्थेमध्ये जमा केलेल्या त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळाव्यात व ज्येष्ठ नागरीकांना न्याय मिळवून दयावा अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी यावेळी बोलताना केली.
       या लक्षवेदी सुचनेला उत्तर देताना राज्याचे सहकार मंत्री म्हणाले, सन्माननीय सदस्य आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे फलटण तालुक्यातील फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्थेने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी लाटुन त्यांची फसणवूक केली असल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून ठेवीदारांनीच या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील व्यक्तींचा शोध घेतला असून या संचालक मंडळातील अपहार करणा-या व्यक्ती ठेवीदारांच्या म्हणण्याप्रमाणे पुणे याठिकाणी असतील तर त्यांची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करुन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल व या पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या ठेवी परत मिळणेकरीता आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी शेवठी बोलताना दिले.


     

1 comment: